काल दसरा होता. पण आमचे दुकान नेहमीसारखे उघडेच होते. सकाळी एक्स्ट्रा पूजाअर्चा काय झाली तीच. अर्थात, ते खाते वडीलांकडेच. मी गेलो सावकाश घरचे आवरून.. नेहमीसारखाच.. त्यातल्यात्यात सणासुदीचे नवीन कपडे आणि व्यवस्थित भांग पाडून.. थोडावेळ मंगल वातावरण वाटले, पण त्यानंतर नेहमीचे काम होतेच ते चालू झाले. अधूनमधून नवीन शर्ट असल्याने आरश्यात बघणे काय ते होत होते, पण त्याचा कामावर काही फरक नाही की दुपारी दुकान लवकर बंद करून घरी पळायची सोय नव्हती.
अश्यातच साडेअकरा बाराच्या सुमारास वाडीतील मुलामुलींचा ग्रूप मला भेटायला, दसर्याच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांचा कुठेतरी मंदीरात जायचा कार्यक्रम होता त्या साठी औपचारीकता म्हणून बोलवायला आला. औपचारिकता म्हणालो कारण मला मंदीर फिरायची आवड नाही हे त्या सार्यांनाच माहीत असल्याने मी येणार नाही याची त्यांना कल्पना होतीच.
सारे नटूनथटून मिरवत होते. मुलांमध्ये कोणी सलवार-कुर्ता घातलेला तर कोणी जीन्सवरच सदरा चढवलेला. एकाने चक्क लांबून पाहता धोतर वाटावे असे काहीतरी घातले होते. दोनचार डोकी टोप्या-फेट्यांमध्येही अडकली होती.... पण मुली मात्र एकजात सार्याच साड्यांमध्ये.. फरक इतकाच की कोणाची अंगभर जरीमरी लावलेली तर कोणाची बॉर्डरच काय ती रुपेरी.. कानातले, गळ्यातले मात्र एकजात टीपिकल.. त्या त्या साडीला मॅचिंग काय ते तेवढेच.. बरे वाटले पण त्यांना असे सजलेले धजलेले बघून..
पण मला पाहताक्षणीच त्या म्हणाल्या, "काय रे तू... आजही असाच शर्ट-पँट घालून.. काहीतरी ट्रेडिशनल घालायचे होते आजच्या दिवशी तरी.. "
झाला.... माझा तर विरसच झाला.. नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. नाही म्हटले तरी चिडलोच..
म्हणालो, "नवीन शर्ट आहे दिसतेय ना, आणि तुम्ही काय असे मोठे ट्रेडीशनल घातलेय?"
"अय्या हे काय... साडी दिसतेय ना..?"
"बरं मग, त्यात ट्रेडीशनल ते काय? माझी आई घरी रोज घालते. साडी घालून घरातली कामेही करते. कचरा काढते, भांडी घासते.. साडीचे काय कौतुक सांगता मला.. "
"अरे पण आम्ही रोज घालतो का? नेसायला किती त्रास होतो माहित आहे का तुला?"
"तो तुमचा प्रॉब्लेम आहे.." मी म्हणालो, "आपल्याकडे एवढे प्रांतप्रदेश आहेत, प्रत्येकाची साडी नेसायची तर्हा वेगवेगळी आहे, दागिनेही कित्येक प्रकारचे त्या त्या नुसार असतात, महाराष्ट्रीयन म्हणाल तर ना तुम्ही नवारी नेसलीय ना तुमच्या नाकात नथ आहे. पदराचा पत्ता नाही, हेअरस्टाईलहीही मॉडर्नच दिसतेय, ब्लाऊजचा फॅन्सी कट तर कुठल्या संस्कृतीत मोडतो तुम्हालाच ठाऊक, हे असे नुसते साडी घालणे म्हणजे ट्रेडीशनल वेअर झाले तर कित्येक बायका रोजच असा दिवस साजरा करतात म्हणावे लागेल ना..."
"म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.."
"चल निघतो आम्ही, तू बस दुकान सांभाळत.. हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...." जाता जाता मला टोमणा मारून गेल्या पण माझा बदला पुर्ण झाला... मी सुद्धा त्यांचा हिरमोड केला..
