निवांत कोकण......

Submitted by अतरंगी on 8 December, 2012 - 08:06

तसा मी मायबोली चा गेले ५ वर्षे सभासद आहे. पण कायम रोमात असतो ( Read Only mode ) शक्यतो कधी लिखाणाच्या फंदात पडत नाही. मला ते तितके जमतही नाही म्हणा.....

पण यावेळेस वाटले काय हरकत आहे प्रयत्न करायला.... आत्ताच कोकणात जाउन आलो म्हणलं चला एक वृत्तांत लिहुन बघूया..... सोबत भरपुर फोटोज पण होतेच.......

भरपुर दिवस झाले कोकणात जायचं ठरवत होतो पण योगच जुळून येत नव्हते. आत्ता सगळं जुळून आलं तर वरचा कोकण कि तळकोकण हेच ठरत नव्हते. शेवटी गाडी चालविणारा मी एकटाच, हातात चारच दिवस म्हणून मग वरचा कोकणच करावे असे ठरविले.....

२ तारखेला मस्त सकाळी सकाळी निघालो. हरिहरेश्वरला जायच्या आधी दिवेआगारला मुद्दाम वाट वाकडी करुन गेलो शेटे कडे जेवायला, संदर्भः मायबोलीचे बीबी :- ( दर्या बीच हाउस कि असे काही तरी होते. ) तिथे दोघातिघांना शेटे म्हणून विचारले त्यांनी तेच एकमेव जे हॉटेल सांगितले तिथे गेलो. जेवण अगदी भारी असे नव्हते पण कोकणात सगळीकडे मिळते तसे होते. रेट व्यवस्थित होते उगाच अति महाग नाही. माझ्या बायकोला व्हेज खायचे होते म्हणून सुहास बापट यांना फोन केला साधारण ११.३० ला तर त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितले. एकच माणूस जेवायला आहे असे सांगून सुद्धा त्यांनी नकार दिला......

दिवेआगार शेखाडी रोड छान आहे, हरिहरेश्वरला जाताना. रोडच्या शेजारीच समुद्र. फोटोज काढायला एकदोन छान स्पॉट आहेत. पण नेमकी कॅमेराची बॅटरी गंडली होती.... ट्रिप च्या पहिल्याच दिवशी माझी हि परिस्थिती. वेंधळेपणा आणि दुसरं काय.....

हरिहरेश्चरला दिलीप बोडस यांचे घर शोधत गेलो. परत एकदा संदर्भः मायबोलीचे बीबी पण त्यांना रुम द्यायची नव्हती कि काय माहीत पण त्यांनी नाही म्हणून सांगितले. हो म्हणाले असते तरी मी कदाचित तिथे रुम घेतली नसतीच. त्यांच्या समोरचे माउली त्यापेक्षा खूप छान. मस्त ओसरी असलेले घर, घराच्या मागे २०० ते ३०० मीटर नारळ पोफळीची बाग, आणि त्यातून समुद्राकडे जाणारी पाउलवाट, मस्त होते घर. आणि मालक पण छान होते वागायला.
DSC_0688.JPGDSC_1016.jpgDSC_1020.jpgDSC_1052.jpgDSC_1063.jpg

सध्याकाळी समुद्रावर गेलो तर क्रिकेट खेळणारी चार पाच मुले सोडली तर कोणी नव्हते.... आख्खा बीच आम्हाला हुंदडायला मोकळा. बीचवर कोणत्या तरी प्राण्याने छान नक्षी काढून ठेवली होती.

DSC_0710.JPGDSC_0711.JPGDSC_0712.JPGDSC_0713.JPGDSC_0714.JPG

ईतका मोकळा बीच मिळाल्यावर आम्हाला पण दंगा करायला आणि फोटो साठी क्रिएटीव्हीटी ला वेळ मिळाला. ईथेच मायबोलीवर ते उडीबाबाचे फोटो कोणितरी नियमित टाकायचे बहुतेक यो रॉक्स..... म्हणलं चला आयडिया ढापायला काही हरकत नाही. मग बसलो उड्या मारत. ते फोटोज बायकोला ईतके आवडले कि रोज सकाळ संध्याकाळ उड्याच मारत होतो बीचवर..... Happy
हे काही फोटोज उड्यांचे.....

