Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 March, 2013 - 23:25
वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा
गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा
बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्याने लपविणे शिकावे जरा
आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा
हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा
पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा
जयश्री अंबासकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान व गायनानुकुल गझल
छान व गायनानुकुल गझल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख.....
सुरेख.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! मस्त
वा ! मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा गं ताई वा... खूप
वा गं ताई वा... खूप आवड्ली..
मतला बहारदार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्व्वा ! मतला आणि काही शेर
व्व्वा !
मतला आणि काही शेर खूप आवडले .
शब्दश्रीमंती, सहजता, आशय,
शब्दश्रीमंती, सहजता, आशय, गझलियत या सर्वांनी नटलेली गझल.
बेफिकीर, योगुली, अवल,
बेफिकीर, योगुली, अवल, बागेश्री, राजीव, विस्मया........ मनापासून धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गायनानुकुल...... ह्म्म.....
फार फार सुंदर!
फार फार सुंदर!
जयावी खूपच सहज सुंदर रचना.
जयावी खूपच सहज सुंदर रचना. शेवटची ओळ जास्त आवडली.
गझल आवडली !
गझल आवडली !
आवडली गं!! मस्त.
आवडली गं!! मस्त.
अप्रचलित वाटली लय,आवडली गझल.
अप्रचलित वाटली लय,आवडली गझल.
पापण्यांनो पहारे करा
पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा >> वाह मस्त..
मुग्धमानसी, टुनटुन,
मुग्धमानसी, टुनटुन, मुक्तेश्वर, प्राजु, भारती, सत्यजीत....... बहोत बहोत शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मतला फार आवडलाय... गझलही
मतला फार आवडलाय...
गझलही उत्तम!
छान....छानच काही मिसरे खूप
छान....छानच
काही मिसरे खूप सुंदर आहेत....जसे
सोसणे मोरपंखी दिसावे जरा
पावलांनी तिथे अडखळावे जरा
सुंदर! खूप आवडली!
सुंदर! खूप आवडली!
मस्त..
मस्त..
बढिया आवडली एकदम
बढिया
आवडली एकदम
छान .... शेवटचे ३ सर्वात
छान .... शेवटचे ३ सर्वात आवडले.
सुंदर गझल... आवडली!
सुंदर गझल... आवडली!
आनंदयात्री, अरविंद, अमेलिया,
आनंदयात्री, अरविंद, अमेलिया, कावळा, जाई, उल्हासजी, शाम ........मनापासून धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप म्हणजे खूपच आवडली
खूप म्हणजे खूपच आवडली
गझल आवडली जयु! अडखळावे - हा
गझल आवडली जयु!
अडखळावे - हा शेर तर फार फार आवडला!!
व्व्वा जयू ... सहजसुंदर !!!
व्व्वा जयू ... सहजसुंदर !!! जियो !
वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा-------- क्या बात है ..
फारच सुन्दर
फारच सुन्दर
वैभव, पुलस्ति, गिरीश,
वैभव, पुलस्ति, गिरीश, सहेली..... खूप खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरीश.... अरे आहेस कुठे??
सर्वच शेर अप्रतिम. हात
सर्वच शेर अप्रतिम.
हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा
क्या बात. व्वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शब्दश्रीमंती, सहजता, आशय,
शब्दश्रीमंती, सहजता, आशय, गझलियत या सर्वांनी नटलेली गझल. >>>>+१००....
छान गझल !
छान गझल !
Pages