कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची. 'संग्राम स्टाईल' कुडते (म्हणजे रंगारी लोकं उघड्या गळ्याच्या नी कोपरापर्यंत हात असलेल्या बंड्या घालतात त्या), बेकहम सारखी 'मोहिकन' हेअर स्टाईल, अशा काही ना काही साथी इथे सदैव चालू असतात. त्यात खाणं म्हणजे जीव की प्राण. एक मटण म्हटलं तरी ते 'निलेश'चं, 'महादेव'चं, 'परख'चं असे पाठभेद असतात. दोने़कशे खानावळींपैकी कुणाला तरी अचानक मटका लागतो की आयला नादखुळा म्हणत सगळे तिकडे धावायला मो़कळे. दोन तीन महिन्यात पुन्हा कोणीतरी नवा शोधून काढतात.
'अख्खा मसूर' हा पदार्थदेखील कोल्हापुरी खाद्यक्षितिजावर असाच उगवला. हा मूळचा कोल्हापूरचा वाटत नाही. कोल्हापूरला 'रस्सा'पान करायला आवडते. मिसळीबरोबर कट (पातळ भाजी) आणि जेवणाबरोबर तांबडा-पांढरा रस्सा 'वढ की वढ' म्हणून ओरपल्याखेरीज आमचे पैसे वसूल होत नाहीत. त्यामुळे हा टोटली कोरडा पदार्थ कोल्हापूरच्या गृहिणीने निश्चितच शोधलेला नाही. पण दहा बारा वर्षांपासून हा एकदम 'ग्लॅमराईझ' झालाय. मुख्य म्हणजे नवलाईचा आवेग कमी झालाय पण प्रेम मात्र टिकून असल्याने कथा रोमिओ-रोझलीनची न होता रोमिओ-ज्युलिएटची झालीय, तीही सुखांतिका.
वेगवेगळ्या छोट्या हॉटेलांतून याची रेसिपी मिळवायचा मी बराच प्रयत्न केला. खूप करमणूक झाली (आत्ता लिहीत नाही, काळजी नसावी!). शेवटी बरीच सर-मिसळ हाती लागली. मायकेलँजेलोच्या चिवटपणाने जरा एडिटिंग केल्यावर ही खालची रेसिपी तयार झालीय. यात काय आहे नी काय हवे आहे यावर मौलिक चर्चा होईलच पण कोल्हापुरात मिळणार्या अख्खा मसूरची ही बर्यापैकी ऑथेंटिक रेसिपी आहे असे मानायला हरकत नसावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
"अख्खा मसूर"
साहित्य
भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ
कृती
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?)
तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा.
कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.
ता.क. यात लसूण, कढीलिंब, हिरवी मिरची काही नसल्यानं आधी मीही थोडा साशंक होतो. अर्थात त्यांच्यासकटही चांगलंच , सॉरी, नादखुळाच लागेल.
जर चवळी नसेल तर मला ते
जर चवळी नसेल तर मला ते फोटोतले कडधन्यं म्हणजे बिन मोडाचे मुग वाटतायेत , अख्या मसुर डाळीचा रंग काळपट चॉक्लेटी असतो ना ?
मसुराची उसळ कशीही करा , हा असा बेसिक कडधान्याचा कलर या लिंक मध्धल्या फोटो सारखा दिसायला हवा ना
http://ruchii.wordpress.com/2007/06/21/masoor-dal-with-goda-masala/
श्रावण घेवडा सारखं इथेही कनफ्युजनवा दिसतय
लोला
लोला
मसूर न वाटायला काय झालं?
मसूर न वाटायला काय झालं? बाजूला काळं काळं जे दिसते आहे ज्यामुळे पब्लिकला ती चवळी वाटतीये, ती मोहोरी आहे.
