माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते >>> खरेच तड्फड होत आहे इथे ओफिसम्द्ये.. घरि जाउन आता काहितरि करुन खाल्याशिवाय पर्याय नाहि... Sad

खूप उशिरा वाचला मी हा बीबी,
माझी काही आवडती कॉम्बीनेशन्स
१) पोह्याचे डांगर शेंगदाणा तेलात बुडवून,
२) ताकातले घावन / आंबोळ्या आणि घट्ट सायीचे दही,
३) भाजलेले शेंगदाणे / चणे आणि गुळ हे दुपारी पुस्तक वाचताना,
४) गरम / गार पुरणपोळी सायीचं दुध आणि भरपूर रवाळ तूप,
५) आई नारळ खवत असली की मुठभर खोबर्‍याचा बकाणा आणि साखर किंवा गूळ,
६) गरम गरम ऑम्लेट किंवा मॅगी वर किसलेले चीज,
७) तळलेला बटाट्याचा किस, लाल तिखट आणि ओलं खोबरं,
८) उपासाची खरपूस बटाटा भाजी फ़ोर्कने खाणे हे पण दुपारी पुस्तक वाचताना,
९) आंबट ताकातली तांदुळाची उकड, वरुन कच्चं शेंगदाणा तेल,
१०) खजुर आतली बी काढून १ चमचा रवाळ तूप घालून खायचा,
११) ओल्या फेण्या आणि सायी चं घट्ट दही,
१२) गरम-गरम भात, कटाची आमटी आणि तळलेल्या कुर्डया, फेण्या,
१३) पोपटीतल्या वाल्याच्या शेंगा आणि उकडलेली अंडी,
१४) शिळी डाळिंब्याची उसळ आणि पातळ पोहे,
१५) झणझणीत पण पातळसर कुळ्थाच पिठलं वाटीत घेउन नुसत प्यायचं,
१६) चिंचोके नसलेली काळसर चिंच भरपुर तिखट मीठ चोपडून खाणे हे पण दुपारी बहिणी बरोबर,
१७) अख्खा सोललेला आंबा/ कलिंगडाची मोठी फ़ोड हात तोंड माखवत मनसोक्त खाणे, बरोबर बहीण हवीच,
१८) आईकडे गेल्यावर दुपारी दोन तास झोपल्यावर तिने प्रेमाने उठवुन हातात दिलेला गरम-गरम चहा...स्वर्गीय सुख.

ट्रेक ला गेलो की हाताशी असलेल्यातून असे भन्नाट पदार्थ हमखास तयार होतात ..

१. ब्रेड वर श्रीखंड, लसणाची चटणी आणि असलाच तर चाट मसाला आणि काकडी
२. पुरणपोळी आणि पालेभाजी - अंबाडी असेल तर लसणीची फोडणी मस्ट
३. साबुदाण्याच्या खिचडीत उकडलेली अंडी कुस्करून
४. मुगडाळ आणि तूरडाळ यांची एकत्र खिचडी आणि त्यात घोसाळी

टाइमपास करायचा असला की पहिला ऑप्शन मायबोलिचं, छान वेळ मिळाळा होता म्हटलं जरा नीट लिहुया म्हणून आठवले ते सगळं लिहिलं
अगदी १८.....गहिवरुन आलं लिहिताना सुध्दा

मुग्धा, बर्‍याचशा आवडी सेम पिंच Happy रवाळ तूप, घट्ट सायीचे दही, खोबर्‍याचा बकाणा तर ऑल टाईम फेव्रेट Happy
आणि १८) तर मी अजूनही "मिस करते" मग जास्तच सेंटी झालं की जायचं आणि सरळ अनुभवायचं!! चार दिवसांचं माहेरपणाचं सुख!! अगदी शब्दशः स्वर्गीय सुख!!! आयता गरमा गरम चहाचा कप हातात आणि सोबत इतक्या दिवसांच्या राहीलेल्या गप्पा (रोज फोन झाला तरी Wink ) यांतली गम्मत नवरोबांना कशी कळणार त्यासाठी माहेरवाशीणच व्हावं लागतं Happy

१. गरम गरम भात+ तुरडाळीचं गरम घट्ट वरण + तूप + लिंबाचं गोड लोणचं
२. चहात गुड्डे बिस्किटे लगदा करून.
३. दूध + गुलकंद + १ चमचा जॅम + पारले जी ची ४ बिस्किटे अगेन लगदा
४. तुप लावून खरपूस भाजलेली पोळी आणि दुधाचा घट्ट गोड चहा
४. भाकरी लसणाची चटणी भरल्या वांग्याची भाजी आणि कांदा
५. गरम भात, शेपूची भाजी दूध... लिंबाचं लोणचं

ड्रीमगर्ल आपण थोडक्यात म्हणजे दुधा-तूपावर जगण्यार्‍या आहोत गं.....
आणि आईच्या अशाच प्रेमाची तर सगळ्याचं माहेरवाशिणींना कित्ती वाट बघतात ते नवर्‍याला काय कळणार.......

