Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारेण्डा - वाचलंय ते.
फारेण्डा - वाचलंय ते.
रॉबर्ट लुडलुम वाचते का कोणी,
रॉबर्ट लुडलुम वाचते का कोणी, आणि एक केलरमॅन म्हणुन आहे सायकॉलॉजी वर आधारित थ्रिलर्स असतात. क्लाइव कसलर? लॉरेन्स सॅंडर्स ? लॉ सॅ ची मॅक्नॅली सीरीज फार छान व खुसखुशीत आहे. फायनान्सिअल क्राइम्स, आणि न्यूयॉर्क शहराची सुरेख वर्णने, अगदी मजेशीर व उत्तम भाषा. आपल्या कर्माने गर्तेत जाणारे गुन्हे गार क्लाइव कसलराचा डर्क पिट नामक हिरो एकदम झक्कास आहे. माझा अगदी स्फूर्तिदेवता आहे. नेव्हर से डाय टाइप.
चेतन भगत म्हणजे सिस्टिम आपल्या बाजूने वळवून पैसा करण्याचे उत्कृष्ट उदाहरण. भिकार इंग्रजी.
बडा नाम. शोभाडे पण तसलीच.
देशात पुढच्या लेखकांच्या
देशात पुढच्या लेखकांच्या पिढ्याची पुस्तके सहजासहजी मिळत नाहित का ? एक कुतूहल म्हणून विचारतोय.>>>>>>
खरंतर पुस्तके भरपुर उपलब्ध असतात. अगदी इंग्लिश, मराठी आणि इतर भाषीय; परंतु काही ठरावीक लेखकांची पुस्तके वाचुन आपण आपली एक आवड जोपासली असते. आणी नविन वाचताना काय, परीक्षण किंवा लेखकाची प्रस्तावना वाचतानाच कंटाळा येतो. शिवाय काही गाजलेली पुस्तके वाचायची राहिलेली असतात, मग ती सोडुन इतर पुस्तकांचा क्रम नंतर येतो.
अनुवादीत कथांविषयी म्हणाल तर मुळ पुस्तक आणि लेखन शैली नक्किच अधिक चांगली असते यात शंकाच नाही. पण काही वेळा जाड जाड बाडे(पुस्तकांची) वाचायला तेव्हढा वेळ मिळत नाही आणि अनुवादीत कथा उपलब्ध असतात म्हणुन वाचली जातात. बाकी काही नाही.
देशात पुढच्या लेखकांच्या
देशात पुढच्या लेखकांच्या पिढ्याची पुस्तके सहजासहजी मिळत नाहित का ? >>> पुस्तकाची ( सस्पेन्स / सायफाय ) नावे सुचवा ना. म्हणजे मिळवता येतील.
थ्रिलर वाचणारा खूप मोठा गट
थ्रिलर वाचणारा खूप मोठा गट दिसतोय. (प्याकेज मध्ये बसवत नाहीये, नोंद घ्यावी. )
खरंतर पुस्तके भरपुर उपलब्ध असतात. अगदी इंग्लिश, मराठी आणि इतर भाषीय; परंतु काही ठरावीक लेखकांची पुस्तके वाचुन आपण आपली एक आवड जोपासली असते. आणी नविन वाचताना काय, परीक्षण किंवा लेखकाची प्रस्तावना वाचतानाच कंटाळा येतो. शिवाय काही गाजलेली पुस्तके वाचायची राहिलेली असतात, मग ती सोडुन इतर पुस्तकांचा क्रम नंतर येतो >>
अनुमोदन.
शिवाय प्लिपकार्ट सारखे गेमचेंजर आहेच की. ते कुठेही पुस्तकं पाठवेल. त्यामुळे इंग्रजी पुस्तकं मिळत नाहीत हे म्हणता येणार नाही. अर्थात मग ते विकत घेऊन वाचावे लागेल हे आले. मी शहरात राहत असल्यामूले जस्ट बुक्स ह्या लायब्ररीचा खूप वापर करतो. अनेक पुस्तकं विकत घ्यावी लागत नाहीत मग.
