Submitted by आनंदयात्री on 18 April, 2013 - 00:08
नको वाटतो उंबरा आजही
हवासा तरी आसरा आजही
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही
तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही
कुठे वेस नाहीच गगनास या
अडवतो मला पिंजरा आजही
अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!
तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/04/blog-post_17.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर गझल... चरा, मोगरा...
सुंदर गझल... चरा, मोगरा... सुंदर जमलेत!!!
वा वा, मस्त गझल आहे. जरी
वा वा, मस्त गझल आहे.
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!
अधिक आवडले हे शेर!
पिंजरा हा शेरही मस्त झाला आहे.
धन्यवाद.
जरी सावलीने तळे झाकले तळाशी
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही <<< सुंदर शेर >>>
जरी सावलीने तळे झाकले तळाशी
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही
अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही
<< क्या बात !
वा
वा सवयीप्रमाणे..............अप्रतिम गझल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप आवडली.......
गझल चांगली आहे
गझल चांगली आहे
मुक्तेश्वर तुम्ही दिलेला
मुक्तेश्वर तुम्ही दिलेला पर्याय मीटरमध्ये नाही. तसेही, पर्यायाची त्या शेराला आवश्यकताही नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुक्तेश्वर तुम्ही दिलेला
मुक्तेश्वर तुम्ही दिलेला पर्याय मीटरमध्ये नाही. तसेही, पर्यायाची त्या शेराला आवश्यकताही नाही.
>> आम्हाला अजुन कळत नाही हो पण तो तसा वाचला
धन्यवाद !
सुगंधापुढे रंग हरतोच ना? बघा
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!
तुझी मोहमायाच छळते अशी -![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझा शोधतो चेहरा आजही
>>
वाह।। अप्रतिम
मस्तच
सर्वच शेर छान झालेत चरा,
सर्वच शेर छान झालेत
चरा, पांढरा व भोवरा सर्वाधिक आवडले
क्या बात!!
क्या बात!!
जरी सावलीने तळे झाकले तळाशी
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!
>>>
वाह! क्या बात है
मस्तच!
मोगरावाला शेर पुन्हा पुन्हा वाचला... मस्तच.....
अशाने नदी पार होणार का? दिसे
अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!
अतिशय सुंदर
गझल आवडली
शुभेच्छा
तिलकधारी आला आहे. छान गझल
तिलकधारी आला आहे.
छान गझल आहे.
तिलकधारी निघत आहे, निघण्यापूर्वी 'मला रोखतो पिंजरा आजही' अश्या एका मनातील सुचवणीची उगाचच पिंक टाकून जात आहे.
निव्वळ अफलातून गझल. पुन्हा
निव्वळ अफलातून गझल. पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटते.
चरा, मोगरा,
चरा, मोगरा, भोवरा........सुरेखच !!
मी आत्ता पुन्ह्यांदा वाचली एक
मी आत्ता पुन्ह्यांदा वाचली
एक ओळ अशी करून वाचली (मला तसे केल्यावर व्यक्तिशः जास्त आवडले म्हणून)
अशाने नदी पार होणार का ?
गिळे, कालचा भोवरा आजही
हे पर्यायी नव्हे .गैरसमज नसावा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मतला आणि चरा हे शेर
मतला आणि चरा हे शेर आवडले.
चर्याच्या शेरात 'चरा' हीच प्रतिमा का वापरली असावी असा प्रश्न पडतो आहे, विचार करतो आहे पण उत्तर अजून मिळालेले नाही. अगोदरच्या मिसर्यात 'सावलीने झाकले' अशी वाक्यरचना आलेली आहे ती चर्याशी डायरेक्ट को-रीलेट करता येत नाहीये पण शेरातला खयाल फार फार मस्त!
मस्त गझल!! पांढरा मोगरा शेर
मस्त गझल!!
पांढरा मोगरा शेर अफलातून आहे.
>> नको वाटतो उंबरा आजही हवासा
>>
नको वाटतो उंबरा आजही
हवासा तरी आसरा आजही
तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही
<<
क्या बात!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतरः
तिलकधारींची सुचवणी आवडली.
