निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शांकली Happy
जिप्सी, १ ले फूल रामधनचंपाचे नसावे,पानांचा फोटो टाकणार का?>>>>पानाचा फोटो काढायला विसरलो Sad फुलात असणार्‍या काळ्या बिया पाहुन मला रामधनचंपा वाटलं.
हे पवई उद्यानात टिपलेले काहि फोटो

आणि ३ नं चे पिवळ्या कांचनाचे आहे.
पिवळा कांचन तुला कुठे बघायला मिळाला? आणि ते रोप केवढे मोठे होते?>>>>>पिवळा कांचन कर्नाटकात इडगुंजी गणेश मंदिराजवळ बघितला. रोप साधारण पाच ते सहा फूट उंचीचे असेल. पानांच्या आकारावरून नक्की समजत नव्हता कि आपटा आहे कि पिवळा कांचन (खरं ह्या रोपाच्या अवतीभोवती भरपूर कचरा होता, त्या कचर्‍यात घुसुन मी हा फोटो काढला. मित्र म्हणत होते याला काहिही दिसले तरी आणि कशाचाही फोटो काढतो Sad ). सफेद कंचन, गुलाबी कंचन, रक्तकांचन पाहिला आणि आता पिवळाही त्यामुळे हा फोटो काढल्याचे आता पूर्ण समाधान होत आहे. Happy

जिप्सी.. मस्तं फोटो..
एक शंका....त्या दुसर्‍या प्रचि. मध्ये काळी बी आहे...? एवढी मोठ्ठी..?

त्या दुसर्‍या प्रचि. मध्ये काळी बि आहे...? एवढी मोठ्ठी..?>>>>हो ती बी आहे. Happy एकुण पाच बिया होत्या. दुसरा फोटो सापडत नाहीए Sad

संयुक्तात ही बातमी दिली पण निग प्रेमींना कशी कळणार म्हणून इथे..........
नोव्हे.च्या "तनिष्का"त माझी माबोवर पूर्वप्रसिद्ध "सेलफोन इष्टोरी" आली आहे.

पवई उद्यानात फोटो काढलेलं फूल रामधनचंपा आहे, पण ते पहिलं फोटोतलं फूल मला नाही ओळखता येत Sad
इतक्या अडचणीच्या ठिकाणी जाऊन फोटो काढलेस!! अर्थात हे तुला नेहेमीच करावं लागत असेल म्हणा! तुझं कुठल्या शब्दांत कौतुक करावं तेच समजत नाहीये. केवळ ग्रेट!!
पाना-फुलांचे, झाडांचे फोटो काढणारा माणूस हा नक्की वेडा बिडाय असाच लोकांचा समज असतो. तू बिल्कूल लक्ष देऊ नकोस.
ह्या सर्व कांचन मंडळींची पानं सेम असतात!! अपवाद फक्त सेमला कांचनाचा. इथे पुण्यात आघारकर संशोधन संस्थेत त्याचा खूप मोठा वृक्ष आहे. कधी पुण्यात आलास तर (त्याचा फुलण्याचा हंगाम सप्टेंबर असतो) तर नक्की फोटो काढ.
आता ऑफिसला पळते.

शांकली, त्या लाल कळ्या आहेत कि फळं. सुंदरच दिसताहेत. दुसरे सोनटक्क्याच्या कुळातले आहे, त्याला अगदी क्वचित फुले आलेली दिसतात (फोटत दिसतोय तो पुष्पकोश आहे.)
जिप्स्या ती गुलाबी पंचकोनी आहे ती रामधनचंपा नाही. आता फोटो काढशील तर पुर्ण झाडाचा, पानांचा असे काढत जा. म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होईल पुढे.
आणि पिवळा कांचन खरेच दुर्मिळ आहे. हे फूल आणखी उमलायला हवे होते म्हणजे तो टिपिकल कांचनाचा आकार दिसला असता.

गिरि, तो बहाव्याच्या शेंगातला गर आपणही खाऊ शकतो (अर्थात शेंग किडली नसेल तरच) पण जपून.. अतिसारावरचे औषध आहे ते.

दिनेशदा, कोकण बदललं नाही हो. आजीच्या दारचं ते रिंग्याचं झाड खूप वर्षांपुर्वीपासूनचं होतं. आता आजीची सगळीच झाडं डेव्हलपमेंटमध्ये गेली Sad आळूचं झाड, बेल, लाल पेरु, आवळा, पोफळी, लिंबू, आंबा, फणस, रातांबा आणि अगणित फुलझाडं गेली.

जिप्सीच्या फोटोतल्या पिवळ्या कांचनासारखंच फूल मी मागच्या महिन्यात बघितलं ... चोरडिया फार्मवर. सात आठ फूट उंचीचं झाड होतं. आणि त्याची सगळी फुलं अशीच अर्धवट उमललेली होती. पानं आपटा / कांचनासरखीच. मुक्या जास्वंदीसारखा हा मुका पिवळा कांचन असावा Happy

हो अश्विनी, काही बदल मात्र खरेच चांगले आहेत. पुर्वी चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर जगणारे कोकण आता काहितरी उद्योग करु पाहतेय.
पुर्वी कल्पनाही करु शकलो नसतो अशी काही उत्पादने (करवंदाचा जॅम, काजूचे सरबत) आता बाजारात मिळतात.
मी लहानपणी अगदी निष्क्रिय कोकण बघितलेय. पावसाचे दिवस संपले, कि पुढच्या पावसाची वाट बघणारे.

