माझे आवडते पदार्थ मला असे (खायला) आवडतात....

Submitted by बाळू जोशी. on 20 July, 2012 - 00:40

हा विलक्षण 'चवीचा' बीबी आदिमायबोलीकार 'आर्च' यांनी २००५ मध्ये जुन्या मायबोलीवर सुरू केला होता. २००७ पर्यन्त तो व्यवस्थितपणे चालू होता नन्तर बहुधा मायबोलीत तांत्रिक बदल झाल्याने तो एखाद्या पुरातन शहरासारखा 'गाडला' गेला. मात्र त्याची आठवण नव्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबीवर निघत होती .त्यावरून तो पुन्हा शोधून काढलेला आहे . मायबोलीवरील रसिक, खवय्ये, आणि 'प्रयोगशील' मंडळींच्या दृष्टीने हा बीबी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन करीत आहे. दरम्यान बरेच नवीन सदस्य नवीन आले आहेत त्याना जुन्या सदस्यांच्या 'कर्तृत्वाचा' परिचय करून देता यावा व स्वतःच्या 'प्रयोगशीलतेचा' अविष्कार करता यावा , तसेच जुन्याना पुनःप्रत्ययाचा आनन्द लुटता यावा म्हणून हा प्रपंच !!!

वि.सू:-
१) हा बीबी वाचताना जेवण करून बसले असले तरी पुनः भूक लागते असे जुन्या सदस्यांचे अनुभव आहेत
२)वाचताना एखाददुसरे लाळेरे सोबत असणे उत्तम...
३) कार्यालयात वाचणे शक्यतो टाळावेच. लई तडफड होते Proud

मूळ बीबीचा दुवा:-
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/81146.html?1109737808

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मुग्धा, कटाच्या आमटीची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

माझे बाबा पण छान स्वयंपाक करतात, त्यांचे दडपे पोहे, दुधातली तांदुळाच्या पिठाची धिरडी तर अफलातून, म्हणून नवऱ्याला काही येत नाही त्याचे जास्त वाईट वाटते.

मुग्धा अग्गो काय तू.... सेम पिंच या लिस्टला पण पहीले सहा पॉईंट्स तर डिट्टो!! (शेवटचं सोडून... आमचं अर्धांग आळशी आहे याबाबतीत नॉनव्हेज फ्राय त्यातल्यात्यात फिश फ्राय करून खाऊ घालतो कधी मधी तिखट-मीठ लावून दिलेलं असेल तर Happy )

 ज्वारीची भाकरी,खर्डा,कांदा xxx.jpg

खमंग फोडणीत पाणी घालून त्या उकळत्या पाण्याला हिरवी मिरची ,सुक गोटा खोबर,लसूण,जिरे ह्यांचे वाटण लावून ते पाणी उकळत असतांनाच चणा डाळीचे (बेसन) पीठ त्या पाण्यावर भुरभुरून लावून डावाने ढवळत केलेले पात्तळ पिठले,गरम भाकरीचा पापुदरा उलगडून त्यात साजूक लोणकढे तूप घालून आणि सोबत हिरव्या मिरच्या व लसूण यांच्या खर्ड्याबरोबर खाणे ह्यातील सुख पंचपाक्वांनांच्या पेक्षा मला जास्त आवडते. एकदम स्वर्गसुख लाभते.

उकडीचे मोदक आणि वरुन तूप
मसाले भात, मठ्ठा, तूप आणि बाजुला तळण
पुरी आणि उंधियो
शिरा आणि आंब्याचे लोणचे
साबुदाण्याची पापडी आणि वरुन चाट मसाला
ढोकळा आणि वरुन तेल, मोहरी, तिखटाची फोडणी
चिवडा आणि वरुन कांदा, टोमॅटो, खोबर आणि लिंबू
खरपूस लोण्यावर भाजलेला पाव आणि गरम कॉफी. पाव कॉफी मध्ये बुडवुन खायचा
उकडलेल्या अंड्याच्या फोडी आणि वरुन मीठ, तिखट, मिरपूड

Happy

 गोळा भाजी,भाकरी व कांदा xxx.jpg

मेथीची गोळा भाजी त्यावर लसणाची फोडणी,त्या सोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा आणि ज्वारीची भाकरी हयासारखा मेन्यू असेल तर त्यापुढे पंच पक्वानांचे जेवणही तुच्छ वाटते.

-भाकरी-खरडा व कांदा_0.jpg
त्याचप्रमाणे पात्तळ पिठले, हिरव्या मिरच्यांचा खर्डा आणि ज्वारीची भाकरी हेही स्वर्ग सुखच

१. आमरस आणि कुरडया
२. पुरणपोळी आणि जोडिला आमरस
३. मॅगी व्हेज आटा नूडल्स + घरच्या लोण्याचा गोळा
४. दूध भात + मेतकूट
५. खाकरा कुस्करून + चिरलेले कांदा, टोमॅटो, कोथिंबिर
६. धनेपूड घालून केलेली भेंडीची परतून भाजी
७. बशीत पारले जी ची बिस्किटं त्यावर गरम चहा ओतायचा आणि आधी चहा पिउन मग चमच्याने बिस्किटं खायची
८. गरम पोळी रोल चहात बुडवून

केळि+साखर
अननस+साखर
रताळे(उकडलेले)+साखर
टरबुज+साखर
आंबा+साखर
भात+साखर
पोळी+साखर कींवा गूळ आणि तुप
बाजरीची भाकरि +साखर कींवा गूळ आणि तुप
घरच्या शेवया+साखर आणि तुप

लीस्ट अजुनही आहे.

