सावरावे जरा

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 March, 2013 - 23:25

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा

गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा

बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्‍याने लपविणे शिकावे जरा

आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा

दिसावे पेक्षा बनावे बरे वाटले असते!

गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा

विधानात्मक शेर वाटला!

बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्‍याने लपविणे शिकावे जरा

खयाल छान!
पण दुस-या ओळीतेल चेह-याने लपविणे तितकेसे प्रभावी नाही वाटले!
चेह-याने समंजस बनावे जरा! म्हटले तर उला मिस-यास पुरेपूर न्याय मिळावा!

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

दुसरी ओळ फारच evident वाटली!

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

वाहू द्यावे असे हवे!

गझलप्रेमी, तू परत तेच करत आहेस. वृद्ध वृद्ध म्हणत एकीकडे सहानुभुती मिळवतोस आणि दुसरीकडे पर्याय देत बसतोस.

तिलकधारीला सगळे दिसत आहे.

Rofl

गझलप्रेमी आपली प्रांजळ मते नोंदवत असतो, निर्भयपणे! लोक त्याला पर्यायी म्हणून संबोधतात! काय लिहिले आहे हे बघायचे सोडून त्याला बगल देऊन पर्यायी असा शेरा मारून सोयीस्कर पलायनाला काय म्हणावे? धन्य धन्य!

माझ्या आत्म्याला-परमात्म्याला, देवाला स्मरून आइशप्पथ सांगतो,
या "गझलप्रेमी" सारखा मनुष्य मी आजपर्यंत पाहिलेला नाही. Sad

या निमित्ताने मला पुन्हा

उद्दामपणाचा कळस - हझल

ही हझल आठवली. Sad

ग.स.
वाहू द्यावे असे हवे!<<< हे बसवून दाखवावेत कृपया
येथे -ह्स्वदीर्घाची चूक फक्त निदर्शनास आणली होती!
हाच आशय दुसरी ओळ बदलून ही चूक टाळता येईल! वाहणे क्रियापद काढावे लागेल, ते इथे या वृत्तात बिनचूक अवस्थेत बसू शकणार नाही! पण आशयाला धक्का न लावता वाक्यरचना बदलता येईल,काफिया बदलावा लागेल, मग शेर असा होईल....

पापण्यांनो पहारे करा मोकळे......
कैद अश्रू मुके मुक्त व्हावे जरा!

आम्ही कुणालाही न स्मरता, कुणाचीही शपथ न घेता सांगतो की, मुटे मास्तरासारखा विनयाचा पुतळा आम्ही आजवर पाहिला नाही! यावर कोणत्याही हझलेची/गझलेची आठवण आम्हास आली नाही!

आम्ही कुणालाही न स्मरता, कुणाचीही शपथ न घेता सांगतो की, मुटे मास्तरासारखा विनयाचा पुतळा आम्ही आजवर पाहिला नाही! यावर कोणत्याही हझलेची/गझलेची आठवण आम्हास आली नाही!

उद्दामपणाचा कळस - हझल

ही हझल आठवली.<<<<<<<<<<<<<

या हझलेचा कुणाही एका व्यक्तीविशेषासी काहीही संबंध नाही. ही केवळ माझ्या मनाची आंदोलने आहेत.

ही आपलीच कबुली ना मुटे सर?

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवे वाहणे मुक्त व्हावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवे वाहणे तृप्त व्हावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
वाहणे आसवांचे खुलावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
पूर हे आसवांचे वहावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
अश्रू गालावरी ओघळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
कुंठली आसवे ओघळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
कुंठल्या आसवांना पिळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
कुंठल्या आसवांना गिळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
कुंठली आसवे ही झरावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
पेटली आसवे ही बघावे जरा
.
,
,
,
, वगैरे वगैरे

प्राध्यापक महोदय, ज्याला गझल रचता येते त्या सर्वांनाच पर्यायी शेर सुद्धा रचता येतो. तरी कुणीही एखाद अपवाद वगळता तसे करत नाहीत कारण हा मुळ कवीच्या अभिव्यक्तीला आव्हान देण्यासारखे असते.
प्रत्येकाला प्रत्येकाच्या अनुभूतीनुसार/प्रगल्भतेच्या पातळीनुसार/प्रतिभेच्या पात्रतेनुसार व्यक्त व्हायचा अधिकार असतो.

कधीकधी एखादी जुजबी दुरुस्ती वगैरे सुचवणे ठीक आहे, मुळ कवीने न मागताच आग्रहाने त्याला चक्क पर्यायी शेर सुचवणे, हे आदीमानवतेचे लक्षण आहे.
*
तुम्ही दिलेला पर्याय आणि मी सुचवलेले पर्याय

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

या शेराची बरोबरी करीत नाही, हे तुम्हाला कोणत्या वयात कळेल?

