छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.
बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)
बारा महाल
१) पोते (कोशागार)
२) थट्टी (गोशाळा)
३) शेरी (आरामशाळा)
४) वहिली (रथशाळा)
५) कोठी (धान्यागार)
६) सौदागीर
७) टकसाल (मुद्राशाळा)
८) दरुनी (अंत:पुर)
९) पागा (अश्वशाळा)
१०) ईमारत (शिल्पशाळा)
११) पालखी (शिबिका)
१२) छबिना (रात्रिरक्षणं)
अठरा कारखाने
१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)
२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)
३) अंबरखाना (धान्यशाळा)
४) आबदारखाना (जलस्थानम)
५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)
६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)
७) जामदारखाना (वनसागर)
८) जिरातेखाना (शस्त्रागार)
९) मुदबखखाना (पाकालयम)
१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)
११) शिकारखाना (पक्षिशाळा)
१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)
१३) शहतखाना (आरोग्यगृह)
१४) पीलखाना (हत्तीगृह)
१५) फरासखाना (अस्तरणागार)
१६) उश्टरखाना (उंटशाळा)
१७) तोपखाना (यंत्रशाळा)
१८) दप्तरखाना (लेखनशाळा)
बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
छान माहीती अजुन येउदे
छान माहीती अजुन येउदे
हाय रोहन.. बर्याच दिवसानी
हाय रोहन.. बर्याच दिवसानी दिसलास..
नेहमीप्रमाणेच छान ,रोचक माहिती..
यातील फक्त काहीच शब्दांचा अर्थ माहीत होता...
राजाभिषेका नंतर संस्कृत व
राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती >> हे मला जाम आवडते
...
आणि "उत्तर पेशवाईत व्यवहार फारसी मध्ये असे" ... हे खरे असेल तर अजिबात निषेध .... असो ...
अरे व्वा! मस्तच माहिती.
अरे व्वा! मस्तच माहिती.
फरासखाना म्हणजे काय?
फरासखाना म्हणजे काय? प्रेतशाला (शवागार) की काय?
रोहन - पेशवाई च्या वेळची ,
रोहन - पेशवाई च्या वेळची , त्या वेळच्या छत्रपतींनी लावलेली, दैनंदिन कारभारची व्यवस्था कशी होती?
रंजक माहिती. माझे आजोबा,
रंजक माहिती.
माझे आजोबा, कोठावळे या पदावर होते.
छान माहिती धन्यवाद >>>> आणि
छान माहिती
धन्यवाद
>>>> आणि "उत्तर पेशवाईत व्यवहार फारसी मध्ये असे" ... हे खरे असेल तर अजिबात निषेध .... <<<
हल्लीच्या राज्यकारभारातील इन्ग्रजी व्यवहाराचादेखिल "अज्जिबात" निषेध करुयात ना?
अजुन माहिती येऊदे. खुप छान
अजुन माहिती येऊदे. खुप छान माहिती आहे.
गो.नि. दांडेकरांचं एक
गो.नि. दांडेकरांचं एक महाराष्ट्र दर्शन नामक पुस्तक आहे. जमल तर वाचा.
चारूदत... त्यावर वेगळा धागाच
चारूदत... त्यावर वेगळा धागाच काढावा लागेल..
थोरले बाजीराव यांच्यापासून मराठ्यांनी साम्राज्य विस्तार धोरण स्वीकारले होते आणि त्यामुळे नव्याने शिंदे-होळकर-पवार-गायकवाड सारखे सरदार निर्माण केले गेले आणि त्यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. त्यातून साम्राज्य विस्तार झाला पण अनेक डोईजड होतील अश्या गोष्टी देखील घडल्या.
बरोबर लिंबूटिंबू..
बरोबर लिंबूटिंबू..
चारुदत्त... आज आपण व्यवहारात इंग्रजी वापरतो याचे कारण जे आहे तेच कारण उत्तर पेशवाई मधल्या फारशी भाषेच्या वापराला आहे.
मस्त माहिती ...
मस्त माहिती ...
मस्त माहीती !! लिंबु >>>>>
मस्त माहीती !!
लिंबु >>>>>
आपला प्रतिसाद " मुखपुस्तकम् " वरील "भिंती"वर "स्थिती अद्यतनम्" करण्या सारखा आहे !!:हहगलो:
नावावरून अंदाज येतो तरी, या
नावावरून अंदाज येतो तरी, या सर्व महालात/ कारखान्यात कामे कोणत्या स्वरूपाची, कशी अंमलात येत असत यावर काही माहिती मिळू शकेन का?
फारच उत्तम माहिती
फारच उत्तम माहिती
अभ्यासपूर्ण सुरेख माहिती.
अभ्यासपूर्ण सुरेख माहिती. फारच छान सिरीज सुरू केली आहे. धन्यवाद.
छान माहीती...
छान माहीती...
हि मॅनेजमेंन्ट स्ट्रॅटेजी आणि
हि मॅनेजमेंन्ट स्ट्रॅटेजी आणि सध्याची MNC ची पद्धत सारखिच
.... वाह क्या बात ....
नावावरून अंदाज येतो तरी, या
नावावरून अंदाज येतो तरी, या सर्व महालात/ कारखान्यात कामे कोणत्या स्वरूपाची, कशी अंमलात येत असत यावर काही माहिती मिळू शकेन का? >>>>> अनुमोदन