तुझे बरोबरच होते सारे...

Submitted by सुमेधा आदवडे on 2 August, 2012 - 12:28

तुझे बरोबरच होते सारे...
मीच धरला होता हट्ट!
निसटुन गेले मन कधीतरी...
धरले होते जरी घट्ट...

तू म्हणाला होतास, "इतके रंग नको पसरवु.."
माझ्याच पोटी फुलपाखरे होती सतत!
उगाच पाहिले दिवसा तारे...तुझे बरोबरच होते सारे...

काचेचा तुकडा दिला होतास तू मला,
मीच जपलं त्याला उराशी, रत्न म्हणुन
त्याच टोकाने रक्ताळले मन बिचारे...तुझे बरोबरच होते सारे...

तू म्हणाला होतास,"इतका जीव नको लावुस, त्रास होईल!"
मी मारे म्हणाले," त्रास नसला तर ते प्रेम कसले?"
खरंच वेडी होते ना रे? तुझे बरोबरच होते सारे...

तुला आठवणींची अडचण होत होती...
मला मन आवरताना अजुनही त्या हाती लागतात.
जरा ल़क्ष नसलं तर..हातुन निसटतात...पडतात.. फुटतात!
सगळं इतकं तकलादु होतं का रे?

तुझे बरोबरच होते सारे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users