जुन घर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

भल्या मोठ्या जुन्या घरात आपण एकटच असाव
आणि रिकाम्या वेळी आठवणींनी सोबतीला याव..

ह्या इथे स्वैपाकघरात आई जेवन बनवायची
त्या तिथे मधल्या घरात बाबा आराम करायचे
परसात आजी नेहमी बागेत रमलेली असायची
कढीपत्त्याच्या वासाने लगेच भुक लागायची!

गॅलरीत मुलांचा अभ्यास कमी दंगाच जास्त असायचा
विविध भारतीवरचा कार्यक्रम सर्वात हीट असायचा!
तीन वाजता दुपारी सर्वांसाठी चहा व्हायचा
पारलेजीचा पुडा कधीतरीच घरात यायचा!

अंगणात जाई जुईची कमान फुललेली असायची
ताईने काढलेल्या रांगोळीवर मांजर येऊन बसायची
कडूनिंबाच्या झाडावर संध्याकाळी पोपट जमायचे
निबर निंबोळ्या खेळायला खाली पाडून जायचे!

रात्र पडताच भुतांच्या गोष्टी खर्‍या वाटायच्या
दिवस उगवताच आमच्यातच भुत शिरायचे
रात्रीचे जेवन अंगत-पंगतीचे असायचे
शेजारचे दोस्तमित्र घरुन ताट आणायचे!

गच्चीवर काहीतरी वाळवण चिळवण असायचे
गप्पा मारता मारता ते फस्त होऊन जायचे
मधुमालतीच्या वेलीला सहज हात पुरायचा
तिच्या फुलांचा झुपका सर्वात प्रिय वाटायचा!

भल्या मोठ्या जुन्या घरात पुन्हा एकदा सर्वांनी जमाव
वाट्याला परत काय काय येत ते अनुभवाव!!!!!!

प्रकार: 

khupach chan vatle aiktana....thoda atishayokticha bhag hotach parantu ekandarit vatavaran nirmiti pahata chhan vatle .....vachat astana ek prashna sarkha dokavat hota ki ...kavi bahudha punyache asavet mag ata tya vadyala ase bhagna rup ka milale asave ????

बी, त्या काळच्या सगळ्या भावंडा-सवंगड्याना पाठवून दे हि कविता.
आणि मग परत सगळे एकत्र जमा.

दिनेशदा आणि मित्रहो, मी हे आता कसं सांगू सर्वांना की मला तुमच्याशीही कित्ती कित्ती भेटावस वाटत म्हणून.. !!!!

सोप्पी, सहज...
खरतर जुन्या मायबोलीतलं... शेजारच्यातलं कुणी येऊन जुन्या आठवणी काढून बसल्यासारखं. Happy
आहात कुठे राव?
हरवू नकोस बरं पुन्हा...

भल्या मोठ्या जुन्या घरात पुन्हा एकदा सर्वांनी जमाव
वाट्याला परत काय काय येत ते अनुभवाव!!!!!!
सुंदर
पण हे सर्व आठवयाचाच फक्त. अनुभवयाला ते घर आता कुठून आणायचं. आणि ती सर्व माणस कुठून आणायची.

जुन्या घराबद्दलच्या भावना छान मांडल्यात.
[ बहुतेकांच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय, माझाही. मीं फार पूर्वीं इथं पोस्ट केलेल्या ओसाड पडलेल्या घराविषयींच्या 'वास्तु' कवितेतील हें शेवटचं कडवं -

वटसावित्रीचं अधिष्ठान, वटवाघळांचं झालयं बस्तान
कलंडल्या माडीला, लोंबकळतोय या घराचा प्राण
त्यांतल्या माणसांमुळेच येतं , घराला म्हणे त्याचं घरपण
कां बरं न दिलं माणसाना, घरानेही आपलं माणूसपण.
]

छान कविता, बी.

आमच्याकडे सुट्टी पडल्यापासून रस्त्यावरच्या झाडांना मस्त झोके बांधलेत मुलांनी. दिवसभर या झाडांच्या सावलीम्धे उन्हाळी खेळ रंगलेले असतात. ते सगळं खिडकीतून बघतच तुझी ही कविता वाचली. Happy

व्वा! छानच आहे कविता. अगदी बालपणात घेऊन गेली. फक्त आमच्याकडे गच्ची नव्हती. Happy

वटसावित्रीचं अधिष्ठान, वटवाघळांचं झालयं बस्तान
कलंडल्या माडीला, लोंबकळतोय या घराचा प्राण
त्यांतल्या माणसांमुळेच येतं , घराला म्हणे त्याचं घरपण
कां बरं न दिलं माणसाना, घरानेही आपलं माणूसपण. ]>>>>>>>>>अगदी हुबेहुब वर्णन.

भल्या मोठ्या जुन्या घरात पुन्हा एकदा सर्वांनी जमाव
वाट्याला परत काय काय येत ते अनुभवाव!!!!!!

माझ्या हाताला आता आईच्या जेवणाची चव यावी
तिचा हात धरून माझी लेक अंगणात बागडावी
लेकी बरोबर तिची आत्ते मामे भावंड असावीत
नाव-गाव-फ ळ-फुल यात ही पीढी पण रमावी

नणंदा भावजयांबरोबर शिळोप्याच्या गप्पा होतील
करीअर, मुले, गावची प्रॉपर्टी कोणत्याही गोष्टी वर्ज्य नसतील
रात्रीचं जेवण, संध्याकाळची बाग असे मस्त प्लॅन बनतील
मुलांबरोबर शिंग मोडून आत्त्या, मामाही दंगा करतील

हीच मुलं मोठी होऊन बालपणीचा काळ आठवतील
त्यांच्या ब्लॉगमध्ये माझी - तुमची गंमत लिहीतील!!

Pages