नमस्कार,
नुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.
मुझीमे रहके मुझीसे दूर,
ये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर
अतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि आशाताई, रफीसाहेबांचा मधुर आवाज.
हे गीत ऐकताना असे वाटले की अश्विनी यांनी स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना साठी एक धागा चालू केला आहे,
तसा भक्तीगीतांसाठी एक वेगळा धागा सुरू करूयात.
यामधे आपल्याला आवडणारी भक्तीगीते लिहावीत.
गीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट / अल्बम, इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान !
तसे तर सर्व भाषांमधली गीते चालतील, पण सुरूवात प्रामुख्याने हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांबद्दल करावी असे वाटते. सुरूवात करत आहे मला आवडणार्या काही गीतांनी
मन तरपत हरी दर्शन को आज
चि : बैजू बावरा, गी : मोहम्मद शकील, सं : नौशाद, गा : रफी, राग : मालकंस
(नौशाद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की हे गीत एका अर्थाने वेगळे अशासाठी आहे की यामधे तिन्ही लोक हिंदू धर्माचे नाहीत. जे लोक कलेचे उपासक असतात त्यांना धर्म हा अडसर होऊ शकत नाही. गीताच्या रेकॉर्डीन्गला गीतकार मोहम्मद शकील देखील उपस्थित होते. शेवटी एक छोटेसे कृष्णभजन आहे त्यावेळी तर ते पण तल्लीन होऊन डोलत होते. )
आना है तो आ राह मे कुछ फेर नही है, भगवान के घर देर है अंधेर नही है
चि : नया दौर, गी : साहीर, सं : ओपी , गा : रफी, राग : ?
(या गीताचे चित्रिकरण जेजुरी येथे झाले आहे असे म्हणतात)
1 देवा श्री गणेशा - (अजय / अजय अतुल / अग्नीपथ)
2 साँचा तेरा नाम - (अनुराधा / लक्ष्मीप्यारे / बिवी हो तो ऐसी)
3 पिया हाजी अली - (ए आर रहमान / ए आर रहमान / फिझा)
4 ख्वाजा मेरे ख्वाजा - (ए आर रहमान / ए आर रहमान / जोधा अकबर)
5 अल मदद मौला - (ए आर रहमान / ए आर रहमान / मंगल पांडे)
6 कुन फाया कुन - (ए आर रहमान / ए आर रहमान / रॉक स्टार)
7 जिक्र - (ए आर रहमान / ए आर रहमान / बोस फरगॉटन हिरो)
8 कौन ठगवा लूटल हो - (आशा / जयदेव / अनकही)
9 मुझी मे छुपकर मुझी से दूर, ये कैसा दस्तूर - (आशा, रफी / मदन मोहन / जेलर)
10 राधा के प्यारे कृष्ण कन्हाई - (आशा / नौशाद / अमर)
11 तू शाम मेरा साँचा नाम तेरा - (आशा, उषा / राजेश रोशन / ज्युली)
12 तोरा मन दर्पण कहलाये - (आशा / रवी / काजल)
13 रोम रोम मे बसनेवाले राम - (आशा / रवी / निलकमल)
14 इतनी शक्ती हमे दे न दाता - (अशोक खोसला, शेखर सावकार, घनश्याम वास्वानी, मुरलीधर / कुलदीप सिंग / अंकुश)
15 पल पल है भारी - (आशुतोष गोवारीकर, विजय प्रकाश, मधुश्री / ए आर रहमान / स्वदेस)
16 मन मोहना - (बेला शेन्डे / ए आर रहमान / जोधा अकबर)
17 घूँघट के पट खोल - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
18 मत जा मत जा जोगी - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
19 उठत चले अवधूत - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
20 ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ - (गीता दत्त, सुधा मल्होत्रा / स.दे.बर्मन / काला बाझार)
21 एक ओम्कार - (हर्षदीप कौर / ए आर रहमान / रंग दे बसंती)
22 शिवजी बिहाने चले - (हेमंत कुमार / स.दे.बर्मन / मुनिमजी)
23 राम सियाराम जय जय राम - (जसपाल सिंग / रविंद्र जैन / गीत गाता चल)
