दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.
लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः
आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)
गाय वासरू छाप गोमुत्र
भारतीय
डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)
गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)
देवपूरकर
या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.
==========================
१. फळे, फुले, झाडे, शारिरीक स्त्राव व पशूपक्षी यांची नांवे सदस्यनाम म्हणून घेता येणार नाहीत. तरीही ती घेतली गेल्यास काहीही कारवाई होणार नाही.
२. कविता, गझल, लेख, ललित, विनोदी लेखन, पाककृती, छायाचित्रकला या धाग्यांना भाजप, काँग्रेस, सावरकर, गांधी घराणे, ब्रिगेड या विषयांकडे वळवता येणार नाही. वळवल्यास 'वळवले जाऊ नयेत' असे वाटणार्यांनी स्वतः वळवणार्यांचा समाचार घ्यावा व तसे अधिकार त्यांना प्रदान करण्यात येत आहेत.
३. भाजप, काँग्रेस, सावरकर, गांधी घराणे, ब्रिगेड या विषयावरील धागे या विषयांवरच चालू राहिलेले चालणार नाहीत. दहाव्या प्रतिसादानंतर त्यात वैयक्तीक शेरेबाजी, व्यक्तीगत रोख असलेली शिवीगाळ, मारहाणीच्या धमक्या, अॅडमीनला विपू या पातळ्या गाठाव्याच लागतील.
४. महिन्यातून तीन गझला (प्रकाशित करण्यास) फुकट राहतील. उरलेल्या अठ्ठावीस गझलांसाठी रुपये एक हजार पर गझल अशी रक्कम जमा करावी लागेल.
५. 'आपला नम्र' अशी मखलाशी करून त्या आधी वाट्टेल ते लिहिण्याचा अधिकार काढून घेण्यात येत आहे.
६. स्त्री सदस्यांचे साहित्यीक शोषण झाल्यास सर्वस्वे स्त्री सदस्य जबाबदार राहील. साहित्यीक शोषण यात सकारात्मक प्रतिसाद, नकारात्मक प्रतिसाद, धीर देणारे प्रतिसाद, खच्चीकरण करणारे प्रतिसाद, दिलेले प्रतिसाद, न दिलेले प्रतिसाद, द्यायचे होते पण वेळ मिळाला नाही या सदरातले प्रतिसाद, असे सर्व प्रतिसाद समाविष्ट आहेत.
७. कोणालाही कोणतेही लेखन निवडक दहात घ्यायचे असल्यास ते ज्याचे लेखन आहे तोच निवडक दहात घेणारा नाही आहे हे घेणार्याला सिद्ध करावे लागेल.
८. अपेयपान करून मायबोलीवर येण्याचे अधिकार काही खास सदस्यांसाठी असून त्या क्लबमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली असून तिचा परवाना आवश्यक आहे. या समीतीत बेफिकीर, गंभीर समीक्षक व तिसरा सदस्य म्हणून उरलेले सर्व माबो सदस्य यांची नियुक्ती केलेली आहे.
शंका असल्यास त्या दाबून ठेवाव्यात. प्रश्न असल्यास ते मनात गाडावेत. मान्य असल्यास खाली तसा प्रतिसाद द्यावा.
तळटीप १ - तेल जास्त पडले म्हणून मासे बिघडले असे सांगण्यासाठी मायबोली म्हणजे प्रयोगशाळा नव्हे.
तळटीप २ - अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही.
तळटीप ३ - दिवाळी अंकावरील प्रतिसाद भाऊबीजेपर्यंतच देता येतील.
तळटीप ४ - अष्टाक्षरीला मायबोलीवर कवितेचा एक आकृतीबंध मानण्यास मनाई करण्यात येत आहे.
तळटीप ५ - माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल.
आपले सहकार्य अपेक्षित आहे.
========================
========================
-'बेफिकीर'!
बेफि...
बेफि...
बेफिकीर, इंग्रजी पत्र
बेफिकीर,
इंग्रजी पत्र लिहितांना 'डियर अमुकअमुक' म्हणून खाली खरडपट्टी काढतात. त्याच धर्तीवर मनातले बोलून अखेरीस 'आपला नम्र' हा मायना टाकलेला का बरे खटकतो!
णिशेद, णिशेद त्रिवार णिशेद! अबीवत्ती सौतंतर्याचा संकोच झाला म्हून!
आ.न.,
-गा.पै.
बेफि.... तळटीपा तर एक्दम
बेफि.... तळटीपा तर एक्दम बेफि स्टाईल..
(No subject)
काही काही धमाल आहेत, बर्याच
काही काही धमाल आहेत, बर्याच कॉमेंट्सचे संदर्भ माहीत नसूनसुद्धा कॉमेंट मजेदार वाटल्या.