त्यादिवशी कुठल्यातरी लग्नाच्या चिवड्याच्या पाकीटात दोन रव्याचे लाडू दिसलेत. पार शिळे होते अन कोरडेही होते, मग काय त्यात ५/७ चमचे दूध घातलं, अर्धा चमचा तूप अन १.५ मिंट मावेत हाय वर गरम केलेत... कसलं भारी काँबो झालेलं! तेव्हापासून रव्याचे लाडू फेवरीट्ट लिस्टित Happy

शाकाहारी:
१) भात + वरण् + तुप + कुरड्या + तळलेली सुकी मिर्ची
२) पिकलेले केळे + दुध + साखर
३) पुरणपोळी + साजुक तुप
४) भात + तिखट आमटी + दही
५) पोळी + काळ्या वाटाण्याची उसळ + दही
६) दुध + भावनगरी गाठिया बुडवुन
७)दुध + सुतरफेणी बुडवुन
८) मठ्ठा + जिलेबी बुडवुन

मांसाहारी :
१) भात + कोलंबीचे कालवण + तव्यावर तळलेली मांदेली/बोंबील
२) भात + टॉमेटोचे सार + तव्यावर तळलेले पापलेट/हलव्याची तुकडी
३) तव्यावर भाजलेला सुका जवळा + कच्चा कांदा बारीक चिरून + लाल तिखट + मिठ + तांदळाची भाकरी

शिळि भाकरी+आंबाडीचि भाजि+कच्च तेल
चिरमुर्यात(फोडणीच्या) दूध घालून मला प्रचंड आवडत.आधि चिर्मुरे संपवायचे मग ते मसलायुक्त दूध
शिळी भजी,वडे, इत्यादी सकाळचा चहात बुडवून
लसूण घातलेली बुत्ति(दहिभात्)+भरलवांग
लसूण घातलेली बुत्ति(दहिभात्)+लसणाचि कोणतीचि कोरडी चटणी (दाणे,खोबरे,मिरचि)
दूध भात्+कोणतीही पालेभाजि (पीठ लावून केलेली)
ओट्स + कोणतीची भाजि किवा आमटी - हे काँबो खूप भारी लागत.नुसते ओट्स शिजवायचे आणि त्यात एक चमचा जी काहि भाजे किवा आमटी असेल ते घालायचि.काय अप्रतीम लागत.उगाच तो ओट्स उपमा,पोहे असली काहि भानगड नाहि.

रविवारी मी पुरी आणि सफरचंद खाल्ले ... अर्थात किडा म्हणून .. पण आश्चर्यचकितपणे पहिल्याच घासाला चांगले लागले, तसे प्रयोगात सुधारणा करत सफरचंद किसून त्यात गूळ मिसळला आणि तो किस पुरीमध्ये रोल करून खाल्ला.

अर्थात गोड रोल झाल्याने फक्त ३ पुर्‍याच खाता आल्या. पण जे खाल्ले ते अहाहा लाजवाब !!!

१. वरण-भात + तूप + लिंबू + तिखटजाळ ठेचा / खर्डा.
२. घरी केलेले गोडे शंकरपाळे चहात बुडवून
३. पातळ पोहे चिवडा + आमटी
४. मॅगी मसाला नूडल्स + oregano seasoning + चिली फ्लेक्स
५. शिळा नारळीभात + तूप.. (यम्मी... कालच खाल्ला)
६. ताजी गरम पोळी + लसूण चटणी + तूप

नरेश माने, मांसाहारी मेन्यु अप्रतिमच!
आनंदिता दोन्ही लिस्ट्स तोंपासु (कीबोर्डचं काय खरं नाही!)

माझा मांसाहारी मेन्यु
तांदळाची भाकरी / आंबोळी कुस्करून दाटसर रस्सा असलेल्या चिकन/मटणाचे कालवण
माश्याचे (विशेषतः घोळीचे) झणझणीत आंबट-तिखट कालवण + मऊसर वाफाळता भात + घट्ट वरण + साजूक तूप
पावसाळ्यात अंड्याची मिरवणी / भरून केलेल्या खेकड्यांचा झणझणीत रस्सा आणि मऊसर वाफाळता भात + तूप

आता जाम विकायला येतात ते आणून त्याच्या मोठ्या फोडी करतो.दही ,पुदिना पूड,तिखट,मीठ,जिरेपूड,सागर एकत्र करून फोडींवर ओतायचे.चविष्ट लागतात.

Pages