अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटणी मेरी इट इज देन! Happy
१२ वाजता तिथे भेटूयात?
आमची बस सायोच्या घरून ११ वाजता(?) निघाली तरी पुरेल मला वाटतं.
पाशिंजर कोण? मी, ल्हान्या आणि बुवा? सिंडी आणि मैत्रीण सायोकडे येणार की कसं?
झक्कींना कोणी कॉन्टॅक्ट केला का?
वृंदाताई, नीती आणि नाइकांना (उद्यापर्यंत त्यांनी इथे कन्फर्म न केल्यास) कसं कळवावं?

अबे येणार का? वा वा. तेच रे ते.

अबे चटणी मेरीकरता येणार की चहाकरता? Wink
बाई, मी, तुम्ही, बुवा आणि ल्हान्या माझ्या बशीत बसल्यावर एकच सीट रहाते हो. सिंडीला किंवा तिच्या मैत्रिणीला ट्रंकेत टाकणार का? Wink
मी वृंदाताईंना मेल टाकते.

स्वाती, ही काय पुणेरी पद्धत पत्ता द्यायची .. म्हणजे अतिरीक्त माहिती देण्याची कळकळ जाणवते पण फक्त पत्ता विचारला तर बिचार्‍यांनां त्या लिंकवर क्लिक करा, पत्ता घ्या अशी उगीच वाईवरून काशी नाही का गाठावी लागणार? Proud

"एकाचं करावं बरं तर तिसरा म्हणतो माझंच खरं" अशी एक नवीनच म्हण पाडावीशी (दगड मारून नव्हे!) वाटत आहे. Proud

सायो, स्वाती_आंबोळे, तुमचे आग्रहाचे निमंत्रण मिळाले.

येण्याची तीव्र इच्छा होती. पण किती, किती म्हणून कारणे सांगू न येण्यासाठी? लाज वाटावी!
थोडक्यात, मला जमणार नाही. तुम्ही मजा करा.

Pages