ईंडोनेशिया - बांडुंग, योग्यकर्ता आणि बोरोबुदुर
१) ९ शतकात ईंडोनेशियामधे महायाना बुद्धीस्त लोकांनी 'बोरोबुदुर' स्तुपाची निर्मिती केली. अनेक वर्ष हे मंदिर जंगलात गाढले गेले होते. हे मंदिर इतके भव्य आणि दिव्य आहे की तिथे गेल्यानंतर जेंव्हा आपण अगदी चिमुकले भासायला लागतो तेंव्हा ह्या पाषाणनिर्मित मंदिराची भव्यता आपल्याला कळते. ह्या मंदिराविषयी अगदी सविस्तर माहिती इथे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Borobudur
हा आहे एक बुद्ध पुतळा. तिथे प्रत्येक बुद्धाला एक एक नाव दिले आहे. उदा: मैत्रेय बुद्ध.
२)पाठीमागून दिसणारी बुद्धाची मुर्ती. ध्यानस्त आणि प्रसन्न!
३)ह्या टोप्या बांबुंच्या पानापासून विणलेल्या आहेत. धष्टपुष्ट आणि उन्हातान्हापासून पुर्णपणे सरंक्षण करणार्या. इथला शेतकारी वर्ग आणि कामगार वर्ग ही टोपी घालूनच कामे करतो. प्रत्येकाकडे एक तरी टोपी असतेच असते. आपली आबाळ होणार नाही इतके वस्त्र मी नक्कीच त्यांच्याकडे पाहिले आहे. अगदी साधी राहणी. पुढे चित्रे येतीलच!
४) ही छोट्या मुलांची खेळणी आहेत. विषेश असे काही नाही पण ही खेळणी आवडली म्हणून लगेच मला तेंव्हा माझे भाचे आठवलेत. म्हणून एक फोटो घेतला.
५) बांडुंग हे ईंडोनेशियातील चार महानगरांपैकी एक. खूप पुर्वी बांडुंगला डच राज्यकर्त्यांनी 'जावा बेटाचे पॅरिस' म्हणून उपमा दिली होती. मी बांडुंग वरुन योग्यकर्त्याला जात असताना वाटेत ट्रेनमधून जे काही मला दिसले त्यांचे छायाचित्र घेतलेत. पुढील बरीच चित्रे हे खिडकीतून दिसणार्या निसर्गाचे आहे.
६) हे नक्की काय आहे? माझ्यामते केळीच्या पानांचे देठ आहेत हे.. रंगावरुन तसेच दिसते.
७) हे बघून मला ईगतपुरीची आठवण झाली. फक्त मेनू वेगळे. हे जे दिसते आहे ते सगळे अन्न शाकाहारीच आहे. बरीच मोठी हिम्मत करुन आणि १०० वेळा तिथल्या लोकांना अहो काका अहो काकू हे शाकाहारीच अन्न ना म्हणून विचारले आणि त्यांनी होकार देऊनही जरा संकोच बाळगत खाल्ले. छान होते सगळे काही फक्त तो तळलेला वडा मी खाल्ला नाही. बघा बघू काय काय ओळखता येत तुम्हाला ह्या टोपलीतून आणि हो मलाही सांगा मग!
८) बाहेरची हिरवळ.. ट्रेनमधून दिसणारी. तिथल्या ट्रेन्सच्या काचा रंगीत नसल्यामुळे बाहरचे रंग जसेच्या तसेच दिसतात. आपल्याकडे मात्र वातानुकुलित बोगीतील काचा कॉफी रंगाच्या असतात. त्यामुळे बाहेरचे जग जसेच्या तसे दिसत नाही. म्हणून मी भारतात आगगाडीतून प्रवास करताना वातानुकुलित बोगीतून प्रवास करत नाही.
१०) विया-विया (VIA-VIA) नावाचे एक हॉटेल मला सापडले. तिथे विषेश हे की तिथे तुम्हाला कुठल्याही देशाची पाककृती करुन मिळते. म्हणून ते हॉटेल तिथे खूपच प्रसिद्ध होते. बघा मला काय काय मिळाल .. चपाती अगदी पिटुकली होती. जेवण छानचं होतं. मातीची भांडी बघा कशी दिसतात ताटातली. या जेवायला!
