एका तळ्यात होती......

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज… Happy

हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?

pond_small.jpg

हम दो … और हमारे…. बाराह !!!

2013-04-13 18_52_17.jpg

पिल्लांची आई भोवती लगबग
ए आई मी काय खाऊ गं ? ए आई ही बघ आमचे फोटो काढतेय… आई चल आपण तिकडे जाऊ या…ए मला पण आई जवळ जायचय… अरे बाबा कुठेय ?

IMG_20130414_122806.jpg

पुन्हा एकदा सहपरिवार

तो सर्वात मागे दिसतोय ना तो वेडा बदक्या का कुणास ठाउक ह्या परिवाराला त्रास देत होता.
ह्या पिल्लांच्या बाबा बदकाला फड्फड उडून क्वॅक क्वॅक करून टोचायचा.. की लगेच बदकी आणि एखादं धिटूकलं बाळंही उलट प्रतिकारात्मक प्रहार केल्यासारखे त्याच्या अंगावर धावायचे. मग पुन्हा आपले लगबगीने सहपरीवार दुसर्‍या किनार्‍याकडे.. इकडे तिकडे...कारंजाभोवती.... फिरत होते... टूबूडुबू.. क्वॅक क्वॅक... तासभर तेच नाटक चालले होते.

IMG_20130415_083351.jpg

संधिप्रकाशात अजून जे सोने ?

2013-04-13 18_52_25.jpg

अंधारून आलं … चला बाळांनो पटकन घरी परतायला हवं !

IMG_20130417_040420.jpg

विषय: 

thanx all Happy

Pages