भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.
हे सर्व खरे आहे. एखाद्या परक्या देशाने 'माझ्या' देशाबद्दल असे काहीही म्हणणे, दाखवणे कोणालाही राग यावा असेच आहे. माझ्या निसर्गसौंदर्याने भरलेल्या आणि 'अतुलनीय' अशा देशाची फक्त वाईट बाजू दाखवणे हे वाईटच आहे. हा राग, चीड, उद्वेग सारेसारे मान्य केले आणि डोके थोडे शांतपणे ठेवून स्वतःला प्रश्न विचारला की, हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाही. देशातील गलिच्छपणापुढे जर आरसा ठेवला तर त्यात याहून काही वेगळे प्रतिबिंब उमटणार आहे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या साईटची लिंक इथे देत आहे. पण ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर ते फोटो पहावेत.
---------------------------------------------------------------
तर यावर मायबोलीकरांच काय मत आहे.
स्वातंत्र्या नंतरचा भारत
स्वातंत्र्या नंतरचा भारत जास्त गलिच्छ झाला आहे ...
हे सत्य आहे, ह्याकडे भारताचे
हे सत्य आहे, ह्याकडे भारताचे फाजील गुणगाण करुन डोळेझाक केली जाते.
हॉरिबल फोटोज आहेत. चीड येऊन
हॉरिबल फोटोज आहेत. चीड येऊन गेली, पण समोर पाण्यात प्रेत दिसत असताना आंघोळ करणारी लोकं व त्यांचा कोडगेपणा पाहून सुन्न व्हायला झालंय. हे आपलं पवित्र क्षेत्र?!
चीनी पण आपल्या मागे नाही आहेत
चीनी पण आपल्या मागे नाही आहेत .
http://www.chinahush.com/2009/10/21/amazing-pictures-pollution-in-china/
सावलींना अनुमोदन! गलिच्छपणा
सावलींना अनुमोदन! गलिच्छपणा आहेच. मात्र तो निपटण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न आवश्यक आहेत.
कुंभमेळ्याच्या प्रसंगी सुमारे ८ कोटी लोक १००+ दिवस स्नान करूनही कुठे गडबड, गोंधळ, अस्वच्छता नसते. त्यामुळे अतिदाटीचे नियोजन आपल्याला अवघड नाही. मात्र जे लोक असे समारोह हाताळू शकतात केवळ तेच सत्तेवर आले पाहिजेत.
-गा.पै.
चीनी पण आपल्या मागे नाही आहेत
चीनी पण आपल्या मागे नाही आहेत .
>>>>>>>>>>
पण हे पाहिल्याने आपण गलिच्छ आहोत हे सत्य बदलत नाही, फारतर आपण पापी तर ते महापापी एव्हढेच म्हणता येईल.
खरोखर आपल्याला स्वशिस्तीची आत्यंतिक गरज आहे.
खरे सांगायचे म्हटले की परदेशात गेल्यावर आपण तेथले नियम अगदी न चुकता पाळतो पण आपल्याच देशात आलो की नियम तोडायला सर्वात पुढे असतो. आणि पुन्हा कोणी बोलले की बाह्या सरसावुन धावून जायला एकदम तयार..
एकदा मी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला उतरतांना धन्यवाद म्हटले तर त्याचा चेहेरा तर खुललाच पण ड्रायव्हरने जो कधी नेटकेपणे बस थांबवत नाही त्याने चक्क बस थांबवून मी नीट उतरलो हे पाहून बस पुढे नेली आणि अजून हात ही केला. मात्र ईतर प्रवांश्यांच्या चेहर्यावर भूत पाहील्यासारख्या भावना आलेल्या सहजच वाचता येत होत्या.
सांगायचा मुद्दा एव्हढाच की आपण जर थोडे नियम पाळले तर अश्या लिंक्स कोणाला (जसे चीन) पोस्टायला आणि आपल्याला पहायला आणि चर्चा करायला मिळणार नाही
धर्माचा (होय हिंदू धर्माचाच)
धर्माचा (होय हिंदू धर्माचाच) जनमानसावरील पगडा हे ह्यातील (वरील) बर्याचशा घाणीमागचे कारण आहे.
