चांदणस्पर्श

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

खूप सुरेख. क्षण बरोबर पकडला आहे. कधी स्वतःचा छोटासा झाडांत लपलेला टुमदार बंगला झाला ना तर नक्की चांदण स्पर्श नाव ठेवीन आणि तुम्हाला चहा पोहे खायला बोलवेन. Happy तो शब्दच फार आवडला.

धन्यवाद सर्वांना!

सत्यजितः rmd-2 काय आहे? Happy मला एकदम Ra.one सारखं वाटतंय.

अश्विनीमामी: जरूर! Happy तुमचा असा बंगला व्हावा अशी मी प्रार्थना करेन. ( शेवटी चहा पोह्यांचा सवाल आहे ना! Happy ). कौतुकाबद्दल आभार.