नभ!

Submitted by अमेलिया on 26 August, 2012 - 01:26

नभ मेघांचे भांडार
नभ अव्यक्ताच्या पार
नभ जळात ओले बिंब
नभ तुझे नि माझे रंग...

नभ ना भिजले काळोखी
नभ तेही जे ना देखी
नभ दिशांत ना मिटलेले
नभ तुझे नि माझे डोळे…

नभ तेजाचा कल्लोळ
नभ अरुपाचेही भाळ
नभ आविष्कृत निर्गुण
नभ तुझा नि माझा कण…

नभ अथांग ना थकलेले
नभ नेत्री-गात्री मितुले
नभ आरंभी अन अंती
नभ तुझी नि माझी प्रीती!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा... अतिशय छान कविता. खुप आवडली. Happy

नभ जळात ओले बिंब
नभ तुझे नि माझे रंग...

नभ दिशांत ना मिटलेले
नभ तुझे नि माझे डोळे…

नभ तेजाचा कल्लोळ
नभ अरुपाचेही भाळ
नभ आविष्कृत निर्गुण
नभ तुझा नि माझा कण… हे सारे अतिशय छान आहे.

----अभिनंदन. आणि आभाळ्/नभ या माझ्या आवडत्या शब्दावर हे सुंदर काव्य करून दिलेल्या आनंदाबध्दल खुप खुप धन्यवाद.

सुंदरच,अमेलिया,चौथ्या ओळीतल्या समेवर येतानाचे कवितेचे अनपेक्षित वळण नभाला वेगळाच संदर्भ देते.. नभ दोघांचे,सर्वांचे आहे हे पुनः जाणवते.

वा ! खुप सुंदर Happy
>>>नभ तेजाचा कल्लोळ
नभ अरुपाचेही भाळ
नभ आविष्कृत निर्गुण
नभ तुझा नि माझा कण…<<< क्या बात है!

सुधाकर, तुमच्या या छान प्रतिसादाबद्दल मीच आभारी आहे.:)
भारतीताई, अगदी बरोबर. मला असेच म्हणायचेय..
सरती, अवल, शशांक, प्रि... खूप खूप धन्यवाद! Happy