फ्लॉवर रेमिडीची जन्म कथा

Submitted by शोभनाताई on 17 September, 2012 - 23:32

२४ सप्टेंबर हा डॉक्टर एडवर्ड बाख यांचा जन्मदिवस येऊ घातलेला आहे. बाख आणि त्यानी शोधुन काढलेली फ्लॉवर रेमेडी ही उपचार पद्धती याचा माझ्यावर खुप प्रभाव पडला. त्याच्या वापराने मी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनात थोडाफार आनंद निर्माण करु शकले. बाखचे विचार पोचवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

फ्लॉवर रेमेडीची जन्मकथा सुरु होते बर्मिंगहॅम जवळच्या मोस्ले नावाच्या निसर्गरम्य खेड्यात. इथच फ्लॉवर रेमेडिचे जनक एडवर्ड बाख यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८६ला झाला. लहानपणापासुनच निसर्गाच वेड होत.शाळेला सुटी पडली कि ते डोंगर दर्‍यातुन हिंडत. प्राणी,पक्षी, वृक्षवल्लरींचे तासनतास निरीक्षण करत.त्याना आपण बरे करत आहोत अशा स्वप्नरंजनात रमत. जिज्ञासु वृत्ती, विलक्षण एकाग्रतेने निरीक्षण करुन विषय समजुन घेणे, त्या विषयाच्या मुळाशी जाउन त्यावर विचार करणे हे पहिल्यापासुन त्यांचे स्वभाव विशेष होते.

डॉक्टर होण्याच्या इच्छेला मुरड घालुन त्याना वडिलांच्या ब्रास फाउंड्रीत काम करावे लागले. निसर्गा प्रमाणे माणसांवरही प्रेम करणारे बाख कामगारांच्या समस्या पाहुन व्यथित होत. मानसिक समस्यानी ग्रासलेल्या कामगारांवर उपचार केले जातात ते त्यांच्या शरीरावर,म्हणजे परीणामावर. आजाराचे मुळ कारण तसेच राहते. त्यामुळे आजार औषधोपचारानंतरहि पुन्हा पुन्हा उदभवतात. यावरुन प्रचलित उपचार पद्धतित त्रुटी आहेत असे त्याना वाटु लागले. त्यापद्धतीच्या मूळाशी जाउन अभ्यास केल्यासच त्रुटी लक्षात येतील असे त्यांच्या मनाने घेतले. वैद्यकीय शिक्षणासाठी ते लंडनमध्ये आले.

लंडनला आल्यावर निसर्गापासून दूर आलेल्या बाखना एकीकडे शहरातील गजबज,वाहनांची वर्दळ हे तापदायक वाटे तर दुसरीकडे विविध रोग्यांशी गप्पातुन मेंदुला भरपुर खुराकही मिळत असे. त्यामुळे प्रचलित उपचार पद्धतिच्या मर्यादाविषयिच्या त्यांच्या अनुमानाला दुजोराच मिळत गेला. जेवणाचे पैसे वाचवून ते भरपुर पुस्तके घेत व अभ्यासत. यातुन आधुनिक वैद्यक,व्याधीवर उपचार करते व्यक्तीवर नाही. हे त्यांचे गृहितक अधिकाधिक पक्के होत गेले. अल्पावधितच ते एम.बी.बी. एस. झाले.डी.पी एच.(Diploma in Public Health)ही पदवीही घेतली.

इतर विद्यार्थांपेक्षा ते वेगळे होते. रुग्णांना फक्त औषधे न देता त्यांच्याशी ते गप्पा मारत. त्यांच्या दु:खावर फुंकर घालत. रुग्णही त्यांच्यापाशी आपल्या व्यथावेदना मोकळ्या करत.

एकदा एक तीव्र दमा असलेली बाई उपचारासाठी आली. अतिशय घाबरलेली.तिच्या मुलाने नॉर्थै इंग्लंडमध्ये तीन महिन्यापुर्वी नोकरी धरली होती. गेल्यापासुन त्याची काहीच खबरबात नव्हती. तो आजारी तर नसेल ना? त्याला अ‍ॅक्सिडेंट तर झाला नसेल ना? त्याचे निधन झाले असेल का? अशा नाना शंकानी तिला घेरले होते. काही दिवसानी तिने मुलगा परत आल्याची आणि जवळच नोकरी धरल्याची बातमी दिली. मुलाची काळजी संपली आणि तिचा दमाही गायब झाला.

दुसरा एक रुग्ण पोटाच्या त्रासानी ग्रासला होता. अल्सरची शक्यता वाटत होती. त्याची नोकरी गेली होती. दोन लहान मुले,पत्नी नोकरी करु शकत नव्हती. त्याला पोखरणार्‍या काळजीनी अल्सरच दुखण बहाल केल होत. त्याला नोकरी लागली आणि त्याचा आल्सरही कमी झाला. आज आधुनिक वैद्यकानेही काळजीने आल्सर होउ शकतो हे मान्य केल आहे. पण त्याकाळी अस मानल जात नव्हत.
अशा विविध रुग्णाना हाताळताना त्याच्या पुर्वीच्या गृहितकावर शिक्कामोर्तबच झाल. काही निरिक्षणही त्यानी नोंदवली.

दु:ख हलक करण्यासाठी मानसिक अवस्था बदलण्यासाठी त्यावर फक्त फुंकर घालणे पुरेसे नाही. विशिष्ट रोगावरील विशिष्ट औषध सर्वानाच लागु पडत नाही. ज्या रुग्णांचा स्वभाव सारखा असतो त्याना ते लागु पडते,तिच तक्रार असणार्‍या पण वेगळ्या स्वभावाच्या लोकाना लागु पडत नाही.
या निरीक्षणाबरोबरच आजार बरा होण्यासाठी इंजक्शनद्वारे वेदना देणेही त्याना पसंत नव्हते. सोपी, वेदनारहित,व्याधीबरोबर व्यक्तिलाहि बरी करणारी उपचार पद्धती त्याना हवी होती.