११) रस्त्यावर फिरता फिरता दुपारी हा एक प्रकार दिसला. ह्या पदार्थाचे नाव मी विचारले नाही. पण पाककृती लक्षात आली. गव्हाचे पिठ आणि केळी पासून हा पदार्थ बनवतात. आधी कणिक मळवायची आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. बाजूला जी दिसते त्या मशीनमधे एक गोळा घातला की रिबीन सारखी लांब पारी बाहेर ...येते. त्या पारीच्या टोकाशी पिकलेले अर्धे केळे ठेवून ती पारी त्या केळ्याभोवती गुंडाळायची (पंतगीच्या रिळीला आपण जसा मांजा गुंडाळतो त्याप्रमाणे). बाजूला केळीच्या फोडी ठेवल्या आहेत ते बघ. मग हा पदार्थ कढईत खरपूस होईपर्यंत तळायचा. मी चाखून नाही पाहिला पण हा पदार्थ शाकाहारी आणि भारतीय पाककृतीच्या जवळ जाणारा मला वाटला. सुरवातीला समोर ठेवलेले कणकेचे उंडे बघून एकदम चपात्यांची आठवण झाली. चला बघू... करा आता हा पदार्थ आणि आपल्या आहार विभागात ह्याला सजवून जरा मराठमोळी रुप द्या.
१२)हे वाचा बघू काय लिहिले आहे? हे पण आपल्यासारखे 'प्रपंचात' अडकले आहेत. ईंडोनेशिअन भाषेत संस्कृत शब्द शोधून काढणे हा एक मंजोरजन करणारा संशोधनाचा विषय होईल!
१३)कोकणातल्या लोकांना भातालावणी आणि भातशेते नवलाईची नसावीत; पण मी वर्हाडी असल्यामुळे भातशेते बघून माझे मन चुबुकडुबुक करायला लागते.
१४) पुन्हा एकदा आपण जागतिक वारशाच्या ठिकाणी आलो आहोत. काय विसरलात? अहो 'बोरोबुदुर' जागतिक वारसा प्राप्त झालेलं बुद्धमंदिर असलेलं एक ठिकाण. दुरुन असं दिसतं. येथून पुढे विसरलात तर छडी मिळेल!
१५)चार भिंतींच्या बाहेर पडून बघा... गरीब श्रीमंत दोन्ही प्रकारचं जग दिसतं. आता हे बघा इथे दाण्याचे कुट करायला ह्या बाटलीचा वापर केला जात आहे.
१६) ईंडोनेशियामधे जर तुम्ही बालीला गेलात तर तिथे केचक नृत्य बघायला मिळेल. हे नृत्य माकडांचे आहे. ते चक चक आवाज करतात म्हणून केचक असे नाव पडले. सिताहरण प्रसंगाशी निगडीत हे नृत्य आहे. तर योग्यकर्त्यामधे (योग्यकर्ता हे नाव भारतीय वाटते ना? असेच इथे आर्या नावाचे पण एक गाव आहे! ) रामायण दाखविले जाते. अगदी संपुर्ण रामायण दीड तासात. मे महिन्यात तर थेट चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली उघड्यावर रामायण दाखवले जाते. हा बघा राम. जोडा हात!!!
१७) ईंधन असेही आणता येते.. त्यात लाज ती का बरे???
१८) रामसितेची जोडी. मी एक विकत घ्यायला हवी होती.. तेंव्हा ना ना केले आता उगाच गेले घ्यायचे राहूनी असे वाटत आहे... पण परदेशात काय काय साठवाव असा एक संभ्रम असतो सारखा जिवाला...
१९) हे दोघे बघा नारळ खवत आहेत आणि ते भरुन ठेवत आहे. किती छान ना!
२०) काय परत विसरलात. मी आता मुळीच च च सांगत त त नाही!!!!
२१) ही मला भेटलेली लाडकी आजी.. आज्जी!!! मला फार आवडली तिची छबी! नीटनेटके केस, अंबाडा, बाटिक पारंपरिक पोषाख, तिच्याकडच्या टोपल्या आणि टोप्या, तिचे हसू, तिच्या देहावरीन सुरुकुत्या, तिच्या कपाळावर पडलेल्या वळ्या (आठ्या नाही!) अगदी आपल्या गुरुदत्तसारख्या, तिच हिरव पोलक आणि पिवळा सारोंग. छान ना.. .अशी एखादी बोलकी आजी जवळ असायलाच हवी!
२२) मी परत सिंगापुरात जात असताना दिसणारे माउंट मेरुत आणि विमानाचे टोक. अहो पण अजून फोटो संपलेले नाहीत. सगळे फोटो क्रमवार आलेच नाही....
२३) भातशेत दुरुन बघण्यात मजा असेल पण तिथे जवळ जाऊन आपण बघावे काय चालले आहे.. असे सारखे वाटत राहते आणि आपली आगगाडी पुढे पुढे जात राहते.
