आज कोण वार? शुक्रवार हे स्पिरिट काल जरा जास्तच झाले. त्यात पॉप टेट ने भर टाकली. परमिटचे पाच रुपये जास्त गेले. पण चालतंय. सव्वा सहाला तिकीट काढले अमेझिंग स्पायडरमॅन चित्रपटाचे अन सव्वा सातला तो सुरू. अगदी पहिला दिवस अन दुसरा शो. तास भर काय करणार? महिना अखेर! त्यामुळे खरेदी प्रकरणात रस नव्हता.
दर आठवड्याला बिग सिनेमात सिनेमा बघून ती जनगणमनची फिल्म पाठ झाली आहे. तरी दर वेळेस गळ्यात आवंढा येतोच. त्यापासून लक्ष विचलित करायला ती मुले करतात तसे हातवारे करायचा प्रयत्न केला. पण आजूबाजूच्या लोकांनी बघितल्यावर गप्प. मनाच्या अश्या कातर अवस्थेत स्पाइडी सुरू झाला.
एक मुलगा जिन्यात बसून लपाछपी खेळत असतो. त्याचे आईबाबा येतात अन त्याला कोणत्यातरी दुसर्या काका मावशींकडे सोडून गायब होतात. हे कळेस्तोवर मला उगीचच आपण हॅरी पॉटरचाच कुठला तरी भाग बघतो आहोत असे वाटायला लागलेले. हो. आजकाल आपण हॅरी पॉटरचे सिनेमे बघायचे अन ती जनरेशन अस्ते फेसबुकवर. कॉमिक बुक वर बनविलेला सिनेमा. त्याने किती फॉर्म्युलेइक असावे? अगदी पेंट बाय नंबर्स सारखेच दिग्दर्शकाने हं आता हे दाखविले, आता ही स्टेप, मग ती असे दिग्दर्शन केले आहे. एक्कही आश्चर्याचा धक्का बसू दिलेला नाही.
मुलगा मोठा होऊन अँड्रयू गारफील्ड ( सोशल नेट्वर्क मधला. म्हणून जरा बघण्यात रस होता मला. ) बनला.
तो सत्रा वर्शाचा असून शाळेत जात असतो. अगदी एकलकोंडा असल्याने फक्त फोटो काढत असतो. त्याला नेहमीसारखेच एक दुसरा सशक्त मुलगा त्रास देतो. हा व्यवस्थित मार खातो. मग लगेच हिरविणीचा प्रवेश. ती
स्क्रिप्टनुसार फारच बारीक व ब्लाँड! तिथेही आ. ध. नाही. त्यांचे जमतेच.
मग हिरोस वडिलांची जुनी बॅग व त्यात लपविलेले जनुकशास्त्रीय रहस्य सापड्ते. मग तो आपण जे केले असते तेच करतो. पक्षी गूगल! त्याला लगेच पत्ता वगैरे सापड्तो. ही पुढची स्टेप पण लै सोप्पी. मोठ्ठीच्या मोठ्ठी इमारत असते. जनुक शास्त्रीय संशोधन जरा लपून छपून करतील तर ते नाही. लगेचच त्याला ती बिल्डिंग सापडते. आत एंट्री मिळते. स्टुपिड बाई त्याला लगेच वर बॉसला भेटायला पाठवते. सगळीच कामे अशी झाली तर कित्ती छान? माझा सात्विक संताप झाला. तर पुढे. तिथे लगेच हिरवीण आणि आपला इर्फान खान.
तो एका गुप्त खोलीत जातो व बाहेर येतो. तो तिथून गेल्यावर हिरो लगेच तसेच बघून ठेवलेले हातवारे करून
मोस्ट गुप्त खोलीत लगेच अॅक्सेस मिळवतो. आधना. तिथे एक अनंत कोळ्यांचे रंगीत झिरमीळ असते.
त्यात जाऊन आल्यावर त्याला अचाट जनुकशास्त्रीय संशोधनामुळे निर्माण केलेला
तो कोळी चावतो. ढँट्ढँ!!! आता आपला हिरो आला. मग त्याला आपल्या अफाट शक्तीचा शोध होणे, त्यासाठी एका मुलीचा टॉप स्ट्रॅटेजिकली फाटणे, थोडी विनोदी मारामारी इत्यादी होते.
