निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, ती हूव्हर फ्लायची सिडीच सापडत नाहीये.
त्यांच्याच एका सिडित मोठ्या आकाराच्या म्हणजे दोन
फ़ुट आकाराच्या चतुराचे फ़ॉसिल दाखवलेय. मग तो
उडताना कसा दिसत असेल, याचेही कल्पनाचित्र आहे.
त्यामानाने हे पिटुकलेच.

दिनेशदा, गूगलवर david attenborough hover fly असे टाईप केले की ती व्हिडिओ क्लिप दिसतिये.
मात्र तुम्ही म्हणताय त्या चतुराची क्लिप बघायलाच हवी. तुमच्यामुळे अशी शोधाशोध करायला चालना मिळते, आणि डोक्यातला गंज निघायला पाहिजे अशी किंचित किंचित जाणीव होते. त्यामुळे असा एखादा क्लू १/२ दिवसांआड तुमच्याकडून मिळावा ही अपेक्षा Happy

दिनेशदा,
किंजळ वृक्ष Terminalia paniculata ह्याचा फुलण्याचा काळ कोणता? त्याची फुलं साधारणपणे आंब्याच्या मोहोरासारखीच दिसतात का?. कारण मागच्या महिन्यात आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा किंजळ खूप बघायला मिळाला पण काही वृक्ष लालसर फळांनी बहरले होते, तर काही आंब्याच्या मोहोरांसारखे तुरे असलेले होते. त्यात पुन्हा रिठ्याचा फुलण्याचा काळ हाच असल्याने; आणि त्याचेही असेच तुरे असल्याने लांबून कळत नव्हते की अशा तुर्‍यांचं झाड हे रिठा की किंजळ. आणि कोकणात ही झाडं खूपच आहेत. पानं पण बरीचशी सारखी वाटली ह्या दोन्ही झाडांची. त्यामुळे दोघांच्या फुलण्याच्या काळावरूनच फरक समजेल असं वाटतंय.

लोकहो, एक सांगा.
आजपर्यंत माझा असा समज होता की खंड्या पक्षी पाणवठ्याच्या आसपासच दिसतो. पण आज सकाळी येताना जेथे जवळ आसपास कुठेच पाणवठा वगैरे नाही अश्या ठिकाणी दिसला. पुण्यात पण भल्या सकाळी उंच तारेवर बसलेले दिसतात.

जरा गोंधळ दुर करणार का? Happy

कारण मागच्या महिन्यात आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा किंजळ खूप बघायला मिळाला पण काही वृक्ष लालसर फळांनी बहरले होते, तर काही आंब्याच्या मोहोरांसारखे तुरे असलेले होते>>>>>शांकली, हे ते झाड का? मी आत्ताच्या कर्नाटक भटकंतीत पाहिलेले.

आणि हे झाड कुठले?

जिप्स्या अरे मला फोटोशॉपची माहीती दे$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ किती भाव खातोस ? मेल, विपू सगळे केलेत.

जिप्स्या तो वरचा पहीला फोटो बहुतेक रिठ्याचा असावा. श्रावणीच्या शाळेजवळ पण मी पाहीला मागच्या आठवड्यात. ती दुसरी लाल तुर्‍यांची झाड कोकणात जागोजागी बहरली होती कसली आहेत ती ?

शांकली बरोबर मीच विसरले होते. ते गो-ग्रिन नर्सरीमध्ये मला दिसले होते झाड श्रीलंकन तरगरचे.

शांकली ती लाल फळे चौधारी असतात ना ? मला नाही वाटत त्याचा काहि उपयोग असेल असा. कारण सुकली तरी झाडावरच असतात ती. (जिप्स्या तेच झाड )
पण कोकणात रिठा नाही दिसत फारसा. हिरडा मात्र भरपुर, राधानगरी, दाजीपूर, अंबोली, आंबाघाट परिसर इथेही खुप आहे. (विशालगडावर शिकेकाई आणि तमालपत्र आहेत)
पण आता ते फुलण्याचा काळ वगैरे पार डोक्यातून गेलेय, सध्या आमच्याकडे कैर्‍याही मिळतात आणि आंबेही. पाऊसही आहे आणि थंडीही..

मालवणला रिठा भरपुर होता. आइ सांगते तिच्या लहानपणी रात्री घरातल्या खोबर्‍याच तेल, सकाळी उठल्यावर फणीने खसाखसा केस विंचरुन मग कागदी लिंबु कापुन केसांच्या मुळावर घासायचेत. आणि मग रिठाच्या पाण्याने आंघोळ.

ही आहे कोकिळा.
१.
२.
३.
४.
५.पण हा कोकिळ मात्र तिला या झाडावर अजिबात येऊन देत नाही. आली की असा मागे लागतो.

६. स्वतः मात्र असा फळ खात असतो.

पण कोकणात रिठा नाही दिसत फारसा. >>> असतो की ! चिपळूणात आजीच्या परसदारी व जवळच्या प्रत्येक घराच्या अंगणात रिठा (रिंग्ये) होता.

जागू, उद्या हापिसात गेल्यावर नक्की पाठवतो. आज रजा घेतलीय. Happy

किती भाव खातोस ? मेल, विपू सगळे केलेत. >>>>>"किती भाव खातोस मेल्या? विपु सगळं केलंय". मी असं काहिसं वाचलं Proud Happy

कोकण बदललं बॉ.
माझ्या आठवणी धूसर झाल्या आता.
शोभा, फोटोची साईझ लहान ठेवली तर नीट दिसतील.
आणि कोकिळ, कोकिळेच्या मागे नाही लागणार तर काय कावळीणीच्या मागे लागेल का ?