'अशाने नदी पार व्हावी कशी / नदीपार व्हावे कसे' असं चालेल का असंही वाटलं.
जरी सावलीने तळे झाकले तळाशी
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही
तुझ्या आठवांचे धुके दाटते
इथे जीव मग घाबरा आजही
खूप निर्मळ नितळ उतरलेय..
पिंजरा ,मोगरा ,भोवरा खूप
पिंजरा ,मोगरा ,भोवरा खूप भावले...
शुभेच्छा!
नको वाटतो उंबरा
नको वाटतो उंबरा आजही.........म्हणजे काय, ते पोचत नाही
हवासा तरी आसरा आजही
जरी सावलीने तळे झाकले
तळाशी उन्हाचा चरा आजही............उन्हाचा चरा प्रतिमा निभावता आलेली नाही.....अपूर्ण चिंतन!
कुठे वेस नाहीच गगनास या
अडवतो मला पिंजरा आजही...............पिंजरा प्रतिमा अजून थेट करता आली असती!
अशाने नदी पार होणार का?
दिसे कालचा भोवरा आजही.......नदीत भोवरा/भोवरे असणे हे सामन्य आहे, तो तिचा स्यायीभाव आहे! त्यामुळे जर नदी पार करणे अशक्य असेल तर शेरात किंवा आशयात काही नाविन्य प्रतित होत नाही!
सुगंधापुढे रंग हरतोच ना?
बघा - मोगरा पांढरा आजही!........पांढ-या रंगात सर्व रंग सामाविष्ट असतात, मग मोग-याचा आजही पांढरा रंग
असण्याने ते सुगंधापुढे हरणे कसे? ..............परत अपुरे चिंतन वाटते!
तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही
.......तुझा चेहरा मी आजही शोधणे याला तुझीच मोहमाया म्हणजे तूच जबाबदार आहेस असा काही अर्थ रचनाकाराच्या मनात आहे का? कारण हा अर्थ शेरातून प्रकट होत आहे! तुझा चेहरा मी आजही शोधत आहे ते मला ध्यास लागला आहे म्हणून की, मजबूरी म्हणून? नीट अभिव्यक्त होत नाही.....
एक शेर आठवला.....
शोधतो मी ज्यास तो हा चेहरा नाही!
लोचने करतात दावा तो खरा नाही!!
...............कर्दनकाळ
वाह मोगरा लई खास..!!! नव्या
वाह मोगरा लई खास..!!! नव्या कल्पना मस्त वाटल्या..
सर्व दोस्तांचे मनापासून आभार!
सर्व दोस्तांचे मनापासून आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिलकधारी, तुमची सुचवणी चांगलीच आहे. पण अडवतो आणि रोखतो हे मलातरी दोन्ही सारखेच वाटत असल्यामुळे आहे तेच ठेवतो.
विदिपा, बाकीचे सर्व तळे सावलीने शांतावले असताना, सूर्याची एक तिरीप पार तळापर्यंत जावी अशी (आणि एवढीच) कल्पना आहे त्या शेरामध्ये.
कर्दनकाळ, पर्यायी शेर न दिल्याबद्दल सर्वप्रथम आभार! या गझलेमधील बहुतेक शेरांबद्दल तुमची तक्रार दिसते आहे - तीही चिंतनाबद्दल! हे पूर्णपणे तुमचे वैयक्तिक मत आहे म्हणून त्यावर उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही. तसेच, माझ्यामते बहुतांश शेर थेट आहेत. संदिग्धता, एकही अर्थ न लागणे असेही इथे घडलेले नाही. तरी ज्याप्रकारच्या शंका तुमच्यासारख्या (३५ वर्षांच्या गझललेखनाच्या अनुभवाचे पॅरा आणि भटसाहेब इत्यादींची परंपरा सांगणार्या) ज्येष्ठ व्यक्तीने उपस्थित केल्या आहेत त्या वाचून 'टीकेसाठी टीका' हा हेतू असेल का, अशीच शंका आली मला. तुमच्यासाठी हे माझे शेवटचे पोस्ट. यानंतर यावर प्रतिसाद देण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नये, ही (आगाऊ) विनंती!