तेल जास्त पडले म्हणून मासे बिघडले असे सांगण्यासाठी मायबोली म्हणजे प्रयोगशाळा नव्हे.>> हे कशाबद्दल आहे काहीच कल्पना नाही (आणि एवढ्या पाकृ वाचून शोधण्याची हिम्मत नाही). मुळात तेल समुद्रात पडले की (जसे एक्झॉन वगैरेंचे पडले तसे) की कढईत तीही एक शंका आहे
माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल.>>>
अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही. >>> म्ह्णजे नक्की काय करणार? १. त्यांचे अपूर्ण लेख प्रतिक्रियेत दुसरेच पूर्ण करणार? २. इतर फालतू बीबी वर आणून बिरबलाच्या रेघेसारखे तो अपूर्ण बाफ खाली ढकलणार? ३. प्रतिक्रियांमधे आधी विषयावर लिहीण्याची औपचारिकता स्किप करून थेट वैयक्तिक शेरे मारणार? कृपया खुलासा करावा
भाजप, काँग्रेस, सावरकर, गांधी घराणे, ब्रिगेड>>> महात्मा गांधींचा उल्लेख राहिला. ते गांधी घराण्यातले नाहीत ना? अर्थात आपण जाणकार आहात. म.गांधींच्या नावाने बीबी कधीच चालू होत नाहीत, पण इतर बीबींमधे ते हळूच घुसतात याची जाणीव होऊन आपण मुद्दाम ते वगळले असावे. त्यामुळे बेनेफिट ऑफ डाउट
<<तळटीप २ - अपूर्ण कथा पूर्ण
<<तळटीप २ - अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही.>> भुक्कड चे काय केलेत ??
बेफी, झक्कास बदल. अजून एक
बेफी, झक्कास बदल.
अजून एक सूचना -
ती तळटीप ५ थोडी बदलून बदल ४ब अशी केली तर? अधिक परिणामकारक होईल असं मला विनम्रपणे नमूद करावसं वाटतं.
४ब - माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल. त्यातही स्वतःच्याच लिखाणावर प्रतिसादावरल्या प्रतिसादात वापरल्यास रु.१००० प्रत्येक प्रतिसादासाठी असा दंड जमा करावा लागेल.
बरं... त्या चारचौघींचं काय झालं म्हणे? आणि भुक्कड? आधी ते पूर्णं करा बघू. मग हे बाकीचे उद्योग...
आणि भुक्कड? आधी ते पूर्णं करा
आणि भुक्कड? आधी ते पूर्णं करा बघू >>>> अनुचमोदनचं
(No subject)
अशक्य जबरी
अशक्य जबरी
तळटीप ४ काय कळली नाही.. बाकी
तळटीप ४ काय कळली नाही..
बाकी
अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच
अपूर्ण कथा पूर्ण न करता उगाच टी आर पी वाढवणार्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही. >>
आणि
माबोबाह्य स्मायली वापरणे हा ओला व कोरडा कचरा वेगळा न ठेवल्याच्या पातळीचा गुन्हा मानण्यात येईल.
>> जबरदस्त
>> जबरदस्त
>> जबरदस्त
मस्त!
मस्त!
दिवाळी अंकावरील प्रतिसाद
दिवाळी अंकावरील प्रतिसाद भाऊबीजेपर्यंतच देता येतील.
>>>
हाणा ! हाणा!
तळटिपा भन्नाट आहेत!
(No subject)
तळटीपा जबरी.
तळटीपा जबरी.
अशक्य!
अशक्य!
या दोन अक्षरांपुढील आकडा
या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा>>अनेक आयडी व धागे चालविण्याची जोखीम असताना एखादा आकडा आंबाजी स्वतःच विसरून पुढचाच नं दिसला, तर अशावेळी काय समजावे, श्री बेफिकीर ह्यांनी प्रकाश टाकावा
मजा आली
अष्टाक्षरीला असी वागणूक मिलाल्याने तिने ओनियन लीदर कदे कम्लेंत केलीये
(No subject)
(No subject)
(No subject)
भाऊंच्या 'तैल'बुद्धीला मुजरा!
भाऊंच्या 'तैल'बुद्धीला मुजरा!
-गा.पै.
तळटीप ३ & ५ खासकरून आवडल्या
तळटीप ३ & ५ खासकरून आवडल्या
फारएण्ड
(No subject)
बेफिकीरजी, हा प्रकार खूप
बेफिकीरजी, हा प्रकार खूप आवडला हें वेगळं सांगायला नकोच !
(No subject)
भाऊ नमसकार (__/\__)
भाऊ नमसकार (__/\__)
बदल नंबर ४ आणि तळटीप नं ५
बदल नंबर ४ आणि तळटीप नं ५ झकास!
त्यात कुणी प्रतिसाद दिल्यावर 'टींबटींबबद्दल काही बोलला/म्हंटला/वदला नाहीत' असं म्हणुन प्रतिसादकाला उचकवणे अलाऊड नाही हेपण अॅडाच.
भाऊ सह्ह्ह्ही!
भाऊ सह्ह्ह्ही!
Pages