Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो मलाही आठवते पूर्वी ती
हो मलाही आठवते पूर्वी ती चर्चा खूप होत असे. तेव्हा त्या लायब्ररीचा दबदबा आणि एकूण 'स्टेटस सिम्बॉल' ही खूप होता.
रॉबीनहूड: दोनहि पुस्तके वाचा.
रॉबीनहूड: दोनहि पुस्तके वाचा. मला तरि दोन्हि पुस्तके आवडली.
तळवलकर वगैरेंची जशी स्वतःची
तळवलकर वगैरेंची जशी स्वतःची विश्लेषणात्मक मतं असायची तसं फारसं नसतं. >> वरदा, मी कुबेरांचा पंखा नाहीये पण काही विषयांत विश्लेषण असूही नये. प्रत्येक माणूस (तो कितीही थोर असला तरी) काही ठरावीक अंगानेच विश्लेषण करतो. सहाजीकच ते बायस्ड असते. असे लिखाण वाचताना, वाचक पण त्याच अनुषंगाने विचार करू लागतो मग. प्रत्येक वेळी लेखकाचा दृष्टीकोन 'पिंच ऑफ सॉल्ट' ने घेणे जमतेच असे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण ह्याला इतके पैलू असतात की सगळे पैलू अगदी तळवलकरांना पण कळले होते असे म्हणणे धाडसाचे होईल. मग त्यांचे विश्लेषणात्मक लेखन वाचण्यापेक्षा निव्वळ माहिती वाचून आपले मत बनवणे चांगले असे वाटते मला.
सध्या मॅथ्यु ग्लास ची
सध्या मॅथ्यु ग्लास ची 'अल्टीमेटम' वाचते आहे. प्रथमदर्शनी कंटाळवाणी वाटली. पण नंतर मात्र हातातुन खाली ठेववत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि प्रदुषणामुळे जगाला असणार्या धोकयाबद्द्ल कादंबरी आहे. यामध्ये अमेरीकेचा नविन राष्ट्राध्यक्ष आणि त्याला इतक्या नवीन संकटांना सामोरे जावे लागते की मुळची आश्वासने आणि आखलेली कामे बाजुला सारून दुसर्याच मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागते. हे इतके प्रभावी पद्धतीने मांडले आहे की, दयाच येते त्या पदावर असलेल्या व्यक्तीची.
राहू, तुम्ही वाचलेल्या
राहू,
तुम्ही वाचलेल्या पुस्तकाची सुरुवात जर
... चीनने अमेरीकेत जाऊन एका लिलावात अमेरिकन तेल कंपनीवर बोली लावली व पुढचे काही महिने अमेरीकेला हादरवून सोडलं. अशी असेल तर ते पुस्तक म्हणजे हा तेल नावाचा इतिहास आहे हे होय.
----------------
गूड अर्थ संपलं एकदाचं.
आलरेडी द रेड स्टार ओव्हर चायना वाचलं असल्यामुळे हे नोबेल व्हिनर असून सुद्धा गूड अर्थ एवढं नाही आवडलं.
गिरीश कुबेर मराठीत यायच्या
गिरीश कुबेर मराठीत यायच्या आधी इंग्रजी अर्थपत्रिकारितेत होते असे ऐकल्या/वाचल्याचे आठवते. त्यांच्या या क्षेत्राच्या बाहेर त्यांनी लिहिलेले काही तितकेसे अपील होत नाही हे खरे.
गिरीश कुबेर यांच्याविषयी बरीच
गिरीश कुबेर यांच्याविषयी बरीच प्रतिकूल मते वाचली इथे. तुमच्या सगळ्यांशी सहमत होऊन देखील असे म्हणावे लागते की किमान या विषयाची तोंडओळख करून देऊन त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे श्रेय तरी त्यांना नक्कीच द्यावे लागेल...
माझ्यासारखा वाचक ज्याला राजकारण म्हणले तरी कंटाळा येतो तो मुळातले हे तेलाचे गुंतागुंतीचे राजकारण इंग्लिश पुस्तके वाचून समजाऊन घेईल अशी मुळीच शक्यता वाटत नाही.
हा पण आता हे पुस्तक वाचल्यानंतर त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्याबद्दल अधिक वाचावे वाटू लागले आहे. आता मी नक्कीच त्याबद्दल आणखी काय काय लिहले आहे ते वाचेनच. पण जर मुळातच कुबेर वाचले नसते तर हे होणे शक्य नव्हते...
