तावदान

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुढेमागे होणारं खिडकीचं तावदान
एक वावटळ घरात घुसणारी
नि:शब्द बडबडीला आलेला ऊत
मधमाश्यांची गुणगुण, वैताग स्साला!
मोहाचं मोहोळ, डंखाचं सुख
कलंडू पाहतोय काचेचा ग्लास
भिरीभिरी वारं, भिरभिरत्या डोळ्यांत
तावदान अजूनही वाजतंच आहे!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

रुपा, मागिल लागोपाठ तीन कवितांपेक्षा ही अगदी वेगळी आणि खरीखुरी वाटणारी कविता. तू नियमित लिहायला लागलीस ह्याचा मनस्वी आनंद होतो आहे. तू खूपच छान लिहितेस.. अजून लिहि.