गंगेविषयी नको इतकी अंधश्रद्धा बाळगल्यामुळे लोकांना प्रेते त्या नदीत फेकाविशी वाटतात.
देवळातही नको इतके गलिच्छ प्रकार दिसतात. शंकराच्या पिंडीवर दूध ओतायचे. जास्त मानाचे देव असतील तर पंचामृताने अंघोळ घालायची! हे सगळे अन्न मोठ्या मुश्किलीने बनते. वाटीभर दूध निर्माण करायचे तर त्याकरता गाय वा म्हैस विकत घेणे, तिचे पोषण, चारा, दूध काढणे, ते तापवणे हे सगळे सोपस्कार करावे लागतात (भेसळीचे दूध नाही असे गृहीत धरू!). अनेक नामांकित देवळे ह्या खुळापायी गलिच्छतेचे आगार बनली आहेत.
तूप, दही, साखर ह्यांच्याकरता अजून जास्त श्रम. हे सगळे निष्प्राण दगडावर ओतायचे, ते सगळे सांडणार, यथावकाश नासणार, माशा, मुंग्या, उंदीर ह्यांना बोलावणार, दुर्गंधी, चिकचिकाट, गलिच्छपणा निर्माण करणार हे माहित असताना लोक ते करतातच. वाढत्या लोकसंख्येबरोबर अशा अभिषेकाचे प्रमाण वाढत आहे आणि गलिच्छपणा वाढतो आहे.
ह्या अंधश्रद्धा आहेत. त्याचे कुठलेही समर्थन होऊ शकत नाही.
गंगा नदी हा एक महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यात प्रेते, फुले आणि अन्य घाण फेकून त्याचा नाश केल्यामुळे कित्येक लाख लोकांना प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागतो.
दूध, दही, तूप असले मौल्यवान अन्न निर्जीव दगडावर ओतून त्याचा नाश करणेही चूक आहे. लाखो लोक जेव्हा असे करतात त्यातून प्रचंड ऊर्जा, संपत्ती नष्ट होत असते.
ह्या बाबतीत मुस्लिम व ख्रिस्ती लोक नशीबवान म्हणायचे. मुख्य धर्मात मूर्तीपूजाच नसल्यामुळे असले प्रकार कमी. तरी भारतीय परंपरेत राहून दर्गे, पीर, मझार बनत आहेत. पण निदान पंचामृताचे स्नान त्यांच्या नशिबी नसेल अशी आशा आहे.
बाकी मलमूत्रविसर्जनाविषयी भारतीयांचा गलिच्छपणा जगजाहीर आहेच. त्यावर प्रबोधन हाच उपाय.
वाढती लोकसंख्या आणि धर्माचा अतिरेकी पगडा ही दोन कारणे मला महत्त्वाची वाटतात.
चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे. पण त्याने ह्या बाबतीत अगदी मर्मावर बोट ठेवले आहे ह्यात शंकाच नको!
shendenaxatra, तुम्ही म्हणता
shendenaxatra,
तुम्ही म्हणता तसा हिंदू धर्माचा पगडा जबाबदार नसून धर्मपालन न करणारे जन्महिंदू जबाबदार आहेत. गोव्यात मोठ्या मानाच्या अनेक देवतांना रोजच्यारोज अभिषेक होतो. तिथे कधीच घाण दिसत नाही. हा प्रश्न मंदिर व्यवस्थापनात मोडतो. याचा संबंध धार्मिक (पंचामृताभिषेक, निर्माल्य, इत्यादि) रीतींशी जोडण्यात येऊ नये.
गंगेत प्रेते फेकली जातात कारण ती जाळायला पुरेशी लाकडे मिळत नाहीत. तशी ती का मिळत नाहीत? काशीत लोक मरायला येतात ते सरकारला ठाऊक नाही का? मग पुरेशी लाकडे वा विद्युद्दाहिन्या का बसवल्या नाहीत? हाही प्रश्न व्यवस्थापन आणि नियोजनाचा आहे.