DSC_0957.jpgDSC_1685_1_.jpgDSC_1787_0.jpg

सकाळी ऊठल्यावर परत बीच वर जायला निघालो. रुमच्या मागच्या दारा तून च बागेतून समुद्रा कडे जायला रस्ता होता. ईतकी छान बाग होती कि त्यातच फोटो काढत काढत जायला दिड ते दोन तास गेले. मग बीच वर चांग लेच उन असल्याने सरळ रुम वर परत येण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता....
का काय माहित पण तिथे जास्त दिवस रहवेसे वाटेना म्हणून मग गाडी काढली आणि सरळ कर्दे गाठलं, मधे फक्त जेवायला केळशीचा स्टॉप घेतला. हरिहरेश्वर वरुन जेट्टि वरुन गाडी बोटितून आणता येते.... त्यामूळे जवळ जवळ ७० ते ८० किमी वाचले......

कर्दे ला निवास, न्याहरीसाठी नागवेकर म्हणून आहेत त्यांच्या कडे राहिलो. घराच्या समोरच बीच आहे अगदी ५० फूटावर. हे घर खूप आतमधे आहे, शोधायला अवघड. गावात काही मिळत नाही, मासे खायचे असल्यास जाताना घेउन जावे लागतात. नाहीतर त्यांना फोन करुन सांगितल्यास ते आणून ठेवतात.
बीच अगदी घराच्या समोरच असल्याने आणि आजूबाजूला थोडी वस्ती असल्याने बीच वर अंधार पडल्यावर पण फिरायला जास्त भिती नाही वाटत.
कर्दे बीच वरचे उद्योग......
DSC_1560.jpgDSC_1522.jpgCSC_1483.jpg

गुहागार ला वेलवण बीच हाउस ला गेलो होतो. पण रुम्स बूक होत्या, मग हिंडता हिंडता खरेज प्लेजर लिव्हिंग ला गेलो. मस्त होतं मला तर भयानक आवडले. एकदम बीच ला लागून. रुम्स आणि टेंट होते. आणि जेवण एकदम हायक्लास, खरे काका एकदम दिलदार माणुस. कशाला नाही म्हणाले नाही, चूल पेटवून पाणी तापवायला पण नाही आणि मासे भाजायला आणि बारबेक्यू करायला पण. ईत़की छान सोय १००० ते १५०० रुपयात मला तरी ४ दिवसात बघायला मिळाली नव्हती. रुम्स च्या पुढे बीचवर एक टेबल पण आहे मस्त कँडल लाईट डिनर वगैरेला, अगदी प्रॉपर बीच हाऊस. आणि आमच्या कडे असे चालत नाही, तसे चालत नाही हे करायचे नाही, ईकडे जायचे नाही असे काही नाही. या, रहा, खा प्या, मजा करा. गाणी लावायची असतील तर मोठे स्पिकर, नाचायला बीच किंवा एक टेंट आ॑हे.
तळीरामांसाठी अगदी योग्य ठिकाण

खरे काका पण एकदम छान, प्राणिमित्र. रात्री आम्हाला बीचवर टॉर्च घेउन खेकडे दाखवायला घेउन गेले. मदतीला अगदी तत्पर. काय लागेल ती मदत करतात. कशाची ददात पडू दिली नाही.
पण एक आहे. रुम्स अगदी समुद्राजवळ आहेत. आणि आजुबाजुला सगळ्या बागा. २ रुम्स आणि ९ टेंट. जर रुम्स मधे ऑक्युपन्सी नसेल तर एखादे वेळेस भिती वाटायची शक्यता आहे. रात्री गरजणारा समुद्र, झाडांची सळसळ, अधून मधून पडणारे नारळ, सुपार्‍या आणि किर्र् अंधार. आम्ही गेलो तेव्हा कोणीच नव्हते संध्याकाळी. मी रात्री बेरात्री तोरणा, लोहगड सारखे ट्रेक केल्या मुळे काही वाटत नव्हते. पण एखाद्या अमावश्येच्या रात्री भयानक पाउस पडत असताना कदाचित मी पण रहायला नाही म्हणेन कदाचित.

DSC_1843.jpgDSC_1633.jpgDSC_1639.jpgDSC_1640.jpgDSC_1641.jpgDSC_1821.jpgDSC_1822.jpgDSC_1961.jpgDSC_2017.jpgDSC_2023.jpgDSC_2024.jpgDSC_2027.jpgDSC_2033.jpgDSC_1858_1.jpg

गुहागार ला अजुन रहावेसे वाटत असताना पण परत फिरणे भाग होते....आख्ख्या कोकण ट्रिप मधे शेवटचे दोन दिवस अगदी मजेत गेले. खरेज प्लेजर लिव्हिंग चा अनुभव खरच अगदी प्लेजंट......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सुजा, मऊ, अव्या, प्रज्ञा.

सुजा आणि अव्या नशिबवान आहात अशा रम्य ठिकाणी तुमचे बालपण गेले.......
BTW खरे रेसॉर्ट वरच्या पाट ला आहे....

Pages