परिक्षण हे पेपर मध्ये आल्यावर वाचून मग पुस्तकं वाचण्याचे दिवस केंव्हाच गेले. परिक्षण हे ऑनलाईन वाचता येतात.
librarything.com
goodreads.com
amazon.com
ही काही चांगली उदाहरण. त्यातल्या त्यात पहिली दोन तर बेश्टच कारण मग आपण तिथे पुस्तकं अॅड केली की त्या त्या जॉनर वरून आपल्याला विविध सजेशन्स मिळतात.
गुडरिड्स आणि लायब्ररीथिंग वर इतके चांगले रिव्हू असतात की त्यातून पेपर मध्ये स्तंभ लिहिणार्यांनी देखील शिकावे. तसेही पेपर मध्ये आलेले रिव्हू मी आजकाल टाळून पुढे जातोय. बरेचदा रिव्हू पेक्षा जाहिरात असते.
फायनल डायग्नोसिस का?>>>>>>>>>
फायनल डायग्नोसिस का?>>>>>>>>> मराठीत अनुवादित पुस्त्क कोणी लिहलेले आहे का ????
आर्थर हॅलीचे हॉटेलही मस्त आहे. एअरपोर्टही वाचा मिळाले तर.>>>>>>>>>>>> मराठीत अनुवादित पुस्त्क कोणी लिहलेले आहे का ????
आज लायब्ररीमधे जाणार आहे ..कोणाला माहीत असेल तर लगेच टाका इथे पोस्ट . धन्यवाद
केदार. धन्यवाद थ्रिलर वाचणारा
केदार. धन्यवाद
थ्रिलर वाचणारा असा काही गट नाही. खूपदा असं होतं कि बेस्टसेलर आहे म्हटल्यावर आपण वाचतो इतकंच. आताशा थ्रिलरपेक्षा अस्सल अनुभव, (ख-या अर्थाने गूढ), नातेसंबंधातले बारकावे दाखवणारे किंवा जीवनविषयक तत्वज्ञान खुबीने मांडणा-या कथा वाचायला जास्त आवडतात. वाचून पटकन विसरल्या जाणा-या थ्रिलर्सपेक्षा खूप काळ सुन्न करणारी थ्रिलर्स जास्त आवडतात. पण हे वाचायच्या आधी माहीत असेलं तर बरंच
आर्थर हॅलीचे हॉटेलही मस्त
आर्थर हॅलीचे हॉटेलही मस्त आहे.+१
फायनल डायग्नोसिस का?>>>>>>>>>
फायनल डायग्नोसिस का?>>>>>>>>> मराठीत अनुवादित पुस्त्क कोणी लिहलेले आहे का ????
आर्थर हॅलीचे हॉटेलही मस्त आहे. एअरपोर्टही वाचा मिळाले तर.>>>>>>>>>>>> मराठीत अनुवादित पुस्त्क कोणी लिहलेले आहे का ????
<<<<<<<अंकु
दोन्ही पुस्तके अनुवादित आहेत आणि मी वाचली आहेत. ती बहुदा विजय देवधरांनी अनुवाद केलेली असावीत.
धन्यवाद मधुरीता
धन्यवाद मधुरीता
mention not अंकु. इथे थ्रिलर
mention not अंकु.
इथे थ्रिलर पुस्तकांबद्द्ल खुप चर्चा चालु आहे पण love stories वर आधारीत असे इंग्लिश किंवा मराठीत अशी चांगली पुस्तके कोणती आहेत? ट्वायलाईट चा एक पार्ट वाचला आहे. अजुन कोणती छान पुस्तके आहेत? किंवा ठरावीक लेखक?
हे पुस्तकाबद्दल नाही. वाचन
हे पुस्तकाबद्दल नाही. वाचन किंवा पुस्तक हाताळण्याच्या सवयींविषयी आहे.
तेंडुलकरांचं साहित्यातून सत्याकडे हे पुस्तक पर्वा लायब्ररीतून आणलंय. अजून वाचून व्हायचंय त्यामुळे त्याबद्दल काही नाही.