२४)बोरोबुदुर मंदिरामधील ह्या घंटीच्या आकाराच्या जागेत एक एक बुद्ध ध्यान करत बसला आहे. आपला हात जर बुद्ध्याच्या पायाशी पोचला तर आपण नशिबवाण समजल्या जातो. लोक सुचनांना न जुमानता नाणी फेकतात आणि हात पोचवायचा प्रयत्न करतात. पण आपल्या भारतापेक्षा खूप कमी प्रमाणात ते सुचनांचे उल्लंघन करतात. घंटीचा आकार तर आहेच पण सोबत कमळाच्या पाकळ्या पण दिसत आहे. पायथा बघा घंटींचा मग कळेल. निरिक्षण करत करत चित्र बघा..
२५) हे आहेत लाकडी झारे ह्याचा उपयोग कालथा म्हणून देखील करता येतो. निरिक्षण नाही केले ना? कालथा का तर झार्याचे टोक बघा.. भाकरी सहज उलटता येईल.
२६) परत एकदा शेत. बघा दिसतात ना दोन माणसे टोप्या घातलेली.. मी खोटे नाही ना बोललो वरती..
२७) बोरोबुदुरचा हा नकाशा बघा आणि तो वाचा. 'उत्तर' दिशा असे लिहिले आहे. पश्चिम दिशेला भारत/बारत असे लिहिले आहे. बाकी तिमुर आणि सेलातान माहिती नाही.
२७) पायर्यांवरचे हे भातशेत जवळून छान दिसत होते मला...
२८) मुसलमान बांधवांची सुरई:
२९) ही एक जातक कथा. मला माहिती नाही पण कुठली जातक कथा असावी ही:
३०) बाटिक कापडावरील रंगरंगोटी:
३१) मन सुखावणारी हिरवळ:
३२) मघाच्या आजीबाई करकर पुढे चालल्यातः
३३) बोरोबुदुरपर्यंत शेवटी मी पोहोचलो. किती वर्षापासून बाळगलेले एक स्वप्न पुर्ण झाले. ३ चीयर्स!
३४) हे रामसिता लक्ष्मण हनुमान सर्व सर्व आहेतः
३५) ही शाळकरी कॉलेजकरी मुले बाटिक कमिजा घालून पर्यटकांकडे लक्ष ठेवून आहेत. बिचारी फुकटात माहिती देतात. मग आपण हवे तेवढे पैसे त्यांना द्यायचे जर द्यायचे असेल तर. बंधन नाही. तुमची मर्जी. मी ना अशीच तीन बाटिक कमीजे घेतलीत:
३६) मला इथे जायचय.. इथल्या चिखलात 'नंगे पैर' ...
३७) टोपलीतला खाऊ. दिनेशदा अणि निसर्गप्रेमींनो ती गुलाबी फुले कंची आहेत?:
३८) आता ९व्या शतकातले मंदिर म्हंटले की अशी हानी होणारचं ना.. तरीही मंदिर बर्यापैकी टिकून राहिले आणि UNESCO नी खूप छान नुतनीकरन केले. मला ह्या मुर्तीच्या अंगातल जानव फार फार आवडलं.
३९)कढईमधे हे बाटिकचे रंग आहे. ते रंग लावल्यानंतरचं कळतात कुठला रंग कंचा...
४०) हे आहे १९२० मधले ITB (Institute Technology Bandung) just like our IIT Powai. आता ह्याचा लोगो बघा. गणेशाची प्रतिमा हा लोगो आहे त्यांचा. आणि हे महाविद्यायल गणेश लेन मधे आहे. नवल ना?!
४१)भातपेरणी करताना. पण मला कळत नाही भाताचे हे कंद रोप जे काही असेल ते परत का पेरावे लागतात. एकदाच पेरुन नाही का काम होत? आमच्या विदर्भात परत परत असे काम नाही करत. एकदा गहू पेरला की तो तिथेच राहीन.
४२) रात्रीला तिथे कटपुटलीचा खेळ असतो. कटपुटली अशी तयार होत आहे. म्हशीच्या कातळावर खिळ्यानी छिद्रे पाडून.. पुढे आणखी चित्रे येतीलच.
४३) वर मी गणेश लेन म्हणालो ना? हो ना.. तिथलाच हा गणपती. नमस्कार करा!
४४)बाटिक हे प्रपंचाचे मुख्य साधन आहे. रस्त्यावरील खांबांवर देखील खाली बाटिक डिझाईनची माहिती दिली आहे.
४५)बघा 'कुयीरी/कोयरी' नावाची बाटिक डिझाईन कशी असते त्याबद्दल इथे माहिती लिहिली आहे. आमच्या विदर्भात हळदीकुंकु ठेवायला कोयरी/कुयीरी नावाचे एक स्टीलचे भांडे मिळते. मी ते इथे काढू शकत नाही.
