नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे "मार्च" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या महिन्याचा विषय आहे "भावमुद्रा"
दोन महिने झाले स्पर्धेला या दोन महिन्यात मायबोलीकरांकडुन अप्रतिम आणि आशयप्रधान प्रकाशचित्रे सादर झाली आहेत..म्हणुनच स्पर्धा एक पाउल पुढे केली..सोप्पे विषयांपेक्षा थोडे विचारमग्न विषयांकडे वळायला हळु हळु सुरुवात केली आहे... आता फोटो हे नुसते फोटो नसुन एक संपुर्ण विषयच असायला हवे याकडे अधिक लक्ष द्यायला हवे...
भावमुद्रा यात . १) क्रोध मुद्रा...२) हास्यमुद्रा..३) शोकमुद्रा.. ४) कुतुहुल / आश्चर्य मुद्रा..५) विचारमग्न मुद्रा ..६) गंभीरमुद्रा ...७) उत्साहमुद्रा .. ८) भय मुद्रा.. ९) शांत मुद्रा...
या मुद्रांचा समावेश होतो..(अजुन काही असतील त्यांचा सुध्दा समावेश करावा )
कोणतेही एक मुद्रा घेउन त्यानुसार फोटो असावा...सुरुवातीला हेडिंग मधे मुद्रेचे नाव स्पष्टपणे लिहावे.. तसेच शक्य असल्यास थोडी प्रस्तावना सुध्दा लिहावी..त्यात फोटो घेताना आपल्या मनात काय होते..का हा फोटो काढला.. फोटो काढता काय वातावरण होते ज्यामुळे ही भावमुद्रा उमटली..
प्रथम क्रमांकः रंगासेठ आणि अमित मोरे
द्वितीय क्रमांक: मनिष कदम आणि सौरभ सावंत
तृतीय क्रमांक: आशुचॅम्प आणि शुभांगी
उत्तेजनार्थ: झकासराव आणि एक शून्य
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) एकच प्रतिसादात फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
आधीच्या थीमचे पण लिंका द्या
आधीच्या थीमचे पण लिंका द्या ना... बघायला मस्त वाटेल नवीन लोकांना.
झंपी - अनुमोदन (शिवाय फोटो
झंपी - अनुमोदन (शिवाय फोटो मायबोलिवर अपलोड करुन टाकायचे काही बघाना, बाहेरील लिन्का आमच्यात ब्यान अस्तात - फोटो दिसत नाहीत)
भन्नाट विषय (उदयन, धन्यवाद)
फु.स.: भावमुद्रा यात "मानवी" अशी भर हवी का? [शोधले तर माझ्याकडे मानवेतर सजीव/निर्जिवान्च्या भावमुद्राही सापडतील ]
स्पर्धेसाठी भाच्याचे - सक्षम
स्पर्धेसाठी भाच्याचे - सक्षम चे फोटो पाठवत आहे. पहिला अगदी १-२ महिन्यातला आहे . बेड वर झोपवलेला असताना नकळत एक हात वर गेलेला त्याचा. कॅमेरा आणेपर्यंत खाली सरकला होता म्हणुन साईडला हात लावावा लागला. एकतर हा फोटो टिपीकल कोल्हापुरी स्टाईल "काय भावा" ह्या पोझसाठी परफेक्ट आहे पण ईथे विचारमग्न मुद्रा . ह्या साठी देत आहे..
विचारमग्न मुद्रा ..
फाईनल ईअर प्रोजेक्ट साठी आम्ही सगळ्या माझ्या घरी जमायचो. सक्षमचे केस मॅगी सारखे होते जावळाच्या आधी. मॅगी म्हटंलो की खदखद हसायचा.. त्याची ती मुद्रा टिपायचा केलेला प्रयत्न..
हास्यमुद्रा
ही कुठली मुद्रा बरं
ही कुठली मुद्रा बरं ??
स्पर्धेसाठी माझी लेक समर्थिकाचा हा फोटो.
फिरायला जाताना तिचे बरेच फोटो काढले जात त्यामुळे कदाचित ह्यात आजीबाई विचार करत असतील आता कोणती पोझ देऊ..तर असा हा आजीबाईंचा विचारमग्न मुद्रा
कृपया प्रस्तावना सुध्दा
कृपया प्रस्तावना सुध्दा जमल्यास लिहावी......
.
.धन्यवाद
.
.
मयुरी आज्जीबाई येकदम
मयुरी आज्जीबाई येकदम झकास
स्निग्धा उत्साह येकदमच जोरात आहेत
मयुरी आता मी ही वस्तु घेणार
मयुरी आता मी ही वस्तु घेणार अशी काहिशी मुदरा आहे
(No subject)
एका मुंजीत जेवणाचा आलेला
एका मुंजीत जेवणाचा आलेला कंटाळा...."कंटाळा मुद्रा"
(No subject)
(No subject)
(No subject)
कुतूहल मुद्रा
कुतूहल मुद्रा
मयुरी आणि स्निग्धा तुम्ही
मयुरी आणि स्निग्धा तुम्ही दोघिंनी टाकलेल्या फोटोतले क्रमांक २ चे फोटो जबरी आहेत.
धन्यवाद सुशांत, दक्षिणा
धन्यवाद सुशांत, दक्षिणा
उत्साह मुद्रा
उत्साह मुद्रा
दक्षिणा .........फक्त २ च
दक्षिणा .........फक्त २ च फोटो टाकायचे आहेत........ते ही एकाच प्रतिसादा मधे.......... हेडींग मधे भावमुद्रा कोणती आहे ते ही स्पष्ट करा
या महिन्याचा विषय "भावमुद्रा"
या महिन्याचा विषय "भावमुद्रा" आहे की "बालमुद्रा" ?
