Submitted by शायर पैलवान on 19 October, 2012 - 04:34
शिजवलेले जरा मस्तच झाले
पाककृती तू टाक इथे
अमुक आज तू तेल लावले
घसरून सगळ्यांना पाड इथे
उपवासाला काय पौष्टिक
सल्ला फुकट तू फेक इथे
कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे
स्वेटर, मोजे, ब्रह्मकमळ ते
काढ फोटो टाक इथे
दर दहाव्या प्रतिसादानंतर
धन्यवाद तू फेक इथे
समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे
चढला डोंगर, सुचला वृत्तांत
दुसर्याच दिवशी टंक इथे
विपु, समस, अन विपत्र खाते
फिरवी रिक्षा रोज इथे
दोन डझनांची कर्तबगारी
क्रमशः पिडूनी टंच इथे
आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे
सरकार दरबारी तक्रारीला
नाही तुझिया अंत इथे
गर्दी जमवून गप्पा छाटी
दिवसभर तू पडिक इथे
दात घासले, आंघोळ केली
जे सुचले ते टाक इथे
अस्तित्व आपुले दाखवण्या तू
जे सुचले ते टाक इथे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणाजी नाही चालणार हा शेर
दक्षिणाजी नाही चालणार हा शेर
इथे............ 'इथे' अशी रदीफ हवी तुमच्या शेरात 'तिथे' अशी रदीफ आहे

दक्षिणाजी हे पहा चालेल
दक्षिणाजी हे पहा चालेल का?
विपु, समस, अन विपत्र खाते
फिरवी रिक्षा रोज इथे
सट्यॅक्
सट्यॅक्
Pages