Submitted by वैवकु on 23 November, 2012 - 15:13
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या
एक तूच ईश्वर वेड्या
ही सृष्टी सडणार उद्या
तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या
आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह.
वाह.
धन्यवाद मधुरा जी शेर सुचले हे
धन्यवाद मधुरा जी
शेर सुचले हे फार आवडले सुचलेले शेर फारसे नाहीत आवडले .........
_____________________________________
वृत्त दोनही ओळीत समान हवे
काफिये सडणार , उडणार हे बरोबर आहेत नियमानुसार ! 'उद्या' ही रदीफही बरोबर जागेवर आहे
पण ..................
शेर १)सडणार हा काफिया शेरात खयालास सूट होत नाही असे मला वाटते आहे
आता खयालावर लक्ष देवू .खयाल छानचय ...तुम्हाला कुणा "ती"ला रडू नकोस असे म्हणायचे आहे का?... मग अश्रू हा शब्द अन त्यास झडणे हे क्रियापद माझ्या मनात आले आहे . मी झडणार हा काफिया योजून व काही किरकोळ बदल करून हा शेर असा केला [जसे आज हा शब्द रदीफेस(उद्या) अधिक चपखल निभावण्यासाठी वापरलाय ]
आज लपवशिल तू राणी
दु:खच ते ; झडणार उद्या !!
शेर २)आता असलेली दुसरी ओळ परफे़क्ट आहे
ज्याला = ? हा प्रश्न उरतो उड्णारे असे कुणीतरी आहे ते ..बरोबर?...पक्षी असेल तो पिंजर्यातला ....अधिक सुंदर कल्पना मन असेल आपल्या आत बंदिस्त असलेलं.......... किंवा आत्मा......???
असे करून पाहुयात का आपण ................
देह पिंजरा !.... मी पक्षी...
.....आकाशी उडणार उद्या ***
*** = देह पिंजरा !. >>>या इथे शेर तुटतो असे समजून घ्यावे लागते अन् पुढचा भाग दुसर्या ओळीस जोडावा लागतो अर्थासाठी. नाहीतर देह अन आत्मा (मी) यापैकी कोण उडणार हा गमतीशीर प्रश्न पडतो
असो
तुमचे दोन शेर तूर्तासतरी असे तयार झाले आहेत ..हे घ्या तुमचे तुम्हाला परत !!
आज लपवशिल तू राणी
दु:खच ते ; झडणार उद्या !!
देह पिंजरा !.... मी पक्षी...
.....आकाशी उडणार उद्या
न आवडल्यास क्षमस्व!!! ............चूक भूल द्यावी घ्यावी !!
पुनश्च धन्यवाद मधुरा जी .........गझल लेखनास शुभेच्छा !!
-वैवकु
फारच सुंदर आहे.
फारच सुंदर आहे.
वेगळी वाटली बांधणी,मिताक्षरी
वेगळी वाटली बांधणी,मिताक्षरी अन प्रभावी. हे लेखन मिस झालं होतं .खूप आवडलं.
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या
वा वा ! मेयन जगबुडीच्या संदर्भात वाचलं अन सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् झालं.जगबुडीची भीती काल्पनिक असेलही, पण हा मानवी संस्कृतीचा पुरातन वाडा कोणत्याही निमित्ताने पडू मात्र शकतो. युद्धखोरीतून नक्कीच..
मग विठ्ठलाच्या उल्लेखाचाही अर्थ उलगडतो, ..
आवडली ही गज़ल!
आवडली ही गज़ल!
छान आहे गजल वैभव. पहिला आणि
छान आहे गजल वैभव. पहिला आणि शेवटचा शेर आवडला.
बहोत खूब! जयन्ता५२
बहोत खूब!
जयन्ता५२
रियाजी! गझलेला पुर्वीचे दिवस
रियाजी!

गझलेला पुर्वीचे दिवस आले काय?<<<<<<
वैभवाच्या गझलेच्या आयुष्यमानासाठी एवढेही कोणी करू नये काय
...........प्रा.सतीश देवपूरकर
पाभे ,मुग्धमानसी , पारिजाता ,
पाभे ,मुग्धमानसी , पारिजाता , जयंता५२जी , खूप खूप आभार
__________________________________________________
भारतीताई तुमचे विषेश आभार
ही गझल ज्या दिवशी सुचली .........गणेशोस्तव होवून गेला होता .......आमचा वाडा पाडायचे काम आधीच सुरू झाले होते .थोडा भाग पाडला होता ... काढलेले छतावरचे पत्रे बाबांनी गल्लीतल्या मंडळाला दिलेले.... ते लोक त्या दिवशी परत करायला आले होते तेंव्हा ....... आता हा सगळाच वाडा एकदिवस पडायचा आहे याची जाणीव झाली. .... हे सगळं झालं त्यावेळी तुमच्याशी फोनवर बोलत होतो..आणि तुम्हाला हेच सांगतही होतो...तुमच्याशी फोनवर बोलताना मन नेहमीच आपसूकच हळवं होत असतंच म्हणा!!.........तर झालं काय की ...हा पहिला शेर क्षणार्धात सुचला (..... हे मी तुम्हाला त्याच्वेळी सांगायला विसरलो..क्षमस्व)
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
थोडक्यात काय की हा शेर तुमच्या त्या फोन् मुळे सुचला किंबहुना ही गझलच! ...म्हणून म्हणतोय की मला असे अधून मधून फोन करत जा तुम्ही! निदान एखादी तरी गझल/शेर सुचेल असा अंतरात्म्यातून
__________________
देवसरांचे मुद्दाम आभार ...त्यंनी मुद्दाम तसा प्रतिसाद दिला म्हणून!! ........ (;))
वैभव काय बोलू.. सर्व
वैभव
काय बोलू.. सर्व शुभेच्छा या सगळ्यावर मात अन कविता करण्यासाठी..
वैभवा!
वैभवा!

सर, स्मायली लै भारी
सर, स्मायली
लै भारी
तुझ्यात लपून गेलो की मलाच
तुझ्यात लपून गेलो की
मलाच सापडणार उद्या
>>>
हा शेर आवडला
छानच
छानच
Pages