काही पदार्थ वगळता मुग्धाला अनुमोदन, (अंडी खात नाहीना म्हणून ते वगळले आणि चहा पीत नाही).
कच्चे जाडे पोहे मी कुठल्याही तिखट पदार्थाबरोबर खाऊ शकते जसे कुळथाचे पिठले, आमटी, कढी, उसळी. माझे बाबा जाड्या पोह्यात तेल,तिखट,मीठ,कांदा घालून स्वतःच्या हाताने करून देतात ते मला खूप आवडतात खायला, कधी कधी त्यात कैरी आणि ओले खोबरेपण घालतात. तसेच वेगवेगळी सलाड घालूनपण मला कच्चे पोहे खायला आवडतात.

बापरे..बापरे...बास करा रे.....एकदम तोपासु.

माझे काही favourite!!!
१. थालीपीठ + चीझ- यमी लागत.
२. दहि पोहे+ लसुण+ दाणे+ कढीपत्ता घालून फोड्णी
३. दूध भात + लसुण+ दाणे+ कढीपत्ता घालून फोड्णी
४. उपवासाची बटाटा भाजी (extra तीखट) + toast
5. Extra तीखट pasta+ toast
6. भात+ शिळी (एक दिवस जुनी) आमटी + गरम दूध
७. पोहे/ दाबेली/ maggie/ उपमा / + लेझ चिप्स

क्रमशः
Happy

*शिळी पोळी कुच्कारून त्यात चिरलेला गुळ आणि भरपूर तूप टाकून केलेला लाडू
*थंड किंवा शिळ्या चपाती सोबत बारीक चिरलेला कांदा त्यात चमचाभर लाल तिखट,मीठ आणि ओघळतं शेंगदाणा तेल
वाफवलेले चणे किंवा बरबटी त्यात बारीक चिरलेले कांदे,टमाटर,काकडी तिखट अन मीठ वरून लिंबू पिळलेले
* नुसता कुरमुऱ्यांचा कच्चा चिवडा
* पोळी त्याला शेंगदाणा तेल लावून त्यावर कुठलाही चिवडा पसरून त्यावर लोणच्याचा रसा ओतून त्याचा रोल करायचा आणि …

आहाहा सगळ्या आठवणी अश्या जागृत झाल्यात

१. कुरमुऱ्यांचा चिवडा (+ बारिक चिरलेला कान्दा + फरसाण) आणि सोबत गरम गरम चहा...
२. गरम गरम वरण भात + तूप + भाजलेले उडीदाचे पापड + लिम्बाचे गोड लोणचे..
३. गरम ज्वारिची भाकरि + गरम घट्ट झुणका त्यावर बारिक चिरलेला कान्दा आणि तूप घालून..

गुलमोहराची फुलं - त्यातला 'राजा' .थोडी वेगळी पाकळी..मस्त्त लागते आंबट गोड. तसेच गुलमोहराच्या कळया सोलुन मस्त्त लागतात. नुस्ती फुलांची टोपि उचकटुन खाय्ची. जीभ हि बघा किती मस्तं लाल - लाल होते.

मेहंदीची फुलं - त्यातला रस खुपच गोड अस्तो... फुलं महा भयानक कडू..!

विलायती इमली आणी मीठ.