दरम्यान इथली चर्चा वाचून
दरम्यान इथली चर्चा वाचून आर्थर हेलीचे फायनल डायग्नोसिस वाचायला घेतले आहे. ७०-८० पानांनंतरही अजून पुस्तक ग्रीप घेत नाही...
ऑफीसमधून घरी गेलो की वाचन होत असल्याने थोडी पाने वाचली की 'उत्सुकतेने झोपलो मी' असेच होत आहे. आणखी थोडा वेळ चिकाटीने वाचेन म्हणतो...
आशुचँप, तुझी कुबेरांच्या
आशुचँप, तुझी कुबेरांच्या पुस्तकाविषयीची ही पोस्ट आवडली
किमान या विषयाची तोंडओळख करून
किमान या विषयाची तोंडओळख करून देऊन त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे श्रेय तरी त्यांना नक्कीच द्यावे लागेल.>>>
आशूचॅम्प - कुबेरांबद्दलची ही नंतरची पोस्ट एकदम बरोबर आहे. पूर्ण सहमत. मी त्यांचे पहिले वाचलेले पुस्तक 'तेल नावाचा इतिहास'. जुन्या माबोवर मी त्याबद्दल तेव्हा जे लिहीले होते ते साधारण असेच आहे:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/123211.html?1172680790
मात्र त्यानंतर मी अधर्मयुद्ध वाचले. नंतर एका तेलियाने वाचू लागलो की मग तोचतोचपणा जाणवू लागतो. त्यात नॅरेशन कंटाळवाणे होऊ लागले मला तरी. काही प्रसंगात असे जाणवले की ही माहिती पूर्ण भाषांतरित वाटते. प्रकाशनाच्या डेडलाईनसाठी दर्जाशी तडजोडी केल्यासारख्या वाटल्या, विशेषतः या तिसर्या पुस्तकात.
मुंबईतरी आता ब्रिटीश
मुंबईतरी आता ब्रिटीश कौन्सिलची लायब्ररी ऑनलाईन आणि ऑनलाईनच उपलब्ध आहे. आता त्यांच्या साईटवर पुस्तकं ब्राऊज करून मागणी नोंदवली की घरपोच येतात. वाचकांना लायब्ररीत जाण्याची सोय आता नाही. पुस्तकं घरपोच किंवा मग इ-पुस्तकं. बाकीच्या शहरांतलं माहित नाही.
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या
रॉहू वेगळा धागा उघडा ह्या चर्चेकरीता आणि तीत फक्त निमंत्रितांना प्रवेश ठेवा म्हणजे चर्चा करता येईल.
<<
निमंत्रणाची वाट पहातोय.
जौद्या , नेटावर पुष्कळ लिखाण
जौद्या , नेटावर पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. तिकडेच वाचू या...
गिरीश कुबेर मराठीत यायच्या
गिरीश कुबेर मराठीत यायच्या आधी इंग्रजी अर्थपत्रिकारितेत होते असे ऐकल्या/वाचल्याचे आठवते<<<< हो, माझ्या बॉसना भेटायला ते बर्याचदा यायचे ऑफिसमधे.
आगाऊला द आफगाणबद्दल
आगाऊला द आफगाणबद्दल अनुमोदन.
त्याचं अॅव्हेंजर वाचल्यावर खूप इम्प्रेस झाले. अर्थात त्यातही खूप रेंगाळत गोष्ट पुढे जाते पण मला ते खूपच आवडलं.
डॅन ब्राउन चं इन्फर्नो वाचून
डॅन ब्राउन चं इन्फर्नो वाचून संपलं. बरेचसे असामीसारखे मत झाले. सुरुवातीचा सुमारे २५-३०% भाग अन शेवटचा २५% भाग खूप इन्टरेस्टिंग अन ट्विस्ट्स ने भरलेला आहे. शेवटचे २५% तर फारच. गंमत म्हणजे जवळपास सगळीच पात्रे बरी- वाईट - ग्रे ते डार्क अशा शेड्स मधे हेलकावे खातात मस्त रंगवलाय तो भाग. दॅट्स टिपिकल डॅन ब्राउन!!
पण मधल्या भागात ते डान्टेचे काव्य, त्यावर आधारित पेन्टिंग्ज, कोण कोण आर्टिस्ट्स्, चर्चेस, ऐतिहासिक वास्तू, जुने गल्ल्या बोळ ....... एक ना दोन .... इतकेss सगळे वर्णन पुस्तकाची पेस पूर्ण स्लो डाउन करते. (वन्स अगेन, टिपिकल डॅन ब्राउन ! )
एक ना दोन .... इतकेss सगळे
एक ना दोन .... इतकेss सगळे वर्णन पुस्तकाची पेस पूर्ण स्लो डाउन करते. ..>>>
म्हणजे वाचावं कि वाचू नये ? इथेच कुणीतरी त्याच्या नव्या पुस्तकाबद्दल प्रतिकूल मत नोंदवलंय. मी नुकतंच त्याचं सर्वात गाजलेलं पुस्तक संपवलं इतक्या उशिरा वाचणारा कदाचित मीच असेन.
