राजसच्या वेळी दिवस राहिले असताना मनशक्ती (लोणावळा) केंद्र आयोजित एकदिवसीय गर्भसंस्कार शिबिराला आम्ही उभयतांनी हजेरी लावली होती. तेव्हा होऊ घातलेल्या माता-पित्यांनी करावयाचे आचार-विचार तसेच गर्भावतीचा आहार-विहार इ. बद्दल समुपदेशन, माहितीपर व्याख्यान इ. दिले गेले. त्यात गर्भवतीने अधून - मधून एक धैर्य-प्रतीक चित्र काढावे असे सांगितले गेले. त्यांनी दिलेल्या एका माहितीपर पुस्तकात काही राष्ट्रीय संत, थोर पुरुष इ. ची चित्रे दिली होती. आणि ती चित्रे नेहमी काढतो तशी काढायची नव्हती. तर चित्र उलटे (म्हणजे खालची बाजू वर व वरची बाजू खाली. उपडे नव्हे!) ठेवायचे. आणि आता ते जसे दिसते तसे काढायचे. त्यामुळे म्हणे गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा (क्रीएटिव्ह गोष्टी करण्यासाठी मेंदूचा हा भाग कामी येतो असे व्याख्यानात सांगितले.) विकास होण्यास मदत होते.
संपूर्ण गर्भारपणात फक्त ६ चित्रे काढली. ती खाली देत आहेत. मला स्वतःला शाळेत असताना चित्रकला ह्या विषयाचा अत्यंत तिटकारा होता. बाकी विषयांचे गुण कायम चांगले मिळत पण चित्रकलेत अगदी काठावर पास होत असे मी! त्यामुळे सरासरी गुणसंख्या खाली आणणारा विषय हे चित्र माझ्या मनात ठसले होते. त्यामुळे मी अशी ६ चित्रे काढली हे त्या चित्रांचेच नशीब म्हणावे लागेल
घरात असलेल्या अध्यात्मिक पुस्तकांवरील काही चित्रे आवडली होती. त्यामुळे मनशक्ती कडून मिळालेल्या चित्रांमधील सर्वच काढली नाहीत.
प्रयत्न कसा आहे ते जरूर सांगा.
नाव न देताही चित्रं कुणाची
नाव न देताही चित्रं कुणाची आहेत ते ओळखू येतंय
अॅक्च्युली चित्रांवरही
अॅक्च्युली चित्रांवरही पेनाने नाव घातलेच आहे, तरी चित्राच्या वरती पुन्हा नाव देण्याचा वेडेपणा केलाय मी
आता एडिटले आहे.
चित्रकलेत काठावर
चित्रकलेत काठावर पास............ शक्यच नाही. चक्क नाव न वाचताही चित्रं ओळखता येताहेत.
अॅक्च्युली चित्रांवरही
अॅक्च्युली चित्रांवरही पेनाने नाव घातलेच आहे, तरी चित्राच्या वरती पुन्हा नाव देण्याचा वेडेपणा केलाय मी>>>>>>>
चित्रांवर आणि चित्राच्या वरती नाव नसते तरी ओळखु आले असते
छान आलेयेत चित्रं. तरी तु चित्रकलेत काठावर पास व्हायचीस म्हणतेस मग मी तर नापासच व्हायचे म्हणायला हवं.
आधी उलट चित्रकारी म्हणजे काय
आधी उलट चित्रकारी म्हणजे काय ते कळले नव्हते. पहिल्याच वाक्यावरुन अर्थबोध झाला....
काय ग बाई असल्या चित्रांना
काय ग बाई
असल्या चित्रांना काठावर पास करायचे काय तुमच्यात?
मग मी खरच नापास झाले असते
मला आवडली बुवा ही चित्र
शाळेत चित्रकला चांगली नव्हती
शाळेत चित्रकला चांगली नव्हती म्हणतेस पण छान आलेत चित्र
शाळेत माझी चित्रकलेची वही
शाळेत माझी चित्रकलेची वही बरेचदा माझ्या धाकट्या बहिणीने पूर्ण करून दिली आहे. व सायन्स ची प्रयोगवही माझ्या बाबांनी!
छान आहेत चित्र. त्या त्या
छान आहेत चित्र. त्या त्या व्यक्तीचे भाव नक्कीच दिसताहेत.
छान आहेत चित्र.
छान आहेत चित्र.
शिवाजी महाराज थोडे रागावून -
शिवाजी महाराज थोडे रागावून - डोळे वटारून बघताहेत असे नवर्याने तेव्हा चिडवले होते.