देवाची मूर्ती लौकिकार्थाने निर्जीव असली तरी तिच्यावर वाहिलेलं अर्पण फुकट जात नाही. त्यातून भक्ताला अध्यात्मिक लाभ होतो.
कुंभमेळ्यात जर ८ कोटी लोकांना स्नान व दर्शन करविता येतं तर काय अशक्य आहे?
आ.न.,
-गा.पै.
कोण म्हणतय भारत गलिच्छ आहे?
कोण म्हणतय भारत गलिच्छ आहे? चीन? बर, चला थोड्या वेळाकरता मान्य करु या की यात चायनाचा Ulterior motive, vested interest, hidden agenda वैगेरे आहे. बाहेरच्या देशांची गुंतवणूक भारताकडे न जाता आपल्या कडे वळावी म्हणून हा उपद्व्याप असावा. इ.इ. तर्क आपण मांडूया.
पण म्हणतोय काय चायना? भारत गलिच्छ आहे. अरे मग काय खोट बोलतोय? आपला ब्रँडच आहे तो. चायनाला मी गेले असताना मायबोलीकर वर्षू ला लिहल..बेजिंगची स्वच्छता पाहून यांच कौतुक कराव की माझ्या भारताची, माझ्या मुंबईची किव करावी.. कळत नाही. असो.
वाढती लोकसंख्या आणि धर्माचा अतिरेकी पगडा ही दोन कारणे मला महत्त्वाची वाटतात.
धर्माचा आणि अस्वच्छतेचा काय संबध? कैच्या की! लोकसंख्या..मान्य आहे One of the many reasons. खर कारण.. आपण स्वच्छ लोक नाहीच आहोत. अस्वच्छतेचा आपल्या त्रास होत नाही. स्वच्छ राहण्याची आपली मानसिकताच नाही. It is not ingrained in us. It is not a second nature to us.
छान.
छान.
कुंभमेळ्याच्या प्रसंगी सुमारे
कुंभमेळ्याच्या प्रसंगी सुमारे ८ कोटी लोक १००+ दिवस स्नान करूनही कुठे गडबड, गोंधळ, अस्वच्छता नसते.
असा कुंभमेळा कुठे भरतो हो पैलवान?
आठ कोटींचा कुंभमेळा असो की आठ लाखांची पंढरीची वारी, "अस्वच्छता" हे आपल्या असंख्य उत्सवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जेव्हा हे मान्य करू, तेव्हाच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काही हालचाल करावीशी वाटेल.
सरकार बदलले तर प्रश्न सुटतील याला भाबडेपणा म्हणावे की प्रपोगन्डा?
बापरे!!! भयंकर फोटो आहेत..
बापरे!!! भयंकर फोटो आहेत.. सगळे बघु पण शकले नाही...
मला येवढं महिती आहे कि चिनला
मला येवढं महिती आहे कि चिनला हे म्हणण्याचा आधिकार नाही
हे पण तितकेच सत्य आहे आणि
हे पण तितकेच सत्य आहे आणि भारत भारत भ्रमण केल्यावर समजते, आपला देश आणि लोक किती गलिछ राहतात
घाणिची सवय कशी काय होवु शकते आपल्या देशातल्या लोकान्ना????!!!!!
चायना म्हणो नाहीतर टायना
चायना म्हणो नाहीतर टायना म्हणो. आपण गलिच्छ आहोतच.
गोव्यातल्या देवळांचा उल्लेख आला म्हणून....
गोवा आणि थोडेफार कोकण सोडले तर भारतातल्या कुठल्याही प्रसिद्ध देवस्थानाच्या इथे स्वच्छतेचा अभाव किंबहुना गलिच्छपणाचे आगार हा कॉमन फॅक्टर आहे. आजवर बहुतांशी प्रसिद्ध देवस्थानांच्या इथे गेल्यावर पावित्र्य ह्या संकल्पनेची व्यवस्थित खिल्ली उडवलेली दिसते. जास्ती पैसे लवकर प्रवेश, दर्शनाच्या रेटारेटीत पाकीटे मारले जाण्यापासून विकृत लोकांचे घाणेरडे स्पर्श सहन करण्यापर्यंत सगळे, अभिषेकात घातलेला नारळ फिरून अभिषेकाची टोपली विकणार्याकडे, हारांचा नको इतका खच, कुजणारे निर्माल्य, वर्षोनवर्षे पंचामृताचे अभिषेक घातल्याने येणारा कुजलेला तूपकट दर्प (रामेश्वरला हा अनुभव नक्की मिळेल) आणि अश्या ठिकाणी जाऊन आल्यावर आम्ही दर्शन घेतले म्हणून आम्ही पुण्यवान म्हणून इतरांपेक्षा जास्त मार्क आम्हालाच म्हणून आम्हाला बरंच काही माफ या प्रकारचा गर्व आणि निगरगट्टपणा...
