चीन म्हणतो, भारत एक गलिच्छ देश!

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 04:18

भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.

हे सर्व खरे आहे. एखाद्या परक्या देशाने 'माझ्या' देशाबद्दल असे काहीही म्हणणे, दाखवणे कोणालाही राग यावा असेच आहे. माझ्या निसर्गसौंदर्याने भरलेल्या आणि 'अतुलनीय' अशा देशाची फक्त वाईट बाजू दाखवणे हे वाईटच आहे. हा राग, चीड, उद्वेग सारेसारे मान्य केले आणि डोके थोडे शांतपणे ठेवून स्वतःला प्रश्न विचारला की, हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाही. देशातील गलिच्छपणापुढे जर आरसा ठेवला तर त्यात याहून काही वेगळे प्रतिबिंब उमटणार आहे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या साईटची लिंक इथे देत आहे. पण ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर ते फोटो पहावेत.
---------------------------------------------------------------
तर यावर मायबोलीकरांच काय मत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलू, चीनबद्दल समजू शकतो. कदाचित वर्षू-नील सांगू शकतील की आपले स्टीरीओ टाईप्स किती खरे आहेत.

पण अमेरिकाही त्याच दावणीला? ज्यांना काय खायचे आहे ते खाऊदे - पण सार्वजनिक ठिकाणी घाण/कचरा इतक्या प्रमाणावर कोठे दिसला? अजिबात नाही आणि काहीही अपवाद नाही असे नाही पण सर्वसाधारणपणे.

१. कचरा होउ नये/कमी व्हावा याकरिता उपाय (उदा: कॅरीबॅग वर बंदी)
२. लोकांना कचरा टाकायला भरपूर आणि वेगवेगळे पर्याय
३. आणि झालेल्या कचर्‍याचा निचरा करणारी व्यवस्था.
४. लोकांनी बिन्स मधेच कचरा टाकणे

हे सर्व लागेल सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवायला. आपल्याकडे १ ची अंमलबजावणी बरोबर होत नाही, २ क्वचितच दिसते आणि ३ नीट केले जात नाही. ४ चे कारण लोकांना सवय नाही हे आहे पण त्याचे कारण २ चा अभाव ही आहे.

आम्ही गलिच्छ आहोत, हे चीनने का सांगावे?

आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून, हे वरील प्रश्नाचे उत्तर आहे..

स्वच्छतेच्या काही कल्पना वैश्विक असतात तर काही सांस्कृतिक आणि भौगोलिक. दोहोंमधला फरक लक्षात ठेवला पाहिजे. आजकाल "deoderant" न वापरणे म्हणजे अस्वच्छ असणे हि फुकाची फ्याशन भारतीय लोकांत रुजू करण्यात आली आहे. भारतात लोक दिवसातून एकदा आणि शक्य झाल्यास दोनदा आंघोळ करतात, तरी डीयो न वापरणारा घाण असे मेंटल इंजिनियरिंग करण्यात येत आहे. हे फक्त एक उदाहरण आहे, असे अनेक आहेत. असल्या सांस्कृतिक कल्पनांपासून सावध असावे. अर्थात डीयो वापरणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण न वापरणारा अस्वच्छ दाखवणे चूक.

चीन मध्ये मी फिरलो आहे. खुद्द शांघाय मध्ये रस्त्यात थुंकणारे मी बघितले आहेत खंडीभर. अर्थात यात देखील मला आक्षेपार्ह काही वाटत नाही. चीनी, वियतनामी लोक पान भरपूर खातात आणि थुंकतात आपल्यासारखे. थुंकी हि जैविक असते आणि तिची विल्हेवाट गरम प्रदेशात जैविक मार्गाने लगेच लागते. तीच गोष्ट मला हगणदारी वर मलमुत्र विसर्जन करणाऱ्या भारतीय लोकांबद्दल देखील वाटत नाही. लहान गावात हा खूप सस्टेनेबल मार्ग आहे. या मार्गात पाणी फार कमी लागते आणि कालांतराने माती देखील सुपीक होते.

हे प्रॉब्लेम गावांच्या ओसाड पडणे आणि शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे येणाऱ्या बकालीमुळे आलेले आहेत. लोक गावातून शहरात जरी आले असले तरी बहुतेक भारतीय माणसाची मानसिकता 'गावातली" असते. हे माझ्यामते भूषणावह आहे. गावात राहायचे आणि शहरात राहायचे "एटीकेट" वेगळे असतात. वास्तविक माणूस उत्क्रांत झाला तो लहान खेड्यात राहायला. आपला मेंदू मुंग्या अथवा मधमाशी सारखा "कोस्मोपोलिटन" नाही.. मुंगी हि एक आदर्श "शहरात" राहणारा प्राणी आहे. असो.