पॅथॉलॉजिस्ट व जीवजंतु शास्त्रज्ञ म्हणुन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधे त्यांची नोकरी चालुच होती. शिवाय स्वतःच्या लॅबोरेटरीत ते प्रयोग करत. जीवजंतुशास्त्रज्ञ म्हणुन ते नावारुपाला आले.१९१३ मध्ये नोकरी सोडुन त्यानी स्वतःचा दवाखाना सुरु केला. त्यांच्या नावलौकिकामुळे रुग्णांची गर्दी वाढत होती. प्रयोग शाळेतील काम दवाखाना आणि नविन उपचार पद्धतीचा सततचा ध्यास या सर्वाच्या अतिताणामुळे ते एकदा बेशुद्ध पडले. त्यांच्या मेंदुवर शस्त्रक्रिया करावी लागली. दुखणे जीवावरचे होते डॉक्टरनी २/३ महिने जगु शकाल अशी स्पष्ट कल्पना दिली होती. यामुळे न खचता ते इच्छित संशोधनासाठी कमी वेळ आहे म्हणुन झपाट्याने कामाला लागले. मृत्यू मात्र त्यांच्यापासुन दूर पळत होता. त्या नंतर ते १८ वर्षे जगले.

१९२८ मध्ये होमिओपाथीचे जनक हनिमान यांचे ऑरगॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. बाखच्या विचाराशी त्यातील विचार जुळणारे होते. व्यक्तिच्या शरीराबरोबर मनाचाही त्यात विचार केला होता. हनिमनच्या विचारात अधिक संशोधनाने भर घालावी असे त्यानी ठरवले. त्यानुसार विविध रिसर्च जर्नलमधुन शोधनिबंध लिहिले. रॉयल लंडन होमिओपाथिक हॉस्पिटलच्या प्रयोग शाळेत काही दिवस कामहि केले. प्रती हनिमन म्हणुन ते ओळखले जाऊ लागले.

इतके करुन बाखची तगमग मात्र कमी होत नव्हती. होमिओपाथीतील हजारो औषधे,त्यांच्या क्षमता हे त्याना सर्व सामान्यांच्या दृष्टीने किचकट वाटु लागले. यापेक्षाही सोपी सर्वसामान्याना स्वतःच स्वतःला बरे करता येइल अशी सोपी उपचार पद्धती त्याना हवी होती. निसर्गातील चैतन्य शक्तीतून ती मिळतील असे त्याना वाटु लागले. निसर्ग त्याना खुणाऊ लागला. शेवटी हार्वे स्ट्रीटवरील खोर्‍यानी पैसे देणारा चालता दवाखाना सहकार्‍याला देउन वेल्सच्या जंगलात प्रयाण केले. बरोबर होती सहकरी नोरा विक्स(Nora Weeks).
दूर जंगलात कोणत्याही शहरी सुविधा नसताना राहणे शारीरिक मानसिक दृष्ट्या क्लेशकारक होते, नोराला माहित होते. नोरा व्यवसायाने रेडिओग्राफर होती. लंडन हॉस्पिटलमध्ये बाखच्या हाताखाली काम करत होती. बाखचा दृष्टिकोन, सत्यशोधनाचा ध्यास,त्यासाठी लागणारी असामान्य बुद्धीमत्ता,त्याला रुग्णाबद्दल वाटणारी आत्मियता,संवेदनशिलता, इप्सित साध्याकडे पोचण्यासाठी झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती आणि आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची कृतिशिलता या सर्वामुळे प्रभावित झालेली होती. त्यामुळे वेल्सच्या जंगलात संशोधनासाठी जाण्यास बाखनी निमंत्रित केल तेंव्हा ती लगेच सहकार्या साठी तयार झाली. बाखच्या सर्व संशोधनात ती त्याचा उजवा हात होती,सर्व संशोधन प्रक्रियेची साक्षीदार होती. देहभान ,भुक तहान विसरुन संशोधनात गुंतलेल्या डॉक्टरांची देखभाल तिने मनापासुन केली. बाखच्या कार्यात नोराच्या निष्ठेचा,आणि निरपेक्षपणे घेतलेल्या काळजीचा खुप मोठा वाटा आहे.