बरे दिग्दर्शकाचे आडनावच वेब आहे. मज्जाय ना! आता त्याला काहीतरी हायर पर्पज पाहिजे. म्हणून फारेंडच्या चित्रपटीय नियमांनुसार कंटाळवाणे क्लास घेणार्या काकांचा खून होतो. त्या खुन्याला शोधायला हिरो काही च्या काही कोळी करामती करून दुसर्याच गुंडांना फाइट करतो. मध्येच संशोधन करून स्वतःचा ड्रेस शिवतो. क्रिश मधल्या सारखे एक बास्केट बॉलचा सीनही आहे. त्यातही एक मुलगी जिम मध्ये पोस्टर रंगवत असते
ती जपानी चेहरेपट्टीची अन बहुतेक बहिरी(आय शुड बी सो लकी!) इथेही आजिबात आधना.
आता गोष्ट पुढे न्यायची तर व्हिलन पाहिजे म्हणून एक हाती शास्त्रज्ञ स्वतःलाच काहीतरी पालींची जनुके वापरून अचाट संशोधन करून निर्माण केलेले इंजेक्षन देतो व त्याचा हातच केवळ परत उगवतो असे नाही तर ओएमजी तो स्वत:च पाल बनतो. इथे प्रेक्षागॄहातील युवतींनी नाजूक किंकाळ्यावगैरे आजिबात मारल्या नाहीत.
काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते.
मध्येच हिरविणीच्या विसाव्या मजल्यावरील घरात स्पायडीने पोहोचणे, नर्म फ्लर्टिंग व भावी सासर्या बरोबर वादावादी करणे इत्यादी आहेच. हिरविणीचे बाबाच पोलीस चीफ. मग ज्वाइंटली दुर्जनांचा विनाश होणार हे ओघानेच आले.
आता हा मोठा होणारा पाल- मानव पुलावर गाडया असतात त्यातील इर्फान खानास शोधून त्याची कार चेपून त्याला सिनेमातून हाकलून देतो. मग एका मुलाला पुलावरून पाण्यावर लट्कणार्या व जळणार्या गाडीतून वाचिवण्याचा सीन आहे. सो ओरिजिनल यू नो! त्यामुलाला बापसाच्या हातात दिल्यावर स्पायडीला आपल्या बाबांची याद येते. ( आधना!)
इथूनपुढे निरर्थक अशी स्पायडी व पाल-मानव अर्थात भुसन्याचा जोक ( संदर्भासाठी एलदुगो बाफ वाचावेत कृपया) यांच्यातील पाठलाग व मारामारी आहे. न्यू यॉर्क मधील अतिशय स्वच्छ व मोठ्या, कचरा नसलेल्या
गटारांची गाय्डेड टूर आहे.
मग परत हॅपॉ ची आठवण करून देणारी शाळेतील कोळी कुमार व पालमानव यांच्यातील मारामारी. पालमानव
काहीतरी जैविक शस्त्र बनवून लोकांना मारत/ फ्रीझ करत असतो. तो मोठ्ठ्या टावर वर चढतो. तीच ती हपीस बिल्डिग. एकच इमारत पाडायचे बजेट होते बहुतेक. त्याला नामोहरम करण्यास शूरवीर हिरविण कुमारी तिथे येते व इमारतीत अडकते. ( आध आजिबातच नाही. कारण मित्र अन बाबा सुट्का कोणाची करणार?) प्रयत्नांची शर्थ करून पालमानवाच्या दुष्ट प्लॅन पासून हिरवीण व हिरो शहरवासियांची सुटका करतात. ग्लोबल अँटीडोट मुळे जनता पण बरी होते व पालमानव नुसता परत एक हाती शास्त्रज्ञ होतो. ( मरत नाही - आपल्या नशीबी सिक्वील आहे ना. ) माझ्या मुली भोवती तुझे जाळे विणू नकोस असे वचन घेऊन भावी सासरे बुवा मरतात.
पण कोळी कुमार येडा प्रभात नसल्याने, घनाच्या सल्ल्या शिवायच असली फालतू वचने मोडतो. व त्यामुळे हिरविण हसते. चित्रपट संपल्याने आपणही हसतो.
बाहेर आल्यावर चिक्कार पावसात लगेच रिक्षा मिळाली हाच काय तो आश्चर्याचा मोठा धक्का.
मुलांना पॉपकॉर्न व कोकचे पैसे देउन थेटरात बसवून या. बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
काही वैताग बाल प्रेक्षक मात्र
काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते.
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
>>>
अरे देवा ... वर्तमानपत्रातले
अरे देवा ... वर्तमानपत्रातले चार चांद बघून आज-उद्याकडे जाण्याचा विचार होता तो आता हे वाचून पार ढेपाळलाय. धन्यवाद - पैसे, वेळ आणि मानसिक संतुलन वाचवल्याबद्दल.