पुस्तक उघडताक्षणी पहिल्या चार पाच पानांवर काही रेखाचित्रे व पुस्तकाविषयी, तेंडुलकरांविषयी बारीकसा मजकूर आहे. ले-आऊट फार छान आहे त्या पानांचा. तिथे त्या रेखाचित्रांमधे लाल बॉलपेनाने तेंडुलकरांना एका वाचकाने शिव्या घालून ठेवलेल्या आहेत. त्यांना तुरुंगात का नाही टाकले पासून काहीही... हे असं चार-पाच पानावर आहे.
त्या वाचकाने शिव्या घालण्याला, तेंडुलकरांचा राग करण्याला माझी हरकत नाही ते त्या त्या वाचकाचं मत आहे. पण अश्या प्रकारे पुस्तकाला विद्रूप केलेले बघून वाईट वाटले. राग आला.
व्हाइटनर लावावे किंवा त्याच पुस्तकाच्या दुसर्या कॉपीतून स्वच्छ पानांची झेरॉक्स करून तिथे चिकटवावी अशी प्रचंड इच्छा झाली. करेनही कदाचित ते.
तुमचे काय मत?
नीरजा, पुस्तकांची वाट
नीरजा, पुस्तकांची वाट लावणार्या लोकांना झोडपून काढायला हवं! तशीच ती बोटाला थुंकी लावून पुस्तकाची पानं उलटायची बेक्कार सवय असते काही जणांना!
तशीच ती बोटाला थुंकी लावून
तशीच ती बोटाला थुंकी लावून पुस्तकाची पानं उलटायची बेक्कार सवय असते काही जणांना! <<
त्या सगळ्यांना ’नेम ऑफ द रोझ' सिनेमा दाखवायला हवा. परत हिंमत नाही होणार अशी पानं उलटायची.
नी, आधीच्या पानावर मी फिनिक्स
नी, आधीच्या पानावर मी फिनिक्स ग्रंथालयाबद्दल लिहिलंय ते बघ... त्यांच्याकडे पुस्तकं वाचायची/हाताळायची कशी याचे कडक नियम असतात. त्याचा भंग केला तर सदस्यत्व तिथल्यातिथं रद्द होऊ शकतं
१. पुस्तकं ने-आण करण्यासाठी एक उत्तम दर्जाची जाड प्लास्टिकची पारदर्शक पिशवी आणि जाड रबरबॅण्ड मिळतो. त्यातच ती ने-आण करायची, वाचत नसताना पुस्तकं घालून ठेवायची. त्यावर काहीही जडशीळ - खुणा पडतील असं - ठेवायचं नाही. पूर्वी सायकलच्या कॅरिअरवर पुस्तकं लावायची नाही अशी स्पष्ट सूचना असे
२. पुस्तक साधारण ४५-५० अंशातून उघडून वाचायचं, मुडपायचं नाही, पानं दुमडायची नाहीत - त्यासाठी प्रत्येक पुस्तकात बुकमार्क असतो. कसलेही तेलकट तुपकट हात लावलेले, क शा चे ही बारीकसुद्धा डाग पडलेले चालत नाहीत. काही लिखाण, पेनपेन्सिलच्या खुणा म्हणजे ते अब्रह्मण्यम्....
प्रत्येक पुस्तक परत घेताना त्याची सगळी पानं यासाठी आधी तपासली जातात. पुस्तक विशिष्ट अंशापेक्षा जास्त उघडून वाचलं की त्याच्या 'कण्या'वर त्या खुणा सूक्ष्मरूपात का होईना रहातात आणि तिथल्या मालक-चालकांना त्या इतके वर्षांच्या अनुभवाने लगेच कळतात. की लगेच हजामत होते... पिशवी, रबरबॅण्ड, जुने झाले की लगेच (विनामूल्य) बदलून देतात पण पुस्तकं जपून हाताळणं हे महत्वाचं..