गंगेचे उदाहरण घेऊ.. गंगेतले आंधळे डॉल्फिन आणि इतर प्राणी नदीत सोडलेले प्रेत वगैरे चटदिशी खाऊन टाकायचे पूर्वीच्याकाळी. पाणी हेल्थी होते, त्यात जीवाणूंची योग्य प्रमाणात वाढ होती. भाराभर धरणे (वाटेल तशी) बांधल्यामुळे नदीचे अंतर्गत स्वास्थ्य बिघडले. आता कितीही पैसा खर्च करा, गंगा, यमुना पूर्वीसारखी होणार नाही, फक्त किनारे स्वच्छ होतील. युरोप मधल्या सर्व नद्या "मेल्या" आहेत. मात्र दिसायला टापटीप आहेत. दिसायला टापटीप नसणे म्हणजे गलिच्छ असणे हे या चीनी माणसाला वाटते यावरून त्याचे किती सांस्कृतिक पतन झाले आहे ते दिसते, बाकी काही नाही.

@ सागर
भल्यामोठ्या शहराचा कचरा कसा नियंत्रणात येईल..? हा विचार करणे स्तुत्य आहेच पण 'मी कचरा कसा कमी करेन' हा विचार अधिकच रास्त आणि व्यवहार्य आहे.
<<<<<<<<

कचरा कसा कमी करता येइल यावर जरा अधिक माहीती दया..... तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रयत्न किंवा प्रयोग केले आहेत या कामी....... तसेच कचरा कितीही कमी करायचा प्रयत्न केला तरी रोजच्या रोज थोडया प्रमाणात का होईना तो जमा होत राहणारच...... गावातील लोक ओल्या कचरयाचा उपयोग बायोगॅससाठी तरी करु शकतात पण शहरातील लोकांनी याचा कसा उपयोग करायचा..... कदाचीत बायोगॅससारखी व्यवस्था आपापल्या सोसायटयांमध्ये करुन त्या इंधनाचा उपयोग सोसायटीच्या सार्वजनिक वीजवापरासाठी होउ शकतो, हे फक्त माझे विचार आहेत, असे प्रत्यक्षपणे करणे शक्य आहे का यावर येथील जाणकार प्रकाश टाकतीलच............

@ फारएण्ड

तुम्ही सांगितलेले कचरा व्यवस्थापनाचे मुद्दे सिंगापुरला देखील लागु होतात फक्त कॅरीबॅगवर असलेली बंदी हा प्रकार इथे नाही..... कारण अजुनतरी इथे सामान विकत घेतल्यावर ते कॅरीबॅगमध्येच भरुन दिले जाते..... पण इथे कुठेही प्लॅस्टीकच्या पिशव्या रस्त्यात पडलेल्या दिसणार नाहीत. जागोजागी कचरापेटी दिलेली आहे........ ट्रेन-बस मध्ये खाण्यास बंदी आहे..... काही खायचे असेल ते बाहेरच खाउन , केलेला कचरा कचरापेटीतच टाकुन मगच आतमध्ये शिरायचे, CCTV कॅमेरे सगळीकडे लावलेले असतात व मध्येच रेकॉरडेड मेसेज येतो की आतमध्ये खाणे बंदी आहे..... कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल..... इथे हल्लीच लेकाच्या शाळेत वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर इंधन म्हणुन कसा करता येइल यावर मुलांची कार्यशाळा घेतली गेली त्यासाठी सर्व पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्या घरी वापरलेले तेल बाटलीतुन मुलांकडे पाठवून देण्यास सांगितले, एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे हे शरीरास अंत्यत घातक असुन त्याचा इंधन म्हणुन वापर करता येतो असा सारांश असणारे मेल पालकांना पाठवले गेले......

'चीन म्हणतो, भारत एक गलिच्छ देश!'
यात चीन म्हणतो हे शब्द कशाला हवेत? चर्चा भारतातल्या गलिच्छपणावर होणे अपेक्षित आहे का असे म्हणण्यामागे चीन चा काय उद्देश आहे , यावर हवी आहे?
बाकी , नुसते गलिच्छ पणाबद्दलच बोलायचे असेल तर चीन कशाला हवाय? सगळेच म्हणतील भारत गलिच्छ देश आहे , त्यात काय नवल.

तीच गोष्ट मला हगणदारी वर मलमुत्र विसर्जन करणाऱ्या भारतीय लोकांबद्दल देखील वाटत नाही. लहान गावात हा खूप सस्टेनेबल मार्ग आहे. या मार्गात पाणी फार कमी लागते आणि कालांतराने माती देखील सुपीक होते.

सार्वजनिक थिकाणी मलमूत्र विसर्जन करण्याने रोगराई वाढते. सेफटी संडासमुळे आरोग्य सुरक्षित रहाते.

सोनखत शेतीला चांगले असते, याचा अर्थ उघड्यावर संडासला बसा, असा होत नाही. सोनखत करण्याचीही शास्त्रीय पद्धत असते.