बहुतेक सगळ्यांची परिस्थिती यथातथाच असल्याने, एकमेकांना धरुन रहायची पद्धत आहे (भले कोर्टकचेर्‍या का करेनात.) मुलीच्या लग्नातल्या हुंड्यापायी, कुणी कर्जबाजारी झालेय, असे नाही दिसत. कारण मुलीचे लग्न हा बडेजाव मिरवायचा प्रसंग कधीच नसायचा. सगळ्या गावाचे सहकार्य मिळायचे, शुभ कार्यात.
मालवणला दरवर्षी जात असू आम्ही, पण तारकर्ली वगैरे ठिकाणे त्या काळात माहित असली तरी प्रसिद्ध नव्हती. हॉटेल्स एवढी नव्हती. वाहतुकीच्या सोयी नव्हत्या. थेट एस्टी पण नियमित नव्हती, एकतर बोटीने जायचे किंवा कोल्हापूर मार्गे.
मालवणला थेट जायला १७ तास लागायचे मुंबईहून. (त्यावेळी खाडी पूल नव्हता, कळव्यामार्गे जावे लागायचे.) पण आता बरेच वर्षात जाणे झाले नाही.

हो अश्विनी, काही बदल मात्र खरेच चांगले आहेत. पुर्वी चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर जगणारे कोकण आता काहितरी उद्योग करु पाहतेय.>>
अगदी अगदी. पर्यटन पण बर्‍यापैकी मिळकत देत आहे लोकांना. जिकडे तिकडे MTDC परवांगी असलेले बंगलोज, रोसॉर्टस, मालवणी खानावळी पण.

मालवणला दरवर्षी जात असू आम्ही, पण तारकर्ली वगैरे ठिकाणे त्या काळात माहित असली तरी प्रसिद्ध नव्हती.>>
पिंगुळी, कुडाळ ते मालवण रस्त्यावर कालवड नावाच गाव आहे. खुप म्हणजे खुप सुंदर कोकणी गाव. तिथे हाउसबोटची व्यवस्था चालु केलेली. आता सुरु आहे कि नाही माहीत नाही.

मालवणला थेट जायला १७ तास लागायचे मुंबईहून. (त्यावेळी खाडी पूल नव्हता, कळव्यामार्गे जावे लागायचे.) पण आता बरेच वर्षात जाणे झाले नाही.>>
माझा मामा तर सांगतो त्यांच्या लहानपणी बोटिने मुंबइला जाव लागायच.

करवंदाचा जॅम, काजूचे सरबत >> करवंदाचे सरबत हे पण एक भन्नाट उत्पादन आहे. 'ग्राहक' मधे मिळते वर्षातून एकदा. बाहेर कुठे मिळते ते नाही माहीत.

मानुषी अभिनंदन.

योगेश आपट्याच्या पानांचा आकार छोटा आणि पाण जाड असते तर कांचनची पाने मोठी आणि पातळ असतात.

माझ्याकडे लावलेल्या हदग्याला रोज २-३ फुले येतात मी सगळी एका पिशवीत रोज जमवतेय. बहुतेक उद्या किंवा परवा भाजी करेन.

माधव, तुम्हीसुद्धा 'ग्राहक'मधूनच सामान भरता दरमहिन्याला? गेल्या महिन्यात मी शुद्ध जांभूळ रस घेतलाय आणि संपू नये म्हणून पितच नाहिये Uhoh

पुर्वी कोकमं आणि काजूची बोंडे अक्षरशः झाडाखाली कुजून जायची. कुणी घरगुति स्वरुपात अमृतकोकम केले तरच (साखरही मिळत नसे.) काजूची दारू गाळायला महाराष्ट्रात परवानगी नव्हती (अजूनही नाही) आता सगळी बोंडे पेडण्यात जातात.
पण अजूनही काही खाद्यपदार्थ, हॉटेलात पण मिळत नाहीत. (फालसांचे सरबत, चुनकापं, सातकापे घावण, लवंगलतिका, धोंडस, भज्यांची आमटी... ) शिवाय भयंकर तिखट म्हणजे मालवणी असे एक विचित्र समीकरण हॉटेलवाल्यांनी बनवलेय.
आणि कोकणातही प्रत्येक गावची चव वेगळी असते. (आमच्या घरी राजापुरी, रत्नागिरी, देवरुखे, मालवणी अश्या सगळ्या गावच्या काक्या माम्या असल्याने, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनत असत.)

भरकटलो ना मी !

आणि संपू नये म्हणून पितच नाहिये

अश्वे Lol

दिनेशदा छान लिहीलत. पुर्वीच कोकण डोळ्यासमोर न बघता आणलत.