नुकतचं खालिद हुसेनी यांचे
नुकतचं खालिद हुसेनी यांचे नवीन 'And the mountains echoed' वाचले.
वाचायची खुप उत्सुकता होती पण एवढे आवडले नाही. 'kite runner' आणि 'thousand splendid suns' वाचले आहे. 'thousand splendid suns' खुप आवडले होते पण हे तिसरे पुस्तक त्यामानाने एवढे आवडले नाही.
६० वर्षांच्या कालावधीत काबुल, पॅरिस, ग्रीस, सॅन फ्रॅन्सिस्को एवढ्या मोठ्या भुभागावर घडणारी गोष्ट आहे.
काही टिपिकल खालिद हुसेनी elements आहेत. काही प्रसंग फार छान रंगवले आहेत, अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते. पण कथेमधे खुप पात्र येत राहतात मग त्यांची व्यक्तिरेखा आणि कथा उभी करण्यात काही पाने जातात आणि नंतर संदर्भ लागतो. पण मग कथेचा ओघ विस्कळीत झाल्यासारखा वाटतो. ३५० पानापर्यंत नेटाने वाचले. मग एक दोन नवी पात्रे आली आणि २०/२५ पानांनंतर त्यांचा मूळ कथेशी काय संदर्भ आहे ते कळले मग कंटाळा आला. मग अशीच मधली काही पाने गाळून वाचले आणि संपवले.
सदानंद देशमुखांची बारोमास
सदानंद देशमुखांची बारोमास वाचलीये का कुणी ?
मी वाचलय बारोमास. इतक सुंदर
मी वाचलय बारोमास. इतक सुंदर पुस्तक असूच शकत नाही. खूप खूप हेलावून जातो आपण वाचताना. पण एकच की पुस्तक हे वर्हाडी भाषेत आहे. पण कथा इतकी सुंदर आहे की भाषेची अडसर होऊ नये.
...यी: इन्फर्नो बद्दल धन्स!
'बखर अंतकाळची' एका झपाट्यात
'बखर अंतकाळची' एका झपाट्यात वाचले, प्रचंड आवडले.
डीकन्स्ट्रक्शनिस्ट तर आहेच पण अत्यंत प्रभावी हिस्टॉरिकल रिव्हिजिनिझमचा नमुनाही म्हणता येईल. दुय्यम दर्जाचा एक शिलेदार ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या लोकांना भेटतो, सर्व कळीच्या घटनांच्यावेळी हजर असतो आणि त्याच्या नजरेतून, त्याच्या वकूबाप्रमाणे या सार्याचा अर्थ लावतो हा प्रकारच भन्नाट आहे.
पेशवाईचा र्हास आणि इंग्रजी सत्तेचा उदय का व कसा झाला याची मिमांसा करताना जातीभेदाची वाढती प्रखरता, जनतेशी घेणेदेणे नसलेले स्वार्थी राजे आणि एका ध्येयाने प्रेरित असलेला इंग्रज ही तीन महत्वाची सूत्रे मांडली आहेत.
एक 'महान' व्यक्ती आणि त्याचे सतत समर्थन केलेले कारनामे ही मराठी ऐतिहासिक कादंबरीची चौकट अंताजी पार मोडून काढतो, त्यासाठी टाळ्या!
डोंगरी ते दुबई वाचून संपवले.
डोंगरी ते दुबई वाचून संपवले. पुस्तक "कमिशन" करून लिहिल्याचा अधेमधे भास झाला. यातल्या काही घटना अगदी व्यवस्थितरीत्या स्क्रीनप्ले पद्धतीने लिहिल्या आहेत. तेवढा वाचताना उत्कंठा वाढते, नंतर गुणगान् चालू झाले की बरत ब्नोअर होतं.
सर्वात जास्त गमतीशीर आणि मजेदार मुद्दा आहे की दाऊद इब्राहिमला मुंबई बॉम्बस्फोट इतके भयावह असतील याची कल्पनाच नव्हती म्हणे.
नंदिनी, >> दाऊद इब्राहिमला
नंदिनी,
>> दाऊद इब्राहिमला मुंबई बॉम्बस्फोट इतके भयावह असतील याची कल्पनाच नव्हती म्हणे.
