नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"
दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...
भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा )
कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..
प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
द्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत
तृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
उत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
रंगासेठ अत्युकृष्ठ
रंगासेठ
अत्युकृष्ठ छायाचित्र...
नक्कीच पारितोषिक विजेते ठरणार यात शंका नाही
एक मस्ती मुद्रा....
एक मस्ती मुद्रा....
जिद्द
जिद्द
खट्याळ भावमुद्रा ... नुकतीच
खट्याळ भावमुद्रा ...
नुकतीच शम्भो झाली होती... आमचे हे घरातले मॉडेल छायाचित्रासाठी नेहमीच तयार असते तसे त्या दिवशीही होते.
मग काय खिडकीतून येणारा सकाळचा सौम्य प्रकाश आणि तिच्या खट्याळ भावमुद्रा मस्त जमून आले.
आणि हा दुसरी... गानमग्न भावमुद्रा...
समुद्राचे पाणी, लाटांमधे खेळणे, आणि चिमुकल्या ओठांवरचे गाणे... एक सुरेख मैफल.
रन्गाशेठ, विषयानुरुप अचूक
रन्गाशेठ, विषयानुरुप अचूक छायाचित्र
फोटोतील प्रत्येक व्यक्तीच्या भावभावनांवर भाष्य करता येईल! प्रातिनिधिक चित्र.
अमित, सुंदर विशेषतः पहिल्या फोटोतिल उजेड-सावलि छान टिपलिये.
घारूअण्णा ...
बाकी सगळ्यांचेच फोटो मस्त - बघताना गम्मत वाटतेय!
(जी लोकं बाहेर फोटो अपलोड करुन इथे नुस्त्या लिन्का देतात त्यान्चा जोरदार निषेध!
निदान मायबोलीवरील अशा स्पर्धेकरता तरी "मायबोलीचीच" सुविधा वापरण्याची सक्ति हवी, हव तर अधिक मोठ्या साईझचा फोटू दाखविण्याकरता स्वतंत्र लिन्क द्यावी, पण मायबोलीवरील स्पर्धेकरता फोटो मायबोलीवरच अपलोड व्हायला हवा - असे माझे मत - येवढे बोलून मी आपली रजा घेतो )
रंगाशेठ उत्तम फोटो आहे आणि
रंगाशेठ उत्तम फोटो आहे आणि त्याचं फोटोत पाठीमागे असणारे पोस्टर सब कुछ भुला के हे जास्त समर्पक आहे त्या फोटोसाठी
रंगासेठ, मस्त फोटो.
रंगासेठ, मस्त फोटो.
रंगासेठ.. मागे इमारतीवर 'सब
रंगासेठ..
मागे इमारतीवर 'सब कुछ भूलाके .. जस्ट डान्स' असा वाक्य हा ..त्या वाक्यान मनाचो ठाव घेतल्यान ..
( अर्थात परीक्षक त्या वाक्यावर लक्ष देतीलच ! )
रंगासेठ.. मस्तच प्रचि ! नि
रंगासेठ.. मस्तच प्रचि ! नि सगळ्यांचे प्रचि जबरी !
अमित मोरे.. पहिला फोटो खूप आवडला.. का माहीत नाही असे नॅचरल लाईटमध्ये काढलेले फोटो खूप आवडतात
भावमुद्रेसाठी माझे स्वतःचेच
भावमुद्रेसाठी माझे स्वतःचेच फोटो स्पर्धेसाठी टाकता आले असते तर कित्ती बरे झाले असते.. असो..
प्रवेश १ : ठसन !
प्रवेश २: माझे डोळे तुझे डोळे !
मयुरी, दोन्ही फोटो मस्त....
मयुरी, दोन्ही फोटो मस्त.... फार छान भाव उतरलेयत फोटोत
हिम्सकूल, फारच गोंडस आलाय फोटो
मयी, जोकर फारच करुण
हर्पेन, चकीत मुद्रा एकदम खासच... मला माझा एक खुप जुना मित्र आठवून गेला!
सौरभ, नाराजमुद्रा एकदम भारी
अमित मोरे, दोन्ही फोटो अप्रतिम.... पहीला फोटो बघून सचिनचा एक फोटो आठवला
शांत-सोशिक मुद्रा
शांत-सोशिक मुद्रा
जागू, काय भाव टिपलेत ग !
जागू, काय भाव टिपलेत ग !
सुंदर फोटो जागुतै
सुंदर फोटो जागुतै
जागू, ढवळ्या-पवळ्या छान ग!
जागू, ढवळ्या-पवळ्या छान ग!