४६) ह्या पणत्या आहेत मातिच्या पण ह्याचा उपयोग जेवणासाठी करतात. संदर्भः वरचे ताट बघा.
४७)हे तिथले चटकमटक खाणे. १००० वेळा विचार करावा लागतो शाकाहारी की मांसाहारी!!!! पाप की पुण्य! मास पोटात जाण्याचे भय! अबब!!!
४८) अशी ताजी गुलाबाची फुले मज्जित मधे जाताना वहायला घेऊन जातात लोक. सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्यांचा वास. तो वास नंतर नकोसा नकोसा होतो मग. एक खास मुसलमानी गंध चिकटतो अंगाला.
४९) अहाहा! ही नारळ बघून देवळात गेल्यासारखे वाटले. ह्या शेंगा नक्की कशाच्या सगळीकडे ह्या शेंगा दिसत गेल्यात मला.. इथेही दिसतात. एकदा करुन खाऊन बघेन आता:
५०)रामायण सादर करणारी नट-नटांची फळी:
५१)बोरोबुदुर...आता हे सगळे चित्र पाहिल्यानंतर बोरोबुदुरचे विकिपेडिया वाचा. कळले ना?
५२)यम्मी चिक्की! गुळ आणि खोबरे खालून केलेली चिक्की. गुळ अगदी खराखुरा. मस्त चव होती. ताजे नारळ.. ताजा गुळ नि पोटात भुक.
५३)उतरा/उत्तरा:
५४)मघाशी जे महाविद्यालय सांगितले तिथे मला अमिताब बच्चन पास्ता मिळाला पण मी तो न खाता दुसरेच काहीतरी खाल्ली. बांडुंग मधे खायची प्यायची केवढी तरी रेलचेल आहे. अगदी शाकाहारी माणसाला देखील. थक्क करणारे रेस्टारंट आहेत तिथे!
५५)दुपारचे जेवण विकणारा. चांगली सोय आहे खरचं.. आपल्याकडे अशी सोय मी फक्त डोंबीवलीला पोळीभाजी केंदातच पाहिलेली आहे.
५६) राजा रामः
५७)जटायुचे पंख छाटलेले:
५८)बोरोबुदुरः
५९)बाटिकः
६०) अंतरिक्षः
६१) सोवळ्यात हार ओवण्याचे काम सुरु आहे:
६२) फणसः
६३) दाट हिरवा रंग..
६४) खलबत्ता विकणारी मुले. मी एक घेतला. जर लसूण, आले आणि मिरच्याचे पेष्ट तयार करायचे असेल तर लगेच होते. बत्ता हा हत्तीच्या सुळ्याच्या आकाराचा असतो.
६५)बाटिकः
६६)
६७)हिरवीगार पसरलेली शेती.. ईंडोनेशियाच्या हिरवळीवर जीव जडला:
६८)सगळीकडे अशी कणसे भाजून मिळतात. मी चारी दिवस चार चार कणसे खाल्ली आहेत. कणसे भाजायला खास असा पंखा असतो आणि चुलपण वेगळी.
६९)
७०)बोरोबुदुरच्या बाहेर गणोबाचे सुवेनिअरः
७१) उद्याच्या 'सोतो आयाम' करायला कोंबडा आणि कोंबडी!
७२)
७३) हनी अननस:
७४)नूडल्स:
७५)
७६) हे आहेतः 'melinjo nuts'.
७७)
७८)
७९)
८०)
८१)
८२)कशाची भाजी आहे ही?
८३)
८४)बाटिक रुमालः
८५)हे आहे गमेलन. संगीताचा एक प्रकार. गमेलन हा शब्द मला आपल्या संमेलनासारखा वाटतो.
८६)
८७)
शेवटचे चित्र...झुंजुमुंजु पहाटे फणस कापणारी ही ताई. चेहर्यावरचे स्मितहास्य फारच आवडले.
सुरेख फोटोज आणि वर्णन,
सुरेख फोटोज आणि वर्णन, बी.
धष्टपुष्ट टोप्या, म्हशीचं कातळ, कॉलेजकरी मुलं, चुबुकडुबुक, मज्जित!!
अधलेमधले तुझे विचित्र गंमतीशीर शब्द पण धमाल आणतात
येस बी, ह्या लेखावर मी
येस बी, ह्या लेखावर मी आवडल्याचा प्रतिसाद दिलाय पण तुम्ही ह्यात डोंबिवलीच्या पोळी-भाजी केंद्राचा उल्लेख केलात ते भावले होते.
Pages