या मार्गात पाणी कमी लागते...... Proud गावात साथ आली तर गावाला सलाइन लावावे लागते. हे पाणी हिशोबात धरले आहे का?

दिसायला टापटीप नसणे म्हणजे गलिच्छ असणे हे या चीनी माणसाला वाटते यावरून त्याचे किती सांस्कृतिक पतन झाले आहे ते दिसते, बाकी काही नाही.

यात टापटीप नाहीच.. जे दिसते तेच इतके गलिच्छ आहे. आणि ते गलिच्छच आहे. ते गलिच्छ आहेच.

@अंबरीश फडणवीस-

तुमच्या मधाळ चिंतनावगुंठीत प्रतिसादातले काही मुद्दे किती तकलादू आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का?
नसल्यास हे पहा-

आम्ही गलिच्छ आहोत, हे चीनने का सांगावे?

हे सर्व "चीन सांगतोय" असे अनेकांना का वाटतेय ते कळत नाही. 'भारतीय गलिच्छ आहेत' असे काही निर्देश चीनी सरकारने दिले आहेत का? ते संकेतस्थळ सरकारी आहे का? एका चीनी पर्यटकाने फक्त आपला भारतातला अनुभव शेअर केला आहे. यात भारत वि. चीन असा सामना रंगवण्याचे कारण नाही. तो पर्यटक ऑस्ट्रेलिअन किंवा इथिओपीअनही असू शकला असता. किंवा हाच चीनी प्रवासी भारतात मलबार हिल अथवा लवासा सिटी पाहून वेगळा लेख पाडू शकला असता. असो.

"deoderant" बद्दल मी तुमच्याशी सहमत आहे. याचप्रमाणे त्या चीन्याच्या लेखात आलेला शौचानंतर कागद विरुद्ध हात हा मुद्दाही चुकीचाच आहे. हे सांस्कृतिक भेद आहेत, हे मान्यच आहे.

थुंकी हि जैविक असते आणि तिची विल्हेवाट गरम प्रदेशात जैविक मार्गाने लगेच लागते.
म्हणजे हो काय? रस्त्यावर थुंकणे हा 'जैविक मार्ग' कसा? या मार्गाने थुंकीची विल्हेवाट लागत असेल तर आमच्या प्रत्येक सरकारी इमारतीतल्या प्रत्येक कोपर्‍यात आणि प्रत्येक एसटी बसच्या खिडकीखाली विराजमान झालेले ओघळ अद्याप जैविक मार्गाने गायब का झाले नाहीत?

वास्तविक माणूस उत्क्रांत झाला तो लहान खेड्यात राहायला. आपला मेंदू मुंग्या अथवा मधमाशी सारखा "कोस्मोपोलिटन" नाही.. मुंगी हि एक आदर्श "शहरात" राहणारा प्राणी आहे. असो.

हे एक प्रचंड सैल विधान आहे.
खेड्यापर्यंत आल्यावर मानवप्राण्याची उत्क्रांती थांबून गेली असे म्हणायचे आहे का? माणूस आजही उत्क्रांत होतोच आहे. आज जगाची निम्मी लोकसंख्या शहरात राहते. आणखी काही शतकांनी आपण परग्रहावर राहण्याइतकेसुद्धा उत्क्रांत झालेले असू !

दिसायला टापटीप नसणे म्हणजे गलिच्छ असणे हे या चीनी माणसाला वाटते यावरून त्याचे किती सांस्कृतिक पतन झाले आहे ते दिसते, बाकी काही नाही.

अत्यंत शरमेने मी कबूल करतो की वस्तुतः माझेही त्याच्याइतकेच 'सांस्कृतिक पतन' झाले आहे. तरी नद्यांत कुजलेल्या प्रेतांपासून रस्त्यात पडलेल्या विष्ठेपर्यंत सर्व काही 'जैविक' समदृष्टीने पाहण्याइतके सांस्कृतिक पुनरुत्थान होईल, अशी लस मला कुठे मिळेल, याची कृपा करून माहिती द्यावी.

आम्ही गलिच्छ आहोत, हे चीनने का सांगावे?

अफगाण आतंकवादी आहे, यावर भारतातला फडणीस धागा काढू शकतो.

भारत गलिच्छ आहे, यावर चिन्याने धागा का नाही काढायचा?

Proud

फडणवीस महोदय,
चुकीची माहिती देऊ नका.

हेपॅटायटिस, वायरसेस, जंतांची अंडी असे अनेक जंतू साध्या उन्हाने मरत नाहीत. ते तसेच दीर्घकाळ मातीत जिवंत राहतात... नुसता उन्हाने गू सुकला आणि नष्ट झाला, याचा अर्थ त्याचा धोका संपला असे होत नाही.