अ.मामी सह्हीच लिहिलंयस.
जनुक शास्त्रीय संशोधन जरा लपून छपून करतील तर ते नाही. / एकच इमारत पाडायचे बजेट होते बहुतेक. >>>>
कोळी कुमार व पालमानव >>>>>
( मरत नाही - आपल्या नशीबी सिक्वील आहे ना. ) >>>> अरे बापरे!
एवढं करून 'भुसन्याचा विनोद' कळायला तो भला मोठ्ठा बाफ वाचायला लावण्याबद्दल णीषेद!
मस्त
मस्त
माझे पैसे गेले ना...........
माझे पैसे गेले ना...........
.
.
इतका अचाट मुर्खपणा दाखवला आहे त्यात..... डॉक्टर स्वतः डबल त्रिबल डोस घेउन सुध्दा जर थोडाच काळ पाल बनत होता तर सगळ्यांना कायमस्वरुपी कसा पाल बनवनार होता.....?????????? कै च्या कै
अश्विनी मामी, प्रीव्ह्यू
अश्विनी मामी, प्रीव्ह्यू पाहून आम्ही जायचा विचार करत होतो. आता रद्द करावा लागेल. चिल्लर पब्लिक बहुतेक मामाला शेंडी लावून पाहतील सिनेमा - त्यामुळे आम्ही ' बच गया साला' म्हणायला हरकत नाही.
भुसन्याच्या जोक काय ते इथेच तळटीपेत लिहा प्लीज. एलदुगो वाचायची हिम्मत नाही माझी
(No subject)
अफाट अमा...लय भारी!!एलदुगो
अफाट अमा...लय भारी!!एलदुगो चांगलंच भिनलंय कि तुमच्यात
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .>>::हहगलो:
अश्विनी..मस्त!!!
अश्विनी..मस्त!!!
आ ध ना:) .. तुम्ही लिहलं
आ ध ना:) .. तुम्ही लिहलं म्हणजे धमाल्च असणार ...
एलदुगो मध्ये घनाचा मित्र आहे
एलदुगो मध्ये घनाचा मित्र आहे एक भुसन्या: तो असे पालीचे पीजे सांगतो. म्हणजे पालीला जा असे सांगायचे झाले तर म्हणायचे : गो पाल!!!! वरील चित्रपट पण अशाच टाईपचा विनोद आहे म्हणून भुसन्याचा विनोद.
शेवटास स्पाय्डी बरोबर पालमानवाशी लढायला पोलिस चीफ पण येतो हे बघून मी चुकून ' हाय मेरा ससुरा बडा
पैसेवाला ' हेच गाणे म्हणू लागले. मग मला झापून गप्प केले लोकांनी.
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
भन्नाट लिहीले आहे अ.मा काही
भन्नाट लिहीले आहे अ.मा
काही वैताग बाल प्रेक्षक मात्र अब मोगली कब आयेगा वगैरे आईला विचारून माझे लक्ष विचलित करत होते. >>>
एकच इमारत पाडायचे बजेट होते बहुतेक. >>>> जबरी हसलो!
ष्टोरी वाचून माईटी जो यंग (लटकणारा मुलगा) ते सॉर्सरर्स अप्रेंटिस (शूरवीर हिरविण कुमारी) पर्यंत असंख्य सुपरहीरोपटांची आठवण झाली
आणि हो, त्या भुसन्याबद्दलच्या संस्पबद्दलही धन्यवाद. ते ४००-५०० पोस्ट वाचायचे श्रम वाचले. त्याबद्दल तुम्हाला पुढच्या कॉमिकबुक चित्रपट परीक्षणासाठी एक मल्टिप्लेक्स तिकीट माझ्याकडून.
झकास ! मस्त लिहीलंय... पंचेस
झकास !
मस्त लिहीलंय... पंचेस जबरी !
( पण शिणेमा पण आवडलाच पोरांची दंगल चालली होती. थ्री डी चे पैसे वसूल ! )
नावासकट संपुर्ण परिक्षण
नावासकट संपुर्ण परिक्षण
तुम्ही असले सिनेमे पहायला जात जा आणि येऊन परिक्षण लिहित जा.....
माझ्या दिवसाची सुरुवात भयानक छान होते.
भुसन्याचा विनोद
शिणुमामा बघताना त्या पालीचं
शिणुमामा बघताना त्या पालीचं नाव मामा पैलवान ठेवायचा मोह होत होता पण ग्रेटेस्ट माबोकर हे नांव आठवलं ...तेच फिक्स करून टाकलं मग
अश्विनी भारी लिहिलंस! जितक्या
अश्विनी भारी लिहिलंस! जितक्या वेळा एल्दुगोमधे भुस्न्या हे नाव कुणी उच्चारतं, मला जाम हसू येतं!