आणि हे अगदी हटकून सगळीकडे सर्व देवस्थाने, मठ इत्यादींच्या आसपास दिसतेच.
डोंबल त्या पावित्र्याचे.
लोक काशीत मरायला येतात म्हणून त्यांना जाळण्यासाठी लाकडं सरकारने उपलब्ध करून द्यावीत, जाळण्याची व्यवस्था सरकारने करावी.... पण आम्ही बदलणार नाही. वा मस्त.
विधवा स्त्री हे घरातले पाप हे धर्मच सांगतो. मग फेका तिला काशीला आश्रमात. प्रश्नच मिटला वर तिच्या आयुष्याचे भले केल्याचे फुका समाधान. मग भले त्या आश्रमात तिच्यावर अत्याचार का होईनात, भले तिला मेल्यावर गंगेत फेकून दिले जाईनात... आपण तिला काशीला नेल्याचे पुण्य घेणार बास्स..
प्रेत, निर्माल्य नदीत(नावेने मध्यात नेऊन हां. काठावरून फेकून देणे नव्हे) फेकणे हे कोणे एकेकाळच्या प्रथांमधे होते. हे सुरू झाले तेव्हाची लोकसंख्या, पाण्याची मुबलकता, वस्तीखाली नसलेली मोकळी जमिन, जंगलांचे अस्तित्व, मानवाचे वैज्ञानिक दृष्ट्या बरेच मागे असणे या गोष्टी लक्षात घेता ही कृत्ये/ प्रथा ठिक असतीलही पण आता बदलायला हव्यातच. धर्म सांगतो ह्याचे तुणतुणे किती काळ?
सावली, नीधपला अनुमोदन!
सावली, नीधपला अनुमोदन!
चायना म्हणो नाहीतर टायना
चायना म्हणो नाहीतर टायना म्हणो. आपण गलिच्छ आहोतच.
<< +१
लाजिरवाणी गोष्ट आहे हे खरंच आणि फोटोही ढवळून आणणारेच आहेत..
गंगेतील सडलेली प्रेतं नसली तरी महाराष्ट्रातील आणि भारताती इतर ठीकाणच्या नद्यांची आणि शहरांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था आहे. मुंबईत लोकलच्या कडेने आणि काही रस्त्यांवर यातील काही दृश्यं नेहमी दिसतात.
इथली अल्बीनोची पोस्ट वाचली, चित्रफिती(व्हीडीवो) पाहिले तर चायनावाले स्वतः किती शुध्द आहेत ते तुम्हाला समजेल.
(No subject)
कल्पु+१००.. ज्यांनी प्रत्यक्ष
कल्पु+१००..
ज्यांनी प्रत्यक्ष चीन पाहिला नाही त्यांनी आणी कुणीही चीनबद्दल किंवा कोणत्याही देशाबद्दल काहीही बोलू शकतात..
(रच्याकने चीनमधे माझ्या वास्तव्याला अकरा वर्षं व्हायला आलीत. या अकरा वर्षात अतिशय मोठ्या प्रमाणात आणी वेगाने झालेल्या प्रगतीची,सुधारणेची मी प्रत्यक्षदर्शी आहे.कल्पु सांगितल्याप्रमाणे फक्त बीजिंग नाही तर ऑलमोस्ट प्रत्येक लहान मोठ्या शहरातही स्वच्छता काटेकोरपणे पाळली जाते. चीन विरुद्ध वेस्टर्न मिडिया किती जोरदार प्रचार करते ते अमेरिकेत विटनेस केलंच आहे . वेस्टर्न वर्ल्ड च्या प्रचारावर डोळे बंद करून विश्वास ठेवला कि खर्याखोट्याची शहानिशा कोण करणार..
