फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा" निकाल.

Submitted by उदयन.. on 1 March, 2013 - 01:08

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"

दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...

भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा Wink )

कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..

प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
rangaseth..jpgAmit more_.jpgद्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत

manish_kadam.jpgsaurabh.jpgतृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
Ashu_554605_482436578438848_743579659_n.jpgShubhangi_DSC07202.JPGउत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य

ek_shunya.jpgJhakas_shankar[1].jpgजिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-

१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) शांत मुद्रा
आमचा स्पॉइल्ट ब्रॅट लुई.
लुई महाराजांची ही शांत (समाधानी)मुद्रा. साधारणतः हे महाराज जेवण वगैरे हादडून सोफ्यावर पहुडलेले असतात तेव्हा ते याच शांतमुद्रेत आढळतात. आधी ते डोळे उघडे ठेवतात. नंतर त्यांचा अंमळ डोळा लागतो. आणि मग ते निद्रिस्त मुद्रेत प्रवेश करतात. ही मुद्रा बहुतेक संपूर्ण दिवसभर धारण करू शकतात.

DSCN1034_5.JPG

२) क्रोधित मुद्रा

आम्ही एकदा एका मांजराच्या चोर्‍यांना कंटाळून त्याला स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाल्कनीत पकडले. आणि कोंडले. त्याचे बरेच फोटो काढले. संदर्भः माझा एक जुना लेखः " बोक्या मनी आणि मॉस्किटो नेट"
त्यातलाच हा एक क्रोधित मुद्रेतला.

DSCN1723_1.JPG

हमार कछुआ . Proud
भय मुद्रा/ कुतूहल मुद्रा. Happy

Don 2.jpg

गावाला काकाच्या रेतीच्या साईटवर सापडलेलं हे कासव,
जवळून फोटो स्न्याप करत असताना सुरुवातीला घाबरलं नंतर कुतूहलाने मान बाहेर काढून डोकावत होतं.

वा वा! खुप छान फोटो सार्‍यांचे... Happy
अरे ते मांजर हिरव्या डोळ्यांच? Wink Happy
अवि.. ते कासव डोक्यावरील चादरीतुन हळुच डोकावतय असं वाटतय. Happy

(एकाच प्रतिसादात दुसरा फोटो अटॅच होत नाही आहे म्हणुन हा दुसरा प्रतिसाद )

केलेली लबाडी आता काय रंग घेतेय ? हे लक्षात आल्यावरची लबाडमुद्रा.....
DSCN0046-002_1.JPG

तंद्री मुद्रा Happy
माझ्या भाचीचा आहे मी काढलेला.... माझ्या भावाच्या शुगरबॉक्स चा वेळेस चा ... तो तिला अंगठी घालत असताना ह्या मॅडम एकदम तंद्रीत पाहात होत्या Happy

ashu1.jpg

ही एक डबल हास्य मुद्रा Happy
बालपणीची मैत्री Happy ती मस्त नाचतीये आनि तो कौतुकाने पाहतोय Happy

ashu2.jpg

मायेची ओंजळ ...

IMG_1335 copy

सुख दुख आयुष्याची ,
दारिद्र्यातही मायेची ओंजळ .
जे येईल ते भोगायचे ,
भविष्याचा मात्र गोंधळ .....

बोगनवेल ग्रीलवर बाहेरच्या बाजुने चढवली आहे. अधुनमधुन येणार्‍या पाहुण्यांची सवय असल्याने जरा झाडांवर बारीक नजर असतेच. तिथेच हे महाराज आढळले. वाईन स्नेक

निसर्गाची कमाल बघा ---- ह्याचे डोके आणि बोगनवेलीचे पान काही फरक कळत नव्हता पहिल्यांदा, तोही वार्‍यावर पाने जशी हलायची तसे आपले डोके हलवायचा. त्याला तेथून हलवणे आवश्यकच होते, त्यामुळे त्याला काठीने खाली उतरवायचे ठरले, फोटोमधे काठी कडे (योगायोगाने) बघताना दिसतोय

पहिला फोटो ---- आपण वाईन स्नेक च्या दॄष्टीतून कुतूहल मुद्रा म्हणून घेऊ

अव्वाsssss ! अस्सं कस्सं झालं? Wink
आश्चर्यमुद्रा...

पेरियारच्या बोटसफारीच्या तिकीटांसाठी चाललेला माणसांचा प्रचंड दंगा बघून किंचीत काळजीत पडलेली ही एक बयो...
"आमचे तथाकथीत वंशज हे असे आहेत?"

टी.व्ही. वर गाण्यांचे स्वर ऐकू आले, कि हे आमचे गवई लगेच आलाप घ्यायला सुरुवात करायचे. त्यावेळी टिपलेली ही भावमुद्रा - गानमुद्रा Happy
gavai mudra edit cs5.jpg

हास्यमुद्रा
पूर्णपणे कापलं गेलेलं वृद्ध-जरठ खोड..जगण्याची काहीच आशा नाही.तरीपण पाऊस येऊन गेल्यानंतरचं निर्मळ, झालंच तर थोडं मिश्किल हास्य.
Rut4442.jpgआश्चर्यमुद्रा/ कुतूहलमुद्रा
जरा उंचावर गेल्यावर दिसणार्‍या जगाकडे मांजरसुलभ उत्सुकतेने पाहणारा बोका.
Rut0156.jpg

रडुबाईमुद्रा....
IMG00658-20111005-1630_2.jpg

आणि हि आमची भावखाऊमुद्रा...

P1000076_compressed.jpg

नटखट्मुद्रा....
DSC06884.jpg
मला माहित आहे, दोनच मुद्रा टाकायच्या आहेत.. पण तरी मोह आवरला नाही.... Wink शेवटची स्पर्धेमधे नाही धरली तरी चालेल....

मला जाऊद्या नं बाहेर खेळायला! ( करूण/व्याकूळ मुद्रा )

17052012605.jpg

पुण्यात एका अपार्ट्मेंटच्या गेटमधून शक्य तेवढं बाहेर येण्याचा प्रयत्न करणारा हा भूभू! येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाकडे पाहून 'आता हा माणूस गेट उघडेल' या विचाराने खूष होणारा आणि तो माणूस निघून गेल्यावर कष्टी होणारा. त्याची ती आर्त व्याकूळ इ. मुद्रा टिपायचा प्रयत्न केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

वामकुक्षी: निवांत गाढ मु ( /नि ) द्रा Proud

07012007513.jpg

बहुधा जेवूनखावून तण्णावून दिली असावी या मनिमाऊने.

माझी भाची ईशा!!! तिच्या वाढदिवसाला तिला सरप्राईझ भेटायला आलेल्या आज्जीला बघुन झालेला आनंद!!!! अर्थात.. आश्चर्यमुद्रा..
isha.JPG

लेकीच्या घराच्या वास्तू समारंभानंतर आई- बाबांच्या चेहर्‍यावर उमतलेली प्रसन्न समाधान मुद्रा

100_1587.JPG

सवाई गंधर्व महोत्सवादरम्यान कलाकारांच्या भावमुद्रा -
निवेदक - आनंद देशमुख -

Anchor Anand Deshmukh.JPG

भारतरत्न पं. भिमसेन जोशी -

Bharatratna Pt. Bhimsen Joshi.JPG

पं. बाल मुरली कॄष्णन -

Dr. Bal Murli Krishnan.JPG

डॉ. प्रभा अत्रे -

Dr. Prabha Atre .JPG

पं. हरीदास -

Mrudunga Player (Pt. Haridas).JPG

नंदिनी शंकर -

Nandini Shankar1.JPG

Pages