श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवर्‍यांना या चर्चेत आणायला पाहिजे. मग अजून गोंधळ, नवनवे शोध अन "आम्ही तुमच्या बीन्सलाच गवार म्हणतो अन त्याची भाजी फक्त माझी आईच चांगली करते" वगैरे वगैरे फार मजा येईल. Lol

नंदिनी हो बरोबर. पण श्री च्या फोटोत वालाच्या शेंगा आहेत. तो श्राघे नव्हे हे मात्र नक्की. Proud अन त्या वालाचे उपप्रकार म्हनजे वालपापडी अन सुरती पापडी. (चपटे वाल).

वरदा, मी अजून आलेच नाहीये लिहायला या धाग्यावर. Happy
आई, या शेंगांना फरसबी म्हणते आणि मी बीन्स. मी याचं अजून एक नाव औरंगाबादला ऐकलं होतं, बीन्निसच्या शेंगा. (बीन्सचा अपभ्रंश असेल हा).

हिंदीतही आम्ही या शेंगांना बीन्स म्हणतो आणि जर चपट्या शेंगा असल्याच भाजीवाल्याकडे तर मी येवाली फल्ली कैसे दी? असं विचारते. हिंदी नाव माहित नाही. चपट्या शेंगांना ऊसावरच्या शेंगा, वालपापडीच्या शेंगा म्हणतात आईकडे. या दोन्ही एक की वेगवेगळ्या मला माहित नाही. या रेसेपीवाल्या बीन्स सोडल्या तर बाकीच्या शेंगांची भाजी खाऊन य वर्ष झालीत.

ही रेसेपी माझी मामी करते. छान लागते.

मी याचं अजून एक नाव औरंगाबादला ऐकलं होतं, बीन्निसच्या शेंगा. (बीन्सचा अपभ्रंश असेल हा). >> हो, हो, माझी काकू औरंगाबादची आहे - ती या भाजीला बिन्निसची भाजी असंच म्हणते.

श्री च्या फोटोतला श्रावण घेवडा अज्जिबात नाही!
एकवेळ ललीच्या फोटोत आहे म्हटलं तर चालेल पण श्री च्या फोटोत श्रा घे नाही!

अरे तो वाद जाऊ द्या रे. किमान जिने आपल्या सगळ्यांना वादासाठी एवढे मोठे व्यासपीठ दिले त्या ललिताला धन्यवाद द्या चांगली रेसेपी दिल्याबद्दल्.:फिदी:

खरे तर नेहेमी मोहरी, हळदीच्या नेहेमीच्या फोडणीपेक्षा कधी कधी ही उडिद, कडीपत्त्याची फोडणी पण मस्त लागते, कोबी थोरन सारखी. आणी ललिताने म्हंटल्याप्रमाणे खरच ही भाजी नुसत्या वाफेवरच शिजवुन चविष्ट होते.:स्मित:

मी एकदा जॉशींकडे गेलो होतो. उनपावसाचे दिवस होते. भूक लागली होती. ऑर्डर केल्याबरोबर ते म्हणाले बाळ घे वडा. तेव्हांपासून श्रावण आला कि त्या दिवसाची आठवण होते आणि श्रावणघेवडा म्हणजे जोशी वडेवालें कडे मिळतो तो असं वाटतं.

Lol

कित्ती ते कन्फ्युजन! Proud

मीही करते अशी भाजी... त्यात भरपूर खोबरं, कढिलिंब ... कधी कधी कांदा घालत नाही त्याऐवजी थोडा ओवा हातावरच भरडुन वरतुन पेरते Happy मस्त स्वाद येतो आनि बीन्स बाधतही नाहित Wink

लोला नाशकात ह्यालाच श्रावणघेवडा म्हणतात, बाकी सगळ्या शेंगा >> भलतच काहितरी! श्रा.घेवडा/फरसबी म्हणजे
मी-पुणेकरच्या फोटोतला.

काकड्यात काकड्या ,पर्शिअन काकड्या .
आमचा पुणेरी श्रावण घेवडा तेवढा बरोबर,
बाकी सगळ्या पापड्या Proud

काकड्यात काकड्या ,पर्शिअन काकड्या .
आमचा पुणेरी श्रावण घेवडा तेवढा बरोबर,
बाकी सगळ्या पापड्या >>> डीज्जे! Biggrin

फुगडीचा उखाणा :

फुगडी खेळू दण्णादण्णा, रुपये मोजू खण्णाखण्णा
गुलाबराव म्हणतात फरसबीलाच श्रावणघेवडा म्हण्णा, तर म्हण्णा Proud

इब्लिस, ते पावटे! त्याचे मराठी "अमर चित्र कथा" पुस्तक होते. त्याचे नाव "जॅक आणि पावट्याचा वेल".

तुमच्या भाजीला "फरसबी" असे नाव आहे ना, मग तेच म्हणा की फक्त. आमची भाजी दिसतेय वेगळी तर त्याला काय म्हणणार मग? तेव्हा तुम्हाला ते ग्रीन बीन्स फरसबी म्हणून ठेवा. आमचा श्रा घे राहूदे!

अजुन चालुच का? Lol

एक म्हण आहे ना.... '*** ला पावट्याचं निमित्त' .....

ललीने श्रा घे रेस्पि काय टाकली ...पावटे / घेवडे / बीन्स कन्फ्युजनला निमित्त मिळाले Lol

Pages