रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते

Submitted by बेफ़िकीर on 26 November, 2012 - 05:10

रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते

आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते

यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते

रोज संध्याकाळचा मी डगमगत जातो जिथे
चालतो जो नीट त्याला सावरावे लागते

होइतो प्रत्यक्ष धोका मी तरी हे मानतो
वर्ष तर प्रत्येक धोक्याचे सरावे लागते

मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते

गाठला हा वास्तवाचा काठ की भीतीमुळे
तीव्र ओहोटीप्रमाणे ओसरावे लागते

यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते

त्या जगामध्ये मिळावा जन्म एखादा जिथे
मी तुझ्यासाठी न काहीही करावे लागते

चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन वैशाखात ज्याला पाझरावे लागते

दिवसभरच्या दगदगीने गार पडलेली मने
एकमेकांना मिठीने पांघरावे लागते

आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल अप्रतिम!

षोडशेला पंधरावे लागल्यामुळे गझलकारांना नववा लागल्याचे दिसत आहे.
>>>>>>>>>>>>>>

तेरावं घालतेय का कोणी...... कावळा टपून बसलाय

Wink

श्रावण१८ | 3 December, 2012 - 22:59 नवीन
काही ठिकाणी सवंगही वाटली !<<<

सवंगच केली होती. तुम्हाला काही ठिकाणीच तशी वाटली हा तुमचा प्रॉब्लेम आहे.

सर्वांचे आभार, या निमित्ताने!

-'बेफिकीर'!

@श्रावण १८ शांत पहुडलेल्या मायबोलीच्या या तळ्यात तुमच्या खमंग अन सवंग प्रतिसादाचा जो दगड टाकलात त्यामुळे जे तरंग उठले ते आवडले नाहीत !!

टाकायची इच्छाआहेच ना तर प्रतिसाद का टाकताय गझलच टाका ना !!...ही अशी .........

http://www.maayboli.com/node/39438

कळावे आपला नम्र
नवाच एक कुणीतरी

Lol
मी वाचलीये वरची लिंक जवळजवळ सर्व आघाडीच्या माबोकर गझलकारांची हजेरीच घेतली आहे
(.........वरून गम्मत म्हणजे त्यात मलाही एक गझलकार समजण्यात आले आहे :फिदी:)

महत्त्वाचे :बेफीजीन्च्या या गझलेत नावे ठेवावावीत असे काहीच दिसत नाही मलातरी .
श्रावण याना मिळालेला सल्ला योग्य आहे !!

२ दिवस झाले देवसर दिसत नाहीयेत तर लगेच सर्व विडंबनकार बेफीजीन्वर तुटून पडलेत की काय
हा नवाच एक कुणीतरी कोण जुनाच आहे काय माहीत

बेफि सर, क्षमा असावी. आपल्या गझलेला सवंग म्हणण्याची आमची औकात नाही. प्रतिक्रिया विभागली गेल्यामुळे गैरसमज निर्माण झाला आहे. चर्चा खमंग आहे आणि काही ठिकाणी सवंग आहे. बाकी आपल्या गझलेवर असे भाष्य करण्याची कुणाची लायकी आहे?

Pages