लोकहो, एक सांगा.
आजपर्यंत माझा असा समज होता की खंड्या पक्षी पाणवठ्याच्या आसपासच दिसतो. पण आज सकाळी येताना जेथे जवळ आसपास कुठेच पाणवठा वगैरे नाही अश्या ठिकाणी दिसला. पुण्यात पण भल्या सकाळी उंच तारेवर बसलेले दिसतात.

जरा गोंधळ दुर करणार का?

गिरी, मी खंड्या पक्षी पाणवठ्यावर पाहिले आणि उंच तारेवर बसलेले सुद्धा. पण तारेवर बसलेलेच जास्त पाहिले. Happy

आजपर्यंत माझा असा समज होता की खंड्या पक्षी पाणवठ्याच्या आसपासच दिसतो

उंच तारेवरुन त्याला दिसत असणार पाणवठ्याच्या जागा. हेरत बसला असेल तिथुन. Happy

जिप्सी, हीच ती झाडं. लाल फुलोरा आलेला 'किंजळ' - दुसरा 'रिठा' ; पण असेच तुरे असलेलं अजून एकप्रकारचं झाड दिसलं त्यात आणि रिठ्यात माझा गोंधळ होतोय. कारण त्यालाही असेच तुरे होते पण पानं जराशी वेगळी वाटली. झाडं लांब असल्याने पानांमधला फरक मला कळला नाही. कारण लाल फळं असलेल्या किंजळासारख्याच झाडांना काही ठिकाणी आंब्याच्या मोहोरासारखे तुरे होते.
तू काढलेले फोटो मात्र फारच सुंदर.
काही दिवसांपूर्वी मी पण किंजळ,रिठा,टेटू,ऑस्ट्रेलियन बाभूळ यांचे फोटो इथे दिले होते. मागच्या कुठल्यातरी पानावर आहेत ते.
आणि कोकिळ, कोकिळेच्या मागे नाही लागणार तर काय कावळीणीच्या मागे लागेल का ?>>>>>>:हाहा:

गिरीकंद, आमच्याइथेही खंड्या असाच तारांवर बसलेला असतो. जवळपास कुठेही पाणवठा नाही. तरी हा आपला मजेत तारांवर जरा कर्कश्श आवाजात गात असतो. माझाही असाच समज होता की तो अट्टल मासेखाऊ आहे पण तो इतर प्राणी - सरडे,बेडूक पण खातो.

अरे खंड्या पक्षी आहे, तो उडू शकतो, खाऊन वगैरे झाल्यावर तो भटकायला बाहेर पडतो. आणि त्याला मोठा जलाशयच नाही तर डबकेही चालते, मासे पकडायचा.
त्याचे निरिक्षण करताना एक बघता येते, सूर्याची स्थिती बघून तो आपला डुबकी मारायचा कोन ठरवतो. त्याची सावली कधीही पाण्यातल्या माश्यावर पडत नाही.

अरे खंड्या पक्षी आहे, तो उडू शकतो, खाऊन वगैरे झाल्यावर तो भटकायला बाहेर पडतो. आणि त्याला मोठा जलाशयच नाही तर डबकेही चालते, मासे पकडायचा.>>>>>>>>>>> Lol

मधे एका नर्सरीत गेले होते, तिथे ही सुंदर वेल बघितली. त्यांना नाव विचारल्यावर सांगितले Combiratum

Combiratum.jpg

पण ह्या फुलांची नावं मला माहित नाहीयेत. दिनेशदा सांगू शकतील.. हे लाल फुलाचं रोप जहांगीर हॉस्पिटलमधे बघायला मिळालं

Image0744.jpg

आणि हे असंच एकांकडे बघायला मिळालं.

Image0769.jpg

किती भाव खातोस मेल्या?
जिप्स्या अरे हा शब्दच माझ्या तोंडातून निघत नाही तर माझ्या लिखाणात कसा येईल ? आणि तुझ्यासारख्या गुणी मुलाबद्दल तर कधीच नाही निघणार. :स्मितः

शांकली ती २ नंबरची मला हळद, सोनटक्का, कर्दळ ह्या जातीपैकी काहीतरी वाटत.

जिप्सी, १ ले फूल रामधनचंपाचे नसावे,पानांचा फोटो टाकणार का? आणि ३ नं चे पिवळ्या कांचनाचे आहे.
पिवळा कांचन तुला कुठे बघायला मिळाला? आणि ते रोप केवढे मोठे होते? सांगू शकशील?.....

पिवळ्या बहाव्याच्या बियांपासुन झाड येईल का हो? आज सकाळि एके ठिकाणी पिवळा बहावा पाहीला, फुलोरा नव्हता पण लांब सडक शेंगा लटकल्या होत्या.

गिरी, त्या बियांवर थोडी प्रोसेस करावी लागेल, आणि मग रुजतील. (बहाव्याच्या शेंगांमधे गर असतो, तो माकडं खातात बियांसकट! मग........... पोटातून बाहेर पडलेल्या बिया रुजतात!) गमतीचा भाग सोडला तर अशा नैसर्गिक पद्धतीने incubate झालेल्या बिया रुजतात. इंगळहाळीकरांच्या 'आसमंत' पुस्तकात याबद्द्ल जरा माहिती दिली आहे.

Pages