मुळात ग्रंथालयचालक कडक असतील आणि प्रत्येक पुस्तक तपासून दिलंघेतलं जात असेल तर वाचकांना आपोआप पुस्तकं नीट हाताळायची सवय लागते...
एवढा आग्यावेताळपणा करूनही फिनिक्सला भरपूर वाचक लाभले. तेव्हा इतर ग्रंथालयांनी कांकू करण्याला कुठलीही सबब नाही
तशीच ती बोटाला थुंकी लावून
तशीच ती बोटाला थुंकी लावून पुस्तकाची पानं उलटायची बेक्कार सवय असते काही जणांना! <<
त्या सगळ्यांना ’नेम ऑफ द रोझ' सिनेमा दाखवायला हवा. परत हिंमत नाही होणार अशी पानं उलटायची.>>>>>>+१००
मला तर पुस्तकांवर कोनी कोपर
मला तर पुस्तकांवर कोनी कोपर टेकवुन बसल तरी प्रचंड चिड्चिड होते...
व्हाइटनर लावावे किंवा त्याच पुस्तकाच्या दुसर्या कॉपीतून स्वच्छ पानांची झेरॉक्स करून तिथे चिकटवावी अशी प्रचंड इच्छा झाली. करेनही कदाचित ते. >>>> करुन च टाका
लोसेसं च्या लायब्ररीत किंवा
लोसेसं च्या लायब्ररीत किंवा एकूणच टिळक मंदिरात अश्या उपयोगी नियमांपेक्षा इतर नाही ते नियमच जास्त आहेत.
लिफ्ट तिसर्या मजल्यावरच्या हॉलच्या इथे जाणार नाही, हॉलचं भाडं तेवढंच पण मंगळागौर किंवा बारसं यासाठी बुक केला असेल तर एसी वापरता येणार नाही वगैरे.
बाप रे फिनिक्स लायब्ररी अजून
बाप रे फिनिक्स लायब्ररी अजून चालू आहे? आणि श्री . पोन्डा पण ? लायब्ररीचा कधी संबंध आला नाही कारण त्यावेळी पुण्यात नव्हतो. पण १९८० च्या दरम्यान श्री पोन्डा 'माणूस'साप्ताहिकातून इंग्रजी पुस्तक परीक्षण मराठीत लिहीत. तसेच बहुधा फिनिक्स लायब्ररीची जाहिरातही असे माणूस मघ्ये. लायब्ररीत पुस्तक उपलब्ध नसल्यास ते विकत आणून देत याचे फार म्हनजे फारच आश्चर्य वाटे. कारण कॉलेजपासून'लायब्रर्यांत कोणतेही पुस्तक "शिल्लक नाही' असे निरिच्छपणे 'चैतळीय ' वृत्तीने सांगितले जायचे तेच अंगवळणी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर हे फारच नवलाचे वाटे. अर्थात फिनिक्सचा कधी संबंध आला नाही ते मी इंग्रजी वाचत नसल्याने आणि त्याची मासिक वर्गणी त्याही काळात जबराटच होती.(अर्थात ते समर्थनीयही होतेच म्हणा ...) . सदाशिवात बहुधा कुमठेकर रोडला ही लायब्ररी असावी असे वाटते. वरदा, सद्यःस्थिती काय आहे?
ब्रिटीश लायब्ररीच्या
ब्रिटीश लायब्ररीच्या सदस्यात्वासाठी नम्बर लावावे लागतात या आदरयुक्त भीतीदायक दंतकथेमुळे मी अजूनही तिथून जाताना चोरूनच तिकडे पहात जातो. आमच्या एका सायबाला अलोकडच्या काळात सभासदत्व पाहिजे होते म्हणून गेलो होतो तेव्हा मात्र पटकन मिळाले . वाचन संस्कृती कमी झाल्याने आता फार मागणी नसावी बहुधा.. नाही म्हटले तरे दया आली ब्रि. ला. ची एवढे सहजासहजी सदस्य्त्व देताना पाहून
रॉ.हू. - गेल्या दोन
रॉ.हू. -
गेल्या दोन वर्षांतल्या घडामोडी माहित नाहीत. श्री. पोंडांचं आता खूप वय झालंय आणि त्यांचा मुलगा यात इंटरेस्टेड नाही. त्यामुळे त्यांना आता सगळी पुस्तकं विकायची होती/लायब्ररी बंद करायची होती. पुढे काय झालं चौकशी करेन... माझी मेम्बरशिप मी २००४ला थांबवली.
