माझी 'उलट-चित्रकारी'

Submitted by निंबुडा on 4 December, 2012 - 01:01

राजसच्या वेळी दिवस राहिले असताना मनशक्ती (लोणावळा) केंद्र आयोजित एकदिवसीय गर्भसंस्कार शिबिराला आम्ही उभयतांनी हजेरी लावली होती. तेव्हा होऊ घातलेल्या माता-पित्यांनी करावयाचे आचार-विचार तसेच गर्भावतीचा आहार-विहार इ. बद्दल समुपदेशन, माहितीपर व्याख्यान इ. दिले गेले. त्यात गर्भवतीने अधून - मधून एक धैर्य-प्रतीक चित्र काढावे असे सांगितले गेले. त्यांनी दिलेल्या एका माहितीपर पुस्तकात काही राष्ट्रीय संत, थोर पुरुष इ. ची चित्रे दिली होती. आणि ती चित्रे नेहमी काढतो तशी काढायची नव्हती. तर चित्र उलटे (म्हणजे खालची बाजू वर व वरची बाजू खाली. उपडे नव्हे!) ठेवायचे. आणि आता ते जसे दिसते तसे काढायचे. त्यामुळे म्हणे गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा (क्रीएटिव्ह गोष्टी करण्यासाठी मेंदूचा हा भाग कामी येतो असे व्याख्यानात सांगितले.) विकास होण्यास मदत होते.

संपूर्ण गर्भारपणात फक्त ६ चित्रे काढली. ती खाली देत आहेत. मला स्वतःला शाळेत असताना चित्रकला ह्या विषयाचा अत्यंत तिटकारा होता. Sad बाकी विषयांचे गुण कायम चांगले मिळत पण चित्रकलेत अगदी काठावर पास होत असे मी! त्यामुळे सरासरी गुणसंख्या खाली आणणारा विषय हे चित्र माझ्या मनात ठसले होते. त्यामुळे मी अशी ६ चित्रे काढली हे त्या चित्रांचेच नशीब म्हणावे लागेल Proud

घरात असलेल्या अध्यात्मिक पुस्तकांवरील काही चित्रे आवडली होती. त्यामुळे मनशक्ती कडून मिळालेल्या चित्रांमधील सर्वच काढली नाहीत.

प्रयत्न कसा आहे ते जरूर सांगा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्च्युली चित्रांवरही पेनाने नाव घातलेच आहे, तरी चित्राच्या वरती पुन्हा नाव देण्याचा वेडेपणा केलाय मी Proud

आता एडिटले आहे. Happy

चित्रकलेत काठावर पास............ शक्यच नाही. चक्क नाव न वाचताही चित्रं ओळखता येताहेत.

अ‍ॅक्च्युली चित्रांवरही पेनाने नाव घातलेच आहे, तरी चित्राच्या वरती पुन्हा नाव देण्याचा वेडेपणा केलाय मी>>>>>>> Proud

चित्रांवर आणि चित्राच्या वरती नाव नसते तरी ओळखु आले असते Happy

छान आलेयेत चित्रं. तरी तु चित्रकलेत काठावर पास व्हायचीस म्हणतेस मग मी तर नापासच व्हायचे म्हणायला हवं. Happy

काय ग बाई
असल्या चित्रांना काठावर पास करायचे काय तुमच्यात?
मग मी खरच नापास झाले असते
मला आवडली बुवा ही चित्र

शाळेत माझी चित्रकलेची वही बरेचदा माझ्या धाकट्या बहिणीने पूर्ण करून दिली आहे. व सायन्स ची प्रयोगवही माझ्या बाबांनी! Proud

चित्रांवर नावं न लिहिताही ओळखता येतात हे तुझं यश आहे.

मी चित्रकलेत काठावरच पास असाय्चो ते ही आठवलं.

'पुष्कर श्रोत्रीनं साकारलेला शिवाजी' >> Lol मामी Happy

आता पुन्हा कधी काढणारेस चित्रं??? >>> आता सुलट काढायचा प्रयत्न करेन! उलट नकोय आता Wink

सेम पिंच. मी सिद्धु च्या वेळेला हे सगळे प्रकार केले आहेत. माझे टिळक लै भारी आलेले. बादवे, सही चित्रे !

छान आहेत चित्र Happy सुलट नक्कीच अप्रतिम काढशिल !

अशी उलट चित्र काढायला लावतात हे माहितच नव्ह्तं.
माझ्या एका मैत्रीणिला ग सं क्लास मध्ये काही ठळक ब्लॉक्स ची चित्रे भिंतीवर चिकटवुन ती ठराविक एका क्रमाने काही क्षण न्याहळत बसायला सांगितले होते. Happy

मला नाही कळलं उलट चित्रकला म्हणजे?
>>>
मनी, जे चित्र बघून काढायचे आहे ते उलटे ठेवायचे. आणि काढतानाही तसेच उलटेच काढत जायचे. उदा. खाली डोके वर पाय. कळले का?

माझे टिळक लै भारी आलेले. >>>
मुग्धानंद, दे ना इथे ते चित्र. मी अजून कुणीही असे काही केल्याचे ऐकले/पाहिले नाही. Happy म्हणून इथे शेअर केले. Happy मला वाटले इथे बर्‍याच जणी असतील.

श्री कृष्णाला वेगळी ट्रीटमेंट का? ... त्याला डोक्या मागे उशी दिलेली नाही ...>>>
श्रीकृष्ण हिंदी सिनेमातला अ‍ॅक्शन हिरो वाटतो.>>>

Biggrin

श्रीकृष्णाचे चित्र माझे सर्वात आवडते आहे. मनशक्तीचेच कृष्णरहस्य म्हणून एक पुस्तक आहे जे गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात वाचणे अपेक्षित असते. त्याच्या मुखपृष्टावरील ते चित्र आहे.

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे पेशल धन्यवाद!

मला वाटले इथे बर्‍याच जणी असतील.>> आमच्या मॅडमनीतर अख्खी वही भरुन टाकली होती अशी चित्रे काढुन..:)

Pages