दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.
लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः
आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)
गाय वासरू छाप गोमुत्र
भारतीय
डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)
गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)
देवपूरकर
या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.
==========================
१. फळे, फुले, झाडे, शारिरीक स्त्राव व पशूपक्षी यांची नांवे सदस्यनाम म्हणून घेता येणार नाहीत. तरीही ती घेतली गेल्यास काहीही कारवाई होणार नाही.
२. कविता, गझल, लेख, ललित, विनोदी लेखन, पाककृती, छायाचित्रकला या धाग्यांना भाजप, काँग्रेस, सावरकर, गांधी घराणे, ब्रिगेड या विषयांकडे वळवता येणार नाही. वळवल्यास 'वळवले जाऊ नयेत' असे वाटणार्यांनी स्वतः वळवणार्यांचा समाचार घ्यावा व तसे अधिकार त्यांना प्रदान करण्यात येत आहेत.
३. भाजप, काँग्रेस, सावरकर, गांधी घराणे, ब्रिगेड या विषयावरील धागे या विषयांवरच चालू राहिलेले चालणार नाहीत. दहाव्या प्रतिसादानंतर त्यात वैयक्तीक शेरेबाजी, व्यक्तीगत रोख असलेली शिवीगाळ, मारहाणीच्या धमक्या, अॅडमीनला विपू या पातळ्या गाठाव्याच लागतील.
४. महिन्यातून तीन गझला (प्रकाशित करण्यास) फुकट राहतील. उरलेल्या अठ्ठावीस गझलांसाठी रुपये एक हजार पर गझल अशी रक्कम जमा करावी लागेल.
५. 'आपला नम्र' अशी मखलाशी करून त्या आधी वाट्टेल ते लिहिण्याचा अधिकार काढून घेण्यात येत आहे.
६. स्त्री सदस्यांचे साहित्यीक शोषण झाल्यास सर्वस्वे स्त्री सदस्य जबाबदार राहील. साहित्यीक शोषण यात सकारात्मक प्रतिसाद, नकारात्मक प्रतिसाद, धीर देणारे प्रतिसाद, खच्चीकरण करणारे प्रतिसाद, दिलेले प्रतिसाद, न दिलेले प्रतिसाद, द्यायचे होते पण वेळ मिळाला नाही या सदरातले प्रतिसाद, असे सर्व प्रतिसाद समाविष्ट आहेत.
७. कोणालाही कोणतेही लेखन निवडक दहात घ्यायचे असल्यास ते ज्याचे लेखन आहे तोच निवडक दहात घेणारा नाही आहे हे घेणार्याला सिद्ध करावे लागेल.
८. अपेयपान करून मायबोलीवर येण्याचे अधिकार काही खास सदस्यांसाठी असून त्या क्लबमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली असून तिचा परवाना आवश्यक आहे. या समीतीत बेफिकीर, गंभीर समीक्षक व तिसरा सदस्य म्हणून उरलेले सर्व माबो सदस्य यांची नियुक्ती केलेली आहे.
शंका असल्यास त्या दाबून ठेवाव्यात. प्रश्न असल्यास ते मनात गाडावेत. मान्य असल्यास खाली तसा प्रतिसाद द्यावा.
तळटीप १ - तेल जास्त पडले म्हणून मासे बिघडले असे सांगण्यासाठी मायबोली म्हणजे प्रयोगशाळा नव्हे.
तळटीप २ - अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही.
तळटीप ३ - दिवाळी अंकावरील प्रतिसाद भाऊबीजेपर्यंतच देता येतील.
तळटीप ४ - अष्टाक्षरीला मायबोलीवर कवितेचा एक आकृतीबंध मानण्यास मनाई करण्यात येत आहे.
तळटीप ५ - माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल.
आपले सहकार्य अपेक्षित आहे.
========================
========================
-'बेफिकीर'!
मस्त अपूर्ण कथा पूर्ण न करता
मस्त
अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही. >>
माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल.>>>>
फार भारी आहे विनोदी लेखनात
फार भारी आहे
विनोदी लेखनात ठेवल्याने उगाच विनोदी आहे म्हणुन सोडुन देण्यात येईल कदाचित. पण काही बदल सिरियसली करण्यासारखे आहेत.
अष्टाक्षरीला मायबोलीवर
अष्टाक्षरीला मायबोलीवर कवितेचा एक आकृतीबंध मानण्यास मनाई करण्यात येत आहे. >>> हा हा ....
लै भारी !
लै भारी !
कोणी अक्षरखुणा पाहिल्या
कोणी अक्षरखुणा पाहिल्या का?
आधार काव्यलेखन कूटप्रश्न गद्यलेखन नातीगोती शाळा साहित्य भविष्य राजकारण व्यक्तिमत्व अवांतर गुलमोहर लेखनात बदल
मस्तच लिहिलंय बेफ़ि. पण साल
मस्तच लिहिलंय बेफ़ि. पण साल अक्षरी पण लिहा हो, मी आपला २०१३ समजून बसलोय ! ( मागचे अनुभव फार वाईट्ट आहेत !)
(No subject)
बेफीजी, मजेदार लिहिलंत
बेफीजी,
मजेदार लिहिलंत ........ नेहमीप्रमाणेच.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :
"बेफिकीर यांना ऍडमिन केले तर ? " अशा शीर्षकाचं एक गंभीर ललित लिहायचा विचार मनात आला.
धन्यवाद
धन्यवाद
बेफिकीरजी अन भाऊजी --^--
बेफिकीरजी अन भाऊजी --^--
भाऊ नमसकर आणि बेफिजींना सादर
भाऊ नमसकर आणि बेफिजींना सादर प्रणाम!
चालुद्या...जोरात!
तळटिप १, २ आणी ५ सॉल्लिड
तळटिप १, २ आणी ५ सॉल्लिड आहेत्.:फिदी:
पण भुक्कडचे काय झाले?:अओ::फिदी:
कितीवेळचा बिचारा आकाशगंगेतच हिंडतोय्.:फिदी:
खुप उशिरा वाचले, पण भन्नाट
खुप उशिरा वाचले, पण भन्नाट आहे. त्यातही "तळटीप ५ - माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल. " -
आभारी आहे. लोभ असावा.
आभारी आहे.
लोभ असावा.
Pages