Submitted by सत्यजित on 15 June, 2012 - 02:48
ती खिडकीतुन बघता पाऊस
पाऊस काचेवर रेंगाळला
नभ गुरगुरता त्याचे वरती
पाऊस किती बरं ओशाळला
नभास दिसते नुसती खिडकी
अन दिसते ना काही
स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी
पाऊस रेंगाळत राही
कोपे नभ ओढी पाठीवर
लकलकता आसूड
लखलखली ती विजेहून
पाऊस वेडा अल्लड हूड
नभास आले कळोनी सारे
तिरक्या केल्या धारा
काचेवरुनी थेंब झटकण्या
घोंगावत ये वारा
फरफटले ते काचे वरती
तरी न सोडला धीर
वादळात त्या उभे ठाकले
ईवलेसे प्रेम वीर
काचेवरती आर्त थाप
पण तिला कसे कळावे?
थेंबांचे न दिसती अश्रू
मग कोणी कसे पुसावे?
काय भासले तिला कळे ना
ठेवले अधर काचेवरती
गहिवरला कोसळला पाऊस
पुलकित झाली धरती
-सत्यजित.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कस्लं सुंदर लिहिलय... बेस्ट
कस्लं सुंदर लिहिलय... बेस्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप गोड! प्रियकर पाऊस... अगदी
खूप गोड! प्रियकर पाऊस... अगदी काचेच्या अलिकडून त्याला भेटल्यासारखं वाटलं...!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ये बात...............
ये बात...............
प्रियकर पाऊस >>> अगदी
प्रियकर पाऊस >>> अगदी अगदी.
पावसासाठी तिने आतुर होणं, त्याची वाट पाहणं, पावसात प्रियकर शोधणं ह्याच्या अगदी उलट म्हणजे पावसाची ती प्रेयसी असणं आणि तिने चुंबावे म्हणून त्याने अधीर होणं ही कल्पना भन्नाट आहे. आणि कवितेत ती उतरली देखील छान आहे!
काय भासले तिला कळे ना ठेवले
काय भासले तिला कळे ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठेवले अधर काचेवरती
गहिवरला कोसळला पाऊस
पुलकित झाली धरती >>> सहीय्ये!
भाई मस्तच
भाई मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर
नभास दिसते नुसती खिडकी अन
नभास दिसते नुसती खिडकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन दिसते ना काही
स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी
पाऊस रेंगाळत राही
>>
कसलच मस्त
निंबुला अनुमोदन
खुप खुप आभार...
मस्तच.
मस्तच.
ये ब्बात सत्या भाय, भारिये
ये ब्बात सत्या भाय, भारिये कविता एकदम
उसगावातला उन्हाळा कविता करतोय
मज्जाय ब्वा ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच.
मस्तच.
रेंगाळणारे थेंब आवडले!
रेंगाळणारे थेंब आवडले!
सुरेख, कित्ती अलवार..........
सुरेख, कित्ती अलवार..........
कविता सुरेख आहे. तुमचे
कविता सुरेख आहे. तुमचे ब्लॉग्सही सुंदर आहेत.
एक नम्र सूचना: अनावृत्त नव्हे "अनावॄत" असा शब्द आहे.
वाह ! मस्तच
वाह ! मस्तच
मस्त रे भौ अनावृत्त शब्द
मस्त रे भौ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनावृत्त शब्द तपासून घेशील का?
सर्वांचे खुप आभार... श्यामले
सर्वांचे खुप आभार...
श्यामले ईथे जोरदार पाउस झाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रद्युम्न माझ्या मते "अनावृत्त" हा योग्य शब्द आहे, मी हा शब्द अनवार कींवा बांध न घालण्या जोगा ह्या अर्थाने वापरला आहे.
अनावॄत असा शब्द माझ्यातरी वाचनात आलेला नाही. गुगल वर देखिल मराठी संदर्भ मिळाले नाहीत. कुठे सापडल्या मला लिंक द्याल का?
विनम्र आभार...
छान कविता आहे. आवडली
छान कविता आहे. आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फरफरटले ते काचेवरती .......इथे फरफटले असं आहे का?
वाह ! मस्तच नभास दिसते नुसती
वाह ! मस्तच
नभास दिसते नुसती खिडकी
अन दिसते ना काही
स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी
पाऊस रेंगाळत राही
किती सुंदर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
(No subject)
अनावॄत असा शब्द माझ्यातरी
अनावॄत असा शब्द माझ्यातरी वाचनात आलेला नाही. गुगल वर देखिल मराठी संदर्भ मिळाले नाहीत. कुठे सापडल्या मला लिंक द्याल का? >>>>> यासंदर्भात ही लिंक पहाणे.
http://www.manogat.com/node/3185
धन्स.