वेल्सच्या जंगलातील निसर्गाच्या सहवासात बाख यांच्या प्रतिभेला बहर आला. लहानपणापासुन निसर्गाच्या सहवासात राहिल्याने विविध वनस्पतींची त्याना ओळख होती. वनस्पतीची बीजे फुलात असतात त्यामुळे वनस्पतीचे सर्व गुण फुलात असले पाहिजेत अशी अटकळ बाखनी बांधली. त्यानुसार संशोधन सुरु केले. पहिले फुल सापडले इंपेशन्स,नंतर मिम्युलस्,त्यानंतर क्लेमॅटीस....
या फुलापासुन तयार केलेल्या औषधाचा त्यांच्या दवाखान्यातील रुग्णावर वापर सुरु केला. परिणाम आश्चर्यजनक होता. बाखचा हुरुप वाढला.आपल्याला हवी तशी औषधोपचाराची नविन सोपी पद्धत आपण शोधली आहे असे त्याच्या लक्षात आले. वेळ काळ ,तहान भूक कशाचीच तमा न बाळगता ते कामाला लागले. निसर्गाशी तदात्म्य पावले. त्यांची ज्ञानेंद्रिये अतीसंवेदनशिल बनली. इतकी की इतराना न दिसणार्‍या गोष्टी त्याना दिसु लागल्या. स्पर्श ज्ञान सुक्ष्म झाले. झाडांची स्पंदने त्याना जाणवू लागली. एखादे फुल तळहातावर,जिभेवर ठेवले तरी त्या फुलांचे गुणधर्म जाणवू लागले. शेवटी शेवटी आपल्या स्वतःच्या मनाची नकारात्मक संवेदना जागवून विविध फुले त्या अवस्थेत हाताळुन त्यानी स्वतःवर प्रयोग केले. औषधातील सुप्त गुणांचा शोध लावला. मनाच्या भीती, साशंकता, अनिश्चितता, एकटेपणा, उदासिनता, नैराश्य, अतिसंवेदनशिलता, इतरांची अवास्तव काळजी अशा सात नकारात्मक अवस्थांची ३८ औषधे शोधली. आणि त्याद्वारे उपचाराची सोपी पद्धतहि. शुद्ध पाणी,ऊन, फुललेली फुले आणि स्वच्छ् काचेचे भांडे एवड्याच साहित्याच्या आधारे हि तयार करता येणार होती. शेवटचे अडतिसावे औषध शोधल्यावर त्यानी जाहिर केले. सर्व नकारात्मक भावनावर औषधे शोधली आहेत. या औषधाच्या आधारे त्यानी हजारो व्यक्तींवर यशस्वी उपचार केले. पुस्तके लेख याद्वारे हि ज्ञान गंगा लोकांपर्यन्त पोचवली.

लंडनमधील मेडिकल असोशिएशनने हे सर्व गैर असल्याची अनेकवेळा ताकिद दिली. पण बाखने त्याकडे लक्ष दिले नाही. जंगलात राहुन त्यानी जे कष्ट घेतले त्याचा शरीरावर व्हायचा तोच परीणाम झाला. २७नोव्हेंबर १९३६ ला शांत झोपेत त्यांचे निधन झाले.

'Heal Thyself 'म्हणजे स्वतःच स्वतःला बरे करा या पुस्तकातुन त्यानी आपले फ्लॉवर रेमेडी विषयीचे विचार मांडले.त्यानुसार आजाराचे स्वरुप समजण्यासाठी काहि मुलभूत तत्वे पुढीलप्रमाणे :

१) व्यक्तीचा स्व म्हणजे फक्त बाह्य शरीर नाही तर आत्मा ही आहे. आणि हा स्व परमेश्वराचा एक अंश आहे. तो अमर आहे. शरीर हे फक्त साधन आहे. प्रवासात घोडा वापरतात.प्रवास संपला की त्याच काम संपत. तस शरीराच आहे.

२) निसर्ग पूर्णत्वाकडे जाणारा. आत्मा हा त्याचाच एक अंश आहे.

३) आत्म्याच निसर्गाशी संतुलन होत तेंव्हा आनंद मिळतो. चांगले आरोग्य मिळते. तुम्ही राजा असा रंक असा,गरीब असा वा श्रिमंत. जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या इशार्‍यानुसार चालता तोपर्यंत सर्व चांगले असते. तुमचा योग्य विकास होतो.

४) सर्व चराचर विश्वात एकत्व असते. वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या पुर्णाचा एक भाग असतात त्यामुळे स्वतःविषयी क्रिया किंवा दुसर्‍याविरुद्धच्या क्रियेचा परिणाम पुर्णाबाबत होतो त्यामुळे स्वत्;शी परात्मता निर्माण होणे आणि दुसर्‍याशी निर्दयपणे वागणे, यातुन संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष आजार निर्माण करतो. हि चूक सुधारली तर शांतता आणि आरोग्य लाभत.

५) आजाराच्या स्वरुपावरुन तो एकतेच्या विरोधात कोणत्या क्रियेने गेला हे समजु शकत. उदा.भीतीने आल्सर्, द्वेषाने थायमस ग्लँडवर परिणाम होतो; थायमस ग्लेंड नीट काम करत नसेल तर प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. अभिमान,उद्धटपणा,मनाचा ताठरपणा यांचा परीणाम शरीरात ताठरपणा र्निर्माण करणारे आजार होण्यात होतो.

६) आजार एका परीने फायद्याचा. कारण तो स्वकडे जाण्याचा मार्ग असतो.आपली चूक समजली तर आपण आजाराचा प्रतिकार करु शकतो. आजार टाळु शकतो.

७) चूक सुधारण्यासाठी त्या चूकीच्या विरुद्धचा गुण आत्मसात करावा. उदा.स्वप्रेम हे अनेक आजारांचे मुळ आहे. सर्वांवर प्रेम करणे हा त्याविरुद्धचा गुण आत्मसात करुन ती चूक सुधारावी. स्वतःच्या हिताबरोबर मानवतेच्या हितात ती चूक परिवर्तीत होऊन दु:खे कमी होतील.

आपले विचार लिखित स्वरुपात लोकांसमोर मांडुन झाल्यावर त्यांनी आपली सहकारी नोरावर सर्व जबाबदारी सोपवली. आणि या उपचार पद्धतीत अपेक्षित साधेपणाला - सोपेपणाला धक्का लागु देउ नये असे सांगितले. नोरानेही सहकारी व्हिक्टर बुलेन(Victor Bullen) यांच्या सहाय्याने वेळोवेळी येणार्‍या अमिषाला बळी न पडता बाखची अपेक्षा पूर्ण केली.

