जुन घर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

भल्या मोठ्या जुन्या घरात आपण एकटच असाव
आणि रिकाम्या वेळी आठवणींनी सोबतीला याव..

ह्या इथे स्वैपाकघरात आई जेवन बनवायची
त्या तिथे मधल्या घरात बाबा आराम करायचे
परसात आजी नेहमी बागेत रमलेली असायची
कढीपत्त्याच्या वासाने लगेच भुक लागायची!

गॅलरीत मुलांचा अभ्यास कमी दंगाच जास्त असायचा
विविध भारतीवरचा कार्यक्रम सर्वात हीट असायचा!
तीन वाजता दुपारी सर्वांसाठी चहा व्हायचा
पारलेजीचा पुडा कधीतरीच घरात यायचा!

अंगणात जाई जुईची कमान फुललेली असायची
ताईने काढलेल्या रांगोळीवर मांजर येऊन बसायची
कडूनिंबाच्या झाडावर संध्याकाळी पोपट जमायचे
निबर निंबोळ्या खेळायला खाली पाडून जायचे!

रात्र पडताच भुतांच्या गोष्टी खर्‍या वाटायच्या
दिवस उगवताच आमच्यातच भुत शिरायचे
रात्रीचे जेवन अंगत-पंगतीचे असायचे
शेजारचे दोस्तमित्र घरुन ताट आणायचे!

गच्चीवर काहीतरी वाळवण चिळवण असायचे
गप्पा मारता मारता ते फस्त होऊन जायचे
मधुमालतीच्या वेलीला सहज हात पुरायचा
तिच्या फुलांचा झुपका सर्वात प्रिय वाटायचा!

भल्या मोठ्या जुन्या घरात पुन्हा एकदा सर्वांनी जमाव
वाट्याला परत काय काय येत ते अनुभवाव!!!!!!

प्रकार: 

Pages