धन्यवाद सर्वांना. मुळात हा
धन्यवाद सर्वांना. मुळात हा विषयच अवघड आहे परिक्षण करण्यास :-), एकसे एक फोटो आहेत. कुठली भावमुद्रा वरचढ हे कसं ठरवणार . परिक्षकांनाच शुभेच्छा!
हा विषय अवघड ??????????
हा विषय अवघड ??????????
.
.रंगासेठ.........?
.
.
अवघड तर पुढच्या महिन्यापासुन,,,,,,, एक एक महिना लेव्हल वाढवत जाणार आहोत आम्ही
विषय अवघड नाही, त्याचे
विषय अवघड नाही, त्याचे परिक्षण करणे आणि निवाडा करणे
जिप्सी आणि
जिप्सी आणि शांग...........बराच या महिन्यात ताप आहे दोघांना........
.
.
आपले काम नुसते धागा काढणे आणि विषय बनवने (तेही या दोघांशी सल्लामसलत करुन) ...सोप्पे काम
रंगासेठ, म्हणले तर तसे अवघड
रंगासेठ, म्हणले तर तसे अवघड नाही परिक्षण करणे, हां, आलेला निर्णय लोकान्ना पटणे अवघड!
या विषयाबाबत म्हणाल, तर भावमुद्रा हा विषय आहे.
तर केवळ एकला क्लोज अप चालू शकेल, तसेच भावमुद्रेनिमित्तच्या घटन्नान्चे चित्रिकरणासहित तपशीलही चालु शकेल.
मात्र फोटो पहिल्याप्रथम बघताना, सर्वात प्रथम नजर ज्या भागावर खिळली जाते, किंवा, अनेक ठिकाण्/विषयांवरुन नजर फिरुन शेवटी जिथे खिळते, वा ज्या एक दोन आकृतीबंधात नजर फिरत रहाते, तो आकृतीबंध "स्पर्धेच्या विषयाशी" संबंधित असावा अशी प्रमुख अपेक्षा असते.
यानंतर विषयानुरुप, इथे "भावदर्शन" किती प्रमाणात किती तीव्रतेने किती प्रभावीरित्या टिपले गेलय हे बघावे लागेल. ("कोणता भाव" याचा विचार करणे अपेक्षित नाही, तर जो भाव टीपू पाहिलय, तो किती प्रभावीरित्या उतरलाय, हे बघणे आवश्यक)
यानंतर येतो तो भाग म्हणजे ही स्पर्धा छायाचित्रणाची असल्यामुळे, छायाचित्रणातील कौशल्य बघणे.
याकरताही सर्वात प्रथम "फ्रेमिंग" किन्वा चौकटीत मुख्य विषय कसा मांडला आहे, काय कोनातुन विषय दाखविला जात आहे वगैरे भाग येईल. इथेच वर जो नजर फिरण्याचा उल्लेख आहे, त्याचाही संबंध आहे.
फोटोची सुस्पष्टता, उजेडसावलीचा खेळ, वगैरे दृष्य बाबी किती चांगल्या आल्या आहेत हे बघणे आवश्यक ठरेल.
अर्थात माझ्यामते, फ्रेमिंग वगळता, भावदर्शन या मुख्य विषयापुढे ऑब्जेक्ट व्यतिरिक्त, फोटोग्राफितील कौशल्य / कॅमेरा वगैरे बाबी तुलनेत थोड्याश्या दुय्यम स्तरावर म्हणजे ६०/४० च्या प्रमाणात धराव्या लागतील. अर्थातच अपवाद वगळता! याचे कारण की केवळ "तांत्रिक मदत व कौशल्य" हे मूळ विषयाच्या वरचढ असू नये, विषयास बाधा ठरू नये, विषयाचे महत्व कमी करणारे ठरु नये.
इथे फोटो देणारे माझ्यासारखे नवशिके, साधे कॅमेरे वापरणारे अस्ताना तर हे निकष अधिकच लागु पडतात. मात्र निव्वळ "फोटोग्राफि - विषय व कौशल्य" अशा दोनोंवर आधारीत "जाणकारांची स्पर्धा" असेल, तर मात्र वरील प्रमाण ५०/५० असेच धरावे लागेल. असो.
जाणकारच यावर अधिक भाष्य करतील.
संकुल, जिद्द आवडला रंगासेठचा
संकुल, जिद्द आवडला
रंगासेठचा फोटो पाहुन खुप वाईट वाटले, आजीबाईंच्या चेह-यावर स्थितप्रज्ञाचे भाव आहेत असा उगीचच भास झाला.
व्वा लिंबूटिंबू..... क्या बात
व्वा लिंबूटिंबू..... क्या बात है!