बा़खच हे काम दैवी वाटाव; संतत्व बहाल कराव अस होत. पण बाखला स्वतःलाच अशी व्यक्तिपुजा मान्य नव्हती.तो स्वतःला निसर्गाचा एक अंशच मानत होता. निसर्गाकडुन म्हणजे त्याच्या देवाकडुन त्याचा साधन म्हणुन वापर केला गेला अशीच त्याची भूमिका होती. आपल्यानंतर आपले स्तोम माजवू नये असे त्यानी निक्षून सांगितले. या त्याच्या अपेक्षेचा मान सहकार्‍यानीही राखला. आजही बाख सेंटर त्यानी घालुन दिलेल्या मार्गावर चालू आहे.

बाखचे विचार आणि त्यानी शोधलेली नविन उपचार पद्धती आज जगभर प्रचलित आहे. 'Medicine of the future' ही त्याची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे.

संदर्भः

१)Heal Thyself- Edward Bach

2)The Bach Flower Remedies Step by Step - Judy Ramsell Howard

3)Question & Answer - John Ramsell

४)पुष्पज औषधी - आसावरी केळकर, डॉ.सचिन देशमुख

टीपः
मंगळवार २ ऑक्टोबर २०१२ पासुन ३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत फ्लॉवर रेमेडी वर्ग सुरु करत आहे.
वेळ : दुपारी ४ ते ५.३०
स्थळ : सॅलेसबरी पार्क, पुणे.

मंगळवार आणि शनिवार असे हे वर्ग असतील.
नाममात्र शुल्क आकारण्यात येइल. बाखचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा हेतू आहे.
इच्छूक असणार्‍यानी संपर्कातून ईमेल धाडावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामी, बरोबर आहे तुमचे.
मी फार दिवसांपासून स्वतःला आवरतोय या फुलधाग्यांच्या वाटे जाण्यापासून. न राहवून वर एक प्रतिसाद टाकलाच आहे याच लेखातले वाक्य बोल्ड करून..

जाऊ द्या. त्यांचे दुकान चालतेय, अन लोकांना आवडते आहे. मी कोण लोकांना सांगणारा की autoparrotism करुन घेऊ नका.

(auto - स्वतः, parrot - पोपट. auto-parrot-ism = स्वतःचा पोपट करून घेणे)

या लेखाचा उद्देश त्यांच्या भावी वर्गांची प्रसिद्धि असा काही लोकांचा समज झालेला दिसतो. परंतु ते तसे नाही हे मी आवर्जून सांगू इच्छिते. एकतर तशी त्यांना आर्थिकदृष्ट्या अजिबातच गरज नाही. केवळ या उपचार पद्धतीचा त्यांना आलेला, त्यांच्या ओळखींच्यांना आलेला अनुभव सर्वांशी शेअर करावा. तसेच आनंदवनामध्ये त्यांना या पद्धतीवर व्याख्याने देण्यासाठी बोलावले गेले असताना तेथे आलेल्या इतर अनेकांनी अशा स्वरुपाचे मार्गदर्शन पुण्यात मिळावे असा विचार मांडला. त्या नुसार हे वर्ग घेतले जाणार आहेत.
मला असे वाटले की मायबोली वरच्याही काही लोकांना अशा वर्गात यायला आवडेल ( माझ्या या विषयावरच्या लेखनातील प्रतिसादात, विपुत आणि भेटीत असे आले होते ) आणि केवळ म्हणूनच मी शोभनाताईंना विनंती केली, की होणा-या या वर्गांची माहितीही या लेखातही द्यावी. केवळ माझ्या विनंतीचा मान म्हणून शोभनाताईंनी या वर्गांची माहिती यात घातली. त्यांचे दुकान चालवण्याचा स्वभाव अजिबातच नाही. उलट त्यांना जे जे ओळखतात त्यांना हे वाचून धक्काच बसेल. आपण कृपया त्यांना एकदा भेटा अन मग त्यांच्याबद्दल आपले हेच मत राहिले का हे जरूर इथे येऊन द्या.

राहता राहिला या उपचार पद्धतीबद्दलचा, त्याच्या उपयोगाबद्दलचा मुद्दा.
मला वाटते आज उपचारांसाठी अगदी प्रथम वापरली जाते ती अ‍ॅलोपॅथी. कारण ती शास्त्र मान्य आहे. अन त्याला दुसरा पर्याय नाहीच.
हे जरी मान्य केले तरी त्याजोडीने किंवा त्यानंतर समांतर अशा अनेक पॅथी उपचारांसाठी वापरल्या जातात. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, अ‍ॅक्युप्रेशर, रेकी, वॉटर थेरपी, मातीचे उपचार, सूज्योक, आणि कितीतरी. या सर्व एका अर्थाने "शास्त्रीय" असतील - नसतील. परंतु एक नक्की प्रत्येकाची आपली एक तर्कावर आधारीत अशी कारणमिमांसा आहे. भले ही कारणमिमांसा "सायन्स" मध्ये बसणारी नसेल परंतु त्यांच्या त्यांच्या "शास्त्रा"त बसणारी विचारपद्धती त्यात आहे. ही सर्व "शास्त्र" ज्याने त्याने आपल्या विचारांनी, मतांनी, अनुभवाने वा अगदी "अंध्"विश्वासाने स्विकारावीत वा नाकारावीत. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशाच "शास्त्रा"तले एक "शास्त्र" फ्लॉवर रेमिडी.

अर्थातच हे माझे मत. प्रत्येकाचे यावर वेगळे मत असू शकतेच. फक्त एकमेकांच्या मतांचा निदान मान राखणे आपल्याला जमावे इतकेच. अन वैयक्तिक टिपण्णी टाळावी ही नम्र विनंती !

अवल ताई,

टिप्पणी वैयक्तीक नाही. अन आहेही.