हा संवाद इथेच संपला... मला तर फार खुमखुमी होती, पण त्या आपल्या सणाच्या दिवसाची सुरूवात वादाने करण्यास उत्सुक नव्हत्या. त्या निघून गेल्या, पण त्यांना पाठमोरे पाहून डोक्यात एक विचार घोळत राहिलाच... या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...
- आनंद
(No subject)
तो वाद इथे चालु करायचा आहे
तो वाद इथे चालु करायचा आहे का.....त्यांनी भाव दिला नाही तर इथे आलात ?
उदयन
उदयन
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...."<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............
चान चान
चान चान
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...."<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............
अहो हिरमोड करण्यासाठी बोल्लेलं आहे ते. घ्या हाजमोला घ्या आणि हळू हळू हाजमा. (होईल हळू हळू हजम)
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि
<हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...."<> य्ये बात कुछ हजम नही हुइ............
>>>>>>>>
म्हणून तर याला टोमणा म्हणालो.
चार आठवड्यात बरीच मजल मारली
चार आठवड्यात बरीच मजल मारली आहे अंड्या जी !!!!!
बोलण्यासारख बरच आहे पण जाऊच
बोलण्यासारख बरच आहे पण जाऊच देत !
.. या आजच्या पोरींना
.. या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार..>>>> थ्री फोर्थ घालुन वर्षभर पोटर्या दाखवायच्या,आखुड टीशर्ट घालुन पाठ पोट दाखवायचे आणि एक दिवसच साडी घालायची यात कसली ट्रॅडीशन आहे? असा प्रश्न त्या ललनांना विचारायला हवा होता.
आजच्या पोरींना साड्यांचं
आजच्या पोरींना साड्यांचं कौतुकच बाकी फार???
परवाच आमच्या शेजारच्या आजी तावातावाने म्हणत होत्या की आजकालच्या पोरींना साड्यांचे कौतुक कसे ते नाहीच, त्यांना या लेखाचे प्रिंटाऔट काढून वाचायला द्यावे काय??
आले सगळे डु आयडी आले.....
आले सगळे डु आयडी आले..... अकलेचे तारे तोडायला.
आले सगळे डु आयडी आले.....
आले सगळे डु आयडी आले..... अकलेचे तारे तोडायला.>>>> मीराबै खरे बोलणे म्हणजे अकलेचे तारे तोडने काय... बर.. बर.
थ्री फोर्थ घालुन सभ्यता वन फोर्थ करायला तुमचा पाठिंबा आहे काय?... तसे स्पष्ट करा.
नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट
नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. >>>
चांगलं लिहिलंय
त्या मुली तुमच्या दुकानाबाहेर जाऊन म्हणाल्या असतील, 'या आजच्या मुलांना भांडायची खुमखुमीच फार'
थ्री फोर्थ घालुन वर्षभर
थ्री फोर्थ घालुन वर्षभर पोटर्या दाखवायच्या,आखुड टीशर्ट घालुन पाठ पोट दाखवायचे आणि एक दिवसच साडी घालायची यात कसली ट्रॅडीशन आहे? >>>
उत्तरेत आपल्या मराठी नऊवारी साडीला काय म्हणतात माहित आहे ना? नौ गज लंबी फिर भी टांगे नंगी. साडीमधे सुद्धा पोट आणि पाठ दिसतेच की.
संस्कृती संबंधाने घेऊ नका
संस्कृती संबंधाने घेऊ नका लोकहो.
'माझा नवा ड्रेस अॅप्रिशिएट नाही केला तर मी तुमच्या आनंदावर पण विरजण टकतो बघा'
या अँगलने वाचा लेख.
साती, लेख त्याच दृष्टीकोनातुन
साती, लेख त्याच दृष्टीकोनातुन वाचला. तु म्हणालीस त्याच अर्थाने घेतला होता. वाईट नाही आणि अगदी आवर्जुन छान म्हणण्याइतका आवडला नाही, म्हणुन वाचुनही लेखाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. संस्कृतीशी संबंध नाही, पण किड्याने जो किडा केला त्यालाच फक्त उत्तर दिलं आहे मी.
मनी, ते खाजवून खरूज काढणं
मनी, ते खाजवून खरूज काढणं आहे.
म्हणजे त्या निमित्ताने हे लोकं एकेकाची त्यांच्यामते संस्कृती जोखणार.
