मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

Submitted by वैवकु on 21 April, 2013 - 06:54

दैवाच्या गरम तव्यावर अस्तित्त्व थापले आहे
हळवेपण माझ्यामधले करपून चालले आहे

माझ्या ध्येयाचा आहे अंधारगावचा पत्ता
रस्त्यात दिव्याच्या खाली आयुष्य..थांबले आहे

वांझोट वाटते आहे संसारसुखाची शैया
कुठल्या वेश्येवर माझे वेडे मन जडले आहे ........ ( ##)

बोलणार नाही आता त्या तुझ्या विठ्ठलाशी मी
रुक्मिणीसारखे माझे ...'असलेपण' रुसले आहे

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

तू नकोस परतू आई थोपटून देण्यापुरती
रडरडून काळिज माझे अत्ताच झोपले आहे





_________________________________-

(##) =एक बेफीजींची ओळ होती , आय थिंक ती अशी होती की ...<<< हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले >>> !! ....त्यावरून
बेफीजी परवानगी न मागीतल्याबदल क्षमस्व!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही आता या धाग्यावर प्रतिसाद देणे थांबवा<<<<<<<<<<

हे सांगण्याचा अधिकार तुझा नाही!
शायर गझल पोस्ट करू शकतो इथे, प्रतिसाद कुणी व कसा द्यावा, कुणी प्रतिसाद देऊ नये हे प्रतिसाद देणा-याचे डिस्क्रिशन आहे!
टीप: एखाद्या धाग्याचे भवितव्य तो धागा उघडणा-या व्यक्तीचेच कर्तुत्व असते!
४६मुद्यांच्या अभ्यासपूर्वक व वेळेची पदरमोड
करून दिलेल्या प्रतिसादाला बगल देऊन ज्या गोष्टीचा अधिकार नाही ती गोष्ट अनावश्यकपणे तू करत आहेस! तेव्हा हे थांबवायला हवे! अशा तुझ्या शैलीवरूनच तुझ्या गझलगांभिर्याचा पत्ता लागतो!

***************इति कर्दनकाळ

अयाई... वितंडवादाची वखवखच.
समजा कोणत्याही खाजवून खरूज काढू इच्छिणार्‍या प्रतिसादाला सगळ्यांनिच पूर्णतः अनुल्लेख केला तर? कित्येकजण (गझल वाचक, मायबोलीचे सर्व्हर्स, सीपियू वगैरे सुद्धा) किती सुखी होतिल... जगात थोडी अधिक मानसिक शांती नांदेल असं मला अगदी मनापासून वाटतं.

वैभव, गझल खरच छान आहे. मला मतल्यासकट सगळेच शेर आवडले. काहून वगैरेंनी नाद समॄद्धं झालीये गझल. त्यात काही ओढून ताणून आहे असं नाही. ह्या गझलमधे तरी विठ्ठल शोभतोय.
तुमच्या आईंचा स्वर्गवास ही वस्तुस्थिती ही गझल वाचताना माझ्यातरी विस्मॄतीत होती. त्यामुळे त्या शेराचा वेगळाच अर्थं लागला... कवीच्या, लेखकाच्या किंवा एकुणात कलाकाराच्या निजी आयुष्याबद्दल माहीत नसताना (किंवा माझ्यासारखं संपूर्ण्तः विस्मॄतीत) कलाकृती ही तुम्ही निव्वळ कलाकृती अन तिचा तुमच्याशी संवाद ह्या आणि इतक्याच पातळीवर अनुभवू शकता. तो अधिक समृद्धं अनुभव असतो नै?

आणि ते बेफींचं वाचून अगदी..."अगदी अगदी" झालं. इथे "हे मा वै म" हे इतक्यांदा वाचलय. असं म्हणून मतप्रदर्शनाच्या कोणत्या जबाबदारीतून सुटका करून घेतात लोक कुणास ठाऊक... डिस्क्लेमर दिल्यासारखं... कायतरीच.

नाटके करतात, ती नुसती निहाळा!
तोतयांना योग्य वेळेला पिटाळा!!

बोलणे घेऊ नये त्याचे मनावर!
चाड ज्ञानाची, वयाची ना टवाळा!!

**************इति कर्दनकाळ

दैवाच्या गरम तव्यावर अस्तित्त्व थापले आहे
हळवेपण माझ्यामधले करपून चालले आहे

तव्यावर भाकरी करपते तसं हळवेपण करपून चाललंय. भारी आहे कल्पना. चुलीपुढं बसून भाकरी शेकताना पाहीलेल्या कवीला सुचेल असा खयाल आहे. या दोन ओळीत काव्य ओतप्रोत भरलंय. सही.

माय गझल पण आहे!!!!<<<<<

घाणेरडा प्रतिसाद .......
निषेध !!

Pages