सर्वप्रथम, 'दुकान' हा शब्द. माझ्या हॉस्पिटललाही मी दुकानच म्हणतो. तिथे शासनाने 'शॉप अ‍ॅक्ट लायसन्स' मला अनिवार्य करून दुकानाचे सर्व कायदेही लागू केलेले आहेत. म्हणुन हेही, दुकान. त्यातून अर्थाजन इ. झालेच पाहिजे असे नाही. 'दवाखाना' चालवायला सुरुवात केली, की 'दुकान टाकलं' असे आम्ही आजकाल म्हणतो.

कोणत्याही 'वैद्यकीय' उपचारांसाठी उपचार करणारा 'नोंदणीकृत' वैद्यक व्यवसायी असणे गरजेचे आहे. (इथे त्यांचे वैद्यकीय 'उपचार' करणे, सुचविणे इतकेच नव्हे, शिकविणेही सुरू आहे असे दिसते.) -हे झाले वैयक्तिक.

अन्यथा या देशात अन जगात सर्वत्रही, 'अँटी क्वॅकरी' बिल आहेच. काही इतर नियम, कायदेही आहेत.

पाककृती म्हणून किंवा इतर छंद म्हणून असे लेख आले असते, तर मला त्याच्या विषयी काहीही अडचण नव्हती. परंतू 'मानसोपचार' करण्यासाठी म्हणून जाहिरात केली जात असलेल्या या प्रकाराबद्दल मला तीव्र आक्षेप आहे. आपल्या देशात मानसिक आजारांसाठी लोक योग्य ट्रीटमेंट न घेता बुवा भगत करतच असतात, त्यात या एका सुशिक्षित बुवाबाजीची भर पडली आहे असे म्हणतो.

सार्वजनीक ठिकाणी या विषयावर हा दुसरा धागा आला आहे. पहिल्यावर काहीही बोललो नव्हतो.
यावर बोलणे गरजेचे होते तरीही बरेच दिवस गप्प बसलो होतो.

यात वैयक्तीक टीका टिप्पणी आली असे वाटत असल्यास नाईलाज आहे.

(ता.क., अवांतर: आमच्या वै. मातोश्री 'बारा क्षार' नामक प्रकरण फार गंभीरतेने घेत, व त्यांचेही हे जसे पुष्पौषधींबद्दल सुरू आहे तसे त्या १२ क्षारांबद्दल सुरू असे. भरपूर समजावून सांगूनही मी डॉक्टर असलो तरी त्यांच्या दृष्टीने लहानच, शेवटी त्यांचा विश्वास असलेल्या एका सिनियर डॉ. आजींकडून समजाविले तेव्हापासून ते १२क्षाराचे पुस्तक अन गोळ्यांच्या बाटल्या बासनात गेल्या. आता त्यांची एक आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत.)
वै=वैद्य नव्हे. वैकुंठवासी.

अमा प्लसेबु एफेक्टपेक्षा जास्त इफेक्ट नाही अस कोणिदिले आहे ते समजले नाही.पण अचिन्ग्च्याप्रतिक्रियेमुळे तुमचा दोघाम्चा मुद्दा लक्षात आला.
मि विज्ञानाचे बोट घट्ट धरुन चालणार्‍यातली. शिक्षक म्हणुन विद्यार्थ्यात विज्ञाननिष्ठा पेरण्यासाठी धडपडणारी.१०/१२ वर्षापुर्वी प्लॉवेर रेमेडी माझ्यापर्यंत आली तेंव्हा मी ढंकुन ही पाहिल नव्हत.(आज त्याची खंत वाटते.)पण कधिकधी होत काय विज्ञान मधेच बोट सोडुन देत.पाय लटपटतात,आधाराची जास्त गरज असते नेम़क तेंव्हाच विज्ञानानि बोट सोडलेल असत.अशावेळी या मानसिकतेचा फायदा घेउन आधारासाठी अनेक हात पुढे येतात.त्यातले काहि तुमचा पोपट करणारे तुम्हाला लुबाडणारे असतात. काही,आमच्याकडे उत्तर आहे पण त्यासाठि पुर्विच बोट पुन:धरायच नाही सांगणारे,काही समस्या सोडौ शकले नाही तरी मानसिक आधार देणारे काही मात्र विज्ञानाच बोट धरुन चालताना त्याच्या मर्यादा लक्षात आलेले.आणि त्यावर उपाय शोधणारे बाखसारखे. स्वत:च चालत दुकान दुसर्‍याना देउन टाकणारे आणि संशोधनाचा आपला मार्ग शोधणारे

Effectiveness

In a 2002 database review of randomized trials Edzard Ernst concluded:
The hypothesis that flower remedies are associated with effects beyond a placebo response is not supported by data from rigorous clinical trials.[4]
All randomized double-blind studies, whether finding for or against the remedies, have suffered from small cohort sizes but the studies using the best methodology were the ones that found no effect over placebo.[13][14] The most likely means of action for flower remedies is as placebos, enhanced by introspection on the patient's emotional state, or simply being listened to by the practitioner. The act of selecting and taking a remedy may act as a calming ritual.[4]
A systematic review in 2009 concluded:
Most of the available evidence regarding the efficacy and safety of BFRs has a high risk of bias. We conclude that, based on the reported adverse events in these six trials, BFRs are probably safe. Few controlled prospective trials of BFRs for psychological problems and pain exist. Our analysis of the four controlled trials of BFRs for examination anxiety and ADHD indicates that there is no evidence of benefit compared with a placebo intervention.[3]
A newer systematic review published in 2010 by Ernst concluded
All placebo-controlled trials failed to demonstrate efficacy. It is concluded that the most reliable clinical trials do not show any differences between flower remedies and placebos.

http://en.wikipedia.org/wiki/Bach_flower_remedies ही लिन्क आहे.

http://www.sciencebasedmedicine.org/index.php/bach-flower-remedies. हे ही वाचावे कृपया.