थुंकी हि जैविक असते आणि तिची विल्हेवाट गरम प्रदेशात जैविक मार्गाने लगेच लागते. >>> तुफान विनोदी वाक्य, लगे रहो Biggrin

गामापैलवान,

कुंभमेळ्याच्या प्रसंगी सुमारे ८ कोटी लोक १००+ दिवस स्नान करूनही कुठे गडबड, गोंधळ, अस्वच्छता नसते. त्यामुळे अतिदाटीचे नियोजन आपल्याला अवघड नाही. मात्र जे लोक असे समारोह हाताळू शकतात केवळ तेच सत्तेवर आले पाहिजेत.

-गा.पै.
>>>>>>>>>>> अहो, तुम्ही स्वतः कधी कुंभमेळ्यात गेला आहात का? २००३ साली नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन कितीतरी भाविक मेले, जखमी झाले. कुंभमेळा सुरु असताना आणि नंतरही शहराची अवस्था भयंकर असते. साथीच्या रोगांचे प्रमाण तर विचारुच नका! नाशकात रहाणार्‍या सामान्य जनतेला अगदी नको-नको होतं!

ज्ञानेश +१००
बाकी गेल्या कित्येक दिवसांनतर "चालू घडामोडी" या सदरात, १००+ प्रतिसाद होऊनही कोणताही वाद न होता चाललेली चर्चा पाहून बरे वाटले.

काही गोष्टी ह्या सर्वत्र वाईट मानल्या जातात. संस्कृती, भाषा, देश असे भेदभाव त्याबाबतीत संभवत नाहीत. मानवी मलमूत्राचे दर्शन, वास ह्या सर्वत्र वाईट, किळसवाण्या मानल्या जातात. हे नैसर्गिक आहे, निसर्गात ह्या गोष्टींचा आपोआप निचरा होतो असे म्हणणे हास्यास्पद आणि केविलवाणे समर्थन वाटते. थुंकणे हे ही तसेच. नाहीतर मी थुंकतो असल्या गोष्टीवर असले वाक्प्रचार एखाद्या गोष्टीला तुच्छ दाखवण्याकरता बनले असते का?
आधुनिक वैद्यकानेही ह्या घाणीतून रोगजंतू पसरतात असे दाखवले आहे, सिद्ध केले आहे.
मानवी प्रेताचेही असेच आहे. जवळपास सर्व संस्कृतीत प्रेताची विल्हेवाट लावून ते दृष्टीआड होईल असे बघितले जाते. मग ते पुरुन असो वा जाळून. काही अडाणी, असंस्कृत, मूर्ख लोकांच्या भाकड अंधश्रद्धेमुळे त्यांना मानवी प्रेते गंगेसारख्या जीवनदायी नदीत फेकून त्या पाण्याचे वाटोळे करावे असे वाटत असेल तर जे काही शक्य आहे ते करुन ते थांबवलेच पाहिजे.
माणूस हा खेड्यातच शोभून दिसतो शहरात नाही वगैरे मूर्ख मुक्ताफळे दुर्लक्षणीय आहेत. त्याला काहीही आधार नाही. जाणूनबुजून अट्टाहासाने आपल्या लोकांच्या गलिच्छ वागण्याचे समर्थन करण्याचा एक अश्लाघ्य प्रयत्न एवढेच.
जसे चिन्यांनी जेव्हा तिएनामेन चौकात अत्याचार केले तेव्हा तमाम जगाने ते चव्हाट्यावर आणले तसे आपले गलिच्छ राहणीमान असे चव्हाट्यावर येईल तेव्हाच त्यावर उपाय होईल.

सूर्य उगवू नये म्हणून कोंबड्याला टोपलीत बंद करुन ठेवणे जितके शहाणपणाचे आहे तितकेच चिन्यांविरुद्ध (ह्या बाबतीत) कांगावा करणे शहाणपणाचे आहे.

ज्ञानेशच्या पोस्टला अनुमोदन.
मी फोटो पाहीलेले नाहीत. पण साधारण दहा वर्षांपूर्वीच ईमेल मधून मला या आशयाचे फोटो मिळाले होते. तेच हे असणार यात शंका नाही. गेली काही वर्षे ते ईमेल फॉरवर्डमधून फिरतच आहेत. चिनी संस्थळावर आले म्हणून चर्चा झाली इतकंच

हे एक प्रचंड सैल विधान आहे.
खेड्यापर्यंत आल्यावर मानवप्राण्याची उत्क्रांती थांबून गेली असे म्हणायचे आहे का? माणूस आजही उत्क्रांत होतोच आहे. आज जगाची निम्मी लोकसंख्या शहरात राहते. आणखी काही शतकांनी आपण परग्रहावर राहण्याइतकेसुद्धा उत्क्रांत झालेले असू !

ज्ञानेशजी,

तुमचे बहुतेक मुद्दे पटले. माझ्या बऱ्याच चुका वरील पोस्टात आहे. पण वरील वाक्य जे तुम्ही "सर्वात तकलादू" म्हणालात ते मात्र नाही. कसे ते सांगतो. वास्तविक माझ्या संपूर्ण आर्ग्युमेंटचा हां "प्रिमाईस" आहे..