आमच्या चित्रकलेच्या सरांची आठवण झाली
कुर्ग (मडिकेरी) पासून साधारण
कुर्ग (मडिकेरी) पासून साधारण तीस कि.मी. वरिल कुशलनगर जवळ तिबेटीयन लामांचा रिफ्युजी कँप आहे. येथील बुद्धीस्ट मोनस्ट्री मधे प्रेक्षणिय GoldenTemple आहे. मुख्य देवळात ४० फुट उंचीची विशाल बुद्ध मुर्ती आहे.
शांत, सुंदर, सुशिल, विनयशील, संयमीत, चिंतनमग्न एक ना अनेक भावमुद्रा एकाच ठिकाणी एकवटलेली ही बुद्ध मुर्ती.
जागूताई, खुपच छान फोटो.
जागूताई,
खुपच छान फोटो.
कुतुहुल / आश्चर्य
कुतुहुल / आश्चर्य मुद्रा.,विचारमग्न मुद्रा ,गंभीरमुद्रा ,शांत मुद्रा..,
हि प्रचि मी ग्लोबल कोकण महोत्सवात कट्पुतलीचा खेळ सुरु होण्याअगोदर घेतली होती.
हास्यमुद्रा
हि प्रची मी मीत्राच्या गावी लग्न समारंभात घेतली आहे.
सर्वांचेच फोटोज मस्त...
सर्वांचेच फोटोज मस्त... सगळ्यांच्या पिल्लांचे तर खूप गोडुले आणि अप्रतिमच!!! मला आत्तापर्यंतच्या फोटोंपैकी स्पर्धेला अनुसरून आवडलेले विशेष फोटो म्हणजे रंगासेठचा गर्दी व कसरतीवाला...
साधना म्हणते तसे आजींच्या चेहर्यावर स्थितप्रज्ञतेचे भाव असल्याचा/ आणल्याचा भास झाला...
आणि मनीष कदम यांनी अपलोड केलेला ग्लोबल कोकण महोत्सवात कट्पुतलीचा खेळ सुरु होण्याअगोदर...
बाकी परीक्षकांना खरंच ऑल द बेस्ट!! खूप पर्याय आहेत निवडीसाठी... कदाचित विभागूनच द्यावी लागतील पारितोषिके...
सुरेख फोटो आहेत. सर्व मुलांचे
सुरेख फोटो आहेत. सर्व मुलांचे अगदी गोड आलेत.
१ल्या पानावर मयुरी चा विचारी, स्निग्धा चा उत्साह, झकासरावचा निळा महादेव ,
दुसर्या पानावर फुग्याचा हट्ट, जोकर, रीमा च्या फोटोतली छान दातवाली आनंदी आई,
तिसर्या पानावर निळ्या झग्यातली लब्बाड, रायबाचा फुत्कारलेला साप, rmd चा दु:खी कुत्रा, अतुलनीयच्या फोटोतील तेजस्वी प्रभा अत्रे, सुंदर नंदिनी शंकर,
चवथ्या पानावर शुभांगीची सुंदरशा पोपटी झग्यातली रडवेली, घारुअणांचा झोपेतही आनंदी दिसणारा हसरा माणुस, रंगासेठ च्या फोटोतली निर्विकार आजी,
५व्या पानावर अमित ची खट्याळ (हा फोटोतर फारच सुंदर आलाय.. ह्यातला प्रकाशाचा खेळ मस्तच), जिप्सी चा पक्षी...
हे सर्व विशेष आवडले.
माझा एक प्रयत्न........
माझा एक प्रयत्न........
यश - हास्यमुद्रा १ - हे हे,
यश - हास्यमुद्रा १ -
हे हे, ही मावशी बघा, कायपण प्रश्न विचारते...येडी कुठली ...
यश - हास्यमुद्रा २ -
माऊ, बाबांनी मला आणलेलं खेळणं बघ.. यात लाईट पण आहे नी फॅनपण ... आडस ना !!!
एक शून्य .... झक्कास! कळस
एक शून्य .... झक्कास! कळस चढवला जणू!
सोनु, मस्त.
पहिला फोटो वरील बाजूने क्रॉप केला अस्ता तर बरे झाले असते, डावीकडच्या वरच्या कॉर्नरमधिल चकाकत्या फरशीकडे व डोक्यावरिल भिन्तीच्या कोपर्याच्या जमिनीलगतच्या कडेला लक्ष जास्त वेधले जाते ते गेले नसते. असो. मुलाचे हास्य मात्र लई खास. त्याला बघुन मलाही हसू फुटतय.
मनीष, पहिला फोटो मस्तच. (अर्थात बाहेरून नन्तर काही इफेक्ट्स केले नसल्यास अधीकच उत्तम). असे फ्रेमिन्ग घेण्याचे सुचणे व तत्काळ अंमलात आणणे हेच मूळात महाकठीण अस्ते.
Pages