'बाकी धडधडीत अख्खा मसूर असे
'बाकी धडधडीत अख्खा मसूर असे नाव लिहून मी मायबोली सारख्या स्थळावर चवळ्या दडपून देऊ शकतो इतपत 'डेरिंग' माझ्यात असेल अशी शंका बाळगणार्यांना भक्तिभावाने नमस्कार''
पण खरा प्रॉब्लेम श्रा घे
पण खरा प्रॉब्लेम श्रा घे सारखा आहे , प्रत्तेक जण मसुर कशाला म्हणतो आणि चवळी कशाला
अक्खे मसूर या रंगांत मिळत
अक्खे मसूर या रंगांत मिळत असल्याने एंड प्रोडक्ट चा रंग त्या त्या रंगावर अवलंबून असेल
अमेय.. तुझ्याकडले मसूर यापैकी कोणत्या रंगाचेत रे बाबा...
वर्षु, ते पहिलेच मला मसुर
वर्षु,
ते पहिलेच मला मसुर म्हणून माहितेत :).
दुसरी डाळ पाहिलिये इं ग्रो मधे , ते पण मसुर माहित नव्हतं !
इथे पण तेच(श्रा. घे टाईप
इथे पण तेच(श्रा. घे टाईप चर्चा)? उठाले रे बाबा, मसूर को.
अमेय, तुम्ही कुठले आहात त्यानुसार मसूर नक्की काय असते अशी कहाणी सुरु करा.
लोला
लोला
लोलाताई, आपला प्रतिसाद पाहून
लोलाताई, आपला प्रतिसाद पाहून खेद वाटला. माझे लिखाण कोणाला किती आवडावे वा अगदी टाकाऊ वाटावे हा ज्याच्या त्याच्या रुचीचा भाग आहे. जेव्हा लिखाण प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्यावर प्रतिसाद येणार हेही मला माहित आहे.
एक गोष्ट निश्चित की उगाच कुणाची चेष्टा करण्यासाठी, कुणाशी वाकूडपणा घेण्यासाठी अथवा शब्दांचे वाद खेळण्यासाठी मी कुठेही एक शब्दही उणा लिहिलेला नाही याची मला संपूर्ण खात्री आहे. अशा स्थितीत अकारण मागच्या लिखाणातील संदर्भ इथे अनाठायी देऊन आपण मला दुखावत आहात. असे करु नये ही विनंती, एवढेच. या पोस्टवर लिहिलेला मजकूर आणि त्यायोगे आलेले बरे-वाईट प्रतिसाद स्वागतार्हच आहेत. बाकी जो आप ठीक समझो.
फोटो आवडला ! पब्लिकच इथे पण
फोटो आवडला !
पब्लिकच इथे पण कन्फ्युजन का ?
मसुराची डाळ थोडीशी केशरी रंगाची असते ना ?
'बाकी धडधडीत अख्खा मसूर असे नाव लिहून मी मायबोली सारख्या स्थळावर चवळ्या दडपून देऊ शकतो इतपत 'डेरिंग' माझ्यात असेल अशी शंका बाळगणार्यांना भक्तिभावाने नमस्कार'' >>>
>>अशा स्थितीत अकारण मागच्या
>>अशा स्थितीत अकारण मागच्या लिखाणातील संदर्भ इथे अनाठायी देऊन आपण मला दुखावत आहात.
असं झालं होय, बर.
म्हणजे तुमच्या कोणत्याच मागच्या लिखाणातले संदर्भ नंतरच्या कुठल्याच लिखाणावर द्यायचे नाहीत म्हणता? की फक्त त्या लेखनाचा संदर्भ आला म्हणून दुखावलात? त्या लेखनावर तुम्ही जे "विसरलात" त्याबद्दल इतरांच्याच बर्याच प्रतिक्रिया आहेत, तेव्हा दुखावला नाहीत का? की दुखावलात म्हणून तिकडे पुन्हा फिरकला नाहीत.. आणि आता मी इथे जे लिहिले त्यामुळे आठवण होऊन पुन्हा दुखावलात? तेव्हाही दुखावला असाल तर मग तिथे ज्यांनी लिहिले त्यांना तेव्हा का नाही सांगितले ते? तिथे मी अंड्याबद्दल एक प्रश्न विचारलाय त्याचेही उत्तर दिलेले नाहीत. बाकींच्यावर रागावला असाल, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे की!
मूळ कारण मी नसताना उगाच मला काहीही बोलू नका.
वर्षू तुमच्याकडं भरपूर विनोदबुद्धी आहे म्हणतेय पण मला शंका आहे आता.