उत्क्रांती थांबली नाही. पण मनुष्याचे इवोल्युशन बघता गेली १,२०,००० वर्षे माणूस हा बहुतांश "खेड्यात" राहिला आहे. खेडे म्हणजे काय तर २००-५००, जास्तीतजास्त १००० इतक्या लोकसंख्येच्या ग्रुप मध्ये बहुतेक मनुष्यजात राहिली आहे. गेल्या १५० वर्षात औद्योगिक क्रांती नंतर लोक गावे सोडून शहरात राहू लागली. भारतात हि क्रांती उणेपुरे १०० वर्षे नंतर "सुरु" झाली. त्यामुळे एकूणच पाश्चात्य जगताशी जवळपास १०० वर्षांचा "फेज डिफरन्स" भारताचा आहे. हा कमी होतोय, हे खरे आहे, तरी डिफरन्स आहेच.

२००-५०० लोकांच्या वस्तीत ते बरेच प्रॉब्लेम नसतात जे शहरीकरणामुळे होतात. ५०० लोकांच्या वस्ती साठी मोठमोठी धरणे बांधावी लागत नाहीत, लहान बंधातून त्यांचे पाणी सुटते. त्यामुळे नदीचा प्रवाह कुंठीत होत नाही, नदीतली "बायोडायवर्सिटी" अबाधित राहते. नदीतले जलचर प्राणी, मासे आणि जीवाणू यांची स्वताची एक जैविक सायकल असते जी नदीच्या अविरोध प्रवाहाशी निगडीत असते.

या बदल्यात एका शहरात पाणीपुरवठा करायला एक मोठे धरण लागते ज्यामुळे नदीची कंटिन्यूटी पूर्ण तुटते. जसेजसे राहणीमान अधिकाधिक आलिशान होते, तसतसे पाण्याची गरज वाढते. सेफ्टी संडास हा वास्तविक शहरीकरणामुळे लागलेला शोध आहे. हळूहळू वेस्टर्न कमोड अधिकाधिक प्रचलित होत आहेत तसतसे त्यास लागणारे पाणी देखील वाढू लागले आहे. तीच गोष्ट शॉवर ची. आतून या बऱ्याच गोष्टी निगडीत आहे. थुंकीचे देखील हेच आहे. ५०० लोकांच्या वस्तीत जर २०० लोक अंदाजे ५० वेळेस रोज थुंकले तरी ती द्रव असेल ते किती? त्या बदल्यात आसपासचा निसर्ग हे "पचवायला" सक्षम नसेल? बिल्डिंग आणि सिमेंट च्या रस्त्यावर दिसणारे ओघळ हे खूप रास्त उदाहरण दिलेत आपण. हे खरे आहे आणि अत्यंत गलिच्छ प्रकार आहे हा. पण तुम्हीच उत्तर दिले आहे. सिमेंट आणि डांबराच्या रस्त्यावर आणि शहरी परिसरात नैसर्गिक जैवविविधता असते का? कोन्क्रीट च्या भिंतीवर किती प्रकारच्या बुरशी उगवू शकतात? कुठलाही आकडा सांगा तो मातीपेक्षा कमीच राहील. अधिक नैसर्गिक पान-तंबाखू आणि प्रोसेस केलेले गुटखा, मावा इत्यादी गोष्टी यात स्वाभाविक फरक आहे. तर त्यांच्या जैवरसायनिक (बायोकेमिकल) विघटनाच्या प्रक्रियेत देखील फरक येणारच.

भारतात अजूनही गावातून शहरात होणारे "प्राथमिक" मायग्रेशन सुरु आहे, नव्हे त्यास सरकार कडून बढावा मिळतोय. प्राथमिक मायग्रेशन म्हणजे अश्या लोकांचे स्थलांतर ज्यांच्या गेल्या ५० पिढ्या गाव सोडून हलल्या नव्हत्या असे लोक. आज भारतातले बहुतांश "शहरी" हे गेल्या १५-२० वर्षात सर्वप्रथम शहरात आले आहेत. हा फरक तत्काळ जाणवतो.

चीन मध्ये हीच गोष्ट आहे. पश्चिमेत हे मायग्रेशन खूप आधी होऊन संपले आहे. आता तिथे बहुतेक जनता काही पिढ्यांपासून शहरात राहते. त्यामुळे तिथले प्रॉब्लेम वेगळे आहेत, ते तूर्तास बाजूला ठेऊ.

गंगेत फेक्ल्याजाणारे प्रेते हे उदाहरण घ्या. आता हे काही आता होत नाही. अगदी जेव्हा पासून गंगा पवित्र झाली आणि विश्वेश्वर तिथे स्थापित झाला तेव्हा पासून लोक तिथे मरायला जातात. प्रेत वाहत्या पाण्यात फेकणे खूप आधीपासून सुरु आहे. पण मग जुन्या कुठल्याच प्रवाश्याने असे का नाही लिहिले? कित्येक चीनी प्रवासी हर्षवर्धन, गुप्त वगैरे काळात, आधी आणि नंतरही इथे येऊन गेले आहेत. त्यांनी असले काहीच का नाही वर्णिले?