अश्विनी हो, आमचे वाणसामान ग्राहक मधूनच असते. ह्या वर्षी आत्याने ते करवंदाचे सरबत घेतले होते - ट्राय करून बघू म्हणून. मला ते प्रचंड आवडले पण आता पुढच्या जूनशिवाय ते वाटपात नाही Sad पण तिच्याकडे ते कोणाला आवडले नाही म्हणून तिच्याकडे गेल्यावर ती आणि मी ते सरबत इतरांकडे तु.क. टाकत प्यायचो.

जांभळाचा रस नाही माहित पण आमच्याकडे आईने डाळींबाचा रस घेतला आहे. कोणी गिर्‍हाईक नाही त्याला Happy जांभळाचा रस पुष्पकजवळच्या शीतल फार्मसीत मिळायचा आधी आता नाही माहित.

दिनेश ती काजूची बोंड खायला कसली मस्त लागतात! बीच्या बाजूचा अर्धा भाग कापून फेकून द्यायचा (चिकामुळे) आणि उरलेला भाग मीठ लावून खायचा. मस्त गोड-तुरट-खारट चव येते. हल्ली तुरट चवीचे काही खाल्लेच नाही जात. पूर्वी आम्ही पेरुची कोवळी पाने खायचो. आणि तोंड तुरट झाले की पाणी प्यायचो मस्त गोड लागायचे पाणी.

मी लहान असताना वालचंदनगरला रहात होतो तेव्हा आमच्या दारात स्पॅथेडीयाचे झाड होते. आम्ही त्याला पिचकारीचे झाड म्हणायचो.

दिनेशदा, त्या लाल रंगाच्या कळ्या आहेत. पूर्ण उमललेली फुलं मात्र बघता आली नाहीत. Sad
जागू, धामण आत्ता फुलली आहे? आणि तुझा कॅमेरा भारीये हं! कारण इतक्या उंचीवर असलेल्या धामणीच्या फुलांचा फोटो काढता आलाय!

हो. ही झाडे पुण्यात खुप ठिकाणी आहेत. आम्ही पिचकारीच म्हणायचो. आफ्रिकन टुलिप पण म्हणतात ना यांना.

(फालसांचे सरबत, चुनकापं, सातकापे घावण, लवंगलतिका, धोंडस, भज्यांची आमटी... >>>>>
ह्या पदार्थांची नावं मी आजच पहिल्यांदा वाचली. पैकी लवंगलतिका हा पदार्थ कमलाबाई ओगले यांच्या रुचिरा पुस्तकात वाचल्याचं आठवतंय.
दिनेशदा, खरंच तुमच्या लिखाणातून कोकण जाणवलं अगदी. अशाच गमती जमती लिहीत जा नं म्हणजे आमच्या सारख्या देशावरच्या लोकांना माहीत नसलेलं कोकण माहिती होईल!

शांकली, माझं आजोळ देशावरचंच ना. त्यावेळी विशाळगडाजवळून थेट राजापूरला लोक चालत जात असत. माझे आजोबा आणि त्यांची आई तशी जात असे. राजापूरातून हळद, सुके खोबरे, कुळीथ, जवळा असा माल येत असे. या व्यापारातून झालेल्या ओळखीतूनच माझ्या आईबाबांचे लग्न ठरले.

सुके खोबरे आपल्याकडे प्रत्येक पुजेत लागतंच, पण ते कोकणातूनच यायचे. नारळही तितका सहज मिळत नसे. (म्हणून तो कौतूकाने देवाला द्यायचा) या सुक्या खोबर्‍याची गंमत म्हणजे तो जेजुरीच्या खंडोबाला लागतो तसाच कोल्हापुरी चटणीतही. पण त्याचे पिक मात्र देशावर येत नाही. कुळथाचे माडगं, पिठलं अगदी पुर्वापार देशावर लोकप्रिय, त्याचेही पिक देशावर येत नाही. आणि भाकरी आणि जवळ्याचे सुके हा देशावरील शेतकर्‍याचा, पावसाळ्यातला आवडीचा आहार. त्यातला जवळा पण कोकणातूनच वर येणार.

देशावर जरा पुढे गेलो, म्हणजे नाशिक वगैरे भागात तर जेवणात नारळाचा वापर जवळजवळ नसतोच पण घाटमाथ्यावरच्या गावात (मलकापूर, राधानगरी, गगनबावडा) भागात मात्र ओल्या सुक्या नारळाचा वापर असतो. राजापुरी जेवणातही थोडेफार सुके खोबरे असते.
या घाटांमधून पुर्वापार लोक जात येत होते, त्यात रस्ते मात्र नंतर झाले. देश आणि कोकण, हा वाद किंवा लोकांमधील लव्ह हेट रिलेशनशिप पुर्वापार होती. आजही आपण तसे शब्दप्रयोग करतोच.
कोकणे भात बोकणे, कोकणस्थ नेमस्त असे अजूनही कानावर येते. पण आमच्याघरात मात्र मध्यममार्गच राहिला कायम.

Pages