५० :५० ब्रँडी व पाण्याच्या सोल्युशन मध्ये फुलांचे अर्क घातलेले आहेत.

पुढे चालू...
आधाराची अपेक्षा असणार्र्यासाठी मला तर बाख पटला.आधारासाठी इतर फसव्या मार्गाकडे वळण्यापेक्षा स्वतःच स्वतःला बरे करा सांगत बिन्धोक अशी सोपि पद्धत देणारा बाख स्विकारणे मला गैर वाटत नाही. त्याचि स्वता:ची प्रयोगशाळा होती तो जिवजंतुशास्त्रज्ञ होता. त्याचे तत्वज्ञान मला पटले मुख्यतः प्रत्यक्षात उपयोगी ठरले.
पार्किन्सन्स्ला स्विकारण त्यामुळे आलेल्या नैराश्याला हाकलण्यासाठी त्याचि मदत झाली. अर्थात न्युरॉलॉजिस्टच्या औषधाबरोबर पुरक म्हणुन. पण काहीवेळा नैराश्य हे हयपोथॉयराइडमुळे असत ते लक्षातहि येत.अशा वेळि फ्लॉवेर रेमेडीवर विसंबुन न बसता रक्त तपासुन थॉइरॉइड नाहिना हे पाहायला सांगाव लागत.फॅमिली डॉक्टरना तातडिने दाखवण्यासाठीहि सल्ला दिला जातो. पार्किन्सन्स बाबतहि असे अनुभव आलेत नैराश्य पार्किन्सन्सच लक्षण असत. सल्ल्यासाठी येणार्‍याना आम्हि आधी नुरॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला देतो.सल्ला विचारणार्‍या प्रत्येकास प्रथम हि औषधे शारिरिक आजारावर नाहीत हे स्पष्ट केल जात.तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सतत संपर्कात राहा हेच सांगितल जात. इथ सल्ला हा शब्द.वापरला तरी मुळात मा़झ्यासारखेच फ्लॉवर रेमेडिची औषधे देणारे बरेच हा जण पाटी लाउन वैद्यकीय व्यवसाय म्हणुन करत नाहीत मानसिक आधार देण हिच बहुतेकांची भुमिका असते.माझीतरी आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करताना आणि इत्रत्रहि व्रुद्ध, विविध आजारानी ग्रस्त,ग्रुहिणीयासर्वाना अशी गरज आहे.हे लक्षात आले स्वतःप्रमाणे इतरानाही फायदा व्हावा हिच भुमिका
व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित वाटल्याने लेख इथ टाकला .पार्किन्सन्स मित्रमंडळात.आम्ही डान्स,मुझीक,यांचा हि थेरपी म्हणुअन उपयोग करतो.डान्स सुरु केल्यावर महिन्याभरातच शर्टाचि बटणे घालता येणे, बरेच साइड इफेक्ट असणारी एखादी गोळि(न्युरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने) कमि होणे हि आमच्यासाठी अ‍ॅचिव्हमेंट असते.मग हि थेरपी क्लिनिकलि सिद्ध झाली आहे का हे आम्ही पहात बसण गरजेच वाटत नाही.हे अनुभव हि मी इथच टाकणार आहे.कारण मला ते आरोग्याशि संबंधित वाटतात.
मायबोली अ‍ॅडमिन, आपणास हे लिखाण या गृपमध्ये अयोग्य वाटते काय ? तसे असेल तर कृपया हे सर्व धागे कुठे हलवायचे व कसे ते सांगाल का ?

The book explains how to prepare flower essences by exposure to sunlight or by boiling, and lists the remedies and their indications under 7 headings:

For fear
For uncertainty
For insufficient interest in present circumstances
For loneliness
For those over-sensitive to influences and ideas
For despondency or despair
For over-care for welfare of others.

सायन्स बेस्स्ड मेडिसिन साइट वर हे दिले आहे. हे वरी ल भावनां चे प्रकार मेनोपॉज मधून जाणार्‍या महिलांच्यात प्रामुख्याने दिसून येतात. वरील भावनांना टॅकल कर्णायाचा मला अनुभव आहे.

पण ३ व ५ चा नाही.

फ्लॉवर रेमेडीचा उपयोग होत असावा .अमेरिकेतले डॉ .डॅनियल एमन हे एक प्रसिद्ध ब्रेन ट्रीटमेंट एक्सर्ट आहेत. त्यांच्या क्लीनीक्समधे आज पर्यंत वीसहजारांपेक्षा जास्त ब्रेन स्कॅन्स त्यांनी केलेले आहेत. त्यांच्याकडे एक केस आली होती ,एक सुखी जोडपे होते , त्यांच्यात अचानक वाद उत्पन्न व्हायला लागले. पतीने जुना जॉब सोडून फर्निचर फॅक्टरीत जॉब पकडल्यानंतर अचानक त्याचे आपल्या पत्नीशी वाद व्हायला लागले होते.तो विचित्रपणे वागायला लागला .डॉ. एमनच्या क्लिनिकमधे आणल्यावर त्याचा ब्रेनस्कॅन केला गेला, त्याच्या ब्रेनस्कॅन वरुन तो अल्कोहोल घेत असावा असे निरक्षण एमननी काढले ,परंतु त्याच्या व त्याच्या बायकोच्या सांगण्यानुसार तो अल्कोहोल घेत नव्हता व पुर्णपणे निर्व्यसनी होता. मग डॉ.एमनने त्याला जॉबचे स्वरुप विचारले तेव्हा तो फर्निचरसाठी वापरल्या जाणार्या organic solvents च्या सानिध्यात दिवसभर काम करायचा असे आढळले. prolonged organic solvent inhalation मुळे त्याच्या मेंदूवर विपरीत परीणाम झाला होता.
यातून एक कन्क्लूजन निघते ते असे की, आपल्या सभोतालचे smell ,fragrence, chemical vapoures,toxic gases यांचा आपल्या मेंदूवर परीणाम होत असावा. तो बरा कि वाइट हा अभ्यासाचा विषय आहे.