कारण नदीची जैवविविधता या जैविक कचऱ्याची विल्हेवाट आतल्याआत लाऊ शकते. त्यात फेकल्या जाणारा कचरा हा संपूर्णपणे "बायोडीग्रेडेबल" असे. मगरी, सुसरी, बुरशी, डॉल्फिन, मासे, इतर पक्षी, गिधाडे, जीवाणू व्यवस्थित वाढायचे पाण्यात आहे हे सगळे संपवून टाकायचे. पुढील गाव लागे पर्यंत पाणी बऱ्यापैकी स्वच्छ झालेले असे. आता असे होत नाही.

प्रदूषणामुळे हि विविधता नष्टप्राय झालेली आहे. गंगेच्या खोऱ्यातील जंगले नष्ट झाली आहेत. अगदी मेलेले लोकांच्या अंगात कित्येक विषारी द्रव्ये (ज्यास आपण औषधे म्हणतो) ती साठलेली असतात. त्यामुळे असले प्रेत खाऊन ते खाणारे मास,, गिधाडे, मगरी आणि जीवाणू देखील मृत्युमुखी पडतात. धरणांमुळे नदीची कंटिन्यूटी नष्ट झाली आहे. साहजिक आहे, पुढील प्रेत खाण्यास लागणारे बुरशी आणि इतर घटक कमी झालेले असतात आणि कालांतराने नष्ट झालेले असतात. मग प्रेत तसेच राहते.

हे सगळे होऊन हि, संस्कार लहान खेड्यातलेच आहेत. कारण हि "सांस्कृतिक" उत्क्रांती इतक्या वेगात झाली आहे कि हिने जैविक उत्क्रांतीला वेळच दिला नाही. शरीराने आणि "मेंदूने" माणूस अजूनही टोळीत राहणारा "हंटर" आहे. पण या सांस्कृतिक उत्क्रांती मुळे आपल्या मूळ निवासस्थानातून लांब एका गजबजलेल्या ठिकाणी राहावे लागते आहे आणि बहुतांश भारतीय हे त्यांच्या "उत्क्रांतीच्या इतिहासात" पहिल्यांदा करत आहेत. उत्क्रांती थांबली नाही पण जैविक उत्क्रांती या सांस्कृतिक उत्क्रांती पेक्षा खूप हळू गतीने होत असते. या दोन गतींमध्ये खूप मोठी तफावत आहे.

निम्म्या लोकसंख्येला शहरात राहावे लागते आहे हे मी फार कमनशिबी समजतो. ती मजबूरी आहे, चोइस नाही.

१५० वर्षात औद्योगिक क्रांती नंतर लोक गावे सोडून शहरात राहू लागली. भारतात हि क्रांती उणेपुरे १०० वर्षे नंतर "सुरु" झाली. >> ह प्रिमाईस चुकिचा आहे... मनुश्यप्राण्याने शेतिस सुरवात केली साधारण ८-१०,००० बीसी... त्यानंतर लगेच अर्बन सेंटर्स निर्माण झाली. अमेरिका ते भारत ह्या सर्व ठिकाणि अशी अर्बन सेंटर्स दिसुन येतात. संडपाणि कचरा ह्यांचे व्यवस्थापन हे ह्या सेंटर मधे केलेले दिसुन येते... उदा. हरप्पा , मोहेंजोदारो...

देवाने माणसाला पुरेशी अक्कल देऊन पृथ्वीवर पाठवले आहे. दहा हजार वर्षापूर्वी माणूस जंगलात रहायचा, उघडा नागडा वावरायचा, शिकार करायचा म्हणून आजही त्याच सवयी ठेवायच्या का?
वीज, रस्ते, वाहने, विजेवर चालणारी उपकरणे, जगातल्या कुठल्याही कोपर्‍याशी संपर्क साधता येईल अशी कम्युनिकेशन यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी जर ह्या लाखो वर्षे जंगला, खेड्यात काढलेल्या माणसाने आपल्याशा केल्या तर आधुनिक काळाला साजेशी स्वच्छता, शिस्त, जाणीव निर्माण करायला नको का?
किती दिवस ही सबब आपल्या गलिच्छपणाचे समर्थन म्हणून वापरणार? बाकी जगात इतका गलिच्छपणा नसतो हे नाकारता येत नाही. ते काही उत्क्रांतीच्या वेगळ्याच मार्गाने विकसित झालेले नाहीत. फार दूर जायला नको. आज डाक्का आणि इस्लामाबाद ही शहरे मुंबईपेक्षा कैक पटीने स्वच्छ आहेत.