24 श्याम तेरी बँसी पुकार राधा नाम - (जसपाल सिंग, आरती मुखर्जी / रविंद्र जैन / गीत गाता चल)
25 नूर उल अल्लाह - (कादीर, मुर्तझा / ए आर रहमान / मिनाक्षी)
26 मौला मेरे मौला - (कैलाश खेर, जावेद अली / ए आर रहमान / दिल्ली ६)
27 ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे - (किशोरकुमार / रा.दे.बर्मन / अब्दुल्लाह)
28 ओ बंदा रे - (कृष्णा बी. / गौरव दासगुप्ता / राझ २)
29 ओ पालनहारे - (लता, साधना सरगम, उदीत नारायण / ए आर रहमान / लगान)
30 एक तूही भरोसा एक तूही सहारा - (लता / ए आर रहमान / पुकार)
31 जय जय हे जगदंबे माता - (लता / चित्रगुप्त / गंगा की लहरें)
32 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो - (लता / चित्रगुप्त / मैं चूप रहूँगी)
33 तुम आशा विश्वास हमारे - (लता / हृदयनाथ / सुबह)
34 माता सरस्वती शारदा - (लता, दिलराज कौर / जयदेव / आलाप)
35 अल्लाह तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
36 प्रभू तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
37 चुप चुप मीरा रोये - (लता / कल्याणजी आनंदजी / जॉनी मेरा नाम)
38 बहुत दिन बीते - (लता / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
39 सत्यम शिवम सुंदरम - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
40 यशोमती मैय्यासे बोले नंदलाला - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
41 कान्हा कान्हा आन पडी तेरे द्वार - (लता / लक्ष्मी प्यारे / शागीर्द)
42 खुदा निगेहबान - (लता / नौशाद / मुघल ए आजम)
43 एक राधा एक मीरा दोनो ने - (लता / रविंद्र जैन / राम तेरी गंगा मैली)
44 ए री मैं तो प्रेमदिवानी - (लता / रोशन / नौबहार)
45 जागो मोहन प्यारे - (लता / सलील चौधरी / जागते रहो)
46 राधा ने माला जपी श्याम की - (लता / स.दे.बर्मन / तेरे मेरे सपने)
47 बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे - (लता / शंकर जयकिशन / एक फूल चार काँटे)
48 मोहे छेडो ना नंद के लाला - (लता / शिव हरी / लम्हे)
49 ज्योती कलश छलके - (लता / सुधीर फडके / भाभी की चुडियाँ)
50 म्हाने चाकर राखो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
51 मुरलिया बाजेगी - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
52 पिया ते कहाँ गयो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
53 ऐ मालिक तेरे बंदे हम - (लता / वसंत देसाई / दो आँखे बारह हाथ)
54 जो तुम तोडो पिया - (लता / वसंत देसाई / झनक झनक पायल बाजे)
55 ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे - (महेन्द्र कपूर / कल्याणजी आनंदजी / बैराग)
56 हे नटराज गंगाधर शंभो - (महेन्द्र कपूर, कमल बारोट / एस.एन.त्रिपाठी / संगीत सम्राट तानसेन)
57 तुम मेरी राखो लाज हरी - (मन्ना डे, सुधा मल्होत्रा / मदन मोहन / देख कबीरा रोया)
58 आन मिलो आन मिलो श्याम साँवरे - (मन्ना डे, गीता दत्त / स.दे.बर्मन / देवदास)
59 भय भंजना सुन वंदना हमारी - (मन्ना डे / शंकर जयकिशन / बसंत बहार)
60 तू प्यार का सागर हैं - (मन्ना डे / शंकर जयकिशन / सीमा)
61 ज्योत से ज्योत जगाते चलो - (मुकेश / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
62 सजन रे झूठ मत बोलो - (मुकेश / शंकर जयकिशन / तिसरी कसम)
63 देव पुजी पुजी - (परवीन सुलताना / उस्ताद दिलशाद खान / आश्रम)
64 वृंदावन का कॄष्ण कन्हैय्या - (रफी, लता / हेमंत कुमार / मिस मेरी)
