हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!
वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते
मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808
हि पोस्ट लिहिल्यानंतर "Voice
हि पोस्ट लिहिल्यानंतर "Voice Typing साठी मी नॉर्मली गूगल डॉक्स वापरतो" हे मी असे वाचले : "Voice Typing साठी मी नॉर्मली मॅगी नूडल्स वापरतो. " :-p
सगळया पोस्टी वाचुन भुक खवळली
सगळया पोस्टी वाचुन भुक खवळली आहे। एक लक्षात आलय ते म्हणजे आपण लहानपणी जे जे खाल्लय ते ते आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रिय आहे। त्या आठवणीन्मुळे चव अजुनच वाढते पदार्थान्चि
आईकडे गेल्यावर दुपारी दोन तास
आईकडे गेल्यावर दुपारी दोन तास झोपल्यावर तिने प्रेमाने उठवुन हातात दिलेला गरम-गरम चहा...स्वर्गीय सुख. ।।।तंतोतंत।। माझी छोटी बहीण करते फक्कड़ चहा। आईच्या हातचा गरम आमटी भात म्हणजे स्वर्ग।।
माझी आजी नाही आता पण तिच्या हातचे पोहे , पिठले, आजी अजोबांनी मिळून केलेला बटाटेवडा आणि फ्लॉवर बटाटा रस्सा अजुन आठवतो सगळ्यांना।। शाळेत असताना माझा फेव रेड कप होता त्यात आजी मला निम्मा चहा आणि वरून निम्मे दूध थोडी साखर घालून द्यायची मी अजुन पण आवडीने पिते हे।
हल्ली लागलेले नविन वेड, मस्त
हल्ली लागलेले नविन वेड, मस्त झणझणीत मॅगी बनवायची अन गॅसवरुन ऊतरवायच्या थोड्या आधी दोन मोठे चीझ क्युब्स घालायचे त्यात.
मस्त यम्मी टेस्ट लागते
VB+999
VB+999
चीज कशावरही द्या. ऑलटाईम फेवरिट.
वांग्याचं भरीत
वांग्याचं भरीत
थालीपीठ + लोण्याचा गोळा
वरण तूप भात लिंबू बटाट्याचे तिखट काप
चकली दही सोबत
चकोल्या + तूप / कच्च तेल
दडपे पोहे
बटाट्याचा रस्सा + पिवळा भात
Yum ☺️
.
.
खिचडी किंवा पिठल्यावर कच्चे
खिचडी किंवा पिठल्यावर कच्चे तेल
गरमागरम ऑम्लेट वरती वाफाळत्या
गरमागरम ऑम्लेट वरती वाफाळत्या मॅगी चिकन नूडल्स त्यावरून टोमॅटो केचप. हात भाजतील म्हणून चमच्याने तुकडे करुन खायचे.
गोडे वरण + वाफाळता भात + तूप + लिंबू याबरोबर तळलेली कोलंबी किंवा बोंबील
गोडे वरण + वाफाळता भात + तूप
गोडे वरण + वाफाळता भात + तूप + लिंबू याबरोबर तळलेली कोलंबी किंवा बोंबील >> हे माझेही आवडते
Pages