ज्ञानेश +१०८

गा पै आपण स्वतः कधी कुंभमेळ्याला गेला अहात का? दूर राहून कुंभमेळ्याचे रोमँटिक चित्र रंगविणे सोपे आहे.

अंबरीष जी आपल्या देशातील एखादी गोष्ट चुकिची आहे असे मान्य करायला काय हरकत आहे ? My country, right or wrong हा हट्ट कशाला?

गंगेत प्रेते फेकणे लोकसंख्या फार कमी होती तेव्हा खपून जात असेल पण ते आज स्केलेबल नाही. रस्त्यावर थुंकणे चुकीचेच आहे, पाच टक्के लोक थुंकले तर ठीक पण वीस टक्के लोक थुंकले तर चूक असे नाही.

मुळात धाग्याचे शीर्षकच चुकिचे आहे "चीन म्हणतो .." च्या ऐवजी "चीनमधले काही नेटिझन्स म्हणतात .." असे हवे.

धागाकर्त्याला चीनबद्दल निषेध अपेक्षित असावा तसं इथे झालेलं नाही.

अंबरीश

तुझी विचारसरणी थोडीफार लक्षात येते. खेडेगावहून लोक शहरात का येतात हे लक्षात घेतलं तर सरकार बढावा देतं वगैरे म्हणण्यात तथ्य नाही हे मान्य करण्यास अडचण येणार नाही. सामाजिक दृष्ट्या विकसित न होणारे मॉडेल जपण्यात खेड्याचं गावपण कारणीभूत असल्याने एकंदरच सामाजिक आणि इतर विकासावर त्याचा परिणाम होतो आहे. याचा फटका बसणारे घटक आपोआप शहराकडे धाव घेत असतात. खाप पंचायत आणि जातीव्यवस्था या खेड्यात जितक्या घट्ट आहेत तितक्या शहरात नाहीत. एकंदरच खेड्यामधे बाहेरच्या बदलाचे वारे सामावून घेण्याची क्षमता आजही अतिशय मंद आहे. गाव करील ते राव करील काय या म्हणी आजच्या नाहीत. आजही खेड्यांमधून भारतिय दंड विधान लागू आहे कि नाही असा प्रश्न पडावा ही स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर केवळ हजारो वर्षे चालत आलेले आहे म्हणून ते बरोबर हे हास्यास्पद आहे.

धरणं शहरासाठी बांधली जातात हा दावा देखील चुकीचा आहे. भारतातल्या कुठल्याही मोठ्या धरणाचे नियोजन हे कृषीविकास समोर ठेवून केलं गेलेलं आहे. पुण्याची तीनही धरणे ( वरसगाव, पानशेत आणि टेमघर ) ही कृषीसाठी आहेत. कृषी, पिण्याचे पाणी आणि उद्योग असा त्याचा प्राधान्यक्रम होता. ज्यावेळी धरणांचे नियोजन झाले त्यावेळची स्थिती हीच होती. त्याच क्रमाने पाणी दिलं जाउनही शहरे वाढल्याने प्राधान्यक्रम बदलण्यात आलेला आहे. केवळ शहरासाठी म्हणून असलेलं खडकवासला हे पहिलं धरण असावं.

विकासाची व्याख्या काय या प्रश्नावर होणा-या चर्चेतले मुद्दे वेगळ्या संदर्भात आहेत. एका जागी एकवटणारा विकास हा मुद्दा असेल तर त्याची इथे गल्लत होतेय तुझ्या पोष्टीत. या बाबतीतही चीनेचे मॉडेल आपल्यापेक्षा प्रगत आहे. खेडेगावांचा विकास केंद्रस्थानी ठेवून तिथे रस्त्यांचे नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं यावरून ते ध्यानात यावं. मानवी विकास निर्देशांकाबद्दल तुला काही म्हणायचे असेल तर यामधेही दुर्दैवाने (भारतापेक्षा) चीनच आघाडीवर आहे. शहरांचा बकालपणा असं काहीसं म्हणायचं असेल तर भारताच्या संदर्भात ते मान्यच आहे. शहरांच्या बकालपणावर वेगळा बाफ उघडायला हरकत नसावी. मात्र जगात इतरत्र भारतापेक्षाही मोठी शहरं आहेत आणि ती बकाल आहेत असं म्हणण्याचं धाडस करता येत नाही... अगदी चीनमधल्या मोठ्या शहरांनाही बकाल म्हणता येत नाही. म्हणजे पुन्हा स्वच्छतेच्या आपल्या सवयी आणि नियोजनशून्यता हाच मुद्दा इथं लागू होतो आहे. सांस्कृतिक उत्क्रांती हा वेगळ्या बाफचा मुद्दा असल्याने त्यातून इथं काहीही हाती लागणार नाही. अनेक मुद्यांची सरमिसळ होऊन धागा भरकटू नये हे सांगण्यासाठीच ही पोष्ट.