आता गोष्ट पुढे न्यायची तर
आता गोष्ट पुढे न्यायची तर व्हिलन पाहिजे म्हणून एक हाती शास्त्रज्ञ स्वतःलाच काहीतरी पालींची जनुके वापरून अचाट संशोधन करून निर्माण केलेले इंजेक्षन देतो >> हेच ते जनुकशास्त्रीय रहस्य, जे हिरो (स्पायडी) उघड करतो आणि त्या प्रोफेसरचं फावतं, स्पायडीच्या वडिलांनी ते रहस्य* का जपून ठेवलं असेल हे त्या पालीने करू घातलेल्या नासधूसीनंतर त्याला कळतं आणि म्हणूनच नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन हा स्पायडी पालीचा नायनाट करू पाहतो! (*ही असली रहस्य जाळून फेकत का नाहीत??)
स्पायडरमन च्या सिरीज मधला अत्यंत निराशाजनक मुव्ही! नवीन स्टारकास्ट इंट्रोड्युस करण्यासाठी 'रिक्रियेशन ऑफ स्पायडर' दाखवताना मुळची स्पायडी फँटसी खरंच साधता आली नाहीये.. आणि ओव्हरॉल स्टोरीचा प्लॉट त्यामुळे अशक्त वाटतो..
उदय, अनुमोदन!
आणि हो, त्या भुसन्याबद्दलच्या
आणि हो, त्या भुसन्याबद्दलच्या संस्पबद्दलही धन्यवाद. ते ४००-५०० पोस्ट वाचायचे श्रम वाचले. त्याबद्दल तुम्हाला पुढच्या कॉमिकबुक चित्रपट परीक्षणासाठी एक मल्टिप्लेक्स तिकीट माझ्याकडून.
>>>> फारेण्ड +१. तिकिट मात्र फारेण्डाकडून घ्यावे.
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते
बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
>>>>>>>
त्यांना पण तुमचे परीक्षणच वाचायला देतो.. त्यांची पण दोन तिकिटे वाचतील..
अवांतर - अजून झाली नाहीत, प्रतिसाद देण्यापुरते त्यांना जगात आणलेय..
अब मोगली कब आयेगा >>>
अब मोगली कब आयेगा >>>
हे मात्र खरयं... मी सुद्धा
हे मात्र खरयं... मी सुद्धा त्यातलाच, मारे ४ चांद पाहून (ते सुद्धा रॉटन टोमॅटोज चे...) थेटरात गेलेलो पण सिनेमा मात्र अगदीच हा निघाला.
बाहेर आल्यावर चिक्कार पावसात
बाहेर आल्यावर चिक्कार पावसात लगेच रिक्षा मिळाली हाच काय तो आश्चर्याचा मोठा धक्का.>>
सही मामी!
सहीये
सहीये
<>>>मुलांना पॉपकॉर्न व कोकचे
<>>>मुलांना पॉपकॉर्न व कोकचे पैसे देउन थेटरात बसवून या. बाहेर पाल कोळ्यास पकडते ते बघत बसा एका तिकीटाचे तरी पैसे वाचतील .
हे कहर होते
भारीच!! तिकिटाचे पैसे
भारीच!!
तिकिटाचे पैसे वाचवल्याबद्दल आभार
अमा... जबरीच परिक्षण..
अमा... जबरीच परिक्षण..
मस्त लिहिलंय अमा!
मस्त लिहिलंय अमा!
अश्विनी लई भारी...मेले हसून
अश्विनी लई भारी...मेले हसून हसून!
कसली मेली ती हाईप या सिनेमाची. आणि लहान मुलांना मामा बनवायचे उद्योग! वॉलमार्टात बघितल तर चड्डी पासून लंच बॉक्सेसपर्यंत... सगळ्यावर आपली कोळीष्टक आणि तो लालभडक कोळी-मानव.
अ. मामी 'सासरेबुवा मरतात'
अ. मामी
'सासरेबुवा मरतात' नंतरची वाक्ये जबरी आहेत.
हा कशाला बघितला? वाघूळ-मानव (गर्द सर्दार) बघा. तो चांगला असणार. २० तारखेला येईल.
वाघूळ-मानव (गर्द सर्दार)>>
वाघूळ-मानव (गर्द सर्दार)>>:खोखो: ह्या वर्षी अमानवीय मानवांवर बरेच चित्रपट येत आहेत..
Pages