65 सुख के सब साथी - (रफी / कल्याणजी आनंदजी / गोपी)
66 शिर्डीवाले साईबाबा - (रफी / लक्ष्मी प्यारे / अमर अकबर अँथनी)
67 मन तरपत हरी दर्शन को आज - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
68 ओ दुनिया के रखवाले - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
69 तू है मेरा प्रेम देवता - (रफी, मन्ना डे / ओ.पी.नय्यर / कल्पना)
70 आना है तो आ राह मे कुछ फेर नही है - (रफी / ओ.पी.नय्यर / नया दौर)
71 अजब तेरी कारीगरी रे करतार - (रफी, कृष्णा कल्ले / रवी / दस लाख)
72 बिरज में होरी खेलत नंदलाल - (रफी / रवी शंकर / गोदान)
73 बडी देर भयी नंदलाला - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
74 दुनिया ना भाये मोहे - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
75 परवर दिगारे आलम - (रफी / एस.एन.त्रिपाठी / हातिमताई)
76 आयो प्रभात - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
77 धन्य भाग सेवा का अवसर पाया - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
78 जाँऊ तोरे चरणकमल पर वारी - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
79 हाँ रहम फरमा ऐ खुदा - (राशिद अली / अमित त्रिवेदी / आमीर)
80 आरती तुम्हारी - (रेखा भारद्वाज / ए आर रहमान / दिल्ली ६)
81 अल्लाह मेघ दे पानी दे - (स.दे.बर्मन / स.दे.बर्मन / गाईड)
82 मोरया मोरया - (शंकर महादेवन / शंकर एहसान लॉय / डॉन)
83 जैसे सुरज की गर्मी से - (शर्मा बंधु / जयदेव / परिणय)
84 तू प्रभ दाता दान मत पुरा - (सुखविंदर / सुखविंदर, वनराज भाटीया / हल्ला बोल)
85 अल्लाह करम करना तू मौलाह रहम करना - (सुमन कल्याणपुर / उषा खन्ना / दादा)
86 होरी खेले रघुबिरा अवध मे - (उदीत नारायण, अलका याज्ञिक, अमिताभ / आदेश श्रीवास्तव / बागबान)
87 तेरी पनाह मे हमे रखना - (उदीत नारायण, साधना सरगम, सारिका कपूर / नदीम श्रवण / पनाह)
88 मैं तो आरती उतारूँ रे - (उषा / सी अर्जुन / जय संतोषी माँ)
89 हम को मन की शक्ती देना - (वाणी जयराम / वसंत देसाई / गुड्डी)
90 शाम रंग रंगा रे हर पल मेरा रे - (येसूदास / भप्पी लाहिरी / अपने पराये)
'लागा चुनरीमें दाग'चा
'लागा चुनरीमें दाग'चा अध्यात्मिक अर्थ आहे, त्यामुळे चालेल.
'कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल'
फा, बहुतेक मी वर लिहिलेल्या दुसर्या ओळीच्या अनुषंगाने इब्लिसने 'मैं तो भूल चली' लिहिलं असावं.
मग 'सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है' हेही सुचवेन मी.
मामी, 'जो तुम तोडो'
मामी, 'जो तुम तोडो' गुलजारच्या 'मीरा' सिनेमातसुद्धा आहे. पं. रविशंकरांचं म्यूझिक.
आकाशवाणीवर पूर्वी नेहमीच्या
आकाशवाणीवर पूर्वी नेहमीच्या (देवदेवतांबद्दलच्या) भक्तीगीतांपेक्षा वेगळी गाणी क्वचितच लागत. एक "बुद्धदेवा तुझी ज्ञानगंगा, मार्ग दावी आम्हाला अभंगा" लागायचे, ते चांगले होते. एक रमजान ला मुस्लिम गीतही लागायचे. आठवत नाही.
येस्स स्वाती_आंबोळे. ते ही वर
येस्स स्वाती_आंबोळे.
ते ही वर अॅड करते. धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आकाशवाणी मुंबई ब वर सकाळी
आकाशवाणी मुंबई ब वर सकाळी ६/६.१५ वाजता भक्ती गीते लागायची त्यात एक बहुतेक कर्नाटकी गीत लागायचं. शब्द कळायचे नाहीत पण ऐकायला मस्त वाटायचं. काही तरी ओनी यन्नार पापा ... वगैरे होतं. CBDG
नॉन फिल्मी भक्तिगीतांचे
नॉन फिल्मी भक्तिगीतांचे अल्बम्स तर उदंड दिसतात आजकाल.
