मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला श्याम मनोहरांचे लेखन जबरी कंटाळवाणे वाटायचे. त्यामुळे 'उत्सुकतेने ' बाबत इथे वारंवार वाचूनही टाळाटाळ केली. कधी उत्सुकतेने वाचून पहायला हवे.

टण्याशेट डब्लिनर्स खरचं वेगळी आहे. त्याच्या पुस्तकाला माझ्या युलिसिसच्या दोन वेळेसच्या फियास्को नंतर हात लावावा वाटत नव्हता, पण म्हणलं एकदा बघावं. काल आणली आणि ४८ पानांनंतरही वाचतोय म्हणजे पूर्ण करेन. Happy फिनेगन्स नेक्स्ट इन लाईन. आणि ह्यातील पात्र पुढे युलिसिस मध्येही आहेत तर पुढे मागे कदाचित ह्या छोट्या कथांचा त्या कादंबरीसाठीही उपयोग होईल.

बायदवे हक्सलीकाकांच्या ब्रेव्ह न्यु वल्ड बद्दल मी इथे लिहिलंय का ते आठवत नाही, पण बहुदा तुला आवडेल.

ज्या कोणाला सायन्स फिक्शन आवडते त्यांना ही कादंबरी सिलबॅसमध्येच आहे असे समजून वाचने मस्ट.

'उत्सुकतेने मी झोपलो' हे संपूर्ण पुस्तक 'रिडींग बीट्वीन द लाईन्स' आहे. मनोहरांची नेमकी 'कळ' काय ज्याला समजेल त्याला त्यांचे कोणतेच लेखन अगम्य वाटणार नाही. जगणं अर्थपूर्ण व्हावं, याची पद्धत शोधतायत श्याम मनोहर. त्यासाठी ते कोणताही विचार उलट सुलट केल्याशिवाय सोडत नाहीत. 'उत्सुकतेने..' च्या पहिल्याच पानावर त्या पुस्तकाचं मर्म आहे (आणि असं त्यांच्या हरेक पुस्तकाच्या बाबतीत) 'व्यक्तीने उल्टासुल्टा विचार करायची देणगी गमावता कामा नये.'
आपल्याकडे पुस्तक एकदा वाचले की कळले पाहिजे अशी लेखकांनीच सवय लावली आहे. पण मनोहरांचं प्रत्येक पुस्तक जेव्हा पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचंय त्याच्या जवळपास आपण जातो. हा साक्षात्काराचा आनंद अवर्णनीय असतो. रुढीनुसार कुणी याला लेखकाची मर्यादा म्हणेल अन सोडून देईल. पण जर लेखक एका कादंबरीचे ६-७ खर्डे करत असेल तर वाचकाने ती समजून घ्यायला २-३ खर्डे करायचे कष्ट घ्यायला काय हरकत आहे? हीच गोष्ट हिंदू ची.
कधी कधी लेखक जसा घडत जातो तसं तसं वाचकानेही घडणं अभिप्रेत असतं. तेव्हाच त्या लेखकाच्या तपश्चर्येतून नक्की काय साध्य झालं आहे ते उमगतं. मनोहरांचा नायक एका कथेत म्हणतो -‘काय पाहिजे ते मला माहीत नाही म्हणून, पण सुशे, नको ते नाकारायचं ते धैर्य मी दाखवलंय...’ मनोहर नेमकं हेच करतायत. त्यांना समजून घ्यायचं असेल तर हे पुरुषोत्तमराव हे ईश्वरराव, शीतयुध्द सदानंद, खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी.. , कळ या क्रमाने पुस्तकं वाचणं फायद्याचं होईल. 'अंधारात मठ्ठ काळा बैल' बद्दल बरंच बोलण्यासारखं आहे पण तूर्तास मनोहरांबद्दल ही मंडळी काय म्हणतायत ते वाचा ..
http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4...

धन्यवाद आशूडी, अप्रतिम पोस्ट!
ज्या कोणाला सायन्स फिक्शन आवडते त्यांना ही कादंबरी सिलबॅसमध्येच आहे असे समजून वाचने मस्ट.>>
'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' ला निव्वळ 'सायन्स फिक्शन' च्या कॅटेगरीत घालणे चुकीचे आहे. त्यातील भविष्यातील जगाची कल्पना एवढाच धागा 'सायन्स फिक्शन' आहे. कादंबरीचा मूळ विषय मानवी समाजाचे तथाकथित 'रेग्युलेशन' आणि त्याचे परिणाम यावर आहे. माझ्या मते १९८४पेक्षाही सरस.

आज महाप्रयत्नपूर्वक विकिवरती शिवा ट्रायॉलॉजीची कथा वाचली. अतिशय शारिरीक आणि मानसिक थकवा आला..

