तुझा शोधतो चेहरा आजही

Submitted by आनंदयात्री on 18 April, 2013 - 00:08

नको वाटतो उंबरा आजही
हवासा तरी आसरा आजही

जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही

तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही

कुठे वेस नाहीच गगनास या
अडवतो मला पिंजरा आजही

अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही

सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!

तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/04/blog-post_17.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! दुर्लक्षणार म्हटल्याबद्दल, पण आम्ही मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार!

सगळेच शेर सुंदर, नचिकेत!
विशेषतः
"तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही" >> हा खूप आवडला

Pages