हृदयनाथ/लताचे 'चला वाहि देस', 'मीरा सुर कबीरा' हे संग्रह सुंदर आहेत.
आबिदा परवीन यांचे 'रक्स-ए-बिस्मिल', 'कबीर' हेही अत्यंत श्रवणीय आहेत.
फा, बहुतेक मी वर लिहिलेल्या
फा, बहुतेक मी वर लिहिलेल्या दुसर्या ओळीच्या अनुषंगाने इब्लिसने 'मैं तो भूल चली' लिहिलं असावं.>>> ओह आले लक्षात.
मला एकूणच हिन्दी भक्तीगीतांपेक्षा मराठी जास्त चांगली वाटतात ऐकायला. कदाचित वर्षानुवर्षे पहाटे आकाशवाणी वर ऐकल्यामुळे असेल. मला चपखलपणे सांगता येत नाही पण बर्याच हिन्दी भक्तीगीतांचा टोन 'सगळे सोडा आणि भक्तीमार्गाला लागा' असा वाटतो, त्याउलट मराठी गाणी ते लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी करताना म्हणत आहेत असे वाटते - काही संतांच्या बाबतीत तर त्यांच्या व्यवसायातील गोष्टींच्या उपमा वगैरेंमुळे आणखीनच चांगली वाटतात ती गाणी.
)
(मराठी जास्त आवडतात हे खरे. ती का आवडतात ते तेवढ्या अचूकपणे सांगता येइलच असे नाही
अरे विरुध सिनेमात असलेलं
अरे विरुध सिनेमात असलेलं "गणनायकाय गणदेवताय.." कसं विसरलात?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजय-अतुल का संगीत और शंकर महादेवन की आवाज में
इथे ऐका: http://blog.practicalsanskrit.com/2009/08/meditate-upon-ganesh.html
फा, मग कबीर ऐकायला हवा तुला.
फा, मग कबीर ऐकायला हवा तुला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर उल्लेख केलेला आबिदाचा 'कबीर' अल्बम ऐकला आहेस का?
कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं ऐकली असशीलच.
नताशा, केदारने लिहिलंय ना.
इक तुही भरोसा इक तुही सहारा
इक तुही भरोसा
इक तुही सहारा (पुकार)
ओ पालनहारे (लगान)
एक ओंकार (रंग दे बसंती)
एक ओंकार (रंग दे बसंती)
ओनी यन्नार पापा>>> अरे हो
ओनी यन्नार पापा>>> अरे हो मलाही असेच अर्धवट आठवते ते मॅक्स. कोणाला माहीत असेल तर शब्दरचना लिहा.
स्वाती - बघतो ऐकून. कबीराचे ते एक "मॉटी कहे कुम्हार को..." माहीत आहे. ते छान आहे. तसेच मन्ना डे ने गायलेले "पानी मे मीन पियासी..." सुद्धा आवडते.
)
(मनोजकुमारचे "कहत कबीर सुनो भई साधों, बात कहू ये खरी, ये दुनिया एक नंबरी, तो मै दस नंबरी" बहुधा भक्तीगीत नसावे, आणि कबीराचेही नसावे :P. मात्र ते गाणे आणि त्याचा अवतार पाहिल्यावर लोक त्यापेक्षा भक्तीमार्गाला लागतील हे नक्की
(No subject)
केशवा, माधवा देहाची
केशवा, माधवा
देहाची तिजोरी
मला हे दत्तगुरु दिसले
फा अन मॅक्स, तिन्ही गाणी
फा अन मॅक्स,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तिन्ही गाणी स्पिरिच्युअल साँग्ज आहेत.
नास्तिक भक्तीगीतं म्हणा हवं तर
दत्तदर्शनाला जायाचं जायाचं नी
दत्तदर्शनाला जायाचं जायाचं नी जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना रे माईना
आनंद पोटात माझ्या माईना.