आजकालच्या जमान्यात ३/४ ला हसतात.
गावात राबताना गुडघ्याच्या जरा खाली साडी नेसलेल्या बायका पाहिल्या नाहीत का?
हल्लहल्ली पर्यंत महाराष्ट्रात कष्ट करणार्या बायका अशी ३/४ नऊवारीच नेसत.
४/४ नेसण्याची हौस फक्त नाजूक काम करणार्या स्त्रीयाच करू शकत.
@ रियाजी पैसे पडत नसतील तर
@ रियाजी
पैसे पडत नसतील तर बोला हो. मला शिव्याही आवडतात.
---------------------------------------------------
@ मोहन की मीरा
चार आठवड्यात नाही हो, ही मजल पंचवीस वर्षात मारली आहे, मायबोलीवर येऊन शिकलो नाहिये हे..
अवांतर - राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू? - मोहन की मीरा मधील "की" हिंदी की मराठी?
---------------------------------------------------
@ मंजिरी
परवाच आमच्या शेजारच्या आजी तावातावाने म्हणत होत्या की आजकालच्या पोरींना साड्यांचे कौतुक कसे ते नाहीच, त्यांना या लेखाचे प्रिंटाऔट काढून वाचायला द्यावे काय??
>>>>>>>>>>
दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच हो... इतर दिवशी कौतुक नसते म्हणून मग सणासुदीच्या दिवशी जास्तच उमाळून येते..
---------------------------------------------------
@ मंजूडी,
धन्यवाद... एक तुच माझी मैत्रीण..
---------------------------------------------------
@ साती
साती दिशा अँगलने वाचला तरी सत्य ते सत्यच..
अवांतर - राग येणार नसेल तर एक
अवांतर - राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू? - मोहन की मीरा मधील "की" हिंदी की मराठी?
हहपुवा
या आजच्या पोरींना साड्यांचे
या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...>> आहेच मुळी. काय प्रॉब्लेम? तुम्हाला तुमच्या नविन शर्टाचे नव्हते कौतुक? मग???
बाकी, सणासुदीचं महत्त्व असतं की रोज जे करतो त्याहून वेगळे काहीतरी करावं. रोज साडी नेसणार्या बाईला अथवा रोज धोतर घालणार्या बाबाला त्याचे कसले आले आहे कौतुक. तुमच्या लेखात लिहिलेच आहे की मुलांनीपण "ट्रॅडिशनल वेअर" घातले होते म्हणून. त्याबद्दल तुमची काहीच कमेंट नाही वाटतं.
मी हल्लीची मुलगी नाहीये.
मी हल्लीची मुलगी नाहीये. चांगली चाळिशीच्या पुढची बाई आहे... पण मला साडीचं ह्या लेखात म्हटलय तसं कौतुक आहे. साडी हा आजकाल (आजकालच्या मुलीमधलाच 'आजकाल') रोजच्या वापरातला पेहराव नाही. गोल साडी (पाचवारी) नेसून घरकाम करणं हे सो कॉल्ड ट्रॅडिशन वगैरे असू शकेल पण सोयिस्कर नाही. त्यापेक्षा मी नऊवारी नेसून घरकाम करणं पसंत करेन. माझीही आई पाचवारी नेसते आणि घरकाम वगैरे तिनंही केलच. पण तिच्या सुनेनं किंवा मी सणासुदीला मुद्दाम आवर्जून नेसलेल्या साडीचं तिला कौतुक आहे. पण... थोडं मिरवून झालं आणि आम्ही घरकामात शिरलो तर तीच सांगते की, साध्या पंजाबी वगैरे सुटसुटित कपडे बदलून या आता...
एक गंमत म्हणून मी हा लेख घेतेय. मुलींच्या विशेष पेहरावाला उपरोधाचं "कौतुक" म्हटलय... त्याच लेखात मुलांनी केलेल्या विशेष पेहरावाला काही वगळं वळण दिलेलं नाही. हा विरोधाभास ही ह्या लेखातली मला गंमत वाटतेय...
दाद आत्या, तुला गंमत वाटली
दाद आत्या,
तुला गंमत वाटली खरेच काही कि तू माझी गंमत घेतेस माहीत नाही.. पण एवढा भरभरून प्रतिसाद दिलाच आहेस तर जरा मी देखील एक गंभीर प्रतिसाद देतोच आता...