मीही हेच ऐकलंय. दाऊदच्या गुन्हेगारी जाळ्याचा केवळ उपयोग करून घेतला गेलाय. कर्ताकरविता वेगळाच आहे.
आ.न.,
-गा.पै.
अन्कुर चावलाचे म्रुणालिनी
अन्कुर चावलाचे म्रुणालिनी नानिवडेकर अनुवादित "ते चौदा तास "वाचत आहे.
.
थरारक अनुभव...
गामा, कर्ता करविता वेगळा आहे
गामा,
कर्ता करविता वेगळा आहे ते माहित आहे,पण दाऊदला अगदीच बॉमस्फोट होणार आहेत हेदेखील माहित नव्हतं हे पटायला थोडं कठिण जातंय. आरडीएक्स उतरवून त्याचे फटाके तर बनवणार नव्हते ना कुणी.
बारोमास मीपण वाचली
बारोमास मीपण वाचली २-३वर्षापूर्वी. खूप मनाला भिडली. नुकतेच सिद्धार्थ पारधे यांचे 'कॉलनी' हे पुस्तक वाचले. साहित्य सहवास कॉलनी( जिथे मराठीतील नामवंत लेखक राहतात आणि सचिन तेंडूलकर जिथे लहानाचा मोठा झाला ती कॉलनी), ह्याच कॉलनीतला वॉचमनचा मुलगा सिद्धार्थ कसा स्वकष्टाने आणि कॉलनीतील लोकांच्या मदतीने जीवनात यशस्वी झाला त्याची कहाणी आहे. छान पुस्तक आहे.
समहाउ मला नाही आवडले कॉलनी
समहाउ मला नाही आवडले कॉलनी
रणजित देसाईंचे प्रपात वाचले.
रणजित देसाईंचे प्रपात वाचले. एखाद-दुसरी कथा सोडल्यास फार कंटाळवाणे वाटले. त्यांचे शहरी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर असणारे कथासंग्रह मला नेहेमीच थोडेसे हुकल्यासारखे (गंडल्यासारखे) वाटतात. असो.
यशोधरा गायकवाड यांचे 'माझी
यशोधरा गायकवाड यांचे 'माझी मी' हे आत्मचरित्र मागे वाचले. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या एका दलित महिलेची हि गोष्ट आहे, मुरबाड तालुक्यातील हे कुटुंब पण त्यांच्या घरात शिक्षणाला खूप महत्व होते आणि यशोधरा लग्नाआधी जुनी ७वी होत्या मग त्यांनी M.A. M.Ed. केले. खूप संघर्ष केला.
मधे एक वेगळेच पुस्तक वाचले
मधे एक वेगळेच पुस्तक वाचले '500 days' म्हणून. ९/११ नंतरच्या ५०० दिवसांची गोष्ट. फार वेगवेगळी, उत्कंठावर्धक माहिती मिळाली.
पुस्तकाची सुरुवात ९/११ घटनेच्या आधी मिळालेल्या गुप्त माहितीने होते. काहितरी विमानं, विमानतळं असणार्या ठिकाणी काहितरी हल्ला होणार अशी माहिती मिळाल्यावर कसून तपासाला सुरुवात होते पण शेवटी हल्ला होतोच. त्याआधी बजेट कट्मुळे NSA कडे पैशाचा ओघ आटलेला असतो आणि ही घटना घडल्यावर साधनसामुग्री कशी कमी पडतेय ह्याची बुश प्रशासनाला जाणीव होते. हे वाचल्यावर अमेरिकेतही असे घड्ते हे कळले :). बर्याच हॉलिवूड चित्रपटात जशा घटना दाखवतात तशा प्रत्यक्ष घडतात हे सुद्धा कळले. ताकही फुंकून पिण्याची वृती झाल्यामुळे बरेच चुकीचे,सामन्य जनतेची दिशाभूल करणारे निर्णय घेतले जातात. संशयावरून इराकवर केलेला हल्ला, ग्वांटानामो बे इ, बद्दल नवीन माहिती कळली. सिरियामधील अत्यंत भयानक अशा 'फार-फलस्तिन' ह्या तुरुंगात कैद्यांचे होणारे अमानवीय हाल आणि नुसत्या संशयावरून अटक झालेल्या निष्पाप लोकांना भोगावा लागणारा त्रास वाचून हळहळ वाटते.
जागतिक राजकारणाची दिशा बदलणारे अनेक निर्णय कसे घेतले गेले हे कळले आणि काही चुकिचे निर्णय आणि त्यांचे जागतिक परिणाम वाचून वाईट वाटते.
Pages