Submitted by prafull shiledar on 6 April, 2012 - 06:55
वाघ
प्रत्येकाजवळ असतो
तसा माझ्याहीजवळ होता एक वाघ
कुणाला फारसा न आवडणारा
लोक दूरदूरच राहायचे त्याच्यापासून आणि माझ्यापासुनही
मी कापली त्याची नखं
जबडा उघडून स्वतःच हलक्या हाताने
काढून टाकले त्याचे सगळे दात
मिशीचे ताठ उभे केसही कापले
काही कोलांटउड्या आणि एक मजेदार नाच शिकवला
त्याला गुदगुल्या केल्या कि तो हसायचा
आणि तो देखील उलट गुदगुल्या करू लागायचा
झकास झाले...
वाघ आणि मी खूपच आवडू लागलो सगळ्यांना
शेळ्यामेंढ्यामध्ये तर आमची फारच तारीफ सुरु आहे
- प्रफुल्ल शिलेदार
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
हलक्या हाताने वाघाचे दात कसे
हलक्या हाताने वाघाचे दात कसे काढायचे!!!
(No subject)