त्यांची वर्गणी कायमच इतर खाजगी ग्रंथालयांच्या तुलनेत (म्हणे) जबराट असे (म्हणजे दोन पुस्तकांसाठी महिना ४०० रु...), पण तुम्ही महिन्यात जितकी पुस्तकं वाचाल तितकी ती वसूल होत असे. पुस्तकं ठेवायला कालमर्यादा कधीच नव्हती. फक्त दिवसातून एकदाच बदलता येईल अशी अट होती (आमच्यासारख्या रिकामटेकड्या वाचकांसाठी)...
आणि फिनिक्समधे इंग्लिशच पुस्तकं होती असं वाटत असेल तर शुद्ध गैरसमज आहे. मी आख्खे गो ना दातार, पण लक्षात कोण घेतो, इ. पुस्तकं तिथूनच आणून वाचली आहेत. (गो ना दातारांच्या कादंबर्या वाचायला हव्यात म्हटल्यावर पोंडा भयंकर खूष झाले होते)
'मुंबैच्या संगे आम्ही
'मुंबैच्या संगे आम्ही (बि)घडलो' - डॉ. सुधाकर प्रभूंचे आत्मकथन वाचले. गिरणगावाचा इतिहास-भूगोल, तिथलं जगणं आणि त्यासोबत लेखकाची जीवनाची वाटचाल. मुंबईच्या इतिहासासंबंधी आणि वर्णनकाळासंबंधाने नवल वाटाच्या अशा अनेक गोष्टींची नोंद - परळ-लालबाग हे गिरणगाव होण्यापूर्वी मुंबईतील नवश्रीमंतांचे वसतिस्थान होते. १९५०च्या काळातही एसेसीचे पेपर्स फुटत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही भाडोत्री सत्याग्रही असायचे. हॉस्पिटलशिवाय मेडिकल कॉलेजांची परंपरा जुनीच आहे, तसाच वैद्यक-औषधव्यवसायातील भ्रष्टाचारही.
आपल्या मामांनीच चालवलेल्या शाळेत शिकता शिकता , नंतर तिथे शिकवता शिकवता डॉक्टरांनी एमेस्सीची पदवी संपादून वैद्यकविद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्यातली irony जाणवल्यावर स्वतःच मेडिकलला प्रवेश घेतला. पण त्यांचा उद्देश मात्र मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापन करणे हाच होता. नाईलाजाने ते जीपी झाले.
(गिरणगावातल्या पेशन्टसचे वर्णन वाचताना मला माझ्या वडिलांच्या मेडिकल ट्रीटमेंटसंबंधीच्या इम्पेशन्सचे मूळ सापडले.) डॉक्टरांचे वडीलही कोणतेही रीतसर वैद्यकीय शिक्षण नसताना डॉक्टरकी करत होते. त्यासाठी नंतर त्यांना वेतनही मिळत असे! गिरणगावातून माहीमच्या मध्यमवर्गीय वस्तीत मालकीच्या घरात राहायला आलेल्या भावी डॉक्टरांचे लग्न आपसूक जुळले, पण साम्यवादी कुटुंबातून आलेल्या भावी वधूच्या मनात मध्यमवर्गीय बूर्झ्वा तरुणाशी लग्न करण्यासंबंधी साशंकता निर्माण झाली! स्वतः डॉक्टरांच्या पत्नीच्या बाळंतपणात आणि आईच्या ऑपरेशनच्या वेळी वैद्यकक्षेत्रातील हलगर्जीपणाची किंमत मोजावी लागली.