त्या वरच्या विडिओ फितीत जो काही चीन दाखवला आहे ,तो काही पूर्ण चीन ला रिप्रेझेंट करत नाही.. हे म्हणजे हिंदीत एक म्हण आहे तसं झालं ,' भैंस कहे गाय से,तेरी पूँछ काली'...असो..)
भेळपुरीच्या ठेल्याशेजारी पडलेले द्रोण,कागदाच्या पुड्या, पानाच्या दुकानाबाहेर गुटका,पानमसाल्याची रिकामी पाकिटे ..लोकांनी केलेला कचरा उचलून शेजारच्या कचरा पेटीत टाकायला त्यांनाच सांगितल्यावरून.. माझं अनेकदा अनोळखी लोकांशी भांडण होतं..
आम्हाला बरंच काही माफ या प्रकारचा गर्व आणि निगरगट्टपणा...
नी..अगदी अगदी..कुठेही कचरा करण्यात,फेकण्यात कोणतीही जाती,धर्म,स्टेटस, एजुकेटेड्,अडाणी असले भेदभाव आड येत नाहीत..
या बाबतीत सर्व भारतीय समान पातळीवर असतात.. गरज आहे आपली मानसिकता बदलण्याची..
कुणी आपल्याला अस्वच्छ म्हटलं म्हणून त्याच्यावर चिडण्यापेक्षा स्वतःवर चिडा की!!!
<<कुणी आपल्याला अस्वच्छ
<<कुणी आपल्याला अस्वच्छ म्हटलं म्हणून त्याच्यावर चिडण्यापेक्षा स्वतःवर चिडा की!!! >> हे शक्य नाही. ती मानसिकताच नाही. पुणे रेल्वे स्टेशन वर सकाळच्या वेळेत विशेषतः १ नंबरच्या फलाटावरून जाणे म्हणजे फार मोठी शिक्षा आहे. प्रचंड दुर्गंधी, गलिच्छपणा आणि घाण..
>>>भारतात आलेले चीनी( कामगार
>>>भारतात आलेले चीनी( कामगार चायनीज हॉटेल्समधले ) तेवढी स्वच्छता पाळतात का इकडे?<<<
मला वाटत होते की ती 'आपलीच'; काहीश्या उत्तर्-पूर्व भागातील माणसे असावीत...
समद्यांचे समदे मान्य, फक्त एक
समद्यांचे समदे मान्य, फक्त एक शंखा आहे, आपल्या घरात झालेल्या कचर्याचे फुडे काय होते हे इथे किती लोकांन्ला माहिती आहे? त्या दृष्टीने किती लोकांनी निदान ओला-सुका सेग्रिगेशन तरी केले आहे? कचरा मुळातच कमी व्हावा यासाठी वैयक्तिक पातळीवर, हापिसात, कॉलनीत काही प्रयत्न केले आहेत?
रच्याकने, शब्दखुणात धार्मिक-साहित्य भविष्य धर्म हे लिहीण्याचा खरा उद्देश कधी सफल होणार?
रच्याकने, शब्दखुणात
रच्याकने, शब्दखुणात धार्मिक-साहित्य भविष्य धर्म हे लिहीण्याचा खरा उद्देश कधी सफल होणार? >> ??
(कर्ट्ली अॅम्ब्रोस बाउन्सर)
गंगेत प्रेते फेकली जातात कारण
गंगेत प्रेते फेकली जातात कारण ती जाळायला पुरेशी लाकडे मिळत नाहीत.
गंगा नदीत मोक्ष मिळायला प्रेते टाकतात. जाळायचा संबंध येतोच कुठे?
सगळे बघु पण शकले नाही... >>
सगळे बघु पण शकले नाही... >> अगदी अगदी लाजो. पोस्टमॉर्टेम करताना ह्याच्याहून भयंकर सडलेली प्रेते पाहिली आहेत. तरीपण वाहत्या पाण्यात टाकलेली ही प्रकरणे नाही पाहू शकले
नी +१.