टीप - इतर सर्व प्रतिसाद चांगले आलेत म्हणून तुमच्या प्रतिसादाबद्दल शंका घेतोय असा गैरसमज करून घेऊ नये. चांगल्या तसेच वाईट प्रतिसादांना 'स्वतः'शी प्रामाणिक राहून स्वीकारणे शिकलोय.
धन्यवाद!
'अशाने नदी पार व्हावी कशी /
'अशाने नदी पार व्हावी कशी / नदीपार व्हावे कसे' असं चालेल का असंही वाटलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> यू सेड इट स्वातीताई! अगदी अस्संच काहितरी लिहायचं होतं. होणार का? ऐवजी व्हावी कशी किंवा मी कसा पार होणार असं. ते नाही जमलं.
धन्स ते सुचवून दिल्याबद्दल!
तुझी टीप पाहून लई भारी
तुझी टीप पाहून लई भारी वाटलं!!
गझल मस्तं झालीये..
तुझी मोहमायाच छळते अशी -
तुझा शोधतो चेहरा आजही>> ह्यातली सहजता मोहक आहे! खास आवडला
चरा उठून दिसला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भोवरा, मोगरा सर्वात आवडले.
भोवरा, मोगरा सर्वात आवडले.
कर्दनकाळ, पर्यायी शेर न
कर्दनकाळ, पर्यायी शेर न दिल्याबद्दल सर्वप्रथम आभार!ह्या क्षणिक जिंदादिलीबद्दल आभार!
म्हणून त्यावर उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही.<<<<<<<<<<ही अपेक्षा नव्हतीच या रचनाकाराकडून!
'टीकेसाठी टीका' हा हेतू असेल का, अशीच शंका आली मला.<<<<<<<<<<
तुझ्या मनाचेच खेळ सारे!दय
तसे कुणाच्या मनात नाही!!...............इति कर्दनकाळ
तुमच्यासाठी हे माझे शेवटचे पोस्ट.आता कुणासाठी पोस्ट आणि कुणासाठी पोस्ट नाही हे पण लिहायचे का गझलेखाली???????????
यानंतर यावर प्रतिसाद देण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नये, ही (आगाऊ) विनंती! हीेरचनाकाराची नसून प्रतिसाद देणा-याची मर्जी आहे!
बिनगोडव्याचा प्रतिसाद सोसवत नसेल तर इथे पोस्टच कशाला करायची माणसाने? आपाणच आपल्याला ओवाळत बसावे, गोडवे गात खुशाल बसावे आपापल्या घरी निवांत! कोण यायला बसले आहे तिथे प्रतिसाद
द्यायला?
इतर सर्व प्रतिसाद चांगले आलेत म्हणून तुमच्या प्रतिसादाबद्दल शंका घेतोय असा गैरसमज करून घेऊ नयेहे काय सांगायला हवे?
चांगल्या तसेच वाईट प्रतिसादांना 'स्वतः'शी प्रामाणिक राहून स्वीकारणे शिकलोय.
वाटत नाही प्रतिसादाच्या शैलीवरून!
टीप: वाईट/विक्षिप्त भांबरभुत्यांचे प्रतिसाद म्हणजे काय असते ते पहायचे असेल तर खालील आयडींच्या गझलेरील प्रतिसाद डोळे फाडून वाचावेत................
१) प्रा.सतीश देवपूरकर
२) अनामिक गझलवेडा
३) गझलप्रेमी
४) कर्दनकाळ
असे असले तरी अमुक अमुक प्रतिसाद देऊ नयेत असे सदर शायराने कधीही दटावलेले दिसत नाही!
कर्दनकाळ, इथून पुढे तुमचे
कर्दनकाळ, इथून पुढे तुमचे सर्व प्रतिसाद माझ्याकडून पूर्वीप्रमाणेच इग्नोरण्यात येतील. वेळ नाहीये माझ्याकडे.
Pages