- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग
- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.
- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्या भाताबरोबरही चविष्ट लागते.
हैला, ही चर्चा वाचून मला
हैला, ही चर्चा वाचून मला अत्यंत आनंद झालाय ! मेरे जैसे और कई (लै) है.
अखेर ही भाजी केली. कांदा,
अखेर ही भाजी केली. कांदा, हिरव्या मिर्च्या, आलं आणि चिमूटभर का होईना, पण साखर हे नवे घटक होते. चव आवडली. धन्यवाद ललिता!
मध्येच शे. दा. तु. आणि
मध्येच शे. दा. तु. आणि भाताच्या शितासारखं काय दिसतंय?
हळदीशिवाय मजा नाही..
>> शे. दा. तु. म्हणजे शें दा
>> शे. दा. तु.
म्हणजे शें दा कु का? ती (चणा)डाळ असेल .. हळद नाही म्हणून अशी दिसत असेल ..
>> भाताच्या शितासारखं
विकतचं फ्रोझन खोबरं असावं ..
मी बहुतेक रुचिरा मध्ये वाचलं होतं की हिरव्या (शेंगांच्या) भाज्यांनां हळद फार कमी घालायची असं .. त्याने म्हणे हिरवा रंग जास्त चांगला दिसतो ..
नाही तु (तुकडे). >>हिरवा रंग
नाही तु (तुकडे).
>>हिरवा रंग जास्त चांगला दिसतो
हो, पण तसा तो राहिला पाहीजे ना.. दणकून वाफ काढली की शेवाळ होतं.
दणकून वाफ काढली की शेवाळ
दणकून वाफ काढली की शेवाळ होतं. >>>>>>>>>> ईईई आता वाफेवर दणकून शिजवल तर हेच आठवेल
आज ही भाजी केली. युएस मधे
आज ही भाजी केली. युएस मधे मिळतात त्या French style cut frozen beans घातल्या. वेगळ्या चवीची आणि झटपट भाजी तयार. धन्यवाद ललिता!
आम्ही यास पाधीती नि करतो पण
आम्ही यास पाधीती नि करतो पण कांदे चा एवजी लसुन वापरतो. या हि प्रकारे कराय ला आवडेल अगदी उद्याच
अखेर ही भाजी केली. कांदा,
अखेर ही भाजी केली. कांदा, हिरव्या मिर्च्या, आलं आणि चिमूटभर का होईना, पण साखर हे नवे घटक होते. >> आक्का श्रावण घेवडा म्हणून काय वापरले तेव्हढे लिहायचे राहून गेले बघ
असामी
असामी
काय ठरल शेवटी ? घेवडा, श्रा
काय ठरल शेवटी ?
घेवडा, श्रा घे की फरसबी की फ्रेबी ?
हा लेख वाचून माझ्या सर्व
हा लेख वाचून माझ्या सर्व बीन्स बद्दल च्या संकल्पनांचे वैचारिक अधिष्ठान हलले आहे. ☺️☺️
ही फरसबी/ फरसी (
ही फरसबी/ फरसी ( भाजीवाल्यांचा शब्द ) असणार. वांगी शेवगासह करतात तो नसणार. खोबरे अधिक तेवढे बरे हे खरेच.
किंचीत मीठ घातलेल्या पाण्यात पाच मिनिटे उकळून घेतले तुकडे की रंग छान राहतो आणि चव राहते. थोडे गाजराचे तुकडेही टाकतो. मग पाणी सुपात वापरायचे आणि फोडींवर उडीद डाळ,लाल मिरची फोडणी घालून हलवायचे. ओले खोबरे मिसळायचे. अशी करतो.
फोटो छान दिसतो आहे.
काल केली ही भाजी. घरच्यांना
काल केली ही भाजी. घरच्यांना सगळ्यांना आवडली. साखर वगळली पण बाकी सर्व तंतोतंत फॉलो केलेलं.
Pages