मनमोहन देसाईलासुद्धा जमणार नाहीत इतक्या काय काय गोष्टी आहेत त्यात -
टेररिस्ट अ‍ॅटॅ़क, कारखानदारीतून उद्भवणारी पाणीटंचाई आणि नदीप्रदूषण, हरवलेला मुलगा, जुळी बहिण यांची पुनर्भेट, भावाने जिवावर उदार होऊन मोठ्या भावाला वाचवणं, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, इजिप्शिअन भाडोत्री मारेकरी, शांतता कराराची कॉन्फरन्स, दोस्ती, दुश्मनी, प्यार, ईमान, उसूल.... (नंदिनीच्या मते मेलुहात एसी पण आहे. आणी शिव अधूनमधून भाजीपोळी सुद्धा खातो - हे विकित नसल्याने मला माहित नव्हतं!!)

बादवे, सोमरस म्हणजे कोकाकोला का हो?

आपण को तो आवडा बाबा 'शिव ट्रायोलॉजी' .... रिझनेबल फिक्शन .... मूळ पुस्तकं एकदा तरी वाचण्यासारखी आहेत.

रैना..
>>मला श्याम मनोहरांचे लेखन जबरी कंटाळवाणे वाटायचे. त्यामुळे 'उत्सुकतेने ' बाबत इथे वारंवार वाचूनही टाळाटाळ केली. कधी उत्सुकतेने वाचून पहायला हवे>>
सहमत. मलाही नाही क्लिक झालं.खरं तर भ्रमनिरासासारखं वाटलं. रुचिभिन्नता.
वरदा, शिवा ट्रायलॉजीतली पहिली दोन वाचलीत. यशस्वी कमर्शियल सिनेमासारखी आहेत..तुम्ही वाचत रहाता, मन तेवढा वेळ गुंतते अन त्या गुंतण्याचे नंतर आश्चर्य वाटते.कुणीतरी एक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला हे अस्तिपक्षी, पण अगदीच उथळ.. शिवाय कच्चे दुवेही खूप.

हीच गोष्ट हिंदू ची>>> कसं जमतं बॉ तुम्हाला अगदी नेमकं मांडायला!
अख्खी पोस्ट पटली. धन्यवाद.

Dan Brown चे Inferno वाचले. Time वगैरे च्या review मधे जेव्हढे टाकाऊ म्हटलय तेव्हढे टाकाऊ नाहि वाटले. लांबड लागली आहे असे नक्की म्हणता येईल पण पहिला ५०-६०% भाग fast paced नि त्यामूळे engrossing आहे.
Dante's Divine Comedy वर जेव्हढी वाचली आहेत त्यात हे उजवे वाटते. अर्थात मधे बराच वेळ documentary चा भास होत राहतो, पण Dan Brown च्या सगळ्याच कादंबर्‍यांमधे हे असतेच. Overpopulation चा विषय घेऊन त्याच्याभोवती सगळे गुंफलेय पण त्याच्या जागी इतर दुसरा विषय पण सहजच खपला असता. Paradise Lost चे references काढून टाकले तर techno thriller म्हणून खपवता आली असती.
leisurely weekend read म्हणून चांगली आहे, पण नाहि वाचली तर, "का नाहि वाचली ?" अशी चुटपुट लागण्याची गरज नाही.

गुलजारांचं अंबरीश मिश्रा यांनी अनुवाद केलेलं "देवडी" वाचतेय. खूप सुंदर पण डिप्रेसिंग वाटतंय.
मधली मधली रेखाटनं आणि त्याखालच्या कवितांच्या पंक्ति मात्र अप्रतीम.
अजून वाचून झालं नाही. ग्लॅमर दुनियेतल्या सुप्रसिद्ध व्यक्तींबद्दलचे छोटे छोटे डीटेल्स इंटरेस्टिंग.
उदा. जावेद अख्तर यांचा तापट स्वभाव. त्यांचं आणि साहिर(त्यांचे वडील) यांच्यातल्या चकमकींची वर्णनं.आणि त्यांच्याविषयी लिहिताना एखाद्या लहान मुलाविषयी लिहावं तसे उल्लेख आहेत.

शिवा ट्रायालॉजी मस्त!!! त्यामध्ये सध्याच्या काळाला अनुसरुन पुराणातल्या गोष्टींचा अर्थ आणि चिकित्सा दिसुन येते. अनेक जुन्या कथा नवीन पध्द्तीने विचारात घ्यावे असे वाटते. अमिष त्रिपाठी जिंदाबाद!!!!!!!!!!!