>>बाकी जो आप ठीक समझो
हे मला तुम्ही सांगायची गरज नाही.
धन्यवाद.
मसुराच्या डाळीचा फोटो . का
मसुराच्या डाळीचा फोटो .
का कुणास ठाऊक ,हल्ली माझ्या किचनमधल्या ज्ञानाचा (?) मला अभिमान वाटायला लागलाय
श्री,
श्री,
लाजो जरा मी दिलेली लिंक तरी
लाजो जरा मी दिलेली लिंक तरी उघडुन बघ
आख्खा मसूर म्हणून मराठा
आख्खा मसूर म्हणून मराठा दरबारचा फोटो दिलाय. त्यात आणि अमेयच्या फोटोत काय फरक आहे हे कोण सांगेल ? जर अमेयची डाळ मसूर नसून चवळी असेल तर मराठा दरबारची मसूर का म्हणायची ? अमेयची डाळ चवळी असेल तर चवळीचा फोटो कुणी देईल का ? अमेयच्या मागच्या लिखाणात प्रस्तावना अनावश्यक होती. पण दिलीच तर काल्पनिक कथा रेसिपीसाठी तडका म्हणून लोकांनी घेतली. रेसिपी सोडून अनावश्यक डिटेल्समधे घुसून लेखक किती बावळट आहे हे सिद्ध करणा-यांना शहाणं समजायचं का ? मूठभरांना हा प्रॉब्लेम का आहे ?
अमेयजी कशाला रेसिपी देता
अमेयजी
कशाला रेसिपी देता लोकांसाठी ? बंद करा ही सेवा. तुम्ही पुरूष असून किचन मधे काम करता याचं कौतुक करायला हवं. तुमचं उदाहरण इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. स्त्री-पुरूष समानता अशा चर्चेत तुम्हाला वेड्यात काढणा-यांकडून या प्रकारची मतं व्यक्त होत असतात नेहमी. नव-याला किचनमधे काम करायला प्रोत्साहन दिलं पाहीजे असं तुमच्या मागच्या धाग्यावर वेड्यात काढणा-या एका आयडीने लिहीलं होतं. पण वेळोवेळी आपण त्या धाग्यावर काय भूमिका घेतली होती आणि इथं काय घेतो याचं विस्मरण होऊ शकतं. ते काहींना चालतं. तुम्हाला नाही चालू शकणार हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. प्रोत्साहन या शब्दाचा अर्थ आमच्याकडे चुका सांभाळून घेऊन उत्तेजन देणे असा होतो. यांच्या गावाला वेगळा होत असेल तर माहीत नाही. त्यातही सोयीप्रमाणे जन्मगाव, शिक्षणाचं गाव कि नोकरीचं गाव हे कन्फ्युजन आहेच.
ज्ञानी व्यक्तीकडे दयाभाव असतो हे लक्षात असू द्यावे.
अहो भुंपो, तुमच्या ब्राउजरची
अहो भुंपो, तुमच्या ब्राउजरची सेटिंग्ज कशी आहेत मला माहीत नाही, पण मराठा दरबार आणि अमेय यांच्या फोटोत दोन मोठे फरक आहेत. (कडधान्याचा) रंग आणि मोहरी. (पोपटांना कडधान्यांतला फरक दिसू नये हे एक नवलच!)
>> यात काय आहे नी काय हवे आहे यावर मौलिक चर्चा होईलच
असं अमेय यांनी लिहिल्यामुळे ती मराठा दरबारची रेसिपी शेअर करण्यात आली. त्यात तुम्हाला चिडण्यासारखं काय आहे? त्यांना नसेल आवडलं तर ते 'माझ्या रेसिपीवर कोणी काही (इस्लाह?) सुचवू नका' असं सांगतील की ते. ते काही असलं डेअरिंग करायला घाबरणार्यातले दिसत नाहीत. आणि त्यांना प्रोत्साहनाची गरज असेल असंही खरंतर दिसत नाहीये.