भगवान महावीर खूपच रोडवलेले
भगवान महावीर खूपच रोडवलेले वाटले आणि शिवाजी महाराज तापट.
बाकी चांगला प्रयत्न.
अवघड प्रकार दिसतोय. चित्रं
अवघड प्रकार दिसतोय. चित्रं छान काढलीत
चांगलाय प्रयत्न.. निंबे..
चांगलाय प्रयत्न.. निंबे..
आता पुन्हा कधी काढणारेस चित्रं??? ( नो पन इन्टेन्डेड!!!! )
चित्रांवर नावं न लिहिताही
चित्रांवर नावं न लिहिताही ओळखता येतात हे तुझं यश आहे.
मी चित्रकलेत काठावरच पास असाय्चो ते ही आठवलं.
चांगलीयेत की! फक्त पहिल्या
चांगलीयेत की!
फक्त पहिल्या चित्राचं नाव 'पुष्कर श्रोत्रीनं साकारलेला शिवाजी' असं दे.
उलटा प्रयत्न चांगला आहे.
उलटा प्रयत्न चांगला आहे. सुटला प्रयत्न केलास तर काठा वरच्यांना पाण्यात बुडवशिल.
निंबे काय हे?
निंबे काय हे?
'पुष्कर श्रोत्रीनं साकारलेला
'पुष्कर श्रोत्रीनं साकारलेला शिवाजी' >> मामी
आता पुन्हा कधी काढणारेस चित्रं??? >>> आता सुलट काढायचा प्रयत्न करेन! उलट नकोय आता
सेम पिंच. मी सिद्धु च्या
सेम पिंच. मी सिद्धु च्या वेळेला हे सगळे प्रकार केले आहेत. माझे टिळक लै भारी आलेले. बादवे, सही चित्रे !
छानेकी हे.
छानेकी हे.
छान आहेत चित्र सुलट नक्कीच
छान आहेत चित्र सुलट नक्कीच अप्रतिम काढशिल !
अशी उलट चित्र काढायला लावतात हे माहितच नव्ह्तं.
माझ्या एका मैत्रीणिला ग सं क्लास मध्ये काही ठळक ब्लॉक्स ची चित्रे भिंतीवर चिकटवुन ती ठराविक एका क्रमाने काही क्षण न्याहळत बसायला सांगितले होते.
श्री कृष्णाला वेगळी ट्रीटमेंट
श्री कृष्णाला वेगळी ट्रीटमेंट का? ... त्याला डोक्या मागे उशी दिलेली नाही ...
मस्त काढलीत चित्रं. श्रीकृष्ण
मस्त काढलीत चित्रं.
श्रीकृष्ण हिंदी सिनेमातला अॅक्शन हिरो वाटतो.
मला नाही कळलं उलट चित्रकला
मला नाही कळलं उलट चित्रकला म्हणजे?
छान काढली आहेस की गं चित्र
छान काढली आहेस की गं चित्र
मला नाही कळलं उलट चित्रकला
मला नाही कळलं उलट चित्रकला म्हणजे?
>>>
मनी, जे चित्र बघून काढायचे आहे ते उलटे ठेवायचे. आणि काढतानाही तसेच उलटेच काढत जायचे. उदा. खाली डोके वर पाय. कळले का?
माझे टिळक लै भारी आलेले.
माझे टिळक लै भारी आलेले. >>>
मुग्धानंद, दे ना इथे ते चित्र. मी अजून कुणीही असे काही केल्याचे ऐकले/पाहिले नाही. म्हणून इथे शेअर केले. मला वाटले इथे बर्याच जणी असतील.
श्री कृष्णाला वेगळी ट्रीटमेंट का? ... त्याला डोक्या मागे उशी दिलेली नाही ...>>>
श्रीकृष्ण हिंदी सिनेमातला अॅक्शन हिरो वाटतो.>>>
श्रीकृष्णाचे चित्र माझे सर्वात आवडते आहे. मनशक्तीचेच कृष्णरहस्य म्हणून एक पुस्तक आहे जे गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात वाचणे अपेक्षित असते. त्याच्या मुखपृष्टावरील ते चित्र आहे.
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे पेशल धन्यवाद!
मला वाटले इथे बर्याच जणी
मला वाटले इथे बर्याच जणी असतील.>> आमच्या मॅडमनीतर अख्खी वही भरुन टाकली होती अशी चित्रे काढुन..:)
छान काढले सगळे चित्र
छान काढले सगळे चित्र
Pages