डॉक्टरांचे आयुष्य निरुद्देश्य(drifting) वाटावे असे आहे. घडण्याच्या काळाबद्दल त्यांनी सविस्तर लिहिले आहे. मात्र आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यानंतरच्या काळाबद्दल अगदीच जाता जाता लिहावे तसे लिहिले आहे. वैद्यकक्षेत्राबद्दल लिहितानाही हात आखडता घेतला आहे असे वाटले.
संस्कृत, इंग्रजी, मराठी काव्यपंक्ती, शब्दावलींची जागोजाग पखरण केली आहे.
माझ्या आधीच्या पिढीने अनुभवलेली मुंबई वाचताना त्यांच्याही जगण्याचा अदमास घेता आला.
पोंडांचे वय झाले असणारच. मी
पोंडांचे वय झाले असणारच. मी १९८० च्या काळातले सांगतोय म्हनजे पोंडा किमान ७५-८० चे असावेत. पोंडा पुस्तक परिचय (फक्त) इंग्रजी पुच्तकांचाच करत माणूसमध्ये. मी कधीही ही लायब्ररी आणि पोन्डा पाहिले नाहीत पण ते गोवन असावेत असे मला का कुणास ठाऊक वाटते मात्र
त्यावेळी मला पगार १२००-१५०० रु असावा त्यामुळे वर्गणी जास्तच वाटायची....:)
रॉहू, ही चर्चा जरा जास्तच
रॉहू, ही चर्चा जरा जास्तच अवांतर असल्याने विपू बघा..
ब्रिटीश लायब्ररीच्या
ब्रिटीश लायब्ररीच्या सदस्यात्वासाठी नम्बर लावावे लागतात या आदरयुक्त भीतीदायक दंतकथेमुळे मी अजूनही तिथून जाताना चोरूनच तिकडे पहात जातो.>>>>>
रॉबिनहूड माझ्याही अगदी त्याच भावना आहेत. अजुनही मी तिथे पाऊलही टाकले नाहि. पण आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मेंबरशीप सहज मिळत असेल तर जरुर ट्राय करावा म्हणते.
ब्रिटीश लायब्ररीच्या
ब्रिटीश लायब्ररीच्या सदस्यात्वासाठी नम्बर लावावे लागतात या आदरयुक्त भीतीदायक दंतकथेमुळे>> त्यात काय एवढं अडसर वाटण्याएवढं? समजा प्रतीक्षायादी असेल तर कधीतरी आपलाही नंबर लागेलच की... त्या त्या ग्रंथालयाची वाचक हाताळायची एक ठराविक क्षमता असते. त्यामुळे त्यापेक्षा जास्त लोक मेम्बर करू घेत नाहीत..
मीही अशाच गोष्टी ऐकल्या होत्या की वर्षवर्ष नंबर लावावा लागतो, पण माझं काम चार दिवसात झालेलं. सुमारे वीस वर्षांपूर्वी. आता ते आणखीच सुकर झालेलं असणार
ब्रिटीश लायब्ररीच्या
ब्रिटीश लायब्ररीच्या सदस्यात्वासाठी नम्बर लावावे लागतात या आदरयुक्त भीतीदायक दंतकथेमुळे मी अजूनही तिथून जाताना चोरूनच तिकडे पहात जातो>>रॉबिनहूड माझ्याही अगदी त्याच भावना आहेत. >> मधुरीता माझ्याही.
'बीसीएलचे दिवस' असे एक ललित पाडा कोणीतरी. काय त्यांची शान होती.
रैने, तूच पाड की
रैने, तूच पाड की
ललित 'पाडण्याची ' तय्यारी...
ललित 'पाडण्याची ' तय्यारी...
ललित नेहेमी 'पाडलेलंच' असतं
ललित नेहेमी 'पाडलेलंच' असतं काय? कोणी मनापासून सच्चं ललित लिहितच नाही का? हा 'ललित पाडणे' वाक्प्रचार गंमत म्हणून न राहता रूढ करू नका प्लीज.
Pages