रस्ते, अपघात आणि आपण

Submitted by श्यामली on 25 December, 2012 - 00:16

काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.

या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.

याबाबत आपण काय करु शकतो? सरकारनी काय करायला हवय. हा अवेअरनेस गरजेचा नाही का? आज रस्त्यावर चालायच म्हटल तरी जीव मुठीत धरुन चालाव लागत. रस्ता ओलांडायचा म्हणजे अरे बाप रे... वाटावं अशी परिस्थिती. मुलांना सायकल्/दुचाकी घेऊन रस्त्यावर जाऊ द्यायला भिती वाटावी अशी परिस्थिती. आपल्यापैकी कुणी प्रवासात असेल तर ती व्यक्ती सुखरुप घरी येईपर्यंत जीवात जीव येत नाही.
घरातून बाहेर पडताना, रस्त्यावरच्या या दहशतीचं काय करायच?

हे सगळं कुठे तरी नीट व्हायला हवं म्हणून ही चर्चा आवश्यक वाटते.

मला सुचलेले मुद्दे लिहिते आहे

आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे
आपल्या वाहनाची योग्य ती काळजी आपण घेतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. नक्कीच.
काही काहीजणांचा Sence of Humour एकमेवाद्वितीय असतो.
थोडक्यात एखादी गोष्ट विनोदी आहे (आणि लई भारीही..) असं फक्त त्यांनाच वाटत असतं.
आता ते व्यक्त केल्यावर हसं होतं हा भाग वेगळा.
बर्‍याचदा लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्नही असतो. त्याला इलाज नाही.

अनिरुद्ध - डोंट जज सो सून… इतकेच म्हणेन… प्रतिसाद नीट वाचाल तर कळेल खोडी कोणी काढली …
धागा आणि विषय संवेदनशील आहे म्हणून ही माझी शेवटची पोस्ट…

वॉव.. गोईंग डाऊन this लेवल… no comments !!! >>> अरे हाड !!

आख्खं कुटुंब गेलंय, त्या धाग्यावर या लेव्हलची फालतूगिरी करताना काहीच वाटलं नाही का वेमा तुम्हाला ? तुमची साईट आहे केव्हांही आयडी उडवा. इतके मानसिक रूग्ण असल्याचे प्रदर्शन करू नका. आणि अनिरूद्धच काय कुणीही तुमच्याकडून शिकून मग प्रतिसाद लिहीण्याइतके लहान नाहीत.

अनिरुद्ध - डोंट जज सो सून… इतकेच म्हणेन… प्रतिसाद नीट वाचाल तर कळेल खोडी कोणी काढली … >>> चला कोट करा तरी पण.चॅलेंज.
इथे मध्यमवर्ग कुठून आला ? मध्यमवर्गाने दोन कार घ्यायच्या याचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध ? या लेवलला उतरून या अशा विषयावरच्या चर्चेत प्रतिसादाची मोडतोड करून इरीटेट करणे हा तुमचा नेहमीचा जोक इथे का दिला ?

आधी अक्कल गवत खायला गेली होती का ? त्या वेळी समजले नाही विषय आणि धागा कसला आहे ते ?
साधा माणूस या प्रोफाईलने मला सकाळी शिव्या दिल्या पण मी रिअ‍ॅक्ट झालो नाही. म्हणून या धाग्यावर ?
कमॉन वेमा, उडवा आयडी.

अरे काय हे? कृपया वैयक्तिक हमरीतुमरी टाळा अशी नम्र विनंती.
विषय गंभीर आहे, कृपया विषयाच्या संदर्भातच बोलूया का आपण?

हमरा तुमरी ? नक्की ना ?
विषय गंभीर आहे म्हणूनच असले प्रकार जिथल्या तिथे हाणून पाडणे हे कर्तव्य नाही का ?
प्रत्येक धाग्यावर हे असे प्रतिसाद आहेत तिथे यांना काडीचीही किंमत दिलेली नाही. हे वैयक्तिक कसे काय ?

<< धडक टाळण्यासाठी कंटेनरवाल्याने स्टिअरिंग जोरात फिरवलं. त्याला ते धूड कंट्रोल झालं नाही आणि तो विरूद्ध दिशेने येणार्‍या दूधाच्या कंटेनरला जाऊन धडकला. हा कंटेनर पलटी झाला तेव्हां ही दुर्दैवी कार त्या दूधाच्या कंटेनरच्या बाजूने चाललेली होती. >>

मला एक कळत नाही की ते दोन्ही कंटेनर (धडक देणारा आणि दुधाचा कंटेनर) फास्ट लेनमधून का जात होते? खरं तर जड वाहनांनी रस्त्याच्या कडेच्या लेनमधून जायला हवे. फक्त ओव्हरटेक करतानाच रस्त्याच्या मधोमध जाणे योग्य ठरेल.

@रघू आचार्य
मी तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद दिला तर चालेल का? की इथेच देऊ?

Pages