प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापन

कच-याचे व्यवस्थापन हा एक क्लिष्ट विषय आहे. उंच आणि दुर्गम भागातील कच-याचे भस्मीकरण ( Incineration) या विषयावर माझं अत्यल्पसं काम आहे ( ते ही फक्त भस्मीकरण संयंत्रापुरते). त्यावेळी या विषयाची व्याप्ती केव्हढी प्रचंड आहे याची थोडीशी कल्पना आली. कच-याचे वर्गीकरण आणि त्याचे डिस्पोजल ( पर्यायी शब्द सुचवा प्लीज) याबाबत आपल्याकडे मानकं (स्टँडर्डस) तयार होत आहेत. जगात सर्वात कडक मानकं कॅलिफोर्निया राज्यात आहेत. आपल्याकडे प्रदूषणाची मानकं आहेत मात्र कचरा व्यवस्थापनाची नाहीत. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने हल्लीच पुढाकार घेऊन जागतिक स्तराच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. भारतियांच्या सवयी पाहता सध्या उद्योगांसाठी ही मानकं निश्चित करण्यात येत आहेत. प्रदूषण हे एण्ड रिझल्टस आहेत. त्यांचं नियंत्रण हे व्यवस्थापनात असल्याने या दोन गोष्टी भिन्न नाहीत. सीपीसीबी बोर्डाने ज्याप्रंमाणे हवा आणि ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर मानकं तयार केली आहेत त्याप्रमाणेच पाणी, नद्या आणि परिसर यांच्या प्रदूषणाबाबतची मानकं तयार करण्याची आवश्यकता आहे. सीपीसीबी ज्या खात्याच्या अंतर्गत येते ते पर्यावरण मंत्रालय याबाबतीत सध्या आस्ते कदम चालत आहे. भारतियांच्या स्वच्छतेच्या सवयी आणि धार्मिक कारणांमुळे त्याबाबतीत गुळमुळीत भूमिका घेण्यात येते. गंगा स्वच्छता अभियानातून मिळालेल्या धड्यातून हे घडतंय. हे असं किती दिवस चालणार ?

>>अहो, तुम्ही स्वतः कधी कुंभमेळ्यात गेला आहात का? २००३ साली नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन कितीतरी भाविक मेले, जखमी झाले. कुंभमेळा सुरु असताना आणि नंतरही शहराची अवस्था भयंकर असते. साथीच्या रोगांचे प्रमाण तर विचारुच नका! नाशकात रहाणार्‍या सामान्य जनतेला अगदी नको-नको होत>><< वत्सला... अनूमोदन..

@अंबरीश-

तुमचा युक्तिवाद पूर्णतः नाकारण्यासारखा नाही. प्रदूषण, बकालीकरण, लोकसंख्येचा घनता जास्त असणे वगैरे पदर अस्वच्छतेच्या समस्येला आहेतच, पण त्यामुळे कशाचेही समर्थन होत नाही.
ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही पाहिले तरी शहरीकरण भारतीयांना नवे नाहीच. हडप्पा आणि मोहेन्जोदारेमधेसुद्धा मलनिस्सारणाची अतिशय प्रगत व्यवस्था होती हे तुम्हाला ज्ञात असेलच. प्राचीन भारतातही मोठी शहरे होती, औद्योगिक केन्द्रे, विद्यापीठे होती. तेव्हा आपण सांस्कृतिकदृष्ट्या 'मागास' किंवा खेडवळ आहोत, हे काही पटत नाही.
नदीत प्रेत फेकणे याला नुसता धार्मिक संदर्भ आहे असे नाही, त्यात एक बेपर्वाई आहे. एक Ignorance, किंवा Lack of responsibility त्यात आहे. नागरीकरणाच्या या टप्प्यावर आपल्याला हे क्षम्य नाही. कोणालाच नाही. एक समाज म्हणून आपण इतके नालायक आहोत का, की आपल्या शवांची आपण व्यवस्थित विल्हेवाटही लावू शकत नाही? Sad

भूतकाळात हे का होत असावे किंवा या परंपरांना सुरूवात का झाली असावी हे ज्ञानार्जनासाठी अभ्यासणे वा तर्क लावणे ठीक आहे, पण आज त्यामुळे कशाचेही समर्थन होत नाही.

थुंकीचे देखील हेच आहे. ५०० लोकांच्या वस्तीत जर २०० लोक अंदाजे ५० वेळेस रोज थुंकले तरी ती द्रव असेल ते किती? त्या बदल्यात आसपासचा निसर्ग हे "पचवायला" सक्षम नसेल?
Proud

एड्स झालेल्या माणसाचा एक मिलि द्रव टोचुन घ्या... एक मिलि म्हणजे फार नाही.

खेड्यातला माणूस शहरात गेला. त्याच्या आधी तो गुहेत रहात होता. ते मॉडेल का नाही आणायचे?

Pages