अजून काही आवडतं
१) गरम गरम मऊभात, मेतकूट, भरपूर तूप, त्यावर साय, मीठ.
२) भरपूर साजूक तूपातला केळं आणि सुकामेवा घातलेला गोड शिरा, तळलेली मिरगुंड, लिंबाचं लोणचं.
३) साबुदाण्याच्या चिकवड्याचा चिक, तिखट- मीठ, आंबट दही.
४) आईच्या हातच्या गरम गरम पोळ्या, बटट्याच्या खरपूस काचर्‍या, लसणीचं तिखट
+कच्चं तेल.
५) भाजणीचं थालिपीठ, त्याला वरुन तुप मीठ लावायचं आणि ताजं लोणी, अहाहा.
६) पांढर्‍या ब्रेडच्या कडा काढून लोण्यावर खरपुस भाजायचा, भरपुर साय-साखर घातलेल्या गरम दुधात बुडवून खायचा.
७) दिवाळीतं उरलेले सगळे चिवडे एकत्र करायचे त्यातच चकलीचे आणि खार्‍या शंकरपाळ्यांचे छोटे तुकडे, वर बारिक चिरलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर हे हाताने कालवून खायचं, चमचा उपयोगाचा नाही.
८) संध्याकाळी स्वयंपाक करायचा, बाहेर जेवायला जायचा कंटाळा आला असेल, तर नवरा म्हणतो चल आज मी काहीतरी छान खायला करतो, अशा वेळी त्याने केलेले दडपे पोहे, हिरवी मिरची, भाजलेला पोह्याचा पापड, हाच ठरलेला मेनू, कारण त्याला एवढचं येत, तेही नारळ खवून, कांदा चिरुन आणि पोहे - पापड भाजून दिल्यावर, तेच मिक्स करुन हातात डिश आणून देतो, पण त्याने केले म्हणून त्याच्या चेहर्‍यावरचा आणि माझा आनंद अवर्णनीय.

हा धागा ज्यांनी काढलाय त्यांना माझे शतश: धन्यवाद Happy ऑफीसात बसून वाचत्ये आणि अक्षरश: तोंडाला पाणी सुटलय.

माझे आवडते पदार्थ
गरमागरम भाकरीचा पापुद्रा काढायचा, त्यात तूप - मीठ टाकायचं आणि खायचं
पुरणपोळी-तूप आणि कटाची आमटी... आहाहाहा..
गोडाचे शंकरपाळे किंवा चकलीचे तुकडे चहात बुडवून खायचे.. दिवाळीनंतर दोनेक आठवडे तरी माझा कार्यक्रम सुरूच असतो.. मस्तचं लागतं ते मिश्रण Happy
गरमागरम भात+ वरण + तूप + मीठ आणि लिंबू ....
शिळी पोळी कुच्कारून त्यात चिरलेला गुळ आणि भरपूर तूप टाकून केलेला लाडू... >>>१११ अनुमोदन.. भरपेट नाश्ता होतो या लाडूने

मुग्धा ( डाळिंब्यांची उसळ सोडून ) बाकी सर्व पोस्टला हजारवेळा अनुमोदन .... आपने हमारेही मन की बात लिखी है यहाँ पे ऐसाच लगा ये पोस्ट पढके Happy

दिनेश, कटाची आमटी म्हणजे पुरणपोळीचे पुरण करतात त्याची आमटी.

मुग्धा लकी आहेस ग, नव-याला दडपे पोहे करता येतात, माझ्या नव-याला फक्त चहा करता येतो आणि तो मी पीतच नाही, मी कॉफी पिते, नाही म्हणायला एकदा त्याने फोड्णीची भाकरी केली होती.

माह्या नवर्‍याला नॉनव्हेज चांगल बनवण जमतं ( असे त्याचे मित्र आणी आमचे नातेवाईक म्हंत्यात), पण म्या खात नाय त्यामुळे त्यो विषय बाजूला पडतो, साईडिंगला टाकलेल्या रेल्वेच्या डब्ब्यापरमानं.

पण चहा मात्र एकदम फुळकट करतो. येकदम विलायती.

हा बाफ सुपर आहे. देवा, या क्षणी मला ताजी भाकरी अन शेंगदाण्याची किंवा तीळाची खमंग चटणी मिळाली तर. ( मलाच बडवावी लागेल ती आधी, फुकटची कोण देणार?:अओ:)

गरमागरम भात+ वरण + तूप + मीठ आणि लिंबू ....>> आणि त्यानंतर हाताला येत रहाणारा सुगंध! अहाहा जान्हवी>>>>>>> Saee हजारवेळा अनुमोदन गं.. Happy

धाग्यावर थोडं विषयांतर होईल,
अन्जू अगं माझी आई जास्त लकी आहे, कारण बाबांना पोळ्या सोडुन बाकी सगळा स्वयंपाक उत्तम येतो. पाव-भाजी , व्हेज बिर्यानी, मिसळ, सगळ्या भाज्या, मेथीची बोंडे, कांद्याची भजी, बटाट्याची भजी, साधी चिंच-गुळ घातलेली आमटी अतिशय उत्कृष्ट करतात, नारळ खरवडणं , कांदा बारिक चिरणे अतिशय सुबक, सांडणं पसारा अजिबात नाही. त्यांच्या हातालाच चव आहे.
हा माझ्या नवर्‍याला चहा, दडपे पोहे, मॅगी येत करता, आता मी कुकर लावायला पण शिकवलय कधी मला ऑफ़िसमधुन यायला उशीर झाला तर करतो तेवढं.

Pages