शिवाय पुरुषांना प्रोत्साहन द्यायचं म्हणजे 'मसूर अशी चवळीसारखी का हो दिसते आहे' असंही विचारायचं नाही होय! मग काय म्हणायचं शंका असेलतर? श्रावणघेवड्याचा बाफ वाचला नाहीत का? असतात शंका. तिथे कुठे चिडले नाहीत रेसिपीकार ते त्यावरून! स्त्री की पुरुष हा तर विषयच कोणी काढलेला नाही इथे तुमच्याआधी. नाही म्हणायला कांदापोहे आणि श्री यांनी मसुरीच्या डाळीला अख्खा मसूर समजायची जुर्रत केली आहे, पण त्यांना दाखवली आहे की सर्वांनी दयाबुद्धी!
शिवाय अभिप्राय अनुकूल होते तेव्हा चाललं होतं की वाचकांनी अनावश्यक डीटेल्समधे घुसलेलं! मग आता काय प्रॉब्लेम आहे?
आणि 'बंद करा ही सेवा' म्हणजे काय? ही सेवा चालली आहे होय?! कोणाची?
अमेय, तुम्ही एवढ्या विनोदी ढंगाने लेख, रेसिप्या लिहिता तेव्हा थट्टामस्करी चालवून घ्याल, नव्हे त्यात गंमतीने सामीलही व्हाल असा माझ्यासकट अनेकांचा समज झाला होता इथे. तो चुकीचा दिसतोय. असू दे. तरीही तुम्हाला हार्दिक प्रोत्साहनच हं.
तुम्ही पुरूष असून किचन मधे
तुम्ही पुरूष असून किचन मधे काम करता याचं कौतुक करायला हवं. >>>> धोक्याचं वळण. गाडी जपून चालवा.
अमेय, नेहमीप्रमाणे चांगली
अमेय, नेहमीप्रमाणे चांगली रेसिपी आणि प्रेझेंटेशन. कोल्हापुर भागात हा प्रकार एव्हढा फेमस असेल हे ठाऊक नव्हते.
मी अगदी अशाच पद्धतीने 'अख्खा मसुर' करते फक्त टोमॅटो बारीक चिरुन घालते. कधी कधी वाढण्यापुर्वी वरुन थोडे क्रीम घालते.
too many cooks spoil the
too many cooks spoil the broth.
अमेय, रेसीपी चांगली आहे...आणि
अमेय, रेसीपी चांगली आहे...आणि लिखाणही छान !! करून पाहीली खुप आवडली.
अमेय छान रेसिपी, सोपी आहे.
अमेय छान रेसिपी, सोपी आहे. करुन बघेन. फोटोपण कलरफुल.
अक्का मसूर - सकाळ सकाळी तो पा
अक्का मसूर - सकाळ सकाळी तो पा सु , कोल्हापूर कराड रोड वर N H -4 वर कामेरी गावाच्या थोडेशे मागे एक पाटील ढाबा म्हणून आहे ........ एक नंबर , नाही नाद खुळाच अक्का मसूर मिळतो इथे ..
हायवे चे बरेच लोक्स रस्ता वाकडा करून तिथे ताव मारतात (अर्थात ज्यांना हा ढाबा आणि याची खासियत माहित आहे ते )....
आजच आणलीय टिफिन मध्ये ही
आजच आणलीय टिफिन मध्ये ही भाजी. इतकी फेमस आहे हे माहित नव्हते.
पदार्थ भन्नाट लागतो हा
पदार्थ भन्नाट लागतो हा चवीला.
रेसीपी बद्दल काही नाही ठाऊक मात्र तासगावात एका धाब्यावाल्याने सांगीतलेले की जितका मसुर तितकाच कांदा असावा लागतो वगैरे.
पण फोटोत दिसणारे धान्य
पण फोटोत दिसणारे धान्य निश्चित पणे मसूर नाहीच.. एकतर ती चवळी आहे किंवा वाटाणा.
मसूर ढेकणा प्रमाणे दिसतात
डार्क ब्राऊन.
मसूरच आहे ती. दुसर्या फोटोत
मसूरच आहे ती. दुसर्या फोटोत सहज ओळखता येतेय.
मला मसुरच दिसतायेत, वरती
मला मसुरच दिसतायेत, वरती मोहोरी आहे असंच दिसतंय.
अमेय भन्नाट रेसीपी... मी
अमेय भन्नाट रेसीपी... मी नक्की करणार.
Pages