डॉ.एमन त्या केसविषयी माहिती देताना

धन्यवाद शोभनाताई.
विरोध करणार्‍या पोस्टवाल्यांनाही धन्यवाद..

प्रयोग म्हणून स्वतःवर करुन पहायला काहीच हरकत नाही. Happy

अरुंधती, मी वाचलेलं की साईडईफेक्ट्स असतात. उदा. जर अस्वस्थता घालवण्याची औषधं अती झाली तर औदासिन्य येऊ शकतं वगैरे..

फारशी माहिती नाहिये फ्लॉवर रेमिडी बद्दल.. मध्यंतरी एका नातेवाईकांना कुणीतरी सजेस्ट केली तेव्हा थोडसं वाचलेलं ते सोडलं तर..

नानबा, रेफरन्स देऊ शकशील का? मी आतापर्यंत वाचलेल्या मटेरियलमध्ये असा उल्लेख आढळला नाही.

अल्टर्नेटिव मेडिसीनबद्दल हीच रड आहे की त्याचे रिझल्ट्स तर दिसतात, पण आता ते प्लॅसिबो इफेक्टमुळे की त्या त्या उपचारपद्धतीच्या प्रभावामुळे याबद्दल भरपूर वाद-प्रवाद आहेत. नामवंत अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर्सही त्यांच्यापाशी जर त्या रोगाचा इलाज नसेल तर अल्टर्नेटिव्ह मेडिसीनकडे वळताना पाहिले आहेत किंवा रुग्णाला तशी उपचार पद्धती सुचवताना पाहिले आहे. मग या डॉक्टरांमध्येच पुरेशी ''जागृती'' किंवा ''विज्ञाननिष्ठता'' नाही की काय?

* जागृती व विज्ञाननिष्ठता हे शब्द त्यांच्या आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असणार्‍या अर्थानुसार.

अवांतर :

नुकत्याच एका अमेरिकन विद्यापीठाच्या संगीताच्या अभ्यासक्रमात संगीताचा उपचार म्हणून कितपत प्रभाव पडतो यावर बरीच चर्चा झाली. त्यात काही पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम करणारे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे असेही लोक होते. रुग्णाच्या बरे होण्यात, त्याला मानसिक उभारी येण्यात संगीताचा वापर किंवा दुर्धर व्याधीने ग्रस्त रुग्णाचे शेवटचे दिवस शांतपणे जावेत यासाठी संगीताचा वापर ते रुग्णाच्या किंवा त्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या संमतीने आवर्जून करतात असे त्यांनी सांगितले. नंतर त्याबद्दल Music and the Mind ही चित्रफीतही पाहिली. मग Music and the Mind - Health Matters ही फीतही पाहिली. जर २५-३० वर्षांपूर्वी संगीत उपचाराला ''शास्त्रीय'' किंवा ''वैज्ञानिक'' आधार आहे असे कोणी म्हटले असते तर त्याकडे अविश्वासाने पाहिले गेले असते.

शोभनाताई, तुमची कळकळ पोचते आहे.
पार्किन्सन्स सारखी व्याधी असतांना अनेकदा अशा पुढे आलेल्या हाताची मदत घ्यावीशी वाटु शकते, त्यानी आधार मिळतो. वैद्यकीय उपचारांबरोबर तो स्विकारणेही योग्यच. पण तुम्ही जे म्हंटले की
> 'सल्ल्यासाठी येणार्‍याना आम्हि आधी नुरॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला देतो.सल्ला विचारणार्‍या प्रत्येकास प्रथम हि औषधे शारिरिक आजारावर नाहीत हे स्पष्ट केल जात.तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सतत संपर्कात राहा हेच सांगितल जात.'
ते किती लोक पाळतात? (सांगण्यात, आणि ऐकण्यात?) चाळीशीच्या अलिकडील लोक जेंव्हा केवळ कोपर्‍यावरील दुकानात उपलब्ध आहेत ही औषधं म्हणुन बाख कडे वळतील तेंव्हा त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

> मग या डॉक्टरांमध्येच पुरेशी ''जागृती'' किंवा ''विज्ञाननिष्ठता'' नाही की काय?
अरुंधती, दुर्दैवानी तसंच म्हणावं लागेल. कितीतरी अभियंते/वैज्ञानीक पण दिवसभर 'विज्ञाननिष्ठतेनी' काम करतात, आणि कार्यकाळ संपला की अनेकदा फर्स्ट प्रिंसिपल्स पण विसरुन वागतात. काही लोकांना तसे करण्यात पैसाही दिसतो.
संगीताबद्दल खालील लिंक वाचा, त्यातील रेफरंन्सेस पहा. संगीताला कितीतरी मिती असतात. जशी औषधांची वेगवेगळी पोटन्सी असते त्या प्रमाणे क्लासीकल ऐकवायचे, की मिश्र की भांगडा ते ठरवायचे का? एखादा स्वर चुकल्यास? की कोणताही आवाज काम करतो?

http://www.skepdic.com/mozart.html

aschig | 26 September, 2012 - 20:40 नवीन

अत्यंत संयतपणे, मी जे म्हणतो आहे, तेच पोहोचविल्याबद्दल धन्यवाद.