खरे तर या लेखात (आईला इथे काहीही लिहिले की लोक लेख लेखच करतात.. उतारा, परीच्छेद वगैरे बोला रे, आपण काहीतरी लेख वगैरे लिहिला आहे आता त्याचे स्पष्टीकरणही द्यावे लागणार असे उगाच दडपण येत.. )
असो... तर हे लिहिता वेळी माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच मुद्दा होता की आजकाल मुली साड्या फारश्या घालत नाही (कारण हजार आहेत, त्या चर्चेला हा धागा नाही) त्यामुळे त्यांना साडी घालणे फार कौतुकाचे वाटते. यावर जराही आक्षेप नाही.. ते असावेच.. पण त्या मुली माझ्याकडून सुद्धा ट्रेडीशनल वेअर म्हणून सदरा-कुर्ता अपेक्षित धरत होत्या..
तर मूळ मुद्दा असा आहे की पोरींचे बरे, साडी घातली की झाला ट्रेडीशनल वेअर, आणखी काही वेगळे करायला नको.. पण मुलांना ट्रेडीशनल वेअर म्हणजे सदरा-शेरवानी तत्सम घालावे लागते.. सर्वांनी ठरवूनच घातला तर ठीक अन्यथा आपणच घातला तर ऑड मॅन आऊट वाटते.. तसेच मोजून दोन-तीन फार तर फार सदरे वगैरे असतात, तेच तेच परत परत घालता येत नाहीत, म्हणून वर्षभरात येणारे हे असले सारेच दिवस साजरे करता येत नाहीत.. मुलींचे बरेय.. साड्या कधीतरी घालत असल्या तरी असतात ढिगाने.. ही नाही तर ती आलटून पालटून घालता येते.. मुले कुठून आणनार दरवेळी एवढे ट्रेडिशनल वेअर... बस हीच खंत.. पण कोण समजून घेईल तर शप्पथ..
साड्या 'घालत' नाही हो,
साड्या 'घालत' नाही हो, नेसतात!
तसा तर साधा सदरा सुद्धा घालत
तसा तर साधा सदरा सुद्धा घालत नाही हो.... चढवतात..
हा तेच लिहिणार होते मंजू.
हा तेच लिहिणार होते मंजू.
बाकी जे काय लिहिलंय ते काहीही आणि उगाच आहे.
मंजूडी | 27 October, 2012 -
मंजूडी | 27 October, 2012 - 18:52 नवीन
साड्या 'घालत' नाही हो, नेसतात>>>>मंजुडी, सिक्सर.
आपलं ट्रॅडीशनल वेअर म्हणजे
आपलं ट्रॅडीशनल वेअर म्हणजे धोतर आणि सदराच खरंतर. एकदा धोतर नेसायला सुरुवात करा. २-३ असली तरी आलटून पालटून नेसता येतात, तीच काय नेसलीत म्हणून कुण्णी काही विचारणार नाही. आणि धोतर नेसणं हे साडी नेसण्यापेक्षा कित्तीतरी सोप्पंय, आता तुम्हाला धोतरात वावरणं कितपत सोयीचं आहे ते तुम्ही बघा. पण तुमचे आजोबा-पणजोबा रोजच धोतर नेसायचे तेव्हा नो बिग डील, काय?
नीधप बाकी जे काय लिहिलंय ते
नीधप
बाकी जे काय लिहिलंय ते काहीही आणि उगाच आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
http://www.maayboli.com/node/38814
@ वरदा, साडी विरुद्ध धोतर अशी
@ वरदा,
साडी विरुद्ध धोतर अशी तुलना करताना नुसती सोय बघू नका.
मुलांना साडीत नटलेल्या मुली आवडतात तसे मुलींना धोतर चढवलेली मुले आवडतील का? अश्या मुलांना कोण मुली भाव देतील का हे ही बघायला हवे.
शेवटी आपण ड्रेसिंग वेसिंग लोकांना आकर्षित करायलाही करतोच ना.
उद्या मुलींना धोतर घातलेली मुले क्यूट वाटायला लागली तर दर दुसर्या गॅलरीत सुकत घातलेले धोतर फडफडण्याचे दृष्य बघायला मिळेल याची खात्री बाळगा..
Pages