' भैंस कहे गाय से,तेरी पूँछ काली' >> वर्षुतै, पर्फेक्ट !
@वर्षू नील 'रच्याकने' चा खडा
@वर्षू नील
'रच्याकने' चा खडा मधून मधून दाताखाली येतो. त्याचा अर्थ कोणी सांगेल का?
>>अगदी अगदी..कुठेही कचरा करण्यात,फेकण्यात कोणतीही जाती,धर्म,स्टेटस, एजुकेटेड्,अडाणी असले भेदभाव आड येत नाहीत..
या बाबतीत सर्व भारतीय समान पातळीवर असतात.. गरज आहे आपली मानसिकता बदलण्याची..
कुणी आपल्याला अस्वच्छ म्हटलं म्हणून त्याच्यावर चिडण्यापेक्षा स्वतःवर चिडा की!!! <<
पूर्ण सहमत.एजुकेटेड् जास्त जबाबदार धरले पाहिजेत.
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या
रच्याकने
म्हणजे रस्त्याच्या कडेने
म्हणजे बाय द वे चे मराठी रूप
चिनने आपल्याकडे बोट दाखवणे
चिनने आपल्याकडे बोट दाखवणे म्हणजे उघड्याने नागड्याला हसण्यासारखे आहे. तथापी सत्य पचवायला अवघड असतं हेच खरं. माझ्या नाशिकच्या वास्तव्यापैकी ४ वर्षे मी गंगावाडीत (रामकूंडाच्या वरचा भाग) घालवली. तथाकथीत 'पवीत्र' कूंडात येणार्या पाण्याचा मूख्य श्रोत होता सांड्पाणी. किमान समाधान वाटते की माझ्या परीने मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की निदान निर्माल्य तरी नदीत फेकू नका..
समद्यांचे समदे मान्य, फक्त एक
समद्यांचे समदे मान्य, फक्त एक शंखा आहे, आपल्या घरात झालेल्या कचर्याचे फुडे काय होते हे इथे किती लोकांन्ला माहिती आहे? त्या दृष्टीने किती लोकांनी निदान ओला-सुका सेग्रिगेशन तरी केले आहे? <<<<<<<<<<<<
भारतात नक्कीच नाही केले, पण इथे सिंगापुरात दर १० दिवसांनी एक मोठी पिशवी घराबाहेर लावली जाते त्यात सुका, पुर्नवापर करता येइल असा कचरा भरुन तो जमा करण्याच्या दिवशी दरवाज्याबाहेर ठेवायचा. अमेरीकेत देखील ओलासुका कचरा वेगवेगळा जमा केला जातो असे ऐकले आहे. भारतात मी एवढे नक्की बघितले की सोसायटीचा कचरा घेउन जाणारे कामगार स्वतःच त्यांना हवा असणारा सुका कचरा वेगळा करतात व बहुतेक तो कुठेतरी विकतात. जर सरकारने ओला-सुका कचरा वेगळा जमा करण्याचे लोकांना आवाहन किंवा सक्ती केली तर नक्कीच लोक ऐकतील अशी सकारात्मक आशा करते.
बाकी इथे काय किंवा भारतात काय बाहेर फिरायला गेल्यावर आजपर्यत कधीही कचरा रस्त्यात कुठेही टाकला असे केले नाही, छोट्या टॉफीचा कागद देखील कचरापेटी जवळ दिसली नाही तर पर्स मध्ये ठेउन नंतर तो कचरापेटीतच टाकला आहे. मुलाला देखील आतापासुनच कचरा कुठेही न टाकता कचरापेटीतच टाकायचा हे सांगत आहोत. बाकी जग बदलेल तेव्हा बदलेल आधी स्वतःस बदलले म्हणजे झाले नाहीतर "लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण" असे व्हायला नको.
आगाऊ, आमच्या सोसायटीत बर्याच
आगाऊ, आमच्या सोसायटीत बर्याच दिवसांपासून दोन डबे असतात - ओल्या व सुक्या कचर्याचे. बहुधा मनपानेच मधे तो नियम आणला होता.
Pages