> मग या डॉक्टरांमध्येच पुरेशी ''जागृती'' किंवा ''विज्ञाननिष्ठता'' नाही की काय?
अरुंधती, दुर्दैवानी तसंच म्हणावं लागेल.
१००% सहमत.
केवळ 'अ‍ॅलोपथीची डिग्री घेतलेले डॉक्टर अमुक करतात' हा निकष लावला, तर अनिरुद्ध बापूही आहेत, अन मुंढेही आहेत.. Sad कुणी काय पुस्तकी शिक्षण घ्यावे अन काय करावे, याला इये देशी धरबंध नाहीच!

(इब्लिसपणा करणारा) इब्लिस.

अल्टर्नेटिव मेडिसीनबद्दल हीच रड आहे की त्याचे रिझल्ट्स तर दिसतात, पण आता ते प्लॅसिबो इफेक्टमुळे की त्या त्या उपचारपद्धतीच्या प्रभावामुळे याबद्दल भरपूर वाद-प्रवाद आहेत

ही रड जुनीच आहे. अल्टर्नेटिव मेडिसिन वाल्यांनी डबल ब्लाईंड पद्धतीने आपले औषध सिद्ध करून दाखवावे. कुणी रोखले आहे त्यांना ?. होमीओपॅथी वाल्यांना जवळ जवळ दोनशे वर्षे होत आली. दोनशे वर्षात एकही प्रयोग नाही ? एका लॅन्सेट नेच संशोधन केले आणी निक्काल लावला.

होमेओपॅथी कॉलेजेस वर तर बंदीच यायला हवी. पण तसे होत नाही कारण संस्था चालक मलिदा चारतात. बिचारे बकरे ( विद्यार्थी) डॉक्टर व्ह्यायच्या आशेने येतात आणी पदवी मिळताच चोरून अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टिस करतात.

माझ्या माहितीतले एक एम डी डोक्टर होमिओपॅथीच्या भजनी लागले. मुलगी आजारी पडली की फेरम फॉस सुरु. मुलीचा जीव जायची वेळ आली तेव्हा अ‍ॅलोपथीला शरण गेले.

होमेओपॅथी कॉलेजेस वर तर बंदीच यायला हवी. पण तसे होत नाही कारण संस्था चालक मलिदा चारतात. बिचारे बकरे ( विद्यार्थी) डॉक्टर व्ह्यायच्या आशेने येतात आणी पदवी मिळताच चोरून अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टिस करतात.
<<<
नुसते संस्थाचालकच नाहीत, तर प्र्याक्टिस करणारे "डाक्टर"ही तेच करतात. (मलिदा. त्याशिवाय असली --> आश्वासने मिळत नाहीत)

परवाच होम्योपथी डाक्टरांना 'कठीण परिस्थितीत मॉडर्न औषधे वापरायला परवानगी देईन' असे आश्वासन महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. होमिओपथी असोशिएशनच्या एका डॉक्टरांनी हे 'लबाडाघरचे आमंत्रण समजा' असे त्याच कार्यक्रमात त्याच स्टेजवर मंत्र्यांसमोर सांगितले, याचे कारण म्हणजे मंत्री महोदयांचे हे वाक्य सुप्रीमकोर्टाच्या निर्णयाविरोधी आहे. (योग्य त्या लिंका मजपाशी आहेत. हव्या तेव्हा डकवू शकतो. सध्या टंकाळा आहे.)

(हलकट मोड ऑन)
साडे पाच वर्षे एम.बी.बी.एस. शिकायचे. त्याआधीची आयुष्याची १८ वर्षे जीवतोड मेहनत करायची- सीईटी मधून अ‍ॅडमिशन साठी. एमबीबीएस पास व्हायचे. (हे सोपे नसते.) मग इन्टर्नशिप. इन्टर्नशिपनंतर पीजी ऐवजी 'रिमोट एरियात' वर्षं दोन वर्षं (त्या दिवशी सरकारची झक फिरेल तशी) नोकरी करायची. मग पुन्हा मरतोड करत पीजी करायची. वयाच्या ३०-३२ व्या वर्षी प्र्याक्टिस. ही आजची परिस्थीती आहे. (मी बराच सुखी आहे त्यामानाने.)

त्यापेक्षा होम्योपथी करा. १२वी+डिएचएमेस (वय १८+२ = २०) अन ऐश करा. हवे ते औशिद हवे त्याला द्या! अहो इलेक्ट्रोपथी नामक भोंदूगिरि अजून सुरू आहे महाराष्ट्रात... (माझा कंपाऊंडरही बर्‍याचदा योग्य औषध देवू शकतो. तरीही आजही २० वर्षांनंतरही मजकडे नोकरीत आहे.. असो बापडा)

ता.क. त्याही पेक्षा बेस्ट आयडिया सुचली Happy
फ्लावर रेमेडी!
आयुष्यभर कारकून म्हणून समजा पीडब्ल्यूडीमधे नोकरी करा.
बाखचं पुस्तक आणा. कोपर्‍यावरचा मेडिकलवाला पकडा. मला पेन्शन आहे, पैशाची गरज नाही असे सांगा. ( हे मस्ट असते. त्याने भयंकर क्रेडिबिलिटी येते.) मग डाक्टरकी करा.
ना शॉप अ‍ॅक्ट का लफडा
ना मेडिकल काऊन्सिल का
ना इन्कम ट्याक्स का
ना कन्झ्युमर कोर्ट का
ऐऽश!

(हलकट मोड इज ऑलवेज ऑन.. नावाचा इब्लिस आहे..)

Pages