Submitted by हर्षल_चव्हाण on 25 April, 2013 - 06:16
पुन्हा हात हाती धरू एकदा,
'कुणी' जिंकण्यासी, हरू एकदा...
जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...
तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...
कधी सोडला हात धुंदीमधे,
जरा दु:ख त्याचे करू एकदा...
जगत राहिलो एकमेकांमुळे,
अता त्याचसाठी मरू एकदा...
==================
हर्षल (२५/४/२०१३ - दु. २.००)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली !
आवडली !
धुंदीमध्ये--- गा गा गा
धुंदीमध्ये--- गा गा गा गा
धुंदीमधे चालेल
तुझा उंबरा लांघला रे
तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा
क्या ब्बात !!!
मस्त रे. आवडली.
मुक्तेश्वर, अरविंदजी, आणि
मुक्तेश्वर, अरविंदजी, आणि किरण : प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरविंदजी : 'पुन्हा' हा शब्द जसा 'लगा' घेतो तसंच 'मध्ये' वाचलं की चालतं असं माझं मत. तुमची सुचनाही योग्यच आहे
धुंदीमधे चालेल
धुंदीमधे चालेल +१
धुंदीमध्ये... वाचायला थोडस अडखळायला झाल.
सुंदर! आवडली.
सुंदर! आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<< 'पुन्हा' हा शब्द जसा
<<< 'पुन्हा' हा शब्द जसा 'लगा' घेतो तसंच 'मध्ये' वाचलं की चालतं असं माझं मत >>>
जाणकार सांगतीलच्,खरे काय !
हायला, तु गझलकार
हायला, तु गझलकार आहेस!!!
मस्तच, आवडली.
का कोण जाणे फारशी भावली
का कोण जाणे फारशी भावली नाही
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्षमस्व
छानच्...........आवडली......
छानच्...........आवडली......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सार्यांचे आभार वैभव,
सार्यांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्येक वेळी नाहीच ना जमत, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन
(यात आयुष्याच्या उताराला आलेलं जोडपं, त्यातली स्त्री, जोडीदाराला सांगू पाहत आहे असा एक विचार होता. आयुष्यभर ज्या गोष्टी प्रयत्न करून जमल्या नाही किंवा राहून गेल्या किंवा एखादी सुखद आठवण, त्या शेवटच्या वेळी; किंवा पुन्हा एकदा करून पहाव्यात असा तिचा प्रयत्न...)
वैभव, तुमच्या स्पष्ट प्रतिसादाबद्दलही आभार
शेवटचा शेर आवडला. ('मधे'
शेवटचा शेर आवडला. ('मधे' याच्याशी सहमत आहे).
जरी वय न झाले, मनाचे तरी, कसे
जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...>>व्वा!
तुझा उंबरा लांघला रे
तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...>>> हा सर्वात आवडला.
धन्यवाद बेफिकीरजी, सुशांत आणी
धन्यवाद बेफिकीरजी, सुशांत आणी भिडेकाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बदल केला आहे
कधी सोडला हात धुंदीमधे, जरा
कधी सोडला हात धुंदीमधे,
जरा दु:ख त्याचे करू एकदा.........आवडेश !!
तिलकधारी आला आहे. गझल सफाईदार
तिलकधारी आला आहे.
गझल सफाईदार व्हायला हवी.
तिलकधारी निघत आहे.
अपेक्षाभंग. शुभेच्छा.
अपेक्षाभंग.
शुभेच्छा.
ठीकठाक. प्रयत्न करीत राहा.
ठीकठाक.
प्रयत्न करीत राहा. सफाई आपोआप येते.
पुलेशू.
जयश्रीजी : धन्यवाद तिलकधारी,
जयश्रीजी : धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिलकधारी, समीर आणि गंगाधर जी : प्रयत्न करेन अजून चांगली लिहिण्याचा