<<<<या हझलेचा कुणाही एका व्यक्तीविशेषासी काहीही संबंध नाही. ही केवळ माझ्या मनाची आंदोलने आहेत.ही आपलीच कबुली ना मुटे सर? >>>

मी कुठे म्हटले की कुणाचा काही संबंध आहे म्हणून? Happy

पण कुणी त्या हझलेतील प्रत्येक शेरानुसारच वागायची भिष्मप्रतिज्ञा घेतली तर मी काय करू शकतो? Sad

हं. मात्र त्या हजलेची आठवण काढू शकतो. Wink

आपले वरील सर्व पर्याय या बालक्रीडा आहेत याचा साक्षात्कार आपणास केव्हा होणार? विनोबा(विनयशील) मुटे गुरुजी?

<<<आपले वरील सर्व पर्याय या बालक्रीडा आहेत याचा साक्षात्कार आपणास केव्हा होणार? विनोबा(विनयशील) मुटे गुरुजी?>>>

कधीचाच झालाय. फक्त फरक एवढाच की त्या बालक्रिडा नसून बडबडगीताच्या धर्तीवरील "बडबडशेर" आहेत. Happy

मी विनयशील वगैरे नाही. उगाच नको त्या उपाध्या मला बहाल करू नका. नाहीतर तुमच्यावर अपेक्षाभंगाची वेळ येईल. Happy

असो- हेमाशेपो.

मुटे,

तुम्ही माघार घ्या अशी विनंती.

प्रोफेसर तुमच्यापेक्षा वयाने जास्त असल्याने अधिक हट्टीपणा ते करतील असा कयास आहे.

वयाने जास्त असल्याने.......>>>>>
हो हो ................आणि बुद्धीने कमी सुद्धा !!!!!!!!

त्यांच्यावर कोणीतरी एकदा एक शेर केल्याचे स्मरते जो तिन्हिलोकी प्रसिद्ध झालेला आहे............नक्की कुणी ते आठवत नाही क्षमस्व Wink

तर शेर असा होता .....................

किती मी पाडल्या गझला.... तरी पस्तीस वर्षांनी ;
जगाला वाटते आहे ......म्हणे शालेय आहे मी !!!

___________________________________

मुटे सर अभिनंदन !!!!!
देवसरांनी दिलेल्या पर्यायीपेक्षाही फालतू चिल्लर पर्यायी देणे हे काही खायचे काम नाही !!!!!!

Lol Lol Lol

विजयराव!

मुटे,

तुम्ही माघार घ्या अशी विनंती.

प्रोफेसर तुमच्यापेक्षा वयाने जास्त असल्याने अधिक हट्टीपणा ते करतील असा कयास आहे.<<<<<<

इथे वयाचा वा हट्टाचा प्रश्न नाही विजयराव, प्रश्न आहे तर्कशुद्ध चर्चेचा, तत्वाचा!
हाच तर फरक असतो प्राध्यापक व अप्राध्यापक इसमांमधे!,

१. मुटे - उद्दामपणाचा कळस ही हझल नव्हे, ती नुसती गझलतंत्रातील टीकात्मक रचना आहे.

२. गप्रे (गझलप्रेमी) - चर्चा वाहवत आहे.

ही गझल कोणाची आहे, त्यावर बोलतय कोण आणि विषय काय चाललेले आहेत. ताळमेळ नाही आहे.

तिलकधारीला सुसंगत चर्चा भावते.

वैभव वसंत कुलकर्णी,
वयाने जास्त असल्याने.......>>>>>
हो हो ................आणि बुद्धीने कमी सुद्धा !!!!!!!!

अरे तुझा कवी म्हणून जीव तो केवढा? तुझ्या शायरीतला दम तो केवढा, तुझा अनुभव तो केवढा, तुझा एकंदर काव्यबोध वा सौंदर्यबोध तो केवढा आणि तू बोलतोस केवढा?
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला काय?

कुणाची बुद्धी किती याचे मूल्यांकन करायला ते करणा-याकडे आधी बुद्धी नावाची गोष्ट असावी लागते जिच्याशी तुझा दुरून तरी संबंध आहे का लेका?

दुस-यांच्या पुढे हांजी हांजी करणे सोडून, दुस-यांच्या अनुमोदनाच्या कुबड्या फेकून, स्वत:ची वाटचाल करायला शीक! म्हणजे तगशील तरी! दुस-यांच्या बुद्धीचे मापन करायला दिल्ली बहुत दूर है बेटा !

टीप: तू जो चिल्लर शेर का काय दिलास ना तिचा जनक तूच/तुझा तोतया असावा कारण तुझ्याशिवाय इतके महान कुणी लिहितच नाही!

भूषणराव!
जरा सांगा आपल्या परममित्राला/भक्ताला काही!
भक्ती सोडून काहीबाहीच बरळू लागला आहे तो! वेडा कुठचा!

Pages