फोर्सिथचे 'द अफगान' वाचले. ठीकच आहे.
शेवट फार गुंडाळल्यासारखा वाटला. त्याच्या नेहमीच्या स्टाईलने तो प्रचंड माहिती देतो जे आता बोअर होऊ लागले आहे. नाट्यमय प्रसंग रंगवताना तो कमी पडतो असेही वाटले.
सगळी कादंबरी अत्यंत प्रो-वेस्टर्न आहे हे देखील खटकले.

अंकु, अंबरिश मिश्राचे शुभ्र काही जीवघेणे मी वाचले आहे. त्यात सिनेमा-संगीत क्षेत्राशी संबंधितांवर दीर्घ लेख आहेत - डॉक्युड्रामा स्टाईलमध्ये. मी जेव्हा वाचले होते ते पुस्तक (१० वर्षापुर्वी) तेव्हा आवडले होते. कधी कधी भाषा बोजड वापरतात ते पण तरी छान होते.
तीत ओपी नय्यर, बेगम अख्तर, मंटो, आळतेकर इत्यांदीवर लेख आहेत.

अजेय झणकरांचं द्रोहपर्व वाचतेय.. रंजक पद्धतीने लिहिले आहे अन माहितीपूर्णही आहे, पण विषय अन कालखंडच असा आहे की मोघलांचं क्रौर्य कमी वाटेल.. डिप्रेसिंग आहे.इतिहासाचा जास्त अभ्यास असणार्‍यांचं मत जाणून घ्यायला आवडेल..

द्रोहपर्व मी वाचले आहे. मुळ प्लॉट इतिहासाला धरून आहे. पण कादंबरीत आलेले हेर आणि बर्‍याच गोष्टी काल्पनिक आहेत.

प्लॉट असा आहे की नारायणराव पेशव्यांच्या खून होतो. त्यानंतरची मराठेशाही कशी उभी राहिली. मग ऐतिहासिक पात्रांसोबत दोन नवीन हेर पात्र गुंफले आहे. ते म्हणजे उदाजी नाईक आणि तुळजा. तुळजा ही एक हेर नाना पैदा करतो ( तिचे वडील नानाच्या पदरी हेर म्हणून असतात. पण नानाला येत्या कालखंडात पेशवीनी बरोबर कोणीतरी हवे असते. मग तिची तो नेमणूक करतो. मग नारायणरावांचा खून आणि त्यातून नानाने कश्या पद्धतीने गरोदर असलेल्या नारायणरावांच्या बायकोला वाचविले आणि पुरंदरावर नेऊन ठेवले. राघोबा पेशव्यापाठीमागे हुजूरातीचे सैन्य लावून एक वर्षाआतच कसे लांब पळवून लावले. मग राघोबा-इंग्रज संबंध अनेक कट कारस्थाने, पेशवे-शिंदे संबंध, पेशवे-होळकर संबंध, नाना फडणविसांची मुत्सद्देगिरी असे अनेक वळणे घेऊन कादंबरी इंग्रज मराठे युद्धावर येऊन थांबते. ( जे युद्ध मराठ्यांनी जिंकले)

अनेक घटना ह्या ऐतिहासिक आहेत. जश्यास तश्या आल्या आहेत पण येताना त्या तुळजा / उदाजीला घेऊन येतात त्यामुळे एका हेराच्या दृष्टिकोणातून देखील ही कादंबरी मांडली गेली आहे.

मला बरी वाटली. कादंबरी आहे ह्याचे भान ठेवून वाचले तरी इतिहासाची अजिबातच माहिती नसणार्‍या व्यक्तीला नक्कीच त्या ५-७ वर्षांची तोंडओळख होऊ शकते.

थॅन्क्स केदार. पेशविनी - Lol पहिल्यांदाच असा उल्लेख ऐकला.

राघोबाला इतिहासकारांनी एवढा व्हिलन का केला आहे, तसेच तेव्हाच्या लोकांनी सुद्धा त्याला पेशवा का होऊ दिले नाही कळत नाही. ते इंग्रजांना फितूर वगैरे नंतर झाले ना?

नॉट विदाउट माय डॉटर या पुस्तकाबद्दल या धाग्यावर (पहिल्या भागात बहुधा) नकारात्मक मत वाचून त्या वेळी तो कार्यक्रम पुढे ढकलला होता. पण आता वाचायला घेतलं तर अतिरंजित काहीच वाटलं नाही. इराण वगैरेची वर्णनं पटणेबलच आहेत.

केदार, लोलिता वाचायला घेतलय. काय भाषा आहे. कहर सुंदर. दुसर्‍याच पानावर 'poetically superstitious' हा वाक्प्रचार वाचून झडझडून दाद दिली. पण एका मुलीची आई म्हणून मात्र भयंकर अस्वस्थ वाटत जाते हळूहळू.

Pages