रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते
आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते
रोज संध्याकाळचा मी डगमगत जातो जिथे
चालतो जो नीट त्याला सावरावे लागते
होइतो प्रत्यक्ष धोका मी तरी हे मानतो
वर्ष तर प्रत्येक धोक्याचे सरावे लागते
मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते
गाठला हा वास्तवाचा काठ की भीतीमुळे
तीव्र ओहोटीप्रमाणे ओसरावे लागते
यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते
त्या जगामध्ये मिळावा जन्म एखादा जिथे
मी तुझ्यासाठी न काहीही करावे लागते
चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन वैशाखात ज्याला पाझरावे लागते
दिवसभरच्या दगदगीने गार पडलेली मने
एकमेकांना मिठीने पांघरावे लागते
आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
-'बेफिकीर'!
संपूर्ण गझल अतिशय आवडली,
संपूर्ण गझल अतिशय आवडली, खालील शेर विशेष आवडले.
रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते
आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते
चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन वैशाखात ज्याला पाझरावे लागते
दिवसभरच्या दगदगीने गार पडलेली मने
एकमेकांना मिठीने पांघरावे लागते
आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
वा वा, धन्यवाद!
छान. जमीन दिल्याबद्दल
छान. जमीन दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते
'खळ फटक'ला अन्यथा मग तोंड द्यावे लागते
वाह..वाह... वाह!! खूपच मजा
वाह..वाह... वाह!!
खूपच मजा आली गझल वाचताना, बहुतांशी शेर आवडलेतच... मैफिलीचा तर, चार चांद लावणारा आहे..
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते
>> वा, वा, व्व्वा!!
आणि आशयाचे थेंब गुंते सोडुनी
आणि
आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते>> हा ही सुंदर.. खास खयाल, शब्दांची गुंफण सुरेख!
अख्खी गझल छान एखादा ,
अख्खी गझल छान
एखादा , अमुक-अमुक शेर जास्त आवडला असे सान्गणे अवघड
<<<यामुळे सत्यात नाही फारसा
<<<यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते>>>
<<<मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
छान गझल 
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते>>> दोन्ही शेर खूपच आवडले
पहील्या ओळीचा (रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते) अर्थ नाही लागला.
सोळावे लागते म्हणजे वयात
सोळावे लागते म्हणजे वयात येते.. मात्रांसाठी पंधरावे लागते असे वापरले असणार.
खूप आवडली... शोडषेला....की
खूप आवडली...
शोडषेला....की षोडशेला ?
आंबा३ | 26 November, 2012 -
आंबा३ | 26 November, 2012 - 17:15 नवीन
सोळावे लागते म्हणजे वयात येते.. मात्रांसाठी पंधरावे लागते असे वापरले असणार.<<<
आंबा ३,
मनाला येईल ते लिहू नयेत अशी नम्र विनंती.
असो. तुम्ही योग्य अर्थ सांगा.
असो. तुम्ही योग्य अर्थ सांगा.
षोडशा असा योग्य शब्द आहे का?
षोडशा असा योग्य शब्द आहे का? मला माहीत नाही. तसा असल्यास बदलेन लगेच. धन्यवाद.
पण ते लेखणीला पंधरावे लागते
पण ते लेखणीला पंधरावे लागते असे सरळ उद्देशून न येता, षोडशेला ( की शोडषेला?) पंधरावे लागते असं लिहिलंय, म्हणून गोंधळ आहे...
शोडषा तारुण्याच्या राज्यात /
शोडषा तारुण्याच्या राज्यात / कल्पनाविश्वात सर्वात अय्डियल बाब मानली जाते तिला पन्धरावे लागणे म्हणजे तिने एखाद वर्ष अजूनच तरुण वाटू लागणे असे काहीसे असावे यातून यौवनाचा 'कडेलोट' दाखवायचा असेल बहुधा
बरोबर! कडेलोट - काय
बरोबर!
कडेलोट -
काय शब्दय!
चौदहवीका चाँद पौर्णिमेच्या चंद्राहून सुंदर समजला जातो तसे काहीसे
बेफिजी : जस षट्कार, षटकोन,
बेफिजी : जस षट्कार, षटकोन, षष्ठ्यब्दी, तसं षोडश वर्षे असतं.
'कडेलोट' मलाही सहजच सुचला हा
'कडेलोट'
मलाही सहजच सुचला हा शब्द!!
बेफिजी : जस षट्कार, षटकोन,
बेफिजी : जस षट्कार, षटकोन, षष्ठ्यब्दी, तसं षोडश वर्षे असतं.<<<
धन्यवाद! हे असे असल्यास माझा तो शब्द लिहिताना चुकला आहे. थोड्या काळाने दुरुस्त करेन.
लोभ असू द्यावात.
तसेच अरविंद चौधरी यांचेही आभार!
रोज रात्री शोडषेला पंधरावे
रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते......वा वा वा !
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते......क्या बात !
मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते.....सुपर्ब !
यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते......सहीय !
मस्त मेजवानी !
धन्यवाद!
षोडशा बरोबर. गझल अतिशयच आवडली
षोडशा बरोबर.
गझल अतिशयच आवडली
>>आशयाचे थेंब गुंते सोडुनी
>>आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते
क्या बात है!
क्या बात ...क्या बात ....क्या
क्या बात ...क्या बात ....क्या बात......!!
अख्खी गझल एकदम जबरी !!
शेवटी ......मक्ता ........ एकदम सेंटी !!
आवडलीच !!
रोज रात्री शोडषेला पंधरावे
रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते
रोज संध्याकाळचा मी डगमगत जातो जिथे
चालतो जो नीट त्याला सावरावे लागते
मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते
यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते
आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
>>>>> मस्तच..
ह्यातही -
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते
मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते
आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
हे खूप खास..
छान!
छान!
वाह... फार छान गझल. यामुळे
वाह... फार छान गझल.
यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते...................... इथे मी सत्यात ऐवजी प्रत्यक्ष असे वाचून पाहिले.
खुप छान. फार आवडली गज़ल.
खुप छान. फार आवडली गज़ल. प्रत्येक ओळ न् ओळ खास आहे!!! क्या बात है!!!
इथे मी सत्यात ऐवजी प्रत्यक्ष
इथे मी सत्यात ऐवजी प्रत्यक्ष असे वाचून पाहिले.>>>
प्रत्यक्षमधे थोडी वेगळी छ्टा येऊ शकेल असे वैयक्तिक मत. सत्य आणि स्वप्न हे जास्त थेट वाटते.
बेफी गझल अतिशय सुरेख... >>
बेफी गझल अतिशय सुरेख...
>> यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते
आणि
आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते >> हे दोन शेर प्रचंड आवडले.
एकच शंका आहे. फक्त षोडशा म्हणजे सोळावं लागलेली कन्यका. तिला पुन्हा पंधरावं कसं लागतं? काहीतरी घोळ आहे.
गर्ल्स
गर्ल्स
प्रश्न फारच चपखल आहे.
प्रश्न फारच चपखल आहे.
भुषणराव निस्तरा घोळ.
एकच शंका आहे. फक्त षोडशा
एकच शंका आहे. फक्त षोडशा म्हणजे सोळावं लागलेली कन्यका. तिला पुन्हा पंधरावं कसं लागतं? काहीतरी घोळ आहे>>>अहो, वैवकु यांनी वर प्रतिसादामधे त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट केला आहे असे मला वाटते.
Pages