पंढरपुरासी जन हो चला
एकादशी आषाढीला ||
भक्त मंडळी सारी जमली,
भिवरथडीही भरूनी आली,
घेण्या हरिनामाला
एकादशी आषाढीला ||
कुंकू बुक्का घेउनी तुळशी,
रांग लावण्या करिती दाटी,
दर्शन घेण्याला
एकादशी आषाढीला ||
टाळ मृदंग चिपळ्या घेउन,
नाचति वैष्णव करिती भजन,
घेती विठु नामाला
एकादशी आषाढीला ||
घालिता मिठी विठुच्या पायी,
अश्रु दाटती वैष्णव नयनी,
विसरती देहाला
एकादशी आषाढीला ||
भक्तांचा तो बघुनी उत्सव,
गहिवर दाटे नमले मस्तक,
पाहुनि विठुरायाला
एकादशी आषाढीला ||
सहज साध्या शब्दांतून भक्तिभाव
सहज साध्या शब्दांतून भक्तिभाव छान प्रकट झालाय.
वा वा वा वा सुरेख भक्तिपूर्ण
वा वा वा वा सुरेख भक्तिपूर्ण रचना.....
जय हरि विठ्ठल श्रीहरि
जय हरि विठ्ठल श्रीहरि विठ्ठल.....
व्वा! सुरेख.
व्वा! सुरेख.
व्वा सह्हीच !!!!!!!
व्वा सह्हीच !!!!!!!
सर्वाना धन्यवाद.
सर्वाना धन्यवाद.
भक्तीनं ओतप्रोत काव्य कसं
भक्तीनं ओतप्रोत काव्य कसं असावं याचा सुरेल नमुनाच ही रचना सादर करते. "आषाढी एकादशीला पढरीला चला" ही कवयित्रीनं दिलेली हाक इतर अनेक हाकांसारखी वरवरची वाटत नाही. तिच्यात भक्तीचा अनावर रस आणि सहका-यांविषयीची सुस्वभावी आपुलकी आढळते. कुंकू, बुक्का, तुळशी घेऊन दर्शनासाठी दाटी करणा-या स्त्रिया, टाळ, मृदंग घेऊन भजनासाठी आलेले भक्तगण, जणू हरीनामासाठीच भरून आलेली भीवरा यांच्या समवेत रसिक वाचकही हरीनामात तुडुंब भरून ओसंडतो.
कवितेतील काही किरकोळ दोष या भक्तीरसात कुठल्याकुठे वाहून जातात.
सुरेखाजी, आपल्यापुढे या सुरेख कवितेसाठी नत...
प्रद्युम्नसंतु
प्रद्युम्नजी इतक्या सुरेखा
प्रद्युम्नजी इतक्या सुरेखा प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.