Submitted by ganeshsonawane on 18 February, 2013 - 06:14
अखेर जन्म टांगला अता खुटीत मी
लबाड जीवना नसे तुझ्या मुठीत मी
कसे कपाळ वेंधळेच भेटले मला
किती तुरुंग भोगले तुझ्या मिठीत मी
मिळे म्हणे मुआवजाच नासल्या पिका
असा कसा बसेचना तसा अटीत मी
झरा झरा वहायला अधीर आसवे
रुखा-सुखाच थेंब एक हा दिठीत मी
बसेल वाटले तुला रडून मोकळा
कसा बसेन सांग तू वुरा कुटीत मी?
असे नभात सावळाच सुर्य गोल मी
नसे तुझ्यापरीच चंद्र फटफटीत मी
विचारतो बळी अखेर जाब वामना
किती बसू पिड्यात कर्ज हे फिटीत मी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Nilesh have you read it
Nilesh have you read it
काय समजेना भाप्पू! वामन कोण?
काय समजेना भाप्पू!
वामन कोण?
या ठिकाणी बळी म्हणजे शेतकरी
या ठिकाणी बळी म्हणजे शेतकरी आणि वामन म्हणजे विष्णू (देव ) असा अर्थ मला अपेक्षित आहे जर काही चूक असेल तर कृपया corrections सुचवा धन्यवाद
विचारतो बळी अखेर जाब
विचारतो बळी अखेर जाब वामना
किती बसू पिड्यात कर्ज हे फिटीत मी?
शेर आवडला.
धन्यवाद समीरजी इथे काहीजणांना
धन्यवाद समीरजी
इथे काहीजणांना तो समजला नाही मला वाटले लिहिण्यात काही गफलत तर झाली नाही ना
नै बुवा आवडली काफिये कहीजागी
नै बुवा आवडली
काफिये कहीजागी डोक्यावरून जातात तर काहीजागी अंगावर येतात
बसेल वाटले >>>> मी ....<बसेन वाटले> असे करून वाचले...
वुरा कुटीत >>>म्हणजे हो काय ??? पिड्यात कर्ज फिटीत >>>म्हणजे तरी काय हो गणेशजी ???
थोडक्यात सांगायचे तर शब्दछळ जास्त वाटला बघा ............. वैयक्तिक मत!!
राग नसवा
~वैवकु
_____________________________
रच्याकने : हे निलेशजी कोण ???
धन्यवाद वैवुकजी तुमच्या सूचना
धन्यवाद वैवुकजी तुमच्या सूचना बरोबर आहेत मी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करीन. निलेश हे माझे स्नेही आहेत ते माझ्या चुका सांगतात पण मायबोलीचे मेम्बर नाहीत फक्त मायबोली वाचतात. लोभ असावा