भाव मुद्रा च आहे.........
भाव मुद्रा च आहे.........
म्हणुन प्रस्तावना लिहिण्यावर सुध्दा जोर देण्यात आला आहे...आणि मी सुरुवातीलाच लहान मुलाचा फोटो टाकल्याने बहुदा चुकिचा अर्थ गेला आहे..:(. भावमुद्रा असल्याने....नविन लोक ज्यांनी आता आता फोटो ग्राफीला सुरुवात केली आहे अथवा या स्पर्धे निमित्ताने कॅमेरा हातात धरला अश्यांना लहानमुलांचेच फोटो टाकने सोपे जाणार आहे... त्यामुळे नाईलाज आहे.... हळुहळु विषय अजुन कठीण करण्यात येणार आहे... ही स्पर्धा सर्वांना भाग घेण्यात सोपी जावी आणि इतरांचे फोटो बघुन शिकायला मिळावे याच उद्देशांनी सुरु केली आहे..
.
असो.......
.
.फोटो तरी टाका आपल्याला समजेल त्या प्रमाणे
अक्कलकोटला गेलो होतो तेव्हाचा
अक्कलकोटला गेलो होतो तेव्हाचा फोटो.
पोटासाठी करावं लागणार हे चक्क असं काम, भविष्यातला अंधार त्याच्या चेहर्यावर आणि डोळ्यात दिसतोय.
म्हणुन हा फोटो काढावा वाटला. फोटो काढताना बर्याच चमको घोषणा आठवल्या होत्या राजकीय पक्षांच्या.
शिवाय फोटोच्या डाव्या कोपर्यात बघाच. आईच्या कडेवर बसलेलं बर्यापैकी मोठं मुल आणि हे मुल ह्यातील कॉन्ट्रास्ट लक्षात येइल.
स्पर्धेसाठी फोटो शोधताना हा फोटो आणि वरील फोटो कॉन्ट्रास्ट लक्षात आला आणि हाच दुसरा फोटॉ हे मनाशी पक्कं केलं फोटो काढताना अर्थात असं काहिही मनात नव्हतं.
कोल्हापुरच्या जवळ असलेल्या कन्हेरी मठात काढलेला फोटो.
मोठी मुर्ती आणि त्यातील योगनिद्रेचे भाव ह्यामुळे काढावासा वाटलेला.
पण वरच्या फोटोमुळे त्याला अजुन एक वेगळा पदर..
आता भावमुद्रा अजुन कशाच्या येवु शकतात हे लोकाना क्लीअर झालं असेल अस वाटतय.
लिम्बु भावु फोटु दिसत नसेल तर सॉरी.
पिकासावरुन दिली आहे लिन्क.
माबोवर फारच कमी साजचे फोटो अपलोड करावे लागतात.
झकासराव......................
झकासराव.............................. अगदी अचुक मांडले......... आम्हाला नेमके कसे फोटो आणि प्रस्तावना अपेक्षीत आहे... याचे अतिशय योग्य उदाहरण आपण दिले..
.
.धन्यवाद
अरे वा.. छानच आहेत सगळ्या
अरे वा.. छानच आहेत सगळ्या मुद्रा
मला भावमुद्रा वाचल्यावर शेअर मार्केट ( भाव ) कोसळल्यावर टीव्हीवर दाखवतात ना.. लोक वर तोंड करुन डिस्प्लेवरचे भाव पहात असत्तात... ती भावमुद्रा आठवली
वर्षा जी.............ती पण एक
वर्षा जी.............ती पण एक भावमुद्राच आहे...
ती पण एक भावमुद्राच आहे>>
ती पण एक भावमुद्राच आहे>> +१
प्रतिसादा काहि उदाहरण म्हणुन भावमुद्रा देइन.
खालील फोटो स्पर्धेसाठी
खालील फोटो स्पर्धेसाठी नाहियेत.
फोटोमध्ये वैविध्य यावं आणि परिक्षकाना त्यांच काम अवघड जाव असा उदात्त हेतु आहे.
शिवनेरीवरील फोटो. बहुद्धा ह्याच स्पष्टीकरण द्यावच लागणार नाही.
कात्रज प्राणिसंग्रहालयातील फोटो.
वाघाच्या चेहर्यावर मला एक मग्रुरी दिसते आणि ती जाम आवडते.
हा फोटु काढलाय सुन्या आंबोळकर ने, मॉडेल आहे यो रॉक्स, कॅमेरा माझा आणि व्हेन्यु आहे कुणे फॉल्स , टायगर व्हॅली..
भले योच्या चेहर्यावरील भाव दिसत नाहियेत पण काय असेल हे आपोआपच कळतय.
तर लोकहो येवु देत वैविध्यपुर्ण फोटो.
काय सुंदर मुद्रा आहेत एकेक !
काय सुंदर मुद्रा आहेत एकेक !
या फोटोत मला दोन मुद्रा
या फोटोत मला दोन मुद्रा दिसतात. पहिली नेहमी माझ्या चेहर्यावर असते ती.. दुसरीबद्द्ल लिहायला नको
[ स्पर्धेसाठी नाही ]
अरे काय खासच आहेत एकेक
अरे काय खासच आहेत एकेक मुद्रा.
ही कशी आहे भावमुद्रा ????
ही कशी आहे भावमुद्रा ????
Pages