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ
नॉन फिल्मी भक्तिगीतांचे
नॉन फिल्मी भक्तिगीतांचे अल्बम्स तर उदंड दिसतात आजकाल.
<<
)
हे वाचून मला ९० च्या काळातली गुलशन कुमार-अनुराधा पौडवाल ची फिल्मी चालीतली असह्य भक्ती गीतं आठवली !
हरिद्वार ला एक गाण ऐकलं होतं,
विष्णु के चरणोमे गंगाजी का वास है ( हे 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा' च्या चालीत
उड जा रे कागा - हृदयनाथ आणि
उड जा रे कागा - हृदयनाथ आणि लता मंगेशकर
उड जायेगा हंस अकेला - कुमार गंधर्व
डी.व्ही. पलुस्करांचे ठुमक चलत रामचंद्र
भीमसेन जोशी व लता मंगेशकर 'बाजे रे मुरलिया बाजे'
अश्विनी भिडे-देशपांडे- 'जय श्री शंकरसुत गणेश'
लगन बिन जागे ना निर्मोही - अश्विनी भिडे-देशपांडे
कैलाश खेर ची तेरी दीवानी,
कैलाश खेर ची
तेरी दीवानी, सैंया पण भक्तीगीतं आहेत ना ?
कुठल्या अर्थाने लिरिक्स लिहिलेत माहित नाही पण डान्स शोज मधे दोन्ही गाण्यात 'मीरेचं कॅरॅक्टर' केलेलं पाहिलय..
पसायदान
पसायदान
१७ माता सरस्वति शारदा - आलाप
१७ माता सरस्वति शारदा - आलाप - लता आणि दिलराज कौर यांच्या आवाजात आहे.
बेकस पे करम कीजिए सरकार-ए-मदीना : मुगल-ए-आझम
परवरदिगार-ए-आलम तेरा ही है सहारा : हातिमताई - रफी
आहा, अगो तू दिलेली सगळीच
आहा, अगो तू दिलेली सगळीच भक्तिगीतं जबरदस्त आवडतात.
'उड जा रे का गा' हृदयनाथांच्या आवाजात इथे आहे.
लाईव्ह असल्याने असेल, पण मला हे खूप आवडते.
माझी लिस्ट-
१) जाऊ, तोरे चरण कमल पर वारी
(लता, राजन मिश्रा, चित्रपट संगम, संगीत- लक्ष्मीकांत प्यारेलाल.
ह्यातले सतारीचे आणि बासरीचे तुकडे खूप छान आहेत.
२) मीरा सिनेमातली सगळीच गाणी
मला त्यातही 'मेरे तो गिरिधर गोपाल' खूप आवडतं. जे ह्या व्हिडिओत सुरुवातीलाही आहे आणि बहुतेक शेवटीही आहे. शेवटी तानसेन मीराबाईबरोबर गातो असं दृश्य आहे त्यातला मेल-व्हॉइस पं. कायकिणी यांचा आहे.
सगळीच गाणी म्हणजे केवळ व्होकल नव्हे तर इन्स्ट्रुमेंटल तुकड्यांची मेजवानी आहे.
३) अभिषेकी बुवांचं 'शिव के मन शरन हो'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्याला म्हणतात 'मखमली आवाज'
४) पं भीमसेन जोशी- जो भजे हरि को सदा
हे कुठल्याशा मैफलीतलं आहे. गाणं प्रत्यक्ष ज्यांनी ऐकलं असेल त्यांना काय वाटलं असेल ह्या विचाराने अंगावर रोमांच उठले.
तूर्तास इतकीच. अजून अधून मधून आठवतील तशी देईनच.
हे आदि देव शिव शंकर कुमारांची
हे आदि देव शिव शंकर
कुमारांची निर्गूनी भजन सुनता है माझे अत्यंत आवडते.
हे वाचून मला ९० च्या काळातली
हे वाचून मला ९० च्या काळातली गुलशन कुमार-अनुराधा पौडवाल ची फिल्मी चालीतली असह्य भक्ती गीतं आठवली !
हरिद्वार ला एक गाण ऐकलं होतं,
विष्णु के चरणोमे गंगाजी का वास है ( हे 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा' च्या चालीत )
>>>>> यावरून आठवलं.
ट्रेनमध्ये एक ग्रुप 'हरी ओम, हरी ओम, हरी ओSSSSम, हरी ओSSSSम, हरी ओSSSSम' अशा आर्त आलापानं सुरू होणारं एक गाणं साईबाबांची आळवणी करण्यासाठी गायचा. चाल होती ...... पंख होते तो उड आती रे.
त्या गाण्याच्या धृवपदाच्या ओळी आठवत नाहीत पण एक कडवं आठवतंय
काशी देखी, मथुरा भी देखी (यादों मे खोई पहुंची गगन में)
शिर्डी ना देखी, तो क्या तुने देखी (पंछी बनके सच्ची लगन में)
दूर से देखा पत्थर पडा था (दूर से देखा मौसम हंसी था)
उस पे मेरा साई खडा था (आनेवाले तूही नही था)
शिर्डी के साईराम ......(रसिया ओ जालिमा)
मुझे अपना रूप दिखलाई रे (तुझे दिल का दाग दिखलाती रे)
छानच संग्रह. "ए मेरे वतन के
छानच संग्रह.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"ए मेरे वतन के लोगो...जरा आंखमें भरलो पानी, जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी" माझ्यासाठी हे हि एक भक्तीगीतच आहे.
आभार अशोक, काल घाईघाईत यादी
आभार अशोक, काल घाईघाईत यादी केली होती..
आणखी काही
१) म्हाणे चाकर राखो / मुरलीया बाजेगी / पिया ते कहा गयो ( तिन्ही लता / तूफान और दिया / वसंत देसाई )
२) मेरी आण भगवान ( गीता दत्त / तूफान और दिया / वसंत देसाई )
३) खुदा निगेहबान ( लता / मुगले आझम / नौशाद )
४) सूरजकी गरमीसे ( शर्मा बंधू / परीणय / जयदेव (बहुतेक) )
५) कान्हा कान्हा आन पडी ( लता / शागिर्द / शंकर जयकिशन )
६) आन मिलो आन मिलो शाम सावरे ( मन्ना डे- गीता दत्त / देवदास / एस डी )
७) यशोमति मैया से ( लता / सत्यम शिवम सुंदरम / लक्ष्मीकांत प्यारेलाल )
८) ओ पालनहारे ( लता / लगान / रहमान )
९) हे नटराज, गंगाधर शंभो ( महेंद्र कपूर-कमल बारोट / संगीत सम्राट तानसेन / एस एन त्रिपाठी ( बहुतेक) )
मीरा सूर कबीरा....माझा ऑल
मीरा सूर कबीरा....माझा ऑल टाइम फेवरेट अल्बम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गैरफिल्मी तर भरपूर आहेत.
गैरफिल्मी तर भरपूर आहेत. शास्त्रीय संगीत गाणारेही बहुदा संग्रहातली एक रचना अशी गातातच.
डॉ. प्रभा अत्रे यांचा भैरव ओम नमो शिवाय, मालिनी राजूरकर यांचा देस, होली खेलन को, वीण सहस्त्रबुद्धे यांचा, दूर्गा, दूर्गामाता भवानी, कंकणा बॅनर्जी यांचा अडाणा, माता कालिका .. असे काही माझ्या आवडीचे आहेत.
हे शिव शंकर..
हे शिव शंकर..
लोकहो, १. श्रीगुर्वष्टकम् :
लोकहो,
१. श्रीगुर्वष्टकम् : https://www.youtube.com/watch?v=Wd96yHczJWU - रचनाकार शंकराचार्य. दिनेश हेगडे यांच्या आवाजातलं सगळ्यात चांगलं वाटलं. तूनळीवर बाकीच्यांनी या गीताचं सुगम संगीत केलंय.
२. भवान्याष्टकम् : शंकराचार्यांचं आजून एक अप्रतिम काव्य! पण तूनळीवर लोकांनी त्याचं भजं केलंय.
इथे बरीच संस्कृत स्तोत्रे आहेत (स्तोत्रं हे भक्तीगीत धरल्यास) : http://sanskritdocuments